हवाईदलातील कार्यकाळात रेल्वेप्रवासातील घडलेले मजेशीर किस्से भाग - २

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
20 Nov 2009 - 11:58 am

:H हवाईदलातील कार्यकाळात रेल्वेप्रवासातील घडलेले मजेशीर किस्से भाग - २ :T

कोट लटकला गाडीत !

हवाईदलातील नोकरीत अकाऊंट्स ऑफिसर्सना ऑडीटच्या कामासाठी डेहराडूनला सीडीए (कंट्रोलर डिफेन्स अकाऊंट्स) ऑफिसच्या भोज्याला शिवायला दरवर्षी जाणे अनिवार्य असते. अशीच कामे घेऊन मी श्रीनगरला व्हाया जम्मू परतत होतो. सर्व कामे सुरळीत झाल्याने मी खुषीत होतो. अमृतसरला जाणाऱ्या गाडीत फर्स्टक्लास कूपेतील सहप्रवासी पांढऱ्या सफेद कपड्यातील ग्यानी सरदारजींशी गप्पा मारून मी ताणून दिली. कारण पहाटे ३ नंतर कडाक्याच्या थंडीत उतरून जम्मूच्या गाडीत चढण्याचे दिव्य करायचे होते. रात्री १२।। ला मला अचानक जाग आली. बाहेर अंबाला स्टेशन आले होते. विचार केला पटकन उतरावे व आत्ताच जम्मूला जाणाऱ्या गाडीत चढावे म्हणजे नंतर उतरायचे झंझट नको. लगेच होल्ड-ऑलचे पट्टे बांधून गाशा गुंडाळला. उतरलो. समोरच्या ठेलेवाल्याकडून गरमागरम चहाचा गिलास ओठांना लावला. तोवर मी आलेली गाडी गेली. मी चहाचे पैसे द्यायला खिशात हात घातला अन् लक्षात आले की पाकीट, वॉरंट व अन्य महत्वाची कागदपत्रे ठेवलेला कोट गाडीतल्या खुंटीला लटकलेला राहिला. गाडी तर गेली! झाले. वाटले आता कसला कोट परत मिळतोय. पुढची ट्रेन तासाभराने आली. वाटले की प्रयत्न करून पाहावे मिळाला तर मिळाला. म्हणून चढलो गाडीत. आता जम्मू ऐवजी अमृतसरला जाणे भाग होते. करत करत अमृतसरला लॉस्ट अँड फाऊंड खिडकीपाशी नकार मिळाल्यावर फार निराशा आली. आणखी चौकशी करता ‘त्या गाडीतील टीसींच्या रेस्टरुमवर पहा प्रयत्न करून’ एकांनी सल्ला दिला. मी त्या खोलीकडे जाता जाता एकदम हाक आली, ‘आई ये भाईसाहब, हम आपकी ही राह देख रहे है.’ माझा कोट हातात देत तो म्हणाला, ‘ये लो आपकी अमानत’. सर्व वस्तू ठाकठीक असल्याचे पाहून माझा चेहरा खुलला. ‘धन्यवाद आप उस ग्यानी सरदारजी को देना जिन्होंने ये कोट आप का होने की बात की’. त्या टीसीं परतीच्या प्रवासासाठी जालंधरपर्यंत त्यांच्या बरोबर येण्यचे सुचवले. तो पर्यंतचा वेळ मी स्वर्ण मंदीर, जालियनवाला बाग पहात घालवला. सहज नजर गेली सिनेमाच्या पोस्टरवर सुनील दत्त, प्रेमनाथचा ग्यानीजी पिक्चर लागला होता. आठवले की या पिक्चरचे शूटींग एअर फोर्स स्टेशन चंदीगढला झाले होते. तेंव्हा आपण त्यात होतो. सिनेमात तो शॉट आला. लढाई जिंकून हिरो फ्लाईंग ऑफिसर सुनील दत्तला महावीर चक्र मिळते. त्याचे कडकडून अभिनंदन करायला आम्ही हवाईदलातील खरे ऑफिसर्स विमानतळावर हजर असतो. मी मला ओझरता पहायला मजा वाटली. अशीच मजा नंतर हवाईदलात असताना माझ्यावरील घडलेल्या सत्य घटनेवर आधारित ‘मन में है विश्वास’च्या सीरियलमधे २६ जानेवारी २००७ ला दाखवलेल्या एका एपिसोडचे शूटींग पहाताना आली. कारण त्यात आमच्या घरच्या सर्वांची भूमिका करणाऱ्या शशिकांत, अलका, चिन्मय व नेहा या कलाकारांतून आम्ही आम्हालाच पहात होतो. श्रद्धा व भक्ती तीव्र असेल तर अशक्यातीत घटनांवर कशी तोड निघते याचे ते अदभूत उहादाहरण होते!

चुकीच्या वॉरंटचा घोळ!
नवी दिल्ली जवळ फरीदाबादच्या एअर फोर्स स्टेशनमधून चेन्नई - तांबरमला - पोस्टींगवर जायला सर्व सामानाची बांधाबांध करून आम्ही तयार झालो होतो. संध्याकाळच्या जीटीचे रिझर्वेशन झालेले. त्याच दिवशी नेमका इतका भयंकर धोधो पाऊस सुरु झाला की थांबायचे नाव काढेना. सामान घेऊन जाणारा ट्रक मथुरा रोडवर अडकून पडलेला. आयत्या दुसरा छोटा ट्रक मिळाला. तो आला तेंव्हा दुपारचे २ वाजलेले. फियाट गाडी त्यात मावेना. तिची मागची बाजू ट्रकच्या बाहेर आलेली. पावसाच्या धारात उरलेले सामान कसेबसे ठासून त्यावर टार्पोलिनने करकचून बांधून ट्रक रवाना झाला. त्यातच ५ वाजले. नवी दिल्ली स्टेशनवर आम्हाला पोचवायला एक बसभरून साथिदार जमलेले. पावसामुळे बँक बंद त्यामुळे बरेच पैसे जवळ. बसमधून बरोबरचे सामान उतरवून घेण्याला माझा जुनियर फ्लाईंग ऑफिसर चार्लस थॉमस हिरीरीने कामाला लागला. मी वॉरंट एक्सचेंज करायला तिकिटाच्या खिडकीत हात घातला आणि काढला कारण ते परत मला देत क्लार्कची फरमाईश झाली, ‘हे वॉरंट चालणार नाही. कारण त्याच्या वरची तारीख चुकीची आहे. नवे आणा नाहीतर पैसे भरून तिकिट विकत घ्या’. झाले. वादविवाद करण्यात वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. मी परत सौभाग्यवतींकडून झटपट दहा हजाराची एक गड्डी घेऊन निघालो. त्या काळात एसी क्लासचे तिकिट काढायला नवी दिल्ली रेल्वेस्टेशनचे संपूर्ण १० प्लॅटफॉर्म ओलांडून जावे लागे. तोवर गाडी प्लॅटफॉर्मला केंव्हाच लागलेली. क्यू तोडून मी तिकिट विकत घेतले. पाऊस थांबण्याचे नाव नव्हते. रस्ते निसरडे. शूजमधे पाणी जाऊन ते मणामणाच्या ओझ्याचे झालेले. आयुष्यात प्रथम वाटले की आज गाडी चुकणार. सकाळपासुनच्या कामाचा थकवा इतका आला होता. घरच्यांचे चेहरे आठवले. आत्ता पाय लटपटून चालणार नव्हते. एकदम उत्साह वाटला. पावले झपझप टाकत मी धावलो. तिकडे गार्डने हिरवा झेंडा दाखवला व मी थॉमसच्या हाती ते वॉरंट ठेवले व कोणी गलती केली ते शोधायला सांगितले. मी गुड बाय करून हात हलवत असताना एक वयस्क बाई गाडीत शिरु लागल्या. त्यांना मी हात देऊन वेळेवर आत ओढले. त्यांचे सामान कुलीकडून घेतले. त्यांचा समाधानाचा चेहरा पाहून मला त्या दिवशीच्या कष्टांचे चीज झाले असे वाटले. पुढे वॉरंट लिहिण्यातील चुकी बद्दल दिलगिरी व्यक्त करणारे कमांडिंग ऑफिसरचे पत्र मला आले. अर्धी बाहेर लटकलेली कार व अन्य सामान व्यवस्थित तांबरमला मिळाले.

नव्या वेळापत्रकाचा फटका!

जळगावच्या सासुरवाडीचा पाहुणचार घेऊन आम्ही पत्नीसह पुण्याला परतत होतो. संध्याकाळच्या ७।। च्या महाराष्ट्र एक्सप्रेसचे रिझर्वेशन झालेले. जावईबापूंचा वेळेवर पोहोचायचा खाक्या माहित असल्याने सासूबाई आधीच धास्तावलेल्या. रिक्षेतून सामान काढेपर्यंत गाडी आल्याची घंटा झालेली. सामान बरेच होते. गाडी येऊ थांबली तरी मी दुसरी खेप करत होतो. इकडे मुले, पत्नी आत चढले. मी चालती गाडी पकडली तेंव्हा सासूबाईंचा जीव भांड्यात पडला.

तो दिवस होता १ ऑक्टोबर. नवे टाईमटेबल त्याच दिवसापासून अमलात आल्याने महाराष्ट्र एक्सप्रेस २०-२५ मिनिटे आधी पोचली होती. त्यावेळी कॉम्प्युटराईज्ड तिकिटे नसल्याने वेळेतील बदल समजणे शक्य नव्हते. असो.

प्रवासात भेटलेले प्रकाशक!

पुणे रेल्वे स्टेशन. दुपारची वेळ. कोयना एक्सप्रेस. एक ग्रहस्थ छातीवर पुस्तक ठेऊन समोरच्या बाकावर ऐसपैस झोपले होते. त्यांच्या छातीवरील पुस्तक अलगद घेऊन मी वाचायला लागलो. नंतर त्यांच्याशी ओळख झाली. गप्पात त्यांनी त्यांच्या अनेक प्रकाशक मित्रांची जवळीक वर्णन केली. पैकी एक होते इस्लामपुरच्या मनेकामना प्रकाशनाचे आनंद हांडे! त्यांनी अनेक पुस्तके छापली आहेत. त्यांची खपवायची पण हातोटी चांगली आहे. असे त्यांनी आवर्जून सांगितले. पुढे हांड्यांशी मी पत्रव्यवहार केला व त्यांनी माझी “अपछाय़िता उर्फ अंधार छाया” ही सत्य घटनेवर आधारित कादंबरी प्रकाशित केली. खपवली. आज तिच्या प्रती बाजारात उपलब्ध नाहीत. नव्हे एकुलती एक प्रत मी दुसऱ्या आवृत्तीसाठी बाळगून आहे. आश्चर्य असे की आज पर्यंत मी त्या प्रकाशकांना प्रत्यक्ष कधीच भेटलेलो नाही!

अशीच एक भेट रेल्वे प्रवासात मनमाडला डॉ अनिल फळे यांची. पहाटेची वेळ. मी झोपलेलो. तशात त्यांनी माझ्या जवळील नाडी ग्रंथावरील माझे पुस्तक उत्सुकतेने चाळले. नाडीग्रंथावर त्यांच्या दिवाळी अंकासाठी लेख आग्रहाने मागितले नंतर काही त्यांनी छापले. ते बाड नंतर पुण्याच्या नितिन प्रकाशनच्या गोगट्यांना भावले. त्यामधून आज नाडी ग्रंथ भविष्य पुस्तकाच्या ५ आवृत्त्या निघाल्या.
गिरगाव मुंबईचे नियतकालिकांचे वितरक श्री. बागवेंची ओळख कै. गोखले यांच्या अशाच एका प्रवासामधून झाली. त्यांनी नाडीग्रंथावर एक पुस्तकही छापले. त्याचे निळ्या-जांभळ्या रंगातील आकर्षक मुखपृष्ठ नंतर अनेक अन्य संहितांच्या पुस्तकावर झळकताना दिसले. त्यावरून आठवले की महाराष्ट्र टाईम्सच्या दैनदिन भविष्य कथन सदराच्या लोगोतील महर्षींचे चित्र माझ्या हिंदीपुस्तक - नाड़ी ग्रंथ एक चमत्कार या मुखपृष्ठाचे आहे. असो.
या शिवाय मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात तान्ह्या चिन्मयला घेऊन अंबाल्याच्या स्टेशनवर मी अचानक उतरून दुसरी एसीट्रेन पकडण्याचे केलेले धाडस! झाशी–कानपूर रात्रीच्या प्रवासात फर्स्टक्लासच्या कूपेत वरच्या बर्थवर सुरे घेऊन बसलेल्या टारगट पोरापोरींचे फाजिल चाळे! सांगलीच्या स्टेशनवर अपरात्री महालक्ष्मी एक्सप्रेसच्या गार्डच्या डब्यातून खाली उतरल्याने घरच्यांची उडालेली झोप!

:-C असे अनेक प्रसंग आठवून मजा वाटते. हे सर्व घडायला माझी हवाईदलातील कारकीर्द कारणभूत होती. त्या शिवाय असे थ्रिल कसे अनुभवायला मिळाले असते?

------------------------------------------------------------------------

संस्कृतीप्रवासमौजमजाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

20 Nov 2009 - 12:44 pm | अमोल केळकर

भा१ प्रमाणे भाग २ ही आवडला

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Nov 2009 - 12:47 pm | llपुण्याचे पेशवेll

भाग १ प्रमाणे भाग २ दमदार नाही वाटला. कदाचित डीटेलिंगमधे कमी पडला का?
(सुस्पष्ट)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

परिकथेतील राजकुमार's picture

20 Nov 2009 - 5:21 pm | परिकथेतील राजकुमार

पुपेशी सहमत आहे.

पहिल्या भागातील मजा दुसर्‍या भागात आली नाही, थोडा एकसुरीपणा वाटला. परंतु ह्या भागात 'स्पेसींग , पॅरा' वगैरेच वापर केल्याने वाचन एकदम सुटसुतीत झाले.

पु. ले. शु.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

टुकुल's picture

20 Nov 2009 - 9:54 pm | टुकुल

सहमत,

<<कदाचित डीटेलिंगमधे कमी पडला का >>
खुपच कमी पडला अस वाटत आहे, प्रत्येक अनुभवावर एक लेख झाला असता.

--टुकुल

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Nov 2009 - 10:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मलाही असंच वाटलं. पहिली गोष्ट वाचायला मजा आली, पण पुढच्यात तेवढी मजा नाही आली.

अदिती

सुमीत's picture

20 Nov 2009 - 4:34 pm | सुमीत

तुमचे अनुभव छान आहेत असे नाही लिहित कारण त्या वेळी तुमच्या मनाची परिस्थिती तुम्हालाच माहीत.
पण, ते वाचायला छान वाटले कारण तुम्ही छान लिहिलेच आहेत. :)

प्रभो's picture

20 Nov 2009 - 8:43 pm | प्रभो

आवडला....पुढचा भाग कधी??

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

कदाचित झाले असावे असे वाटते! ;) (ह.घ्या.)
शशिकांत साहेब, एकेका भागात दोन किंवा तीन आठवणी मस्त खुलवून सांगा राव, त्याशिवाय मजा नाही!!

(खुद के साथ बातां : रंगा, ओक साहेबांचे कुठलेही लिखाण हे 'नाडीच्या' उल्लेखाशिवाय का बरं पूर्ण होत नाही? :? )

('नाड'लेला)चतुरंग

jaypal's picture

20 Nov 2009 - 11:18 pm | jaypal

रंगाशेठ आपली लिखाणातली ईलास्टीसीटी मानली बुवा.
आम्ही आपला ताण देतोय...देतोय. तुटायची वेळ आली पण .......
नाद(ड)वलेला
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

पाषाणभेद's picture

21 Nov 2009 - 8:21 am | पाषाणभेद

तुमच्या डिपार्टमेंटला चालत असतील तर ईतरही किस्से आवडतील.
--------------------
काय? घरात वॉल टू वॉल कारपेट टाकायचे नाही? मग घरात स्लीपर वापरा.

पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Nov 2009 - 10:52 am | llपुण्याचे पेशवेll


टॅग बंद केला.

प्रसन्न केसकर's picture

22 Nov 2009 - 2:07 pm | प्रसन्न केसकर

दुसरा भाग त्यामानानं गुंडाळल्यासारखा वाटला. पण एकुणच वाचायला छान होतं लिखाण. लिहिते रहा असेच म्हणतो.

निखिल देशपांडे's picture

23 Nov 2009 - 10:56 am | निखिल देशपांडे

पहिला भाग अधिक आवडला असेच म्हणतो.
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

मदनबाण's picture

23 Nov 2009 - 3:59 am | मदनबाण

दोन्ही भाग वाचले...१ला जास्त आवडला. :)
बाकी तुम्ही नाडी प्रकरण काही सोडत नाही बुवा !!! ;)
और भी आने दो...

मदनबाण.....

"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo

विजुभाऊ's picture

23 Nov 2009 - 11:51 am | विजुभाऊ

निवृत्तीनन्तरच्या गाथा असे एखादे पुस्तक का नाही काढत हो ओक काका.
अर्थात हे नाडी पेक्षा निदान काही टक्के बरे.........