ही एक १०० टक्के सत्य घटना आहे.
मागे मी एकदा मलेश्यातील क्वाला लुंपूर या शहरी गेलो होतो. संध्याकाळी काम संपवून जरा दिवसा-उजेडी हॉटेलवर परत आलो. हॉटेल शेजारीच एक पार्क होता म्हणून एक चक्कर मारायला तिथं गेलो. का कुणास ठाऊक, पण पार्कमध्ये कोणी चिटपाखरूही नव्हतं. एक-दोन फेरफटके मारल्यावर हिंदुस्तानी चेहेर्याचा एक पंचविशीतला तरुण कांहींसा "खोया-खोयासा" चेहरा करून एका बाकड्यावर बसलेला दिसला. आधी आपल्या देशाचा असावा म्हणून मी त्याला "हॅलो" केले. तो थोडासा बुजलेला दिसत होता. कांहींसा बिचकत-बिचकत अवघडतच तो उभा राहिला व "आप कहाँसे हैं?" असे त्याने मला विचारले.
मी म्हटलं "मै हिंदुस्तानी हूँ|".
हे ऐकून तो आणखीनच बिचकला.
ते लक्षात आल्यावर मी त्याला विचारलं, ""आप कहाँके हैं?"
"मैं पाकिस्तानी हूँ|" तो म्हणाला.
"कोई बात नहीं| चलो साथमें घूमते हैं|" मी म्हणालो.
तो माझ्याबरोबर चालू लागला. आधी थोडा गप्पसा होता, पण थोड्या वेळाने बोलू लागला. मूळचा पेशावरचा रहिवासी, पण तो थायलंडमध्ये शिंपीकाम करायला आला होता व क्वाला लुंपूरला व्हिसाच्या कामासाठी एक दिवस आला होता. पेशावरला एक बायको होतीच, पण त्याने थायलंडमध्ये आणखी एक लग्न केले होते व या नव्या बायकोबरोबर तो तिथे रहात होता.
"आप ऐसे कैसे कर सकते हैं?" मी विचारले.
"उसमे कोई नयी बात नहीं जी| वहाँ हम सभी लोग ऐसेही करते हैं!" तो उत्तरला.
आता काय बोलायचे म्हणून मी जरा विचारात पडलो. पण तो त्याच्या पेशावरच्या बायकोबद्दल आपणहून बोलू लागला. त्याने त्याच्या नात्यातल्याच मुलीशी लग्न केले होते. "ऐसे क्यूं" या प्रश्नाला उत्तर देतांना तो म्हणाला "यही रिवाज अच्छा है। घरमें बाहरके रिश्तेके साथ बाहरके (म्हणजेच वधूचे नातेवाईक) लोग आकर खामखाँ बात खराब कर देते हैं। राईका पर्बत बना देते हैं। इसलिये रिश्तेवालीसे शादी करनेसे घरके तमाम सवाल घरके अंदरही रहते हैं, बाहर नहीं जाते। इसलिये हम रिश्तेमेंही शादी-ब्याह करते हैं।"
मी तर हा विचार ऐकून चकितच झालो.
"मगर रिश्तेदारोंसे शादी करनेसे बच्चे ठीक नहीं पैदा हों तो?" मी विचारले.
"ऐसी कोई बात नही जी|" उत्तर. अज्ञानात केवढे सुख आहे!
मग कसे कुणास ठाऊक, पण आमचे संभाषण संततीनियमनाकडे वळले.
"अपनी अमदनीमें अगर हम बच्चोंकी परवरिश अच्छी तरहसे नहीं कर सकते तो आप फॅमिली-प्लानिंग क्यूँ नहीं करते? क्यूँ उसके खिलाफ हैं?" मी विचारले.
"अरे साहब, ऐसा करनेसे आप अगले नबीको जनम लेनेसे रोक रहे हैं ये आपने कभी सोचा है? जिसका जनम हमने रोका वो कलका बडा सायंटिस्ट हो सकता था, कोई बडा लीडर, बडा नबी हो सकता था! उसका जनम रोकना बिल्कुल गलत है!"
मी अवाक् झालो! कां कुणास ठाऊक, पण त्याच्याशी झालेले हे संभाषण व त्यातला त्याचा युक्तिवाद इतक्या वर्षांनंतरही माझ्या लक्षात राहिला आहे. कुटुंबनियोजन का करू नये तर आपण जो गर्भ राहू दिला नाहीं तो आईनस्टाईनचा असू शकतो किंवा नव्या संताचा, नव्या प्रेषिताचा असू शकतो हा त्याचा मुद्दा बिनतोड होता. पण अशा विचारांवर विश्वास ठेवणारा तो मला आतापर्यंत भेटलेल्या माणसांत पहिलाच व एकुलता एक माणूस होता. विचार करण्याची ही एक अनोखी रीत होती यात कांहीं शंका नाहीं.
कोणी असे विचार त्याच्या मनात बिंबविले असतील व त्यावर त्याचा कसा विश्वास बसला असेल हाही एक विचार करण्यासारखा व जास्त सखोलपणे अभ्यास करण्याजोगा विषय आहे असे आजही मला वाटते.
हळू-हळू आमच्यातले संभाषणाचे विषय संपले, अंधारही पडू लागला होता. मग आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
पण तो पोरगेलासा भांबावलेला किडकिडीत तरुण आजही मला माझ्या मनःचक्षूपुढे दिसतो आणि त्याचे हे विचारही माझ्या लक्षात राहिले आहेत.
तुम्हाला हे वाचून काय वाटले?
प्रतिक्रिया
16 Nov 2009 - 11:01 pm | चतुरंग
काळेसाहेब, अहो तुम्ही त्या तरुणाच्या भाबड्या भाषणात वाहून गेलात ह्याचे आश्चर्य वाटते. अहो तो पुढला गर्भ जो कुणी आईनस्टाईन किंवा संत असू शकतो तो कधी? जेव्हा त्याला नीट खायलाप्यायला असेल, तो/ती शिकू शकेल, व्यवस्थित विचार करून जगू शकेल तेव्हाच ना?
आणि असा लाखात एखादा निघणार बाकी सार्या पिलावळीचे काय?
संतती वाढती ठेवून आम्हाला कामाला जास्ती हात मिळतात हाही त्यातलाच एक विचार! अरे कामाला मिळणारे हात हे कामाजोगे होईपर्यंतच्या काळाचा विचार करा! जन्मापासून मधली १८ वर्षे ते जीव कोण वाढवणार, कसे वाढवणार? प्रश्नचप्रश्न.
अशा भोळ्या समजुतीत अडकल्यानेच आपण लोकसंख्येचे नियंत्रण करु शकलो नाही आहोत.
एक क्षणिक भावनिक आवाहन ह्यापलीकडे माझ्या दॄष्टीने ह्याला किंमत नाही.
(सज्जड)चतुरंग
16 Nov 2009 - 11:54 pm | दिपाली पाटिल
अगदी हेच म्हणते...
>>आणि असा लाखात एखादा निघणार बाकी सार्या पिलावळीचे काय? हा प्रश्न ही अगदी खरा...मग पोसता येत नाही म्हणून पडेल ती कामं करणे आहेच त्यांच्या नशिबी मग झोपडपट्टी, आतंकवादी हे सगळं तिकडूनच येतं पण खरंतर काळेकाका त्याला काही ज्ञान देण्याच्या फंदात नाही पडले तेच बरं...गाढवापूढे वाचली गीता...असं आहे त्या अजनबीचं...
अवांतरः पण ये कथा बोले तो चालू होते ही खतम हो गयी... :D
दिपाली :)
17 Nov 2009 - 12:15 am | प्रभो
त्यातून एक आईनस्टाईन आणी १०० कसाब निघणार असतील तर???? :?
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
16 Nov 2009 - 11:49 pm | टारझन
कसली पाण्चट पाण्चट लोकं भेटतात हो काका तुम्हाला ? आणि त्यांचे पाण्चट अनुभव तुम्ही अगदी लक्षात ठेऊन तुम्ही लेख ही लिहीता ? कमाल आहे !!
असो .. पुढील अनुभव लेखणास शुभेच्छा !!
--(सहि विडंबण फार प्रयत्न करून टाळलं आहे) टारझन
17 Nov 2009 - 12:04 am | निमीत्त मात्र
सहमत आहे!
निवांत बागेत बसलेलो असताना मला प्रश्न विचारायला आलं कुणीतरी. आधीच कामानं थकलेलो त्यात ह्यांचे प्रश्न. दिलं तिच्यायला जे मनात आले ते ठोकून.
असा लेख त्यानेही लिहिला असेल कुठल्यातरी पाकिस्तानी साईटवर?
17 Nov 2009 - 7:16 am | सुधीर काळे
टारझन-जी,
खरं सांगायचं तर संधी मिळाल्यास अशा (पांचट) लोकांशी मी आवर्जून बोलतो. इथं इंडोनेशयातही कमी मिळकतीच्या माणसांशी - माझे कामगार, माझा ड्रायव्हर, बाजारात भेटणारे व थोडेसे ओळखीचे झालेले - मी आवर्जून व मुद्दाम बोलतो, खास करून राजकारण/समाजकारण या विषयांवर, कारण त्यांचं मत "पाचामुखी परमेश्वर" असतं व ते जे होईल असं वर्तवतात ते हमखास होतं.
थोडक्यात काय कीं "कोण" बोलतो यापेक्षा तो "काय" बोलतो याला मी महत्व देतो.
आमचे एकेकाळचे हुकुमशहा सुहार्तो यांच्याबद्दल ही गरीब माणसं जितकं प्रेमानं बोलतात ते ऐकून आश्चर्य वाटतं. कारण या माणसाचं अद्याप एकही स्मारक या देशात झालेलं नाही! पण गरीब लोक मनापासून बोलतात, कारण त्याकाळी किमती कमी व परवडणार्या होत्या. रस्त्यावर गुन्हेगारी शून्य होती. म्हणून त्याच्याबद्दल अशा भावना आहेत. ते त्यांच्या मनतलं बोलतात मला जे ऐकायला आवडेल ते नाहीं बोलत. व मी ते बोलणे एंजॉय करतो.
एलीट लोक वेगळं बोलतात!
पण एकूण प्रतिसादांचा रोख पाहून व "पाचामुखी परमेश्वर" हे तत्व वापरून हा लेख चुकीच्या जागी पोस्ट केला (परी तू जागा चुकलासी) याची जाणीव झाली व तुम्ही म्हटल्याप्रमाणे भावी लिखाणात मी जास्त सारासार विचार करून योग्य लेख पोस्ट करीन. सकारात्मक सल्ल्याबद्दल धन्यवाद!
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
17 Nov 2009 - 10:21 am | टारझन
काळे काका ... "पाचामुखी परमेश्वर" =)) प्लिज !!
आहो .. काही तरी *त्त्यासारख्याच्या बडबडीचा लेख बनवलाय तुम्ही !! आणि हा काय विचार आहे होय ? मग आम्ही तर अशा विचारांवर १०० लेख बनवू आणि टाकू !! हा विचार पोचवण्यात हाशील ते काय ? काहीही विचार आहेत .. आणि त्यामुळे लेखही काहीही झालाय !!! तुम्ही नको त्या गोष्टीचा विचार पार किस पाडेपर्यंत करता असं अनुमान निघतंय आता !
असो, स्वांतसुखाय लेखनास बंदी नसते :) चालू द्या !!
एखाद विडंबण लिहीण्याबाबद विचार करतोय आता .
- (अल्ला के घर धीर है लेकिन सुधीर नही) टारझन
18 Nov 2009 - 12:12 am | निमीत्त मात्र
१००?? सामंतांनी तर ३०० च्यावर टाकलेले :D
16 Nov 2009 - 11:57 pm | बहुगुणी
चतुरंगांशी अगदी सहमत आहे.
17 Nov 2009 - 4:59 am | नंदू
लेखन शैलीवरून सामंत काकांची आठवण झाली.
नंदू
17 Nov 2009 - 5:05 am | प्राजु
एक क्षणिक भावनिक आवाहन ह्यापलीकडे माझ्या दॄष्टीने ह्याला किंमत नाही.
चतुरंग यांच्याशी सहमत आहे..
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
17 Nov 2009 - 6:10 am | सन्जोप राव
बीथोव्हनच्या गोष्टीची आठवण झाली.
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
17 Nov 2009 - 6:58 am | सुधीर काळे
चतुरंग-जी,
हे माझं मत म्हणून नाहीं सांगितलं. माझा या संभाषणावर विश्वास बसला असं कुठलं वाक्य दिसलं तुम्हाला? मी म्हटलं की संततिनियमाविरुद्ध मी अनेक मुद्दे ऐकले होते, पण हा मुद्दा कधी ऐकला नव्हता!
या माणसांना ही मतं उपजत फुटत नाहींत, तर त्यांना कुणीतरी शिकवण देऊन असली मतं पटवून देतात व प्रजाजनन चालू रहातं! तर अशा मतांचा उगम पाहून त्याच्यावर उपाय केला पाहिजे.
माझ्या मते याला एकच प्रभावी उपाय आहे-स्त्री शिक्षण! जे आज ग्रामीण पाकिस्तानात (व ग्रामीण भारतातही) खूप कमी आहे.
मी केवळ यांचे शिक्षक काय-काय विचार या भोळ्या लोकांच्या डोक्यात इतक्या यशस्वीपणे भिनवितात त्याने थक्क झालो. सांगणारा अगदी मनापासून बोलत होता.
मलाही हे माहीत आहे की यातली जास्त बहुसंख्य मुलं न शिकता-सवरता पोट भरण्यासाठी कसाबच बनणार!
असो.
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
17 Nov 2009 - 7:33 am | शाहरुख
त्याला विचारायचे ना की "भावा, तू कैसे सायंटीस्ट नही बना "
सायंटीस्ट हा सायंटीस्टचा बिल्ला हातात घेऊन जन्माला येत नाही हे त्याला पटवून द्यायला हवे होते.
17 Nov 2009 - 11:36 am | JAGOMOHANPYARE
पाकिस्तान हा मुद्दा धरला तर योग्य विचार आहेत....... आइन्स्टाईन, प्रेशित हे असले करोडो मुले जन्माला घातली की एक एक होणार... मग हिशोब बराबरच आहे...
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
17 Nov 2009 - 12:01 pm | सुधीर काळे
चला, एक तरी प्रतिसाद बरा आला! आता जरा बरं वाटतय.....
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
17 Nov 2009 - 12:05 pm | सहज
हा हा हा!
लेखानंतर एक मॉडेल प्रतिसाद देत चला बॉ. :-) सोपे जाईल.
धागा विरंगुळा लेखनप्रकारात आहे म्हणून हलकेच घ्या हो!
17 Nov 2009 - 12:16 pm | सुनील
त्यापेक्षा, २१ अपेक्षित प्रतिसादांचा संच दिल्यास, आम्हाला चॉइस करणे सोपे जाईल!! ;)
(अवांतर - आमच्या काळी हे २१ अपेक्षित प्रश्नसंचांचे फॅड होते. हल्लीचे ठाऊक नाही)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
17 Nov 2009 - 1:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
१. व्यनि पहा
२. ***-जी (अनुकूल) लेख/प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
३. अमाहासउ
४. या विषयावर मी फलाण्या वर्तमानपत्रात अमुक एक दिवशी पत्रं लिहीलं होतं.
५. हे 'प्रकाटाआ' म्हणजे काय असतं? कोणी सांगणार का?
इ.इ.
अदिती
17 Nov 2009 - 1:12 pm | सुधीर काळे
बस, आपकीही कमी थी| वोभी पूरी हो गयी!
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
17 Nov 2009 - 1:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आपापसांत गप्पांसाठी तात्यांनी खरडवहीची सोय केली आहे, तिचा वापर करावा. प्रत्येकच धाग्यावर अवांतर लिहू नये.
-- आणिबाणीचा नोटीसकर्ता
(ही सही टार्याला सादर समर्पण)
17 Nov 2009 - 1:21 pm | परिकथेतील राजकुमार
'आपापसात गप्पांसाठी' होय ! मी चुकुन 'अवांतर गाण्यासाठी' असे वाचले.
©º°¨¨°º© पराहद्दी पलिकडे ©º°¨¨°º©
आमचे राज्य
17 Nov 2009 - 1:45 pm | सुनील
हिंदीतून प्रतिसाद देऊन हिंदीचा सन्मान केल्याबद्दल आपले अभिनंदन!
सुनील आझमी
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
17 Nov 2009 - 1:26 pm | नंदन
आदिती, फारच खत्रुड बॉ तुम्ही. वर पुन्हा हच घ्या? आम्हांला नोकिया घ्यायचा असेल तर?
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Nov 2009 - 2:46 pm | परिकथेतील राजकुमार
पुर्णपणे सहमत आहे. अदिती खत्रुड आहे !!
अदितीला द्रष्टा (का द्रष्टी) देखील म्हणावे काय ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
17 Nov 2009 - 3:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
श्री. परिकथेतील राजकुमार-जी, तुम्ही माझ्या धाग्याची लिंक इथे दिलीत त्याबद्दल आभार. अर्थातच मी तेव्हा प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे तो लेख सर्वसमावेशक नव्हता. त्यामुळे इथे जे उदाहरण आहे, त्याचं विवेचन त्या पाकृमधे नव्हतं. पण सोदाहरण शिकवल्यास शिकणं सोपं पडतं, हे याच उदाहरणावरून लक्षात येईल. लंडनचे प्रा. ब्राऊन यांनी मला विहीरीवर फिरायला गेल्यावर हेच सांगितलं होतं.
अदिती
17 Nov 2009 - 4:12 pm | परिकथेतील राजकुमार
खुलाशाबद्दल धन्यवाद.
प्राध्यापक तिरशींगे किंवा आपले प्राध्यापक डीलीटे वगैरे जिथे संपतात
तिथे प्राध्यापक ब्राऊन सुरु होतात.
उगाच मी आपणास द्रष्टा (का द्रष्टी?) म्हणालो नाही. तुमच्याकडे जादुचा लोलक आहे का हो ? आणी हो उत्तर इथेच द्या, व्यनीतुन नको.
॥॥॥॥॥ ॥ हॅ हॅ हॅ ॥॥॥॥॥॥
©º°¨¨°º© परायक पाचकळ ©º°¨¨°º©
आमचे राज्य
17 Nov 2009 - 12:11 pm | ब्रिटिश टिंग्या
त्या पाकड्याच्या बोलण्यात पॉईंट आहे! फक्त तो चुकीचा आहे :)
17 Nov 2009 - 12:19 pm | लवंगी
हा पॉईंट आवडला ... :)
17 Nov 2009 - 12:43 pm | वेताळ
गरीबी मुळे बिचार्याला फक्त दोनच लग्ने करता आली.काका त्याला ज्यादा पैशे कमावण्याच्या टिप्स दिल्या असत्या तर त्याने अजुन दोन-चार बायका केल्या असत्याना.तेवढेच प्रेशित व सायंटिस्ट निपज काम वेगाने वाढले असते.तुमचा जाहिर निषेध करावा तेवढा थोडाच आहे.
वेताळ
17 Nov 2009 - 10:45 pm | सुधीर काळे
अहो वेता़ळ-जी, माझा निषेध कशाला? मी नाहीं दोन लग्नं केली. मी फक्त आमच्यात झालेलं संभाषण सांगितलं. त्याने असा एक अजब मुद्दा सांगितला जो मलाही हास्यास्पद वाटला तरी त्याला पूर्णपणे पटला होता व तो अगदी मनापासून, प्रामाणिकपणे सांगत होता. तो आर्थिक परिस्थितीने गरीब नसेलही, शिंप्याचा धंदा करत होता व मिळकत विचारण्यापर्यंत आमची मजल गेली नाहीं. पण परवडेल तर करेलही आणखी लग्नं.
मुद्दा हा आहे कीं पाकिस्तान नाहींसा झाला तर अशाच माणसांशी गाठ पडायची आहे?
सुधीर
अवांतर: अशी बहुपत्निकत्वाची चाल उटा (Utah) राज्यातल्या मॉर्मॉन जमातीतही आहे. घराला जितकी धुराडी तितक्या बायकाशी त्या पुरुषाने लग्न केलेले असते असे एकदा Grand Canyon ला जाताना आमच्या वाटड्याने सांगितले होते. एक मॉर्मॉन माझा जकार्तात colleagueही होता, त्यानेही तेच सांगितले होते. असो.
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
18 Nov 2009 - 9:54 am | अमृतांजन
ह्या लोकांना एव्हढ्या बायका लग्नाला मिळतातच कशा असा मला नेहमीच पडलेला प्रश्न आहे.
बहूपत्नीत्व शक्य असेल तर ह्याचाच अर्थ स्त्री-भ्रुण हत्या व त्याच्या बरोबरीने दिलेला डाटा खोटा आहे असे म्हणता येईल का?
17 Nov 2009 - 1:50 pm | Nile
अरे क्या चल रहा है इधर? तुम लोगो ने इसे क्या विधानसभा समझ रखां है क्या? ;)
17 Nov 2009 - 2:17 pm | वि_जय
काका,
एखाद्यावेळी सापावर विश्वास ठेवा हो..
पण या अजगरांवर नको.
17 Nov 2009 - 2:41 pm | सुधीर काळे
विजय आणि अमोल,
या अशिक्षित/अर्धशिक्षित पाकिस्तान्यांचे विचार कसे चालतात हे दाखविण्यासाठी व त्याबाबतीत सर्वांना अद्ययावत राखण्यासाठी मी हा लेख लिहिला. पण असं वाटतंय कीं माझा मुद्दा मी वाचकांना समजावून सांगण्यात कमी पडलो. त्या माणसाने दोन लग्ने केली हे ऐकल्यावर मी विचारलेले "आप ऐसे कैसे कर सकते हो?" हे वाक्य कुणाला भिडले नाही किवा "अपनी अमदनीमें अगर हम बच्चोंकी परवरिश अच्छी तरहसे नहीं कर सकते तो आप फॅमिली-प्लानिंग क्यूँ नहीं करते? क्यूँ उसके खिलाफ हैं?" हेही वाक्य असंच वाया गेलं असं वाटतंय. असो. मी वाचकांना दोष देत नाहीं, माझा मुद्दा मांडण्यात मीच कमी पडलो!
पण जे कांहीं मी लिहिलंय त्याबद्दल मला पूर्ण खात्री, पूर्ण श्रद्धा आहे. हे असं शेजारच्या राष्ट्रात (किंवा आपल्याही राष्ट्रात) होत असेल तर त्याबाबत आपण कांहीं करू शकलो तर फारच छान, पण कमीतकमी अज्ञानी तरी असू नये हे माझे ठाम मत आहे.
असो. जनतेला आवडलं नाहीं हे खरं.
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
17 Nov 2009 - 4:43 pm | प्रकाश घाटपांडे
आपण जस घडल तस लिहिलत. आपण कुठे कमी पडला असे वाटले नाही. हे प्रासंगिक लेखन आहे. वाचकांचे आकलन हे व्यक्तिसापेक्ष असते. त्यात पुर्वदुषित/पोषित ग्रह असु शकतात. इथला वाचक हा वेगवेगळ्या वयोगटाचा, वेगवेगळ्या वातावरणातुन आलेला आहे. त्यामुळे मतमतांतर असु शकतात. प्रतिसाद हे फार विचारपुर्वक दिलेले असतात अशातला अजिबात भाग नसतो. केसरीचे संपादक अरविंद गोखले हे पाकिस्तान भेटीत गेल्यावर जे अनुभवाला आले त्यावर त्यांचे एक पुस्तक आहे. त्यांना सामान्य पाकिस्तानी हा लता मंगेशकर मोहमद्द रफि सह भारतीय हिंदि गाण्यांवर प्रेम करणारा आढळला. अजुन कुणाल वेगळा आढळला असेल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
17 Nov 2009 - 5:10 pm | पर्नल नेने मराठे
माझ्या ऑफिसात अनेक पाकिस्तानी आहेत.
*त्यापैकी एकाला भारताविशयी प्रचन्ड प्रेम आढ्ळ्ले. तो मुम्बै आधी कधीतरी येउन गेला आहे. त्याची अशी आशा आहे कि परत सलोखा होउन तो परत मुम्बैत येउ शकेल. कसाबबद्द्ल बोलताना तो म्हणाला कि काही नतद्रष्ट नादी लावतात व असे होते. त्याला सगळी हिन्दी गाणी आवडतात. माझे 'आपुन बोला' स्टाइल हिन्दि त्याला खुप आवडते(बॉलीवुड विशयी अधिक प्रेम).
*एकाला उगिचच पाकिस्तानचा प्रचन्द अभिमान दिसुन आला. पण माणुसकीचा माणुस वाटला (रोज एकत्र काम करतो म्हणुन हा अन्दाज).
*एक एवढा मदत करतो त्याला चुकुन मी बरेचदा भारतियच संबोधते.
सो मला आलेला अनुभव हा चान्गला आहे. कितिहि मुले जन्माला येतात ति अल्ला ताला चा आशिर्वाद म्हणुनच, आता हा त्यान्चा गैर्-समज मी दुर करत बसत नाही कारण शेवटी हे खुपच वैयक्तिक आहे.
बाकी काळेकाका इथला वाचक हा वेगवेगळ्या वयोगटाचा, वेगवेगळ्या वातावरणातुन आलेला आहे. त्यामुळे मतमतांतर असु शकतात हेच खरे. तुम्ही लिहित राहा, नविन नविन विषय हाताळले जातात.
चुचु बानो मक्तुम मराठे
17 Nov 2009 - 5:29 pm | वेताळ
त्यापैकी एकाला भारताविशयी प्रचन्ड प्रेम आढ्ळ्ले. तो मुम्बै आधी कधीतरी येउन गेला आहे. त्याची अशी आशा आहे कि परत सलोखा होउन तो परत मुम्बैत येउ शकेल.
कोणत्या बॉम्बस्फोटासाठी तो मुंबईमध्ये आला होता? कारण भारताविशयी असलेल्या प्रचन्ड प्रेमापोटी ते मुंबई येवुन बॉम्बस्फोट करतात.जरा त्याच्या पासुन सावध रहा. आणि तो परत कधी मुंबईमध्ये येवु नये हिच आमची अल्लातालाला प्रार्थना आहे.
वेताळ
17 Nov 2009 - 10:38 pm | सुधीर काळे
घाटपांडेसाहेब व चुचु,
तुम्ही सांगितलेला मुद्दा मीही अनुभवला आहे. पाकिस्तानी सरकार व जनता यात गल्लत मी तरी कधीच करत नाहीं. म्हणून तर बागेतल्या त्या पाकिस्तानी पोराला मी "चल, भटकून येऊ" म्हटलं.
एकदा इटलीत मी ज्या हॉटेलमध्ये रहात होतो त्याच हॉटेलमध्ये एक अब्बास अकबर अली नावाचे एक स्टील प्लांटचे मालक उतरले होते. मी भारतीय व त्याच धंद्यातला म्हटल्यावर आमची बर्यापैकी गट्टी बनली ती आजतागायत. ते मला नेहमी कराचीला बोलवायचे. मी गमतीत म्हणायचो "हिंमत नहीं होती". "अरे साहब, आप हमारे मेहमान हैं| आपके बालकोभी धक्का लगने नहीं देंगे वगैरे." उर्दू गझल हा एक कॉमन दुवाही निघाला. आम्ही एकमेकांना बर्याच टेप्सही दिल्या. ती मैत्री आजतागायत चालू आहे.
युरोपीय एअरलाईनवर प्रवास करताना विमानात किती तरी पाकिस्तानी माझ्या शेजारी येऊन बसलेत व ८-८ तास आमच्या गप्पा झाल्यात. फक्त काश्मीर वगैरे विषय टाळायचे.
इथे जकार्तातही मित्र म्हणता येणार नाहीं पण खूप परिचित असे पाकिस्तानी माहीत आहेत. ज्यांच्याकडून मी विमानतिकिटे घ्यायचो त्या कंपनीतही एक पाकिस्तानी होता, त्याच्या आईने मला ए व ई चा अर्थ सांगायचा प्रयत्न केला होता.
खरं तर पाकिस्तानी लोक आपल्यापेक्षा त्यांच्या सरकारला जास्त किटलेत. आपण बोलून तरी दाखवतो, त्यांना तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार मिळतो. दुबईला रहाणारी व मिपाची सदस्य असलेली एक सभासद आहे ती तर एकदा म्हणाली कीं पाकिस्तानी तर परत देशात जायला घाबरतात कारण पैसेवाले म्हणून त्यांना लुटलं जातं.
अमेरिकन लोक व सरकार जसे "वेगळे" तसेच पाकिस्तानी लोक व सरकार "वेगळे". पाकिस्तानात लष्करी सत्ता खूप दिवस राबवली गेली असल्यामुळे समीकरण बरेच वेगळे आहे.
असो. धागा सुरुवातीला जरा लडखडला, पण आता रंगलाय्. धन्यू!
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
18 Nov 2009 - 4:25 am | गणपा
दुबईतील ८-९ वर्षांच्या वास्तव्यात माला ही बरेच चांगले अनुभव आले. ज्या कंपनीत कामाला होतो ,त्यात ४५ % भारतीय, ३५ % पाकिस्तानी, १० % लंकेचे तर १०% इतर देशीय होते. त्यामुळे कामाच्या संदर्भात नेहमीच पाकिस्तानी लोकांशी संबंध यायचे.
आमची क्रिकेटची टीम पण जबर्दस्त होती. सगळी आशियायी भेळ.
पण कधी भांडण झाली नाहीत, सलग तिन वर्ष शिपींग ट्रॉफी पटकावली आमच्या टीम ने.
वाद व्हायचे नाही अस नाही पण भांडण कधी झाली नाहित. आम्ही आमच्या सणांत त्याना सहभागी करायचो ते त्याच्या सणांत आग्रहाने बोलवायचे.
त्यांच्या बोलण्यातुन नेहमी जाणवायच की तिकडचे लोक सरकारला कंटाळले आहेत. आपल्या सरकारच कौतुक करयचे. द्वेषाचा एक कलमी कार्यक्रम न राबवता तुम्ही कशी प्रगती केली आहे. शिक्षणाच्या अभावामुळे त्यांचे सरकार लोकांना कसे आपल्या तालावर हवे तसे नाचवते हे त्यांच्या बोलण्यातुन बरेच वेळा यायच.
>>धागा सुरुवातीला जरा लडखडला, पण आता रंगलाय्
काळे काकांशी सहमत
17 Nov 2009 - 5:28 pm | सुधीर काळे
धन्यवाद! जय हो!
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
17 Nov 2009 - 6:26 pm | प्रदीप
छान प्रतिसाद.
फक्त "सामान्य पाकिस्तानी हा लता मंगेशकर मोहमद्द रफि सह भारतीय हिंदि गाण्यांवर प्रेम करणारा आढळल"" इथे थोडा अडखळलो. 'लता मंगेशकर' हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखे वाटतेय, पण हे 'मोहमद रफि' कोण क्रिकेटपटू होते, त्यांचे नाव कधी कानावरून गेलेले नाही.
17 Nov 2009 - 2:19 pm | अमोल खरे
पाकिस्तानी लोकांची डोकी अशीच विचित्र चालतात. मी पण अशी काही उदाहरणे ऐकली आहेत ( लंडनमध्ये जे पाकिस्तानी आहेत टॅक्सी ड्रायव्हर वगैरे ) ते कसे बोलतात ह्यावर. फक्त होतं काय की हे सर्व आपल्याला नवीन असल्याने विचित्र वाटतं. जास्त माहिती बिपिनदा देऊ शकतील. त्यांचा अनेक पाकिस्तानी लोकांशी संबंध आला आहे असे ते पुर्वी एका लेखात म्हणाले होते.
17 Nov 2009 - 3:04 pm | वि_जय
काका,
तुमचा मुद्दा बरोबर मांडलात.
पण दगडावर डोक आपटल तर आपलाच कपाळ्मोक्ष होतो म्हणुन सावधान केले.
एका नाटकातला संवाद काहीसा असा होता
||जो गलती करता है वो इन्सान.||
||कभी गलती ना करे वो भगवान.||
||गलती करके ना माने वो शैतान||
||और बार बार गलती करे वो पकिस्तान||.
तात्पर्यः तुमच्यासारख्या विचारवंताने पाकड्यांना कितीही सल्ला देण्याचा प्रयन्त केलात तरी गाढवापुढे वाचली गीता असच होणार बर का.
यापुढे तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपर्यात भ्रमंती करीत असतांना या हिरव्या पिलावळीवर जास्त विश्वास ठेवू नये असे वाटले म्हणुन म्हटले. राग नसावा.
17 Nov 2009 - 3:40 pm | सायबा
सुधीरभाऊ,
तुमचा लेख मला समजलाही व पटलाही.
लिहा तुम्ही बिनधास.
सायबा
17 Nov 2009 - 4:28 pm | कानडाऊ योगेशु
एक अजनबी (?)..एक अनोळखी का नाही?
योग्य पर्यायी मराठी शब्द उपलब्ध असताना हिंदी शब्द वापरल्याबद्दल तुमचा निषेध..!!! (ह.घ्या)
बाकी लेख आवडला.
(गोपनीय -: एखाद्या ललित लेखाप्रमाणे ह्या लेखाला जर थोडा विद्वत्ताप्रचुर, थोडा तत्वज्ञानाचा मुलामा दिला असता तर हि&हि प्रतिसादाच्या इतक्या लेंड्या पडल्याच नसत्या.
उदा. अंधारही पडू लागला होता. मग आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. हेच वाक्य तुम्ही असेही लिहु शकला असतात.
सूर्ये पश्चिमेकडे झुकु लागला होता.तो तरुण मग आपली हातभर वाढलेली दाढी खाजवत खाजवत चालु लागला.मी ही मावळत्या सूर्याकडे पाहत त्याचा निरोप घेतला.बराच वेळ त्याच्या दाढी खाजवण्याचा आवाज मला येत होता.आजही जेव्हा तो तरुण माझ्या मनःचक्षु (निषेध.निषेध..किती अवघड शब्द.) येतो तेव्हा अचानकच मला कुठुनतरी दाढी खाजवण्याचा आवाज येऊ लागतो.
)
------------------------------------------------
मला इतरांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा अद्यापही उपलब्ध झाली नसल्याने मी कुणाच्याही खरडींना प्रतिक्रिया देवु शकत नाही आहे.
ypj@indiatimes.com .
17 Nov 2009 - 4:51 pm | टारझन
खुलाश्याबद्दल धन्यवाद ,
आपलाच ,
*डखाऊ लोकेशु
(आमच्या लेंड्या हलक्याच घ्या)
17 Nov 2009 - 5:31 pm | सुधीर काळे
एक अजनबी (?)..एक अनोळखी का नाही? (दिलगीर आहे)
बराच वेळ त्याच्या दाढी खाजवण्याचा आवाज मला येत होता.आजही जेव्हा तो तरुण माझ्या मनःचक्षु (निषेध.निषेध..किती अवघड शब्द.) येतो तेव्हा अचानकच मला कुठुनतरी दाढी खाजवण्याचा आवाज येऊ लागतो. (हाहाहा. जीते रहो! पण त्याला चक्क दाढी नव्हती!! या घटनेला १०-१२ वर्षे झाली व दाढी हा अद्याप "गणवेश" झाला नव्हता!)
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
17 Nov 2009 - 4:37 pm | ऋषिकेश
जगात व्यक्ती तितके विचार आहेत हेच खरे...
कालच डीएनए मधे फोटोसहीत बातमी होती की पाकिस्तानात एका सामाजिक संस्थेतील माणसे काहि मौलवींना संततीनियमनावर प्रेसेंटेशन दाखवत होते(!!!!).. वातावरण तंग झालं .. त्या संस्थेच्या पदाधिकार्यांना वाटलं झालं आपल्याविरुद्ध फतवा निघणार
मात्र संपूर्ण प्रेसेंटेशननंतर त्यापैकी एकच मौलवी थोडं बोलला तेही चक्क "यामुळे जर आपल्या पुढल्या पिढ्या चांगल्या बनु शकणार असतील, त्यांना सुविधा मिळणार असतील तर यावर विचार करायला हवा. आम्ही आजपर्यंत तर हे म्हणजे मुसलमानांची लोकसंख्या कमी करण्याचा ख्रिश्चननांचा डाव म्हणून बघत होतो"
आशा करूया विचार सकारात्मक असेल
:)
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
17 Nov 2009 - 5:38 pm | सुधीर काळे
(आशा करू या विचार सकारात्मक असेल) पूर्णपणे सहमत.
संततिनियमनाच्या बाबतीत शहरी व ग्रामीण भागांत खूप फरक असू शकतो जसा भारतातही आहे.
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
17 Nov 2009 - 4:45 pm | JAGOMOHANPYARE
प्रेषित उपजावा म्हणून पोरे वाढवणे, तेही मुसलमानानी?
काही तरी घोळ!
कारण (बहुतेक) पैगंबरानी स्वतःला शेवटचा प्रेषित म्हटलेले आहे! 'जाणकार' सांगू शकतील याबाबत.
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
17 Nov 2009 - 8:07 pm | सुधीर काळे
त्यानं सांगितलेलं जे मला समजलं ते असं: संततिनियमनाची साधने वापरून गर्भ राहूच नये याविरुद्ध तो बोलत होता. म्हणजे स्त्री-पुरुष संबंध नैसर्गिक असावेत व गर्भ राहातो कीं नाहीं हे "देवाजीच्या मना" असावे असे त्याचे म्हणणं होतं! कारण अशा तर्हेने गर्भ रहाण्याच्या विरुद्ध केलेल्या कृतीने जो एरवी राहिला असता तो गर्भ कदाचित थोर माणसाचा असता व त्याच्या/तिच्या जन्माला आपण रोखले.
अर्थातच मी याच्याशी सहमत व्हायचा संबधच नाहीं. मी फक्त त्याचा मुद्दा समजावून सांगितला.
त्याने "नबी" हा शब्द वापरला होता. आता प्रेषित शेवटचा की आणखी येणार आहेत हे मलाही माहीत नाही, त्यालाही कदाचित माहीत नसेल किंवा त्याने तो शब्द चुकीचाही वापरला असेल. कोण जन्माला यायला मुकला हा महत्वाचा मुद्दा नसून त्या माणसाचे विचार काय होते ते महत्वाचे व ते ऐकून मी तर थक्कच झालो. १९९५च्या सुमाराला कुणी अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो हेच किती आश्चर्य!
असो. प्रेषिताबद्दल जाणकार लोक मत देतील, पण तो नबी म्हणाला होता.
गर्भधारणा होऊ न दिल्याने जग कुणा थोर व्यक्तीच्या जन्माला मुकू शकते (!) हा त्याच्या बोलण्याचा रोख होता.
असो.
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
17 Nov 2009 - 8:41 pm | प्रमोद देव
इस्लाममध्ये सुधारणेला....नवीन विचारांना बंदी आहे. प्रेषित जे काही त्यावेळी सांगून गेला तेवढेच सत्य...बाकी सगळे झूठ अशीच त्यांची श्रद्धा आहे. तेव्हा त्यावर आपण काय बोलणार?
थोडक्यात काय तर...म्हणतात ना..बाबा वाक्यम् प्रमाणम्!...तेच.
त्यामुळे तो तरूण जे काही बोलला ते काहीही नवीन नाही. कुणीही मुसलमान असेच बोलेल. आपल्याकडे जसे सुधारक आहेत तसे त्यांच्यात नाहीत....नाहीत म्हणजे असे कुणी बोलायला लागले तर त्याचा आवाज परस्पर बंद केला जातो.
नाही म्हणायला एकेकाळी महाराष्ट्रात हमीद दलवाईंनी मुस्लिम सत्यशोधक चळवळ स्थापन केली होती. त्यांनाही त्यांच्या जातभाईंशी असाच मुकाबला करावा लागला होता. शेवटी त्यातच त्यांचे निधन झाले. आज त्यांचे काही मोजके अनुयायी ती चळवळ पुढे नेत आहेत..मात्र ती खूपच क्षीण आहे.
काळेसाहेब,कोणताही मुसलमान लोकसंख्यावाढीबद्दल चिंता,कुटुंबनियोजन वगैरेवर बोलणार नाही...कारण वर तुम्हीच म्हटल्याप्रमाणे त्यांच्या धर्मात ह्या गोष्टींना मुळी स्थानच नाहीये.
काळे साहेब, आपण कोणत्याही व्यक्तीशी त्याचा जात,धर्म,दर्जा वगैरे न पाहता बोलता...हा गुण मात्र आवडला. मी देखिल जमेल तिथे समोरच्या व्यक्तीशी त्याचे वय,अनुभव,हुद्दा,जात-पात,धर्म वगैरे न पाहता संवाद साधत असतो. त्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन आपल्याला येतो असे मला वाटते.
असेच अनुभव अजूनही येऊ देत.
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
18 Nov 2009 - 9:06 am | सुधीर काळे
देवसाहेब!
अगदी देवासारखे बोललात आणि हमीद दलवाईंची आठवण काढून मला कॉलेजच्या दिवसात (१९६०) नेलंत.
हो, मीही कॉलेजात असताना हमीद दलवाईंच्या सकाळमधल्या लेखांनी प्रभावित झालो होतो. ते या दोन धर्मांना जोडण्याचे (integrate) फार चांगलं काम करत होते व लिहीतही मस्त व पटण्यासारखं. आज त्यांची आठवण काढून मी एकदम १९६० सालात गेलो!
मी खरंच man-on-the-street शी आवडीने बोलतो. हे तुम्ही spot केलंत याबद्दल धन्यवाद.
खरं तर "जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी" या म्हणीवर माझा विश्वास आहे. मुस्लिम स्त्रिया जेंव्हा शिकायला लागतील तेंव्हाच तो समाज बदलेल. आज भारतात तरी ते होत आहे. महाराष्ट्रात तर १२वी पर्यंत सर्व मुलींना शिक्षण मोफत आहे. धर्मांध लोक मधे आले नाहींत व हे मुस्लिम स्त्रीशिक्षण चालू राहिलं तर २५ वर्षांनी चित्र खूप बदललेले दिसेल असे वाटते. ज्या मुलाबरोबरच्या संभाषणाने हा धागा सुरू झाला त्याची आई शिकलेली असती तर त्याचा असा मूर्ख समज झाला नसता!
भुपत्नीकत्वएकपत्नी (झाले डिस्टॉर्शन)! हे गमभन वापरतानापहोते. Help. Help.
कूळ कायदा, एकपत्नित्व, स्त्रीशिक्षण अशा ज्या गोष्टी भारतात झाल्या त्या पकिस्तानात व्हायला हव्या. तिथेही महात्मा फुले, (महर्षमहकर्वे-पुन्हा डिस्टॉर्शन) महर्षी कर्वे जन्मायला हवे होते. पण "उस माटीमे जन्मे डिक्टेटर (तू छुपी है कहाँ-नवरंग)"!
ए.आर.रहमानच्या ऑस्करनंतर एक लेख पाकिस्तानी वृत्तपत्रात आला होता. तो मी इथे टाकला होता. आपण वाचला असेल. नाहीं तर पुन्हा टाकेन. जमीनदारी, जी भारतात बर्याच प्रमाणात नष्ट झाली, तिच पाकिस्तानात सुळसुळाट आहे. खूप गरीबी आहे. म्हणून आत्मघाती दहशतवादी मिळतात!
असो. आपल्या उत्तेजनात्मक प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
17 Nov 2009 - 5:16 pm | समंजस
काका, लेखा वरच्या प्रतिक्रीया वाचून नक्कीच तुमची अवस्था ~X( अशी झाली असेल नाही का?
मला वाटतं त्या पाकिस्तानी व्यक्तीचा मुद्दा थोडा चुकीचा, थोडा बरोबर होता :)
थोडा चुकीचा कारण सायंटिस्ट होण्याकरीता त्याच्या तुटपुंज्या मिळकतीत तो मुलांना काय मदत करू शकणार होता?
थोडा बरोबर कारण लीडर किंवा बाबा व्हायला नक्कीच जास्त साधनांची गरज पडणार नाही. फक्त तल्लख डोक हवं(विचारा आमच्या देशातल्या कित्येक नेत्यांना, बाबांना) ;)
18 Nov 2009 - 1:18 pm | सुधीर काळे
चांगले निरीक्षण! (At wit's end)
पण असे कांहीं झाले नाहीं. अशी वादळं येतात नि जातात. चलता है|
आपल्याला पटलेलं लिहायचं, बस्स!
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
17 Nov 2009 - 6:23 pm | प्रदीप
वाटले की आता काही माणसे शहाणी झाली आहेत. 'देवाने दिलेले कसे आपण नाकारायचे' ह्या जुनाट युक्तिवादाहून ह्या आपण ऐकलेल्या 'हे येणारे मूल ..आईन्स्टाईन' वगैरे युक्तिवादापर्यंत त्यांची वाटचाल झालीय. चला, काहीतरी प्रगति आहे म्हणायची!!
18 Nov 2009 - 10:05 am | प्रकाश घाटपांडे
बरोबर! हल्ली अंधश्रद्ध लोकांना सुद्धा वैज्ञानिक मुलामा लागतो. आपण अंधश्रद्ध आहोत असे म्हणवुन घेणे कुणालाच आवडत नाही. जिथे विज्ञान संपत तिथ अध्यात्म चालु होते अस म्हणणारे आता अध्यात्म व विज्ञान हे परस्पर विरोधी नसुन पुरक आहेत असे म्हणु लागले आहेत ही पण प्रगतीच आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
18 Nov 2009 - 10:45 am | प्रदीप
.
17 Nov 2009 - 7:06 pm | स्वाती२
पाकिस्तानी बिचारे थर्ड वर्ल्ड मधले अडाणी पण इथल्या अमेरिकन लोकांचेही हेच चालते. कट्टर कॅथॉलिक संतती नियमन करत नाहीत. माझ्या मुलाचे मित्र आहेत. एकाला सात भावंड, एकाला पाच. घरात १० तोंडं खाणारी आणि एक माणूस कमावता. आज अमेरिकेत रहात असुनही इंटरनेट कनेक्शन परवडत नाही.
या लोकांच्या दबावामुळे शाळेत इवोल्युशन शिकवत नाहीत कारण यांच्या देवाने ७ दिवसात सृष्टी निर्माण केली. गेल्या वर्षी माझ्या मुलाला बायो(१) ऑनर्स ला राज्याच्या अभ्यासक्रमानुसार इवोल्युशन शिकवणे आवश्यक होते पण स्थानिक स्कूल बोर्डाने शिकवायचे नाही असे ठरवले. स्टेटच्या परीक्षेत मुलांना प्रश्नांची उत्तरे लिहिता आली नाहीत. हेल्थ च्या तासाला ते अॅबस्टिनन्सवाले येतात प्रेझेंटेशन द्यायला. प्लॅन्ड पॅरेटहूडवाले आलेले चालत नाहीत. याचे टोक म्हणजे धर्माच्या आड येते म्हणुन डॉक्टर इमरजन्सी काँट्रासेप्टीव प्रिस्क्राइब करायला नकार देतात. किंवा फार्मसीतला माणूस ते फिल करायला नकार देतो.
17 Nov 2009 - 10:19 pm | सुधीर काळे
मला कॅथॉलिक लोक संततिनियमनाच्या विरुद्ध असतात हे माहीत होते, पण आजही व तेही इतके कडवे हे मात्र माहीत नव्हतं. आपण लिहिलेला प्रकार खरंच भयंकर वाटला. मला वाटतं अशाच लोकांच्यामुळेच "डुब्या" दोनदा राष्ट्रपती झाला! जय बायबल बेल्ट!
तसे केनेडी कुटुंब मोठे होते. बॉबी केनेडीला ८-१० मुलं होती. पण या विरुद्ध बेनझीरला एकच मुलगा आहे ना? थोडासा शहरी व ग्रामीण विचारसरणीतही फरक आहे.
पण आपण लिहिलेले मी ऐकलं नव्हतं. ज्याला "अॅबरेशन" म्हणता येईल ते फक्त मॉर्मॉन या धर्माबद्दल ऐकलं/वाचलं होतं.
सांगितल्याबद्दल धन्यवाद.
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
18 Nov 2009 - 10:02 am | अमृतांजन
>>>>पाकिस्तानी बिचारे थर्ड वर्ल्ड मधले अडाणी ....
तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण एक कच्चा दुवा आहे तो असा-
भारतात काही मुख्य शहरं सोडली तर पाकिस्तानात ज्या-ज्या गोष्टींना तुम्ही "थर्ड वल्र्ड" म्हणाल, त्याच गोष्टी जशाच्या-तशा दिसतील- काही अपवाद वगळता; उदा- हिंसक टोक.
नशीबाने रशियाचे एक टोक - सीमा भारताला चिकटून नाही. नाही तर जो भस्मासूर तेथे दिसतो तो भारतात दिसला नसता से म्हणता येईल का?
18 Nov 2009 - 1:31 am | पक्या
काळे काका, लेख / अनुभव चांगला लिहीला आहात. मलाही कमी मिळकतीच्या वर्गातील लोकांचे आजूबाजूला घडणार्या घटना , राजकारण , समाज , चाली रीती वगैरे विषयांवर काय म्हणणे असते, ते या बाबतीत कसा विचार करतात हे ऐकायला, जाणून घ्यायला आवडते.
इथे बहुतेक वाचकांना तुम्ही काय म्हणताय ते समजले नाही. मला ही पहिला प्रतिसाद वाचताच जरा आश्चर्यच वाटले.
आंणि पहिला प्रतिसाद तसा आल्यावर बाकीचे त्याच वळणाचे येत रहातात. चालायचेच.
- जय महाराष्ट्र , जय मराठी !
18 Nov 2009 - 10:19 am | प्रकाश घाटपांडे
समुहमानसिकता( खर तर समुहशरणागतता) व गतानुगतिकता यातुन विचार करण्याची क्षमता नाहीशी होते. अनेक अंधश्रद्धा कालबाह्य असल्या तरी उपद्रवी नाही यातुन 'गतानुगतिक' पद्धतीने संक्रमीत होतात. तरी माणुस अनुभवातुन आपले विचार तपासतो. लहानपणी रेडिओत छोटी माणसे बसलेली असतात अशी माझी समजुत होती. वयानुसार ज्ञानात भर पडल्यावर ती बदलली. अनेक परिकथात लहानपणी आपण रमुन जायचो. ते केवळ मनोरंजक आहे याचे भान हळु हळु आपल्याला येउ लागले.
आपण जे करतो ते आपल्याला पुर्णपणे पटतच असत असे नव्हे. अथवा जे पटत ते पुर्णपणे करतोच असेही नव्हे. त्यामुळे चालायचच
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
18 Nov 2009 - 10:34 am | सुधीर काळे
प्रकाश-जी,
धन्यवाद.
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
18 Nov 2009 - 7:05 am | वैशाली हसमनीस
सुधीरजी,ज्या सहजतेने आपण हा लेख लिहीला आहे तितक्या सहजपणे वाचकांनी तो घेतलेला दिसत नाही.विषयाला उगीचच फाटे फोडत आहेत्,दुसरे काय!असो.आपण जे वाटते ते बिनधास्तपणे लिहावे.'पिंडे पिंडे मतिर्भिन्ना'.
18 Nov 2009 - 8:29 am | सुधीर काळे
वैशालीताई,
आपण म्हणता ते खरे आहे, पण मीही माझा लेख लिहिल्यावर पुन्हा एकदा-दोनदा वाचायला पाहिजे होता. मी साधारणपणे असा वाचून पहातोच, पण काल असं करायचं राहिलं व त्यातल्या तृटी राहून गेल्या. त्यासाठीच मी म्हणालो होतो कीं मला काय म्हणायचे आहे ते वाचकांपर्यंत पोचविण्यात मी कमी पडलो.
पण हे झाले खर्या-खुर्या टीकात्मक प्रतिसादाबद्दल.
असं होऊ नये, पण कांहींच्या बाबतीत ते होताना दिसतंच कीं "काय लिहिले आहे" यापेक्षा "कुणी लिहिले आहे" या तत्वावर प्रतिसाद लिहिले जातात. व असं जेंव्हा होतं, तेंव्हा बर्याचदा ते असभ्यतेच्या सीमांना ओलांडत जरी नसले तरी त्या सीमांना जरूर स्पर्शतात. 'कॉर्पोरेट' जंगलात तर हा अनुभव खूपदा येतोच, पण वैयक्तिक जीवनातही येतो. तिकडे मी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. बर्याचदा तो यशस्वी होतो, तर कधी-कधी अयशस्वीही होतो.
'मिपा'त सामील झाल्यावर माझ्या लक्षात आले आहे कीं इथे कांहीं सभासद "more equal than others" आहेत व साधारणपणे इतर सामान्य सभासद त्यांच्या वाटेला जात नाहींत. मीही शक्य तो हेच धोरण ठेवतो.
आपल्या पसंतीदर्शक प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
18 Nov 2009 - 1:02 pm | शशिकांत ओक
सुधीरजी व मित्र हो,
प्रकाशजींचे आकलन योग्य आहे.
हा मंच असा आहे की त्यात आपल्याला भावलेले लिखाण वा विचार टाकणे महत्त्वाचे. स्वतः लिहायचे नाही व इतरांनी काही लिहिलेल्यात काड्या घालायच्या - 'हे वागणं बरं न्हव'!
प्रश्नाची पाकिस्तानी माणसाने उकल केल्यामुळे आपणाला जरा तिखट प्रतिक्रिया द्याव्याशा वाटतात. पण त्याचा खरा कळीचा मुद्दा हा की मुले निर्मिती कऱ्ण्यात कसूर करता कामा नये. पण गेला बाजार अद्याप निर्मिलेल्या बालकांचे जे पीक बाहेर पडतेय त्यावरून "आईनस्टाईनची वा अन्य जगतमान्य व्यक्तिमत्वाची निर्मिती करण्याच्या खटाटोपासाठी अनेक विवाह वा अपत्य निर्मिती करणे चालू ठेवतोय" हे निवेदन फक्त पाकी करू जाणोत. शशिकांत
18 Nov 2009 - 6:56 pm | भोचक
प्रकाशजी आणि ओकसाहेब या दोघांचे या लेखाच्या निमित्ताने कुठल्या तरी एका गोष्टीबद्दल एकमत झाले. याबद्दल दोघांचे अभिनंदन. काळेकाका तुमच्या लेखातून काय काय साध्य होते पहा.
(भोचक)
इंदूरला आलात नि सराफ्यात नाही गेलात? आयुष्य फुकट गेलं यार तुमचं!
हा आहे आमचा स्वभाव
18 Nov 2009 - 8:24 pm | सुधीर काळे
हो, अगदी सेरा पेलिन व ओप्रा यांच्यातली गट्टी?
आजचे खरडायच्या फळ्यावरचे मी चढवलेले (कांहींना भयप्रद वाटलेले) व्यंगचित्र पहा.....!
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
18 Nov 2009 - 8:31 pm | सुधीर काळे
हो, अगदी सेरा पेलिन व ओप्रा यांच्यातली गट्टी?
आजचे खरडायच्या फळ्यावरचे मी चढवलेले (कांहींना भयप्रद वाटलेले) व्यंगचित्र पहा.....!
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
18 Nov 2009 - 9:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =))
अगदी नाव सार्थ झालं ना आज! ;-)
अदिती
18 Nov 2009 - 6:56 pm | भोचक
प्रकाशजी आणि ओकसाहेब या दोघांचे या लेखाच्या निमित्ताने कुठल्या तरी एका गोष्टीबद्दल एकमत झाले. याबद्दल दोघांचे अभिनंदन. काळेकाका तुमच्या लेखातून काय काय साध्य होते पहा.
ह. घ्या.
(भोचक)
इंदूरला आलात नि सराफ्यात नाही गेलात? आयुष्य फुकट गेलं यार तुमचं!
हा आहे आमचा स्वभाव