हॅलोवीन पंपकिन!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
1 Nov 2009 - 7:37 pm

परवाच्या शुक्रवारी हापिसातून घरी आलो तो मुलगा धावत येऊन मिठी मारत म्हणाला " बाबा, आज हॅलोवीनचा पंपकिन कार्व करायचाय!"
हो हो म्हणत त्याला थोपवला. जेवणं वगैरे होईपर्यंत चिरंजिवांनी कसाबसा दम काढला.
हातांवर पाणी पडताच "मी टूलकिट काढतो!" म्हणत त्याची धाव क्लोजेटकडे गेलीच.
टूलकिट म्हणजे दोन वर्षाखाली भोपळा कोरायला आणलेली छोट्या हत्यारांची एक पुडी. त्यात दोन छोट्या करवती, भोपळा कोरून त्यातल्या बिया काढायला असलेला एक प्लॅस्टिकचा 'हात', एक टोचणी, एक प्लॅस्टिकचा दातेवाला मार्कर (करंज्या कातायची कातणी असते ना तसा - ह्याने भोपळ्यावर मार्किंग करता येते)
हा सगळा जामानिमा एका पुठ्ठ्याच्या शीटवर घेतला.

त्याच दिवशी त्याला शाळेतून मिळालेला एक छोटा भोपळा घेऊन स्वारी आली. गेल्या वर्षी आम्ही मार्केट बास्केट मधून मोठा भोपळा आणून कोरला होता, त्यामानाने हा अगदीच छोटा होता त्यामुळे कोरायला थोडा अवघड वाटत होता.
करवत घेऊन आधी भोपळ्याच्या देठाजवळची चकती कोरुन काढली आणि बाटलीचे टोपण काढावे तसा भोपळा वरुन उघडला.
मग मुलाने आतल्या बिया आणि थोडा गर कोरुन काढून भोपळा मोकळा केला.
भोपळा धुवून पुसून पुढल्या तयारीला सज्ज झला. स्केचपेनने डोळे, नाक, तोंडाच्या खुणा करुन घेतल्या. कातणी चालवून खुणा ठळक केल्या.
मुलालाच भोपळा कोरायचा होता त्यामुळे मी फक्त करवत खुपसून देणे आणि अधून मधून सूचना देणे ह्या व्यतिरिक्त काही करु शकलो नाही!
माझ्या अपेक्षेपेक्षा लेकाने चांगले कोरीवकाम केले. मग मी शेवटचा हात फिरवून थोडी साफसफाई उरकली.
भोपळ्याच्या डोक्यातून कधी एकदा आत पणती घालतोय आणि ती पेटवतोय असं होऊन गेलं होतं चिरंजिवांना.
पणती पेटवल्यावर तातडीनं सगळ्या खोल्यात अंधार करुन फोटो काढायला कॅमेरा घेऊन आलाही तो!
हे पहा फायनल प्रॉडक्ट!

विकट हसणार्‍या राक्षसाचा चेहरा बघून लेक मात्र कमालीचा आनंदी दिसत होता!
हॅप्पी हॅलोवीन!!

-चतुरंग

संस्कृतीसमाजजीवनमानराहणीविरंगुळा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

1 Nov 2009 - 8:24 pm | मदनबाण

हॅप्पी हॅलोवीन !!! :)

मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Nov 2009 - 8:28 pm | बिपिन कार्यकर्ते

हॅप्पी हॅलोवीन!!

हॅहॅहॅ!!!! शेम टू यु!!!

विकट हसणार्‍या राक्षसाचा चेहरा बघून लेक मात्र कमालीचा आनंदी दिसत होता!

आखिर लाकशशकाही बेटा !!! ;)

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Nov 2009 - 10:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लाकशशकाका, भोपळा मस्त झाला आहे, लेकालाही सांगा!

अदिती

मुक्तसुनीत's picture

1 Nov 2009 - 11:29 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो. पंपकिन लय भारी !:-)

सहज's picture

2 Nov 2009 - 6:56 am | सहज

लय भारी!

आनंद घारे's picture

1 Nov 2009 - 8:36 pm | आनंद घारे

अप्रतिम कोरीवकाम आणि तितकेच सुंदर छायाचित्र.
हॅलोवीनबद्दल अधिक माहिती माझ्या ब्लॉगवर वाचायला मिळेल. दुवा खाली दिलेलाच आहे.
भुताटकीचा सोहळा - हॅलोविन
halloweenCombo
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

मस्त कलंदर's picture

1 Nov 2009 - 8:45 pm | मस्त कलंदर

लाक्कश छानच दिसतोय!!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

धनंजय's picture

1 Nov 2009 - 8:45 pm | धनंजय

:-)

(विकटहास्याची स्मायली कुठली?)

टारझन's picture

2 Nov 2009 - 12:27 pm | टारझन

--(स्मायली प्रवर्तक) टारझन बुद्ध

चित्रा's picture

1 Nov 2009 - 8:49 pm | चित्रा

वा!
छान केले आहे कोरीव काम लेकाने. आवडले म्हणून सांगा.

यावेळी आमच्याकडे नेहमीच्या चेटकिणीवरून व्हँपायरपर्यंत प्रगती (!) झाली. दिवसही मस्त होता, त्यामुळे भटकायला मजा आली.

हॅलोवीनच्या आदल्या दिवशी (परवा संध्याकाळी) गाडी चालवताना एका जरा अंधार्‍या रस्त्याच्या बाजूला असलेल्या फूटपाथवरून एक पांढर्‍या गाऊनमधली मोठे नाक असलेली पांढर्‍या केसांची म्हातारी दिसली, आणि गाडी चालवताना मला बर्‍यापैकी झटका बसला. बहुदा ती बया हॅलोवीनच्या मूडात जरा आधीच शिरली होती.

रेवती's picture

1 Nov 2009 - 9:14 pm | रेवती

मलाही अश्याचप्रकारचा अनुभव आला. एक भलमोठं झाड व त्यामागे जुनं घर असा प्रकार ग्रोसरीच्या रस्त्यावर आहे. झाड सध्या आपले वेगवेगळे रंग दाखवत असतं म्हणून येताजाता त्याकडे लक्ष जातं. हॅलोवीनच्या आधी अठवडाभर झाडाकडे बघताना घराकडे सहज लक्ष गेलं आणि मी गोठून गेले. एक सहाफूटी भयानक चेहर्‍याचा माणूस (खोटा, पण खर्‍यासारखा दिसणारा.) थर्मल कपडे घालून हातात भलामोठा सुरा घेऊन उभा होता. त्याच्या डोक्यातून रक्त येत होते. हॅलोवीनचा मूड यायला वेळ लागला नाही. आमच्याकडे यंदा स्टारवॉर प्रकाराने उच्छाद मांडलाय.

रेवती

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Nov 2009 - 9:26 pm | बिपिन कार्यकर्ते

आम्ही पहिल्यांदा बंगलोरला गेलो होतो तेव्हा बायको धुतलेले कपडे वाळत टाकायला गच्चीवर गेली, मी पण गेलो मागे (उरलेले धुतलेले कपडे घेऊन.... उगाच गैरसमज नकोत). मागच्या बाजूच्या बंगल्याच्या गच्चीवर एक राक्षसाचा अगदी खरा वाटावा असा मुखवटा लावला होता. (तिथे तशी पध्दत आहे.) अचानक तो मुखवटा दिसल्यावर, एका सेकंदाच्या आत बायको डायरेक्ट खाली जाऊन उभी राहिली... त्यानंतर किंचाळली. :D

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

1 Nov 2009 - 9:29 pm | श्रावण मोडक

(उरलेले धुतलेले कपडे घेऊन.... उगाच गैरसमज नकोत)
हा खुलासा अनावश्यक होता. ते गृहीत होते, पण खुलाशाने आता वेगळी शंका येऊ लागली आहे... ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Nov 2009 - 9:31 pm | बिपिन कार्यकर्ते

हे एक धर्मसंकटच असते... न लिहावे तर उगाच प्रश्न आणि लिहावे तर अनावश्यक. ;)

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

1 Nov 2009 - 9:40 pm | श्रावण मोडक

हाहाहाहा... तुम्हाला ते हवेच असते ना!!! ते म्हणजे धर्मसंकट, फॉर ऑब्व्हियस रिझन्स!

स्वाती२'s picture

1 Nov 2009 - 8:49 pm | स्वाती२

व्वा! मस्तच झालाय जॅकोलँटर्न!

प्राजु's picture

1 Nov 2009 - 8:53 pm | प्राजु

आमच्या घरीही झाला हा प्रकार. मात्र सुबक कोरीव काम न करता आल्याने केवळ भोपळा रंगवणे इतकेच झाले. :)
- प्राजक्ता
http://praaju.blogspot.com/

प्रशांत उदय मनोहर's picture

1 Nov 2009 - 9:16 pm | प्रशांत उदय मनोहर

छान. सुरेख.
आपला,
(हॅलोविनव्यस्त) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

प्रियाली's picture

1 Nov 2009 - 9:21 pm | प्रियाली

आमच्याकडेही दरवर्षी हे कोरीव काम चालते. तुमच्या लेकाने चांगला कोरला आहे.

आमच्याकडे एकदा लेकीचा गणिताच्या परीक्षेत पहिला नंबर आला म्हणून बाईंनी २५ पौंडाचा भोपळा बक्षीस दिला होता.

मीनल's picture

1 Nov 2009 - 9:26 pm | मीनल

मस्त आहे कंदिल.

भोपळ्याच्या या हॅलोविन उत्सवाबद्दल अधिक माहिती इथे वाचा

मीनल.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Nov 2009 - 9:30 pm | प्रकाश घाटपांडे

चलरे भोपळ्या टुणुक टुणुक मधील म्हातारी भोपळ्यात कशी बसली असेल याचा विचार करतोय
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

देवदत्त's picture

1 Nov 2009 - 11:18 pm | देवदत्त

अरे वा .
मस्त आहे हॅलोवीनचा भोपळ्याचा राक्षस.
(तिकडेही 'चल रे भोपळ्या टुणुक टुणुक' सारखी कथा आहे का? ;) )

हॅलोवीनची तयारी नेमकी केव्हा चालू होते? मी तिकडून निघायच्या थोडं आधी म्हणजे सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यापासून मी बहुतेक मॉल मध्ये हॅलोवीन चे सामान आलेले पाहिले होते. तेव्हा मला वाटले होते की सप्टें च्या शेवटच्या आठवड्यात असेल.

संदीप चित्रे's picture

1 Nov 2009 - 11:41 pm | संदीप चित्रे

चिरंजीवांनी कोरीवकाम छान केले आहे.
आमचे चिरंजीव दोनेक वर्षांत त्या टप्प्यावर पोचतील तोपर्यंत आराम आहे :)

अश्विनीका's picture

4 Nov 2009 - 10:01 pm | अश्विनीका

वा. मस्त दिसत आहे जॅक-ओ-लँटर्न.

हा माझ्या मुलीचा कोरलेला भोपळा -

आणि हा सिएटल जवळ एका जत्रेत ठेवलेला कोरलेला महाकाय भोपळा -
>
- अश्विनी

भडकमकर मास्तर's picture

2 Nov 2009 - 9:34 am | भडकमकर मास्तर

मस्त झालाय भोपळा...
...

समंजस's picture

2 Nov 2009 - 10:24 am | समंजस

छान!!! >:)

अमोल केळकर's picture

2 Nov 2009 - 12:41 pm | अमोल केळकर

वा सर्वच भोपळे मस्त !! :)
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

गणपा's picture

2 Nov 2009 - 1:11 pm | गणपा

मस्त हो रंगाशेठ. हॅप्पी हॅलोवीन ..
मुलाने चांगल कोरीवकाम केलय. :)

JAGOMOHANPYARE's picture

2 Nov 2009 - 2:07 pm | JAGOMOHANPYARE

छान.

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

परिकथेतील राजकुमार's picture

2 Nov 2009 - 3:19 pm | परिकथेतील राजकुमार

रंगाशेठ लैच भारी दिसतोय हो भोपळा :)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य