आज गांधी जयंती.
या निमित्ताने आजच्या दिवशी देशात लादल्या गेलेल्या ड्रायडेचा (दारुबंदी) मी तीव्र निषेध करतो..
ज्या गांधींनी स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, आणि कुठकुठल्या फ्रीडमस्चा वगैरे पुरस्कार केला असे ऐकून आहे, त्या गांधींच्या जयंतीच्या दिवशी देशातला एक फार मोठा कष्टकरी वर्ग विनाकारण बेरोजगार राहणार हा विरोधाभास चीड आणणारा आहे..
मद्यविक्रीच्या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार मिळतो आणि त्यांची रोजीरोटी चालते. या सर्वांना या लादल्या गेलेल्या दारुबंदीमुळे रोजीरोटीला मुकावे लागणार ही अत्यंत शरमेची अन् दुर्दैवाची बाब आहे.
मद्यविक्री व्यावसायिकांना मद्यविक्रीच्या व्यवसायातून मिळणार्या उत्पन्नावर माझ्यासारख्या गुंतवणूक सल्लागाराचाही रोजगार अवलंबून असतो. हस्ते-परहस्ते माझ्यासारखी माणसंही या दारुबंदीमुळे भरडली जातात!
बाकी सगळी दुकानदारी सुरू असते मग मद्याच्याच दुकानांना बंदी का??
स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या गांधींच्या जन्मदिनी मद्य-व्यावसायिकांच्या सरकारमान्य व्यवसायावर ड्रायडेचे हे पारतंत्र्य का??
तीव्र निषेध...!
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
2 Oct 2009 - 1:08 am | टारझन
=)) =)) =))
निषेध नक्की कोणासाठी हो तात्या ? पिणार्यांसाठी की विकणार्यांसाठी ?
असो ... गांधी शब्द काढला तरी माझ्या मनात फक्त एक शब्द येतो .. "निषेध" !!
बाकी सरकारी सुट्टी मिळते हाच तो काय फायदा !
-(गांधीद्वेष्टा) टारझन गोडसे
2 Oct 2009 - 1:39 am | हुप्प्या
दुर्दैवाने गांधीवादातच ढोंगीपणा सामावलेला आहे. गांधींनी आपली तथाकथित तत्वे आयुष्यात पाळताना ढोंगीपणा केला आहे. त्यामुळे त्यांचा जप जपणार्यांनी तेच केले तर आश्चर्य नाही.
२ ऑक्टोबरला सक्तीची दारूबंदी हा शुद्ध ढोंगीपणा आहे. एक निरर्थक रुढी.
मीही याचा निषेध करतो. आणि अर्थातच नुसता "कोरडा" निषेध नाही!
2 Oct 2009 - 2:22 am | ऋषिकेश
सालाबादप्रमाणे गांधी जयंती आली आहे आणि सालाबादप्रमाणेच (केवळ प्रतिसाद मिळविण्यासाठी?) फुकाचे निषेध सुरू झाले आहेत.
असो सारखं तेच तेच काय बोलणार! ज्याची त्याची मते!
ऋषिकेश
------------------
नवी स्वाक्षरी बनविण्यास टाकली आहे
2 Oct 2009 - 2:28 am | चतुरंग
(निषेधग्रस्त)चतुरंग
2 Oct 2009 - 2:23 am | मिसळभोक्ता
फक्त गांधीजयंतीच नाही, तर कुठल्याही सणाला, कुणाच्याही जयंतीला, पुण्यतिथीला, निवडणुकीच्या वेळी.. कधीही ड्राय डे नको !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
2 Oct 2009 - 2:33 am | प्राजु
नॉट अगेन!! पुन्हा तेच तेच!
किती वेळा निषेध ! आणि किती वेळा तेच ते प्रतिसाद.. #o
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 Oct 2009 - 2:39 am | मिसळभोक्ता
वारंवार तोच तोच निषेध केल्यामुळे तात्याचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे !
(काळेसाहेब, लिहा बरे एक अनावृत्त पत्र !)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
2 Oct 2009 - 12:24 pm | सुधीर काळे
मधल्यामधे या गरीबाला का घसीटता? आधीच तात्यासाहेब माझ्यावर भडकले आहेत त्यात तुम्ही असे लिहून आगीत आणखी तेल ओतताय्.
काहीं नाहीं. आमचा तात्यांना पाठिंबा आहे. फक्त दूरदर्शीपणा अंगात बाणवून आदले दिवशी "हवे-नको" ते विकत आणून ठेवावे. सोडा-बिडा, बर्फ, शेंगदाणे वगैरे "पूरक auxiliary)" साहित्य कांहीं "ड्राय"मध्ये मोडत नाही. शिवाय स्टेनलेस स्टील किंवा तत्सम अपारदर्शक ग्लासात प्यायची तयारी असेल तर कुठेही तीर्थप्राशन करता येते असा माझा कांहीं वर्षांपूर्वीचा स्वानुभव आहे.
सुधीर
------------------------
हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
2 Oct 2009 - 2:56 am | घाटावरचे भट
बाकी ही बातमी वाचल्यावर तर खूप लोकांना त्रास होईलसे दिसते.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5074905.cms
2 Oct 2009 - 3:01 am | बेसनलाडू
२९ ऑक्टोबरला आषाढी एकादशी आहे, हे वाचून पडलोच! शाळेत चैत्र,वैशाख, ज्येष्ठ, आषाढ .... कार्तिक, मार्गशीर्ष.. वगैरे जे घोकून घेतात त्याची उजळणी करण्याची म.टा.च्या प्रूफ रीडर्स ची वेळ मद्याची साठेबाजी करण्यात गेली की काय, असे वाटून गेले ;)
(खोचक)बेसनलाडू
2 Oct 2009 - 3:10 am | घाटावरचे भट
>>म.टा.च्या प्रूफ रीडर्स ची वेळ मद्याची साठेबाजी करण्यात गेली की काय, असे वाटून गेले
=)) ज्याला त्याला आपापली चिंता बेलाशेठ!
2 Oct 2009 - 3:52 am | नंदन
तेच, ऑक्टोबरात आषाढी वाचून गार झालो. ड्राय डे चा परिणाम म्हणावा काय हा? ;)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
2 Oct 2009 - 10:45 am | प्रशांत उदय मनोहर
"असा मी असामी"मधलं वाक्य आठवलं. "एकादशी होती हे निश्चित. कारण माझ्या जन्माच्या दिवशी दोघांना कडकडीत उपास घडल्याचं आठवतंय."
बाकी महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलटुन पालटून जुनं पंचांग वापरण्याची अनेक उदाहरणं आहेत.
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
2 Oct 2009 - 3:15 am | चतुरंग
एकूण सात दिवस बंद आहे ऑक्टोबरात. म्हणजे अचानक दारुबंदी सप्ताहच झाला म्हणायचा की! :D
सर्व 'झोकदार' लोकांची ऑक्टोबर क्रांती करण्याची वेळ झाली ! ;)
(क्रांतिकारक)चतुरंग
2 Oct 2009 - 4:13 am | गणपा
ड्राय डेच्या आदल्या दिवशी जरा लिकर दुकानांवर नजर टाकली की कळते, जो तो उद्याची सोय करण्यात गुंतलेला. :)
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
2 Oct 2009 - 7:10 am | सहज
तुमच्या ड्रायडे दारुबंदी निषेध भाषणाची एक चित्रफित चढवा हो. बघायला मजा येईल. निषेध पत्रकांना कोणी विचारत नाही, तूनळीवर एक चित्रफित चढवाच.
येत्या विधानसभा निवडणुकीत तुमच्या भागातील जे उमेदवार आहेत त्यांना हा प्रश्न जरुर विचारा, उत्तर काय मिळाले ते जरुर लिहा.
बाकी २ ऑक्टो. शिवाय इतर ड्रायडे देखील असतात त्याबद्दल निषेधही, किमान त्या त्या दिवशी होउन जाउ दे. स्वातंत्र्य मिळुन इतकी वर्ष झाली ह्या देशाला पण तरी किती दिवस व किती वर्ष भरडले जाणार तुम्ही? छ्या तुमच्या सहनशक्तीची दाद देउ की तुमच्या हतबलतेवर सुस्कारा टाकू, काही कळेनासे झाले आहे.
जय हिंद, महात्मा गांधीजी की जय!
2 Oct 2009 - 8:21 am | Nile
सहमत आहे. २ ला मोर्चा काढाच. मोर्चाला हवे तितके पंटर पाठवतो. पण त्यांची घसे ओरडताना कोरडे होणार नाहीत याची काळजी घ्या म्हणजे झालं. किती पंटर पाठवु?
2 Oct 2009 - 8:38 am | विनायक प्रभू
सहजरावांशी सहमत
2 Oct 2009 - 4:47 pm | ऋषिकेश
सर्व निषेधकर्त्यांनी (प्राणंतिक!) उपोषणाला बसून गांधी जयंती व दारूबंदीचा निषेध यांचा सूवर्णसंगम साधावा असे सुचवतो.
बाकी जर गांधी जयंतीशीच वावडं असेल तर मात्र कठीण आहे
लालबहादूर शास्त्री व मोहनदास करमचंद गांधी या थोर पुरुषांस मनापासून दंडवत
ऋषिकेश
------------------
नवी स्वाक्षरी बनविण्यास टाकली आहे. (प्रस्ताव अनेक आले आहेत जो स्वतात मस्त करून देईल त्याकडून घेईन ;) )
2 Oct 2009 - 8:31 am | शाहरुख
गांधी बाबाचा दारू पिण्यास विरोध होता काय ?? जाणकारांचे काय मत आहे ?
2 Oct 2009 - 1:29 pm | सखाराम_गटणे™
विदेशीला होता.
कुटीरउदद्योगांना न्वता.
2 Oct 2009 - 8:43 am | विनायक प्रभू
आणखी एक पद्धतीने निषेध व्यक्त करुया.
माझ्या कडे मी एक अड्डा तयार केला आहे.
३६५ दिवस नो ड्राय डे.
तसा गविरमींट चा परवाना सुद्धा आहे.
तो गांधी जयंती च्या निमित्ताने सुरु करायचा होता.
सर्वसाक्षी आणि मी तसे ठरवले होते.
विविध प्रकारचे मेनु ची तयारी होती.
पण काय करणार प्रमुख पाहुणा म्हणुन फित कापायला बोलवायचे होते.
पण तुम्ही अंमळ बिझी.
काय करणार?
2 Oct 2009 - 8:50 am | विसोबा खेचर
आज जमुया का? :)
आज आपल्याला टाईम हाय! :)
तात्या.
2 Oct 2009 - 9:03 am | विनायक प्रभू
दोन नंतर मोकळा आहे मी.
मेनु नंतर ठरवतो.
सर्वसाक्षी ना तुम्ही बोलवा.
रामदासांना मी बोलवतो.
आणखी कोणाकोणाला निशेद व्यक्त करायचा आहे त्यांनी प्रतिसादात कळवावे.
आयचा घो ड्राय डे च्या.
उशीर झाला म्हणुन काळजी नको.
पसरायची व्यवस्था सुद्धा आहे.
2 Oct 2009 - 9:05 am | अवलिया
तात्याला उशीशिवाय पसरता येत नाही. तेवढी सोय त्याच्यासाठी कराच.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
2 Oct 2009 - 2:46 pm | श्रीयुत संतोष जोशी
मी पण मी पण.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
2 Oct 2009 - 9:12 am | विनायक प्रभू
येतोस काय रे हलकटा?
तुझ्या साठी दोन उशा.
2 Oct 2009 - 9:13 am | अवलिया
श का ष?????
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
2 Oct 2009 - 9:41 am | विनायक प्रभू
काय हवे ते तु ठरव.
2 Oct 2009 - 9:32 am | टारझन
चालु द्या !!! मास्तर नंतर तात्या न नाना .. अजुन दोन हिरवट म्हातारे ... चालू द्या भो ... आता त्या उशांवरून मारामारी करू नका रे... ते फक्त डिस्कव्हरी चॅनल वर होतं ! :)
2 Oct 2009 - 10:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'ड्राय डे आणि त्याचे महत्व' या विषयावर आमच्या वतीने आमचे सन्माननीय मित्र कलंत्री हे दोन शब्द बोलतील.
स्वगतः हल्ली कलंत्री कुठे दिसत नाही. :S
-दिलीप बिरुटे
2 Oct 2009 - 10:28 am | अवलिया
त्यांनी घेतलेली दिसतेय.... निवृत्ती ! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
2 Oct 2009 - 10:28 am | योगी९००
जयंती निमित्त महात्मा गांधींना आणि लाल बहाद्दूर शास्त्रींना अभिवादन..
भले आपण कोणीही गांधीजींना आदर देत नसू, पण केवळ ड्राय डे म्हणून यांची आठवण या गोष्टीचा निषेध..ज्या व्यक्तीला सर्व जग आदर दाखवते (पहा गुगल होम पेज) त्याला एकानेही अभिवादन करू नये..या गोष्टीचा सुद्धा निषेध..
एकालाही शास्त्रीजींची आठवण येऊ नये..? याचा ही तीव्र निषेध...
खादाडमाऊ
2 Oct 2009 - 11:27 am | अडाणि
विनम्र अभिवादन.
-
अफाट जगातील एक अडाणि.
2 Oct 2009 - 12:02 pm | विसोबा खेचर
अनादरही कुठे व्यक्त केलेला नाही...
केवळ ड्राय डे म्हणून नव्हे. ड्राय डे मुळे गांधीजयंती नव्हे तर गांधीजयंती मुळे ड्राय डे लादला गेला आहे आणि त्यात मद्यव्यवसायाशी निगडीत असणारा कष्टकरी वर्ग भरडला जात आहे, स्वत:च्या रोजीरोटीपासून वंचित होत आहे म्हणून निषेध!
शास्त्रीजींना माझी विनम्र आदरांजली..
तात्या.
2 Oct 2009 - 10:44 am | प्रकाश घाटपांडे
आमचे मते या दिनामुळे मद्यप्रेमी लोकांना नियोजनाची सवय लागते. वाईन शॉपमधे आगाउ सुचना ठळक अक्षरात लिहिल्या असतात. त्यामुळे आदल्या दिवशी ष्टॉक करुन ठेवावा. त्यातुन काही लोकांना आयत्यावेळी मदिरेच्छा झाल्यास तशीही सोय असते. शोधा म्हणजे सापडेल. त्यातुन समजा दिवस ड्राय गेल्यास त्याची कसर दुसर्या दिवशी भरुन काढावी.
खर तर गांधीजींनी देशी कुटीरोद्योगाला चालना दिली होती. त्यामुळे त्यादिवशी देशी /हातभट्टी या प्रॉडक्टला उत्तेजन मिळायला हवे. या निमित्त 'देशी' सप्ताह 'साजरा' करायला हवा. मोहापासुन दुर रहाण्यासाठी 'मोहाची' जवळ केली पाहिजे. त्यामुळे अतिपरिचय उद्भवुन अवज्ञा निर्माण होण्यास मदत होते. काही विद्वाज्जन सोमरसालाही दारु म्हणतात. त्यांची येथेच्छ निंदा या सप्ताहात करावी. द्राक्षासवाच्या अंमलामुळे उत्तुंग प्रतिभा स्फुरते याची उदाहरणे जालसाहित्यावर कमी नाहीत. राधाधर मधु मिलिंद जय जय | हे नाट्यगीत त्याचेच उदाहरण असावे असा आम्हाला दाट संशय आहे.
असो शुष्कदिनाच्या मद्यप्रेमींना मदिच्छा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
2 Oct 2009 - 12:31 pm | विसोबा खेचर
सुंदर उतारा! प्रकाशभावजींचा विजय असो... :)
तात्या.
2 Oct 2009 - 10:54 am | प्रमोद देव
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री ह्या दोघांना त्यांच्या जयंती निमित्त माझेही विनम्र अभिवादन!
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
2 Oct 2009 - 11:35 am | चिरोटा
दोघानांही विनम्र अभिवादन.
(M.G. road ला खरेदी साठी जाणारा)भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
2 Oct 2009 - 12:13 pm | गणपा
दोघानांही विनम्र अभिवादन.
-(कोणे एके काळी M.G. road ला राहाणारा) गणपा
2 Oct 2009 - 12:35 pm | jaypal
गांधी जयंती निमित्ताने दारुबंदी सप्ता पाळ्ला जातो.
फकत १ ला दिवस आणि ७ वा दिवस दारुबंदी.
मधले ५ दिवस तर्रर्रर्र... व्हा.
अजब हे सरकार
2 Oct 2009 - 2:19 pm | १.५ शहाणा
गांधी बाबाचा दारू पिण्यास विरोध
दारू + सोडा = दारु सोडा असे सांगितले आहे .
2 Oct 2009 - 2:32 pm | गणपा
( सोड्यातला) - गणपा
2 Oct 2009 - 2:26 pm | १.५ शहाणा
मोसबी नारंगी लक्षात ॓वा .......
2 Oct 2009 - 5:45 pm | हरकाम्या
आमचा कायमच" ड्राय डे "असतो त्यामुळे माझ्या नजरेत हे सर्व म्हणजे 'पीनेवालेको पीनेका बहाना चाहिये "
2 Oct 2009 - 5:47 pm | वेताळ
माझा दारुबंदीला विरोध नाही.
वेताळ
3 Oct 2009 - 6:47 pm | अमृतांजन
दुर्दैवाने अनेकांना ड्रायडेचा अर्थ कळला नाही हे वाचून वैशम्य वाटले.
लेम्मी हेल्प यू अंडरस्टॅंड- ड्रायडेच्या दिवशी ड्राय व्हिस्की, ड्राय जीन, ड्राय वाईन (तरी) प्या असे त्यांचे म्हणणे आहे.
1 Oct 2013 - 6:31 pm | होबासराव
उद्या २ ऑक्टोबर... ड्राय डे. आपण तर आजच उद्याचि सगळि व्यवस्था केलि आहे...
1 Oct 2013 - 7:56 pm | वेताळ
बाबानो उद्याचे नियोजन आजच करा रे.
1 Oct 2013 - 8:03 pm | अभ्या..
का ओ तात्या. मिळू द्या की सुट्टी बारवाल्यांना पण.
साप्ताहिक सुट्टी न घेता काय फक्त तुमच्या गमजाच बघायच्या का आयुष्यभर.
नायतर हायेच की रोज सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत मापे. :(
आणि स्टॉक करुन विकणार्यांना पण कमवू द्या एखांदा दिवस. ;)
1 Oct 2013 - 8:33 pm | भाते
ऊद्याची सोय आजच केली आहे. बुधवारी आणि सुट्टीच्या दिवशी ड्राय डे आला की ही सुवर्णसंधी मी कधीच सोडत नाही.
८ तारखेला पुन्हा एकदा ड्राय डे आहे.
1 Oct 2013 - 8:52 pm | होबासराव
ला पिला दे साकिया पैमाना पैमाने के बाद होश कि बाते करेगे होश मे आने के बाद...