मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गांधी जयंती निमित्तच्या ड्रायडेचा तीव्र निषेध!

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आज गांधी जयंती. या निमित्ताने आजच्या दिवशी देशात लादल्या गेलेल्या ड्रायडेचा (दारुबंदी) मी तीव्र निषेध करतो.. ज्या गांधींनी स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, आणि कुठकुठल्या फ्रीडमस्चा वगैरे पुरस्कार केला असे ऐकून आहे, त्या गांधींच्या जयंतीच्या दिवशी देशातला एक फार मोठा कष्टकरी वर्ग विनाकारण बेरोजगार राहणार हा विरोधाभास चीड आणणारा आहे.. मद्यविक्रीच्या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार मिळतो आणि त्यांची रोजीरोटी चालते. या सर्वांना या लादल्या गेलेल्या दारुबंदीमुळे रोजीरोटीला मुकावे लागणार ही अत्यंत शरमेची अन् दुर्दैवाची बाब आहे. मद्यविक्री व्यावसायिकांना मद्यविक्रीच्या व्यवसायातून मिळणार्‍या उत्पन्नावर माझ्यासारख्या गुंतवणूक सल्लागाराचाही रोजगार अवलंबून असतो. हस्ते-परहस्ते माझ्यासारखी माणसंही या दारुबंदीमुळे भरडली जातात! बाकी सगळी दुकानदारी सुरू असते मग मद्याच्याच दुकानांना बंदी का?? स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या गांधींच्या जन्मदिनी मद्य-व्यावसायिकांच्या सरकारमान्य व्यवसायावर ड्रायडेचे हे पारतंत्र्य का?? तीव्र निषेध...! -- तात्या अभ्यंकर.

वाचन 17161 प्रतिक्रिया 0