णमस्कार्स लोक्स ,
वाचताना घेवयाच्या खबरदार्या :
१. इनोंचं पोतं घेऊन बसा .. लेख वाचून आपली जळजळ अंमळ वाढू शकते.
२. विरामचिन्हे व्याकरण वगैरे आम्ही फाट्यावर मारतो .. आणि हो आपण हे, जाणताच
३. लेख वाचण्यासाठी प्रिरिक्विसाईट
माझ्या विडंबणांच्या रिओपनिंगच्या निमित्ताने माझ्या ब्लॉगवर लिहिलेला हा लेख.... जसाच्या तसा इथे
स्वतःची बाईक असावी अशी प्रत्येकाची इच्छा असती, माझीदेखील होती,त्यामुळे ११वीत गेल्यावर जेव्हा घरी सायकल आली तेव्हा बाईक कशी आणता येईल हाच विचार मनात होता. मात्र ,मी १६ वर्षाचा असल्याने आणि कमाईचा कोणताही मार्ग नसल्याने जे काही करायचे ते फु़कटच करावे लागणार होते. अशातच मग उकिरडे हुडकाहुडकी सुरु झाली, घराजवळचे एकून एक भंगाराचे स्पॉट्स, धुडआळले आणि एक बाईक सापडली ,मग काय माझ्या स्टंट्ससाठी बनवलेल्या प्रोफाईलमध्ये त्या बाईकचे दिमाखात आगमन झाले. लोकाना मी माझे स्टंट्स बघा असे ओरडुन ओरडुन सांगु लागलो, लोकांच्या घरांसमोर मी रात्री बेरात्री जाऊन ती सायलेंसर खराब झालेली बाईक मुद्दाम आवाज करत पिदडायचो .. एक-दोन नवविवाहित जोडप्यांनी मी नको त्या टायमाला रायडींग करत कॉलनी डोक्यावर घेतू म्हणून माझा कॉलनीत जाहिर अपमानही केला होता .... तेंव्हा "तुमच्यात कॉण्संट्रेशन नाही .. माझ्यावर कशाला फाजिल आरोप करता ? " असा सणसणीत टोला मी लगावलाही .. पण तो कोणीही ऐकून घेतला नाही. एव्हाना माझे ओव्हर ड्रायव्हिंगही सुरु झालेले होते, तेव्हा चारी बाजुनी मी या साईटवरचे स्टंट्स पाहुन गल्लीत डंका वाजवला आणि मग ते बळेच फेमस करायचा प्रयत्न केला. तर हा झाली माझ्या पहिल्या बाईकचा किस्सा.
पण नंतर लक्षात आले की अरे आपली बाईक तर फारच बाळबोध आहे, आणि आपले स्टंट्स तर त्याहून बकवास .. एकदा मी बाईकचे स्टंट्स करत होतो .. च्यामारी कोणी साधं वळून पहायला तयार नाही .. वैतागून बाईक पार्क केली .. एंव्हाना शरीरातल्या पाण्याची लेव्हल करायची वेळ झाली .. जरा आड गेलो तर एक कुत्रं सालं .. बाईकवर तंगडं वर करून आणि जिभ बाहेर काढून आरामात त्याच्या पाण्याची लेव्हल करत होतं .. नाही नाही .. एखादं रोडछाप कुत्र देखिल विज्जत काढतं म्हणजे काय ? नवीन काही केले पाहिजे, मग काय पुन्हा नवी साईट हुडका जिथे अजुन वेगळेवेगळे स्टंट्स मोफत पहाता येईल.. मोफत गोष्टींचा मला पहिल्यापासूनंच लळा .. काय सांगायचं घराच्याच बाजुला मंगलकार्यालय हो .. मंग काय "सारे भारतीय माझे बांधव आहेत" अशी प्रतिज्ञा रोज शाळेत घोकायचो की नाही ? असलं लग्न की हाण तिन टायमाचं घरच्यागत. झाले नवीन साईट सुरु ,इतके दिवस मला स्टंट्स मधले यडझवही माहित नव्हते त्यामुळे युट्यूब ,रेडट्यूब अबब चुकलं .. स्टंट्समॅनिया मधले पहायचे आणि स्वतःच्या बाईकवर ते ट्राय करत बसाय्चे , पुन्हा तोंड उचकून पृष्ठभागावर पडायचे .. आणि गल्लीत हसू करून घ्यायचे ..पुन्हा पुन्हा तेच चक्र,असे मी किती स्टंट्स ट्राय केल्या आणि कितीवेळा आपटून घेतली माझे मलाच माहित . दरवेळेला घसा खरडून जाहिरात करायची आणि पुन्हा काही चांगले बघितले कि जुने स्टंट्स बंद करुन नवीन ट्राय करायची, नेतवर बसले की तोच उद्योग ,त्यात माझी मोपेड बाईक होती त्यामुळे तोंड उचकून पडलो म्हणून कपडे खराब झाले म्हणून वर घरातल्यांच्या शिव्या,आणि हो नवीन काहितरी करायचे ही खाज मात्र प्रचंड त्यामुळे अगदी शारीरिक तसेच बौद्धिक दिवाळखोरीचा एक नवा उपक्रमही सुरु केला. अगदी सहजच कॉलनीवाल्या तुसड्या कंपुंपासुन सगळ्याना विनवनी अर्ज केला आणि सगळ्यानी मदतीचे हातही पुढे केले मात्र काही कारणानी ते सगळे तिथेच राहिले. आता मी यामाहा ची आर-१ मागायला लागलो होतो नां ? त्यांना वाटलं मी अपंगनिधीसाठी २ रुपये मागायला आलो की काय ? पुन्हा एकदा सगळ्यांनी इतिहासावर लाथ मारून हाकलले तर हाकलले वर नागरिकशास्त्राची नवी व्याख्याही ऐकवली. एव्हाना मी आता कागदावर केलेले (काय ? ते विचारू नये) बाईकवर उतरवयला लागलो होतो (कसे? ते विचारू नये) ,बर्यापैकी बाईकरही बनलो होत. मग सारखे तेच , बाईकवर जाऊन वाकडी तिकडी रपेटून किती नव्या हिट पोरी कॉलनीत आल्या ,कुणी आपल्यावर नवीन काही कॉमेंट पास केली का? सारखी धुकधुक . ती कडूंच्या आलकाचे कसे आणि किती वाढले एवढाच फक्त विचार मनात होता (शांत बसा चावट लोकांनी .. तिचं माझ्यावरील क्रश किती वाढलं ह्या बद्दल बोलतो मी ) . आणि एक गंमत झाली.
थोड्याच दिवसात मला थम्स अप च्या कुपना वर यामाहा-एफझेड१६ या बाईकचा शोध लागला आणि माझे स्टंट्स मी तिच्यावरंच करु लागली(ली?) तेथे ही गलथानपणा केला खरा पण लोकाना माझे स्टंट्स बरर्यापैकी आवडले (असं ते उच्चभ्रू लोक किमान तोंडावर तरी म्हणू लागले .. मागे बहुदा शिव्याच घालत असावेत .. मधे मी कॉलनी सोडून जाण्याचा एक लै भारी ड्रामा केला होता नं ? त्याचा परिणाम.. काही जळकूटे लोक मात्र अजुनही जळतात बुआ माझ्यावर .. तो कॅफेवाला परा तर काय समजतो काय ठाऊक स्वतःला ? एकदा स्टंट्स च्या नावाखाली त्याचे दोनचार कंप्युटर्स आणि कष्टंबरंच मोडतो.. मग बस्स म्हणा बोटं मोडत) ,मग काय्.. मला फक्त हवा मिळण्याची देरी ..,तिथे आणखी काही स्टंट्समेन भेटले (सखुबाई चटणे.. प्रतिदिनी .. तुम्हाघरीमन हे माझ्या पेक्षा अनुभवी आणि मोठे स्टंट्समेन मला भेटले) त्यानी त्याच्या बाईक्स किती भारी सजवला आहे ते पाहिले आणि आपणही तसेच करायच्या पाठिमागे लागलो... मंग आम्ही अचानक पाठलाग करतो म्हंटलं .. रोक सको तो रोक लो .. मग काय कोठेतरी जा नवीन स्टंटक्लिप्स डाऊनलोड कर. ते आवडले नाही तर पुन्हा तिसरे, त्यात व्हिल्ली-स्टॉपी मधले ओ का ठो कळत नव्हते त्यामुळे मग आणखीनच प्रॉब्लेम व्हायचा ,पण माझा आपला फालतू प्रयत्न चालुच होता, एव्हाना बजबजणारा स्टंट चालु करायचे पुन्हा डोक्यात आले होते आणि अशातच 6162byhands.com चा वापर करुन मी जुन्या रायडर्सचे व्हिडिओज एकत्र करायचा प्रयत्न चालु केला. तो बर्यापैकी चालला. पण जसे जसे माझे ज्ञान वाढत होते तसे तसे मला अधिकाधिक काही करावेसे वाटु लागले मग काय नवनवीन अॅक्सेसरिज हुडक किंवा मग नवीन बघे (ज्यांना आपण "पैसे देतो-टाळ्या वाजव" असे म्हणू) मिळवण्यासाठी माझ्या बाईक स्टंट्से फॅन व्हा असे जगाला ओरडुन सांगणे , हे सगळे करण्यासाठी मी किती बाईकचे आणि लोकांच्या डोक्याचे उट्टे काढले असतील ते मलादेखील माहित नाही. पण अगदी घरातल्याना सांगुन मीच बाईक बंद केल्यावर देखील माझे हे व्यसन जात न्हवते त्यामुळे मग मी यात पुढे जायचे ठरवले एकदा तर मी रात्री आमच्या ऐवजी पुढच्याच घरात निघून गेलो... तिथे तर आर्मीवाली फॅमिली रहायची .. तो माणूस तसा ६ महिन्यांनी घरी यायचा .. पण मी गेल्यावर आत कोणी वेगळाच होता .. जाऊ दे ना .. आपल्याला काय ? चला पुढे .. (पुढचे प्रसंग "बाईच्या कुषितले" ह्या प.रा.राजवाडेंच्या मासिकात) , आपले आपण स्टॅटिक बर्निंग शिकलो आणि स्टॉपी मारायला लागलो आणि मीच माझा प्रायोगीक दी रायडर बनत गेलो. काय चालले होते काही कळत नव्हते पण काहीतरी चांगले करत होतो इतके मात्र नक्की . आणि याच काळात मी अनेकाना भेटत गेलो माझ्या स्वतःच्यात अनेक वैचारीक बदल होत गेले मी चारीबाजुनी प्रगल्भ होत गेलो आजही होत आहे .. चौमीती मधे रहाणारा मी . मी लठ्ठ झालो होतो की काय ?..
आणि या सगळ्यात माझी एक सुप्त इच्छा होती की माझी अशी एक अॅकॅडमी हवी होती की ज्यात माझ्या सारख्या लोकाना सदस्य होता येईल आणि मलाही समाधान लाभेल म्हणून मी "फारसे फाटलेले" हे माझे जुन्या बाईकवरच्या स्टंट्सचे कथापुराण नव्या बाईकच्या नावाने खपवले आणि तेथे सद्स्यनोंदणी ची सोय घेतली ,पण हा मात्र माझा प्रयोग फसला (तसे किती प्रयोग फसले ह्याची गिणती मी आता बंद केली आहे ) आणि येथे मला काही प्रतिसाद (एवढे ओरडूनही) मिळाला नाही.. काय करावं बाबा ? सगळे स्टंट करून झाले .. पण दखल घ्यायला कोणीच तयार नाही यार . सांगायची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी स्टंट्सचे प्रयोजन ,स्थळ ,बाईक डिझायनिंग सगळे माझे मीच करत होतो (आणि कशातही परफेक्ट नसल्यानं काहीही जमत नव्हतं ),आणि हो पण त्यात मला आनंददेखील मिळत होता आणि हो या सगळ्या वेळी माझे व्हिली हेच स्टंट्सप्रकार असायचे कारण इझीली केल्या जाणार्या स्टंट पैकी सर्वात सोपे तेच होते हे वेगळे सांगणे न लगे. आणि हो माझ्या अजुन काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या त्या अशा की बाईक्स स्टंट्स अॅकॅडमी मधे एकही पुर्णवेळ ओपन क्लब नव्हता. मग काय हुडकली जागा आणि हो सुरु केला क्लब "स्टंट करा तोंडावर पडा" नावाचा आणि हो मध्ये सांगायचेच विसरलो डीसेंबर महिन्यात माझ्या घरी थंडरबर्ड आली होती त्यामुळे तसा प्रॉब्लेम नव्हता पण तिचं मशीन पण फॉल्टी त्यामुळे अजुन रंग मे भंग, पण या सगळ्यातुन मार्ग काढत मी अॅकॅडमी काढली . आणि हो याचे हळू हळू मेंबरही वाढत गेले १२ डिसेंबरला तुकाराम लाटणे जॉइन झाला त्याला लगेच अॅकॅडमीचा अध्यक्ष केला. जानेवारात प्रतिदिनी आणि पाठोपाठ तुम्हाघरीमन ही आला. त्सुस्तुत्सू हा जॅपनीज रायडर .. हा आल्यानं आमच्या अॅकॅडमीला चार चांदण्या लागल्या .. आणि आम्हाला चपला मिळाल्या .. त्या घालून आम्ही आता आणखी चेवाने कारणामे करतो. पण हा आकडा ८ च्या वर गेला नाही (मीच रूप बदलून ४ वेळा यायचो त्यामुळे माझेच चार वेळ सभासदत्व. असे झाले तरी या सगळ्या अॅकॅडमीसाठी मी केलेले श्रम आजही जसेच्या तसे मी जपुन ठेवलेले आहे आठवण म्हणून ते ही मनाचा कुपीत.
आणि अशातच मी एक मोठा निर्णय घेतला. माझ्या ऑफिसवर या स्टँट्स,अॅकॅडमी वगैरेचा चा मोठा परिणाम होऊ लागला. आणि ऑफिस ही माझी पहिली प्रायोरीटी होती त्यामुळे ३१ फेपुरवारी रोजी मी पुर्णपणे स्टंटसन्यास घेतला. माझे स्टंट्स बिंट्स बंड केले. अॅकॅडमीलाही सुरूंग लावला आणि उडवली आणि बाईक्स लोकांच्या स्वाधीन करुन टाकल्या. अर्थातच कंप्युटरवर गेम्स मधे स्टंट्स करणे चालु होतेच. मग मी महिन्यातुन एखादा स्टंट करून कॉलनीमधे मिरवू लागलो आणि त्याचवेळी वेगवेगळ्या कॉलन्यातू पक्षी पाहु लागलो खुप खुप पडलो धडलो आणि ९ महिन्यांच्या गॅप नंतर पहिल्यांदा मी माझी नवीन मॉदिफाईद बाईक www.haatgaadi.dk सुरु केली . त्याची जास्त पब्लिसिटी केली नाही.. छे बुवा .. तुम्हाला काही कळतं का ? अशा गोष्टींची जाहिरात करायला मी काय गोत्र-बित्र प्रोफाईल मधे लिहिणारा आणि कंपनीसाठी खुप काम करणारा वाटलो का ? पण ज्यानी ते पाहिले त्याना ती प्रचंड आवडले (नाही आवडून सांगतील कोणाला? जोवर आवडले म्हणत नाही तोवर त्यांच्या घरा समोर मी फाटलेल्या सायलेंसर वाली बाईक घेऊन रात्री अपरात्री स्टंट्स करायचो म्हंटलं) आणि मग मी माझी अॅकॅडमी "आपटलेल्या तोंडातले" जुने नाव टाकुन देऊन व्हाय टु पिस ऑफ या नव्या नावाने सुरु केला आणि पुन्हा काही प्रमाणात टारझन झालो.
आणि हो मी कुबड्या खविस अस्थिदंत विमा एजन्सी तर्फे लोकांना विमे देतो हे तर तुम्हाला माहितच आहे (बोला आहे की नाही माहिती ? नाही ? देऊ का विमा काढून मग ? ) ,आणि हो त्यामुळेच मी पुर्ण दंतकर्मी झालेलो आहे ,अशातच साधारण जुलै महिन्यात ओव्हरड्राईव्ह मॅगझिनात माझ्या स्टंट्सवर काही फोरम आले (लेख वाचा वाचू नका .. पण एवढं वाक्य लक्षात ठेवा .. समजले काय ?) . आणि नेहमीप्रमाणे ते डर्टरोड किंवा ड्रिफ्ट-स्प्रिंट्स हे स्टंट्स केंद्रबिंदु धरुन लिहिलेले होते ,अर्थात त्याला मी खणखणीत उत्तर पाठवले पण ते छापुन आले नाही (हॅहॅहॅहॅ .. बहुदा ते सणसणीत फक्त मलाच वाटले ) .आणि यातुनच आमच्या काही जेष्ठ लोकांच्या मनात स्टंट्सवर एखादी अकादमी का असु नये अशी कल्पना आली , आणि त्यांनी मध्यंतरी झालेल्या एका कार्यक्रमात ती सांगितल्यावर सुरु कराच असे अनेक लोकानी सांगितले अर्थातच आमच्या गृपमध्ये अकादमी काढायला जमणारा मी एकटाच त्यामुळे मी ते इंद्रधनुष्य उचलले , आणी कॉलनीत जाहिरात करायचे ठरवले आणि मग वेगवेगळी गॅरेजं धुंडाळुन मॉडिफाइद पार्ट बनवून .थोडेफार stunts शिकुअन एक एकाअदमी बनवली www.haatagaadi.com अर्थातच यावेळी अॅकॅडमी पुर्ण प्रोफेशनल असल्याने आम्ही तोताराम वैद्य(www.amhi_amachya_nayanit_khush_ahot.com) यांच्या मदतीने अॅकॅडमीचे डोमेन सर्वर्स तर प्रतिदिनी यांच्या मदतीने अॅकॅडमीच्या जाहिरातीसाठी एक खास प्रतिदिनी छाप कवितांचा ऑडियो अल्बम तयार केला त्याला स्वरबासकर देवादिदेवांकडून उत्तम चाली लाऊन घेतल्या .. व एक उत्तम अॅकॅडमी जन्माला आली (असे आम्हीच म्हणतो) .
कळसाध्याय म्हणजे एका विशेष कार्यक्रमात डॉ. मोरिच भोक यानी त्या संस्थळाचे उद्घाटन केले आणि आज ते जोमात सुरु आहे (असे आम्हीच म्हणतो) . योगायोग असा की मला व्यासंगासासाठी अनेक बक्षिसे मिळाली.. पोलिस कंप्लेंटी झाल्या .. लोकांनी लग्न कॅन्सल केली .. काहींनी तर कॉलनीतून दुसरीकडे रहाणे पसंत केले. पण सांगली ग्रांप्रिं मधे चार जणांच्या रेस मधे चौथा आल्यावर मला पहिल्यांदा मोठ्या हस्तीकडुन बक्षीस मिळाले आणि ते होते डॉ. मोरिच भोक. आणि या अकादमीचे उद्घाटकही तेच. आता मी या अकादमीचा स्टंट ऍडव्हायजर म्हणून कम पाहत आहे. अर्थातच मेकॅनिक व प्रेक्षक सुद्धा दुसरे कोणी नाही मीच आहे . अशारीतीने माझा हा डी रायडिंग चा प्रवास मध्यावरच सुफळ झाला आहे. अजुन अनेक विषय डोक्यात आहेत पण ते काही दिवसानी ..मग खरा तो संपुर्ण होईल. पण शेवटी काही का होईना.... मी दी रायडर झालो...................
टारझन
www.haatgaadi.com (आपटेड)
प्रतिक्रिया
18 Sep 2009 - 12:51 am | प्रभो
दणक्यात पुनरागमन रे टार्या..
>>>आणि ९ महिन्यांच्या गॅप नंतर पहिल्यांदा मी माझी नवीन मॉदिफाईद बाईक www.haatgaadi.dk सुरु केली
हे सगळ्यात ब्येश्ट बाबा...
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
18 Sep 2009 - 1:43 am | शेखर
असेच म्हणतो...
तू जाम धडपड्या माणूस आहेस..
विविध अडचणींमधून मार्ग काढत रायडिंग शिकण्याची प्रोसेस छान लिहिली आहेस...
लोकांच्या वेळा संभाळत रायडिंग कला शिकुन घे ;)
रेस मध्ये पोल पोझिशन मिळण्या साठी शुभेच्छा...
18 Sep 2009 - 9:51 am | विशाल कुलकर्णी
कसला रे उद्योगी तू टार्या! लै भारी........, येकदम दणक्यात....
हाण तिच्या मारी.......! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
18 Sep 2009 - 1:04 am | sujay
आगाग्ग्ग्ग्ग्ग्ग !!!
लई म्हंजी लई म्हंजी लईच वरचा लेख.
"स्टंट करा तोंडावर पडा"
डॉ. मोरिच भोक
साष्टांग दंडवत.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
लेख उडायच्या आत वाचल्याने आम्ही अंमळ आणंदीत झालो.
(हातगाडी रायडर) सुजय
18 Sep 2009 - 1:10 am | सायली पानसे
सॉलिड रे टार्या..... हसुण हसुण पोट दुखायला लागला बघ.
बेश्ट विडंबन.... =)) =)) =)) =)) =)) =))
18 Sep 2009 - 1:50 am | बिपिन कार्यकर्ते
खरंय !!!
=)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
18 Sep 2009 - 12:31 pm | llपुण्याचे पेशवेll
हान तिचायला.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
18 Sep 2009 - 1:14 am | अमृतांजन
http://www.a-to-s.co.uk/home.php
ही सूदर वेबसाईट तुला अर्पण...
जबरदस्त ईडंबन!
18 Sep 2009 - 1:17 am | शेखर
www.chappal-gift.com
18 Sep 2009 - 2:09 am | प्राजु
लेख वाचताना कधी खुद्कन, कधी गालातच तर कधी खळखळून... मात्र अखंड हसतच होते हे नक्की. :)
सॉल्लिड!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Sep 2009 - 2:43 am | टुकुल
अजुन वाचला नाही.. पण आधीच हसायला सुरुवात झाली...
वाचतो आता निवांत..
18 Sep 2009 - 3:23 am | टुकुल
लै लै ह्हुच्च टार्या...
आणी हो जाम हसलो..
--टुकुल
18 Sep 2009 - 2:49 am | चतुरंग
बरेच दिवसांनी एंट्री मारलीस ती एकदम व्हीलीच! B)
लई हसलो!
जरा जपून चालवा बरं का रायडर भाऊ, एकदम तोंडावर पडायला व्हायचं! ;)
आणि हो, हेल्मेट घालायला विसरु नका! :D
(नॅविगेटर)चतुरंग
18 Sep 2009 - 3:27 am | रेवती
हे वाचून तुला काय म्हणावं तेच समजत नाहिये.
लिहिलयस चांगलं पण उगमस्त्रोत कोणता?;)
रेवती
18 Sep 2009 - 10:11 am | टारझन
माझा लेख केवळ आपल्यालाच समजला आहे रेवती तै ;)
बाकी चार लोकं आपलं टेंशन विसरली ह्यात आपला लेख यशस्वी झाला ..काय ? .. ह्या उपर "आपलाच इतिहास लाल " म्हणण्यात आपल्याला काडीमात्र विंटरेष्ठ नाही,... काय ?
हल्लीच आमच्या हि&ही मनावर आधात झाल्यानं आम्ही लेख आवरता घेतलाय :) त्याबद्दल सर्वांची जाहीर माफी मागतो आणि इथेच थांबतो.. कॉलनीत नवं कुटूंब आलंय .. जरा आमचे ष्टंट दावतो की ...
-आणि हो .. लेख स्वयंप्रकाशितंच आहे हो .. ह्याचा दुरदुरवर कोणत्याही जिवंत अथवा मृत आय.डी. शी किंवा प्रसंगाशी संबंध नाही .. असल्यास तो केवळ योगायोग समजावा :)
-(लेखण प्रेमी) टारोबा रायटर
18 Sep 2009 - 10:24 am | शैलेन्द्र
लय भारी...
21 Oct 2009 - 11:10 pm | शेखर
बाकी चार लोकं आपलं टेंशन विसरली ह्यात आपला लेख यशस्वी झाला ..
हे मात्र खर आहे.... तुझे लेख म्हणजे स दा ब हा र ...
नविन लेखाची वाट बघत आहे....
18 Sep 2009 - 3:53 am | गोगोल
हसून हसून गडाबडा लोळलो. अतिउच्च!! मला प्रश्न पडलाय की हा लेख सर्वात सही आहे की मण्याच्या खिषातले - शेंगदाणे...तुलना करणे अवघड आहे...महान आहेस तू लेका.
18 Sep 2009 - 5:42 am | गुंडोपंत
सावलीड लिहिल्लस रे!
आपला
दी रिटायर्ड रायडर
गुंडोपंत
18 Sep 2009 - 6:59 am | संदीप चित्रे
हसत हसतच लेख वाचलाय :)
>> तुमच्या कॉन्सन्ट्रेशन नाही ...... =D>
18 Sep 2009 - 8:18 am | पाषाणभेद
जोरदार पुनरागमन. कामातून वेळ काढून कष्ट करून लिहीलेस. मजा आली. असेच चालू द्या.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
18 Sep 2009 - 8:24 am | क्रान्ति
टारूशेठ, महाण आहात! दि रायडर झाल्याप्रित्यर्थ हारदिक हाबिणंदण! तुमच्या लेखातला कळसाध्याय तर परमोच्च बिंदू आहे! येऊ द्या अजूण!
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
अवांतर :-वाचताना घेवयाच्या खबरदार्यांमधे पोटदुकीवरचे औशिद लिवायचे राहिले वाटते! हासू हासू पोट दुकले ना!
क्रान्ति
मला हासूही सोसेना!
अग्निसखा
रूह की शायरी
18 Sep 2009 - 8:39 am | सहज
मस्त रे! (पण परप्रकाशीत की उत्स्फूर्त(आयत्या वेळचे विषय) केटॅगरी म्हणायची रे)
औषधोपचार|नृत्य|बालकथा|वाङ्मय|शुद्धलेखन|वाद
हे एकदम उच्च!! :-)
18 Sep 2009 - 9:01 am | दशानन
अॅकॅडमीला चार चांदण्या लागल्या .. आणि आम्हाला चपला मिळाल्या ..
अग्ग्गाग्गाग्ग्गाअग्ग्ग्गा !!!!!
ज ब रा !
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
18 Sep 2009 - 9:13 am | अमोल केळकर
मस्त , मजा आली वाचून
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
18 Sep 2009 - 9:25 am | अवलिया
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
18 Sep 2009 - 10:02 am | भडकमकर मास्तर
विषयनिवड आणि निरूपण उत्तम
:))
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
18 Sep 2009 - 11:39 am | छोटा डॉन
एकदम हुच्च झाला आहे लेख, टार्याची धडपड( की धर पाड ? ) आवडली, अॅकेडमीला शुभेच्छा !!!
वेळ मिळाला की आम्हीही तुमच्या अॅकेडमीत येऊन २-४ स्टंट करुन दाखवु ;)
------
छोटा डॉन मल्ल्या
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
18 Sep 2009 - 12:09 pm | विसोबा खेचर
आलास पुन्हा? लेका गायब होतास ते बरं होतं की! :)
18 Sep 2009 - 12:36 pm | श्रावण मोडक
+१
;)
18 Sep 2009 - 12:41 pm | टारझन
पुन्हा ? म्हणजे गेलेलो ?
हो ना .. "बर्याच" जणांना आम्ही असलो की बरं वाटतं .. आणि "काहिंना" नसलो की :)
आता बर्याच जणांसाठी काहिंचा विचार थोडा कमी केला :) बाकी काही नाही हो ;)
-(ये-जा प्रेमी) टारोबा लाकझुकर
18 Sep 2009 - 12:48 pm | परिकथेतील राजकुमार
आगागागागा
हाण तेज्यायला !!
अतिशय महान हिन व उच्च हिणकस असे हे विडंबन आहे. आणी हो ह्या बरोबरीनेच आपल्या मुर्च्छा डॉट टिके ह्या संस्थळा विषयी देखील लिहिले असतेत तर आमच्या ज्ञानाची त्रिमिती वाढुन चतुर्मीती झाली असती.
आणि हो बाहेरुन टंकुन आणुन युनिकोदात परिवर्तीत करण्याची कल्पना आवडली. आपल्या रायडींगला खुप खुप शुभेच्छा.
मध्ये आपल्या खव मध्ये आपला आणी संधिवात खरे ह्यांचा फोटु पाहिला. आवडला... फोटु.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
18 Sep 2009 - 2:03 pm | अजिंक्य
विषयापासूनच हसायला सुरुवात!
झक्कास - =)) !!!
अजिंक्य.
18 Sep 2009 - 9:19 pm | सूहास (not verified)
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
सू हा स...
18 Sep 2009 - 9:29 pm | धमाल मुलगा
टारझना, धडपड आवडली.
स्टंटबायकिंग प्रवासाला आणि हापिसाच्या कामाला शुभेच्छा...!
तू जाम धडपड्या माणूस आहेस..
विविध अडचणींमधून मार्ग काढत शिकण्याची प्रोसेस छान लिहिली आहेस...
शुभेच्छा...
छान खटपट रे!
तुझी फारशी पब्लिसीटी नसलेली पण सर्वांना आवडलेली साईट बघीतली...तिथे तुझा फोटो आणि इंग्रजी बनावटीच्या गाड्यांच्या ढीगभर स्पेसिफिकेशन्सचे चुका असणारे लेखन सोडून काहीच आढळले नाही. :(
-('बर्याच'जणांमधला एक ;) ) ध.
18 Sep 2009 - 11:06 pm | निमीत्त मात्र
आमचाही इथे फ्यान क्लब होतोय की काय? ;)
19 Sep 2009 - 1:40 pm | धमाल मुलगा
>>आमचाही इथे फ्यान क्लब होतोय की काय?
हरे राऽऽम! #o
लेखाच्या विडंबनाला प्रतिक्रियांच्या विडंबनानेच प्रतिक्रिया द्यावी म्हणुन ३ रँडम प्रतिक्रिया उचलल्या आणि चिकटवल्या फक्त!
१.
स्त्रोतः आमचे बिरुटे गुरुजींचा प्रतिसाद.
२.
स्त्रोतः जालिंदरबाबांचे पट्टशिष्य भडकमकर मास्तरांचा प्रतिसाद.
३.
स्त्रोतः श्री. निमित्त मात्र ह्यांची प्रतिक्रिया.
ह्यातल्या बिरुटेसरांना किंवा/आणि भडकमकर मास्तरांना का नाय वाटलं बॉ असं???
---
आमचा विनोबा पाचलग बारावीतला अडनिड्या वयाचा पोरगा, त्याला छोट्या छोट्या गोष्टींचं अप्रुप वाटणं सहाजीक आहे, समजु शकतो, यु टु??? :D
(बाकी, आम्ही आपले बर्याच आधीपासुन 'फ्यान' आहोत हे जाणुन असालच की ;) )
-(हल्ली डिजिटल रेग्युलेटर) ध.
19 Sep 2009 - 4:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे त्या दोघांचं मिपावरचं वय पहा रे, लगेच उत्तर मिळेल! ;-)
ठ्यॉ करून हसले धम्या, नशीब कॉफी पित नव्हते एकीकडे!
अदिती
18 Sep 2009 - 10:54 pm | मिसळभोक्ता
१२ वीतल्या व्यासंगी, धडपड्या मुलांना ट्यारराईझ करणार्या या टारुरिष्टाचा निषेध !
-- मिसळभोक्ता
18 Sep 2009 - 10:55 pm | अवलिया
कोण बोलतय... कोण बोलतय...
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
18 Sep 2009 - 11:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आचरट आणि आगाऊ विडंबन आहे ... एक लंबर ही & ही आहेच आहे.
अवांतरः
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
अदिती
19 Sep 2009 - 11:09 am | स्वाती दिनेश
टारोबा, लय भारी..
स्वाती
19 Sep 2009 - 12:35 pm | पर्नल नेने मराठे
=)) ;)
चुचुत्सु
19 Sep 2009 - 5:54 pm | मराठमोळा
टारझन,
तुझी बाईक स्टंट शिकण्याची धडपड आणि जिद्द बघुन डोळ्यात पाणी आले रे. असाच पुढे जात रहा एक दिवस मोठा स्टंटमैन होशील..
अॅकॅडमीला शुभेच्छा!!!!
अवांतरः अशक्य आहेस रे बाबा, मानलं बुवा..
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
19 Sep 2009 - 6:38 pm | अजुन कच्चाच आहे
फुडच्या येलेस टारझन्रावांचा ल्येख हेल्म्येट शिवाय वाचणे नाह्ही.
बाब्बो !
कडेलोट म्हन्जे आनखी काय असतोय दुसरा !!
.................
अजून कच्चाच आहे.
23 Oct 2009 - 3:20 pm | विजुभाऊ
धड पडणार्या मुलाना शुभेच्छा
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत