काही दिवसांपूर्वी इथे 'स्मृतीगंध' हे ओघवतं प्रकटन वाचायला मिळाल्याचं बर्याच जणांना आठवत असेलच. मला स्वतःलाही स्मृतीगंधाचे वाचन करून खूप आनंद मिळाला, एका कृतार्थ आयुष्याची आणि एका चांगल्या लेखकाचीही ओळख झाली.
गेल्या काही दिवसांत खूपदा बराच प्रवास झाला तेंव्हा या लिखाणातील काही भाग (आणि इतरही लेख, कविता वगैरे) वेळच्या वेळी वाचायला मिळाले नाही, तेंव्हा "हे सर्व चांगलं लिखाण 'श्राव्य' स्वरूपातही उपलब्ध असतं तर किती बरं झालं असतं" असं वाटून मी या लिखाणाच्या एम पी ३ फाईल्स करायला उद्युक्त झालो. पण विचार आणि कृती यांत बराच कालावधी जावा लागला!
मराठीतील नवीन कर्णिका (मनकर्णिका) असं नाव या उपक्रमाला मी दिलंय. या ठिकाणी, मिसळपावावर (आणि आंतरजालावर इतरत्र) प्रकाशित झालेलं असं इतरही उत्तम साहित्य श्राव्य स्वरूपात जस-जसा वेळ मिळेल तसं उपलब्ध करून द्यायचा माझा विचार आहे. हेतू हा आहे, की या mp3 audio files वाचकांना download करून mobile स्वरूपात mp3 player वर कुठेही नेता येतील.
तर मंडळी, सुरूवात करतोय मिसळपावावर प्रसिद्ध झालेल्या वामनसुत यांच्या "स्मृतीगंध" या मालिकेने. या ध्वनीमुद्रणासाठी आणि त्याच्या प्रसारणासाठी अर्थातच त्यांची परवानगी घेतलेली आहे, त्याबद्धल त्यांचे आणि स्वाती दिनेश यांचे मनःपूर्वक आभार!
ही माझ्या या कथनाची सुरुवात [Streaming audio च्या पानावर गेलात की play ची कळ दाबा.]
(हे शब्द आहेत बामनाचं पोर यांचे, 'स्मृतीगंधा'च्या अखेरच्या भागावरील प्रतिक्रियांमधून; मला वाटतं हे शब्द या लिखाणाचं अचूक वर्णन करतात!)
आणि
हे मनकर्णिकेचं श्राव्य प्रथमपुष्प
मूळ लिखित: स्मृतीगंध-१ "व्हेळातले दिवस"
हा दुसरा श्राव्य भाग
मूळ लिखित: स्मृतीगंध-२ "व्रतबंध"
हा तिसरा श्राव्य भाग
मूळ लिखित: स्मृतीगंध-३ "वाकेडची शाळा"
आणि हा चौथा श्राव्य भाग
मूळ लिखित:स्मृतीगंध-४ "मुंबईमार्गे व्हेळ ते राजापूर"
यांपुढील भागांसाठी (ते खरंच श्राव्य असतील तर) थोडी प्रतीक्षा कराल अशी आशा आहे
- बहुगुणी
कृपया नोंद घ्या: मी या audio files एका व्यावसायिक server वर सध्या ठेवलेल्या आहेत, जिथून त्या stream केल्या जातात. ही free service असल्याने तेथील जाहिरातींशी वा इतर content शी माझा संबंध नाही, त्यावर माझा काही आधिकारही नाही. त्यामुळे त्या link च्या वापराने कुणाचं काही नुकसान होणार नाही याची मी खात्री देऊ शकत नाही. Anti-malware software वगैरे आपल्या संगणकावर असतीलच, त्याचा कृपया वापर करा. हा उपक्रम वाचकांना आवडला तर यथाकाळ तात्या आणि नीलकांत इथेच audio files upload ची सोय करू शकतील, तेंव्हा बहुतेक आधिक सुरक्षित streaming शक्य होईल.
प्रतिक्रिया
10 Aug 2009 - 3:41 am | विंजिनेर
उत्तम उपक्रम. सुंदर नाव! येऊ द्या अजून बहुगुणी शेट!!
10 Aug 2009 - 3:59 am | विकास
उत्कृष्ठ उपक्रम आणि नाव! अशी सुविधा करून दिल्याबद्दल धन्यवाद!
10 Aug 2009 - 4:15 am | Nile
हे झालं तर उत्तमच! :)
10 Aug 2009 - 4:44 am | प्राजु
अत्यंत स्तुत्य उपक्रम.
पुढे ऐकायला नक्कीच उत्सुक.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Aug 2009 - 6:46 am | विसोबा खेचर
बहुगुणीराव,
उत्तम उपक्रम...!
आपला आवाजही छान, स्पष्ट आहे त्यामुळे ऐकायला मजा येईल..
वामनरावांच्या एका सुंदर लेखमालेची ध्वनिफित तयार होते आहे ही वैयक्तिक माझ्याकरता आणि मिपाकरता आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे..
त्याकरता मी आपला व वामनरावांचा ऋणी आहे...
तात्या.
--

आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!
10 Aug 2009 - 11:11 am | प्रकाश घाटपांडे
अगदी हेच म्हणतो. अगदी समर्पक नाव
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
10 Aug 2009 - 7:00 am | मस्त कलंदर
नाव आणि उपक्रम दोन्ही उत्कृष्ठ!!! येऊ द्या आणखी...
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
10 Aug 2009 - 7:19 am | स्वाती२
छान उपक्रम. धन्यवाद.
10 Aug 2009 - 8:03 am | प्रमोद देव
बहुगुणींचे अभिनंदन!
असाच उपक्रम मी माझ्या निवडक लेखनसंदर्भात वापरतोय. तो बत्तीशीची चौसष्टी ह्या नावाने राबवलाय.
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
10 Aug 2009 - 8:17 am | मदनबाण
छान उपक्रम... :)
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
10 Aug 2009 - 8:20 am | दशानन
उत्कृष्ठ उपक्रम आणि नाव! अशी सुविधा करून दिल्याबद्दल धन्यवाद!
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
10 Aug 2009 - 10:57 am | स्वाती दिनेश
आपले बोलणे झाल्याप्रमाणे तुम्ही अगदी मनावर घेऊन सुरुवात जोरदार केलीत, आता हे वामनसुतांनाही दाखवते म्हणजे तेही ऐकतील,त्यांना नक्कीच आनंद होईल.
धन्यवाद.:)
स्वाती
10 Aug 2009 - 8:51 pm | क्रान्ति
खूप आवडला. नाव तर खूपच सुरेख. अभिनंदन!
क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी
10 Aug 2009 - 9:20 pm | संजय अभ्यंकर
बहुगुणी साहेब,
फार शुद्ध व स्प्ष्ट आवाज.
अजून येऊदे!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/