माझं तुझ्यासोबत असणं..
माझ्या कौतुकात तुझं बुडुन जाणं..
माझ्या आवडीनिवडी
सांभाळण्यासाठी तू
तुझ्या कामांना बाजूला ठेवणं..
संपूर्ण महिनाभर चालणारा हा कौतुकाचा सोहळा..!!
पण... काहितरी राहून गेलंय..
आपलं निवांत गप्पा मारणं..
एकमेकींच्यासोबत !
केवळ अन केवळ बोलणं....
असं झालंच नाही गं!
हिंडलो, फिरलो.. खेळलो..
पण.. फक्त आणि फक्त आपण दोघी
कितीवेळ एकमेकीसोबत होतो??
आता तू येणार...
तुझं येणं तसं वर्षभर लांबलं..
.... अन शेवटी
हो नाही करता करता तू आलीसही..
तू इथे आल्यावर.. हिंडण्या फिरण्यासोबतच
तुझ्याशी खूप खूप गप्पा मारायच्या... ठरवलं होतं मी.
कितीतरी वेळा एकत्र हिंडलो, फिरलो..
कितीतरी वेळा..."तू कर ना चहा माझ्यासाठी.." असा हट्ट केला..
किती पदार्थ खाल्ले तुझ्या हातचे..!!
भांडणही झालं..
एकमेकींशी गप्पा सुद्धा मारल्या.. ठरवल्याप्रमाणे!!!
.......... त्या पुरेश्या होत्या का गं??
मन का नाही भरलं कधीच?
तुझ्या इथे असण्याची सवय .. जाईल का लवकर?
घरातला प्रत्येक कोपरा... ..
मला तुझ्या वास्तव्याची जाणीव करून देतो आहे..
आणि पुन्हा पुन्हा असंच का वाटतं आहे की..
आपण दोघी मनसोक्त भेटलोच नाही..
आणि मनसोक्त बोललोही नाही..!!!
मनसोक्त ची व्याख्या नक्की काय असते??
प्रतिक्रिया
7 Jul 2009 - 9:58 pm | चकली
छान कविता प्राजु ..मनातले विचार लिहलेस!
चकली
http://chakali.blogspot.com
7 Jul 2009 - 10:00 pm | श्रावण मोडक
आवडले.
मनसोक्त ची व्याख्या नक्की काय असते??
खासच सवाल आहे हा!
7 Jul 2009 - 10:15 pm | llपुण्याचे पेशवेll
हम्म.. छान कविता.
(आई चाल्ल्या वाटते परत)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
7 Jul 2009 - 10:18 pm | प्रमोद देव
:)
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
7 Jul 2009 - 10:24 pm | मदनबाण
बाप्पा महोदयांशी सहमत... :)
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka
7 Jul 2009 - 11:43 pm | धनंजय
अगदी मनापासून लिहिलेले आहे.
8 Jul 2009 - 7:02 pm | अनिल हटेला
मनापासुन लिहीलेली कविता आवडली...:-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
7 Jul 2009 - 10:54 pm | अवलिया
मनातल्या भावनांचे प्रकटीकरण आवडले :)
--अवलिया
7 Jul 2009 - 11:10 pm | विकास
कविता आवडली. घरापासून दूर रहाणार्यांच्या व्यथेचे हे सार्थ चित्रिकरण आहे...
मनोसोक्तची व्याख्या शोधण्याचा प्रयत्न बघताना एकदम "गोडी अपूर्णतेची लावेल वेड जीवा" ह्या ओळी आठवल्या.
7 Jul 2009 - 11:23 pm | छोटा डॉन
ही सुंदर कविता अगदी मनापासुन लिहली असुन अगदी आतुन आली आहे आणि ती काळजाला हात घालते इतकेच आम्हाला ह्या कवितेतले समजले.
फारच सुंदर, कविता आवडली ...
>>मनसोक्त ची व्याख्या नक्की काय असते??
उत्तर देण्यासाठी मनापासुन आणि मनोसोक्त लिहावे लागेल.
पण मनोसोक्त म्हणजे किती?
म्हणुन तुर्तास "पास" ...!!!
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
7 Jul 2009 - 11:50 pm | राघव
शक्य असल्यास यावरचा आईंचा प्रतिसादही टाका! लेकीपासून दूर जाताना माईच्या काय भावना असतात तेही इथे टाकलेत तर मनोगत पूर्ण होईलसं वाटतं!! :)
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
8 Jul 2009 - 7:06 am | सहज
पूर्वीचे मुमुक्षु सध्याचे राघव यांच्याशी सहमत.
नक्की सांगा आईला, तिचे मनोगत लिहायला.
भाग्यवान आहेस.
7 Jul 2009 - 11:58 pm | चित्रा
खरे आहे. प्रेमाच्या माणसांना खूप दिवसांनी भेटल्यानंतर वेळ कितीही असला तरी पुरेसा वाटत नाही. हुरहूर राहतेच.
8 Jul 2009 - 12:02 am | चतुरंग
सुरेख प्रकटन! निरोपाची वेळ अवघडच, नेहेमीच अपूर्ण वाटणारी भेट पुढल्या भेटीची आस लावून जाते! :)
(अपूर्ण)चतुरंग
8 Jul 2009 - 12:15 am | दिपाली पाटिल
फार छान वाटलं , थोड्या-फार फरकाने सगळ्यांच्या भावना अश्याच असाव्यात बहुतेक...
आणि पुन्हा पुन्हा असंच का वाटतं आहे की..
आपण दोघी मनसोक्त भेटलोच नाही..
आणि मनसोक्त बोललोही नाही..!!!
मनसोक्त ची व्याख्या नक्की काय असते??
ह्या ओळी वाचुन काय वाटलं ते सांगायला शब्द च नाहीयेत.
दिपाली :)
8 Jul 2009 - 12:29 am | घाटावरचे भट
भारी.
- भटोबा
8 Jul 2009 - 12:52 am | विसोबा खेचर
सुंदर..!
राघवरावांशी सहमत..
(मातृभक्त) तात्या.
8 Jul 2009 - 1:03 am | स्वाती राजेश
लिहीले आहे....अगदी सर्व लग्न झालेल्या मुलींच्या मनातील या भावना आहेत...
मी सुद्धा माझ्या आईला एक वर्षांनी भेटणार आहे....एका महिन्यानंतर माझी सुद्धा हीच अवस्था असेल...
8 Jul 2009 - 1:34 am | अनामिक
सुंदर... मनातल्या भावना सहअ उतरल्या आहेत!
-अनामिक
8 Jul 2009 - 4:31 am | पाषाणभेद
छान आहे कविता. आवडली.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
8 Jul 2009 - 12:52 pm | शाल्मली
छान कविता!
अगदी मनापासून लिहिली आहेस.
--शाल्मली.
8 Jul 2009 - 4:28 pm | सुबक ठेंगणी
ह्या वेळीस घरी येताना "तुझ्यासाठी काय आणू?" असं आईला विचारलं त्या दिवशी फोनवर. तर म्हणाली "गप्पा मारायला वेळ आण थोडा"...
तेव्हा जे वाटलं तेच आत्ता वाटतंय!
8 Jul 2009 - 5:09 pm | परिकथेतील राजकुमार
अप्रतीम अप्रतीम अप्रतीम..
खरच सुंदर मनोगत आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
8 Jul 2009 - 9:03 pm | ऋषिकेश
मस्त कविता.. आवडली..
मनातून थेट कागदावर उतरलीए
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
8 Jul 2009 - 9:40 pm | प्राजु
सर्वांचे मनापासून आभार. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Jul 2009 - 10:58 pm | बिपिन कार्यकर्ते
कविता छानच. अगदी मनापासून लिहिल्याचे जाणवते आहे. प्रकटन आवडले.
बिपिन कार्यकर्ते
10 Jul 2009 - 10:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली..!
-दिलीप बिरुटे
11 Jul 2009 - 7:53 am | क्रान्ति
खरंच मनसोक्तची व्याख्या करता येते? इतकी मनातून आलीय कविता की कायमसाठी मनात घर करून राहिलीय!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा