शहरात लागलेली वाट

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
17 Jun 2009 - 8:58 am

धन्याशेठची 'शहरात धावणारी रानवाट' ही वेगळीच कविता वाचली, आवडली. आता वेगळं काही वाचलं, आवडलं किंवा नाही आवडलं तरी आमचं चक्र चालू होतंच त्याप्रमाणे ते झालं! ;)

शहरात लागलेली वाट
-----------------
'बघायचा' गॉगल लावून
चकाचक केशकर्तनालयातून
पळतो मी लगेच बाहेर
एका हमरस्त्यावर.

उजवीकडे, डावीकडे
नट्यांची पोस्टर्स,
डोळे तनांनी झाकोळतात!

धसमुसळ्या तरुणी
दृष्टीआड जातात,
खुसफुसतात, खिदळतात.

एक पोरटी आडवी जाते बटांशी खेळत.

लगबग चालणार्‍या
रंगीबेरंगी फुललेल्या
मादक भडक वासांच्या
सुकेशा ललनांमधून
वाट काढतो, न थांबता.

मग अचानक थबकतो.

दत्त समोर वाटेत
दोन झुडपे असतात
दरवळत शनेल नंबर फाइव्ह
आणि ओल्ड स्पाईस.

त्या अरुंद फुटपाथवर
तंद्रीतच मी ऐकतो -
"अहो काका, अहो काका -
हा वीग तुमचा का?"
-------------------------

चतुरंग

कवितामुक्तकविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

सहज's picture

17 Jun 2009 - 9:14 am | सहज

रंगाकाका !!!

:-D

कपिल काळे's picture

17 Jun 2009 - 10:40 am | कपिल काळे

हे हेहे हेह्हेह

रंगाकाका ??

मिसळभोक्ता's picture

17 Jun 2009 - 10:58 am | मिसळभोक्ता

"अहो काका, अहो काका -
हा वीग तुमचा का?"

क्या बात है !! जियो !

-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)

अश्विनि३३७९'s picture

17 Jun 2009 - 11:05 am | अश्विनि३३७९

=)) =)) =))

केशवसुमार's picture

17 Jun 2009 - 12:21 pm | केशवसुमार

रंगाकाका,
जबरा..चालू दे..
केसुकाका

मराठमोळा's picture

17 Jun 2009 - 6:39 pm | मराठमोळा

हाहाहा..
विडंबनाची विग लै भारी!!!

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jun 2009 - 6:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रंगासेठ, लै भारी !

'धसमुसळ्या तरुणी'पासून ते 'अचानक थबकतो'पर्यंत, अक्षरक्षः गर्दीत असल्याचा अनुभव आला !:D

-दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत's picture

17 Jun 2009 - 10:45 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतू ! :-)

विनायक प्रभू's picture

17 Jun 2009 - 6:54 pm | विनायक प्रभू

मस्त

धनंजय's picture

17 Jun 2009 - 8:47 pm | धनंजय

खतरनाक!

लिखाळ's picture

17 Jun 2009 - 8:57 pm | लिखाळ

हे हे हे .. मस्त वाट लागली :)

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

सायली पानसे's picture

17 Jun 2009 - 8:59 pm | सायली पानसे

मस्त :-)

श्रावण मोडक's picture

17 Jun 2009 - 9:00 pm | श्रावण मोडक

चालू द्या...

संदीप चित्रे's picture

17 Jun 2009 - 11:03 pm | संदीप चित्रे

च्यायला अशाने मिपावर कविता टाकताना आधी विचार करायला लागेल की रंग्या काय करणार या कवितेचं :)
>> हा वीग तुमचा का?
=D>

अवलिया's picture

18 Jun 2009 - 7:01 am | अवलिया

हा हा हा
जियो !!!

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

क्रान्ति's picture

18 Jun 2009 - 10:40 am | क्रान्ति

त्या अरुंद फुटपाथवर
तंद्रीतच मी ऐकतो -
"अहो काका, अहो काका -
हा वीग तुमचा का?"

=)) =)) =))
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

आणि पडलेला वीग बघून फक्त हसणार्‍यांचेही आभार! ;)

(गॉन्-केस)चतुरंग
('गॉन्-केस' हा शब्द नंदनकडून साभार!)

आपला अभिजित's picture

18 Jun 2009 - 4:59 pm | आपला अभिजित

त्या अरुंद फुटपाथवर
तंद्रीतच मी ऐकतो -
"अहो काका, अहो काका -
हा वीग तुमचा का?"

व्वा!

हे मस्तच!!!
एकूणच झकास झाले आहे विडंबन!!!

घाटावरचे भट's picture

18 Jun 2009 - 11:53 pm | घाटावरचे भट

खी: खी: खी:

- भटोबा