मथुरानगरपती

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
11 Jun 2009 - 8:27 am

हे कृष्णार्पण इथे!


मथुरानगरपतीनं लावलेलं वेड इतकं जबरदस्त आहे, की कधी नव्हे तो काव्याचा काव्यात स्वैर भावानुवाद करायचा प्रयत्न केलाय. जमलाय की नाही, ते त्या मथुरानगरपतीलाच माहीत!

सकाळी सकाळी तुला काय सुचले रे हरी?
मथुरा सोडून पुन्हा निघालास नंदाघरी
मथुरेच्या राजा आता गोकुळी कशाला जासी?

नंदलाल त्यागी वस्त्रे अलंकार मनोहर
उतरला शिरीचा का राजमुकुट सुंदर?
धरणीवरी ठेविला राजदंडाचाही भार
बन्सीधर होऊन पुन्हा का सूर जागविसी?

असे कोणते आगळे गीत छेडतो कोकीळ?
राज्यही का तुझ्यासाठी झाले चरणांची धूळ?
विरहिणीपरी तुझे मन का होई व्याकुळ?
राज्यकाजात कृष्णा का मन तू न गुंतविसी?

अंतःपुरातल्या नारी व्याकुळ नेत्री जागती
पुष्पशय्येवर आज कसे कंटक सलती?
प्राणनाथ माधव का असे बेचैन राह्ती?
अर्ध्या रात्री का कन्हैया सारथ्याला बोलाविसी?

हळूहळू येई रथ यमुनेच्या तीरावर
सुने, रिते पाणवठे, मंद वा-याची लहर
क्षणोक्षणी माधवाला चढे विरहाचा ज्वर
आता तरी कान्हा तिला विसरून का न जासी?

तुझी प्रियतमा आता संसारी रमणी होई
दूध, नवनीत, तूप यात तिचा दिन जाई
विरहाच्या आसवांना पुसून ती शांत होई
पुन्हा नव्याने तिचे का दु:ख आता जागविसी?

कविताप्रकटनविचारप्रतिसादभाषांतर

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

11 Jun 2009 - 8:33 am | विसोबा खेचर

जियो..!

आपल्या काव्यप्र्तिभेवर मथुरानगरपतीची नेहमी अशीच कृपा राहो..!

तात्या.

जयवी's picture

11 Jun 2009 - 3:49 pm | जयवी

बढिया जानेमन ...... मूड अगदी पर्फेक्ट :)

सायली पानसे's picture

11 Jun 2009 - 5:28 pm | सायली पानसे

मस्त ग क्रांती ताई. सुरेख !

प्राजु's picture

11 Jun 2009 - 9:24 pm | प्राजु

सुरेख!!!
केवळ अप्रतिम!!!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

निशिगंध's picture

11 Jun 2009 - 9:28 pm | निशिगंध

शब्दच नाहीत !!!!!!!!

अप्रतीम.

____ नि शि गं ध ____

अवलिया's picture

12 Jun 2009 - 10:53 am | अवलिया

वा! मस्त सुरेख!!!
केवळ अप्रतिम!!!

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

मराठमोळा's picture

12 Jun 2009 - 11:08 am | मराठमोळा

वा! मस्त सुरेख!!!
केवळ अप्रतिम!!!

एकदम सहमत..

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!