देवाशपथ! शरदिनी ह्यांची 'चंपी' वाचून माझी अक्षरश: चंपी झाली आणि मग बधिरल्या मेंदूला काही सुचेना. पण काय चमत्कार थोड्याच वेळात आमच्या भादरलेल्या मेंदूतून हे स्फुरले! ;)
चंपी
कविता कसली अढळ वस्तरा साफदुहेरी कल्ले कटले
टकुरे थोडे हलवुन गेले केस कातरी अडकून मेले
काव्य'कर्तरी' चालवताना काय मेंदूला टोचून गेले
सुसाटटोण्या, सावनटवळी 'पेय दुधारी' टाकून मेले
दर्पटवाळ्या काव्यसख्यांनी दिवट्या जाळून पाने भरली
दुर्धर असल्या कवनजटांना भोळीजनता पुरती फसली...
पिसाटपिंजर कपाळमाथी लावा सत्वर अधीर भामटी
हसतो 'रंग्या' विकट सुरसुरी जटिल विडंबन दर्पण चंपी!
२६ मे २००९, अँडोवर
प्रतिक्रिया
26 May 2009 - 5:16 am | पिवळा डांबिस
हसतो 'रंग्या' विकट सुरसुरी जटिल विडंबन दर्पण चंपी!
तद माताय!!! =))
आयच्यान सांगतो, मी मूळ कविता वाचली आणि तुला फोन करणार होतो की, "रंग्या, अरे काय झोपलायस की काय? उठ, ऊठ!!! नवीन माल आलाय बघ बाजारात!!!"
कविता कसली अढळ वस्तरा साफदुहेरी कल्ले कटले
~X(
=))
-चमनगोटा डांबिस
आऊट अँडोवर
26 May 2009 - 6:02 am | अवलिया
पिडाकाकाशी संपुर्ण सहमत
--अवलिया
26 May 2009 - 8:25 am | मुक्तसुनीत
हेच आणि असेच म्हणतो. धन्य ती चंपी ; धन्य ती (चंपी) आणि धन्य ही पिडांतिका ! ;-)
26 May 2009 - 12:30 pm | विजुभाऊ
ही घ्या आणखी एक चम्पी http://misalpav.com/node/7926
भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
26 May 2009 - 10:18 am | अनंता
पण मला कविता समजली ;)
प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
26 May 2009 - 7:09 am | चन्द्रशेखर गोखले
अफाट ! अचाट!! बेफाट !!! आपण खरोखरच विडंबनसम्राट आहात! आपल्याला साक्षात दंडवत..!
26 May 2009 - 8:08 am | सहज
झकास!
26 May 2009 - 8:18 am | शरदिनी
ही (चंपी) खूप आवडली...
"हरित तृणांच्या सतरंजीवर मत्त सकाळी सरसर टोले" अशी अवस्था झाली...
26 May 2009 - 9:45 am | मेघना भुस्कुटे
अक्षरशः दंडवत रंगाशेट!
26 May 2009 - 9:51 am | विसोबा खेचर
अक्षरशः दंडवत रंगाशेट!
हेच बोल्तो..!
संपलो रे रंगा... :)
तात्या.
26 May 2009 - 9:55 am | भडकमकर मास्तर
अगायायाया.. लै भारी..
कल्ले कटले, जटिल विडंबन दर्पण चंपी...्ईहीहीहीहीही :)
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
26 May 2009 - 10:12 am | ऋषिकेश
विडंबनाधिपती ऽऽऽ .........विडंबनकुलावतंसऽऽऽ........ विडंबन सम्राट ऽऽऽ.......आ गये है!!ऽऽऽऽ
लै भारी! मुळ चंपीइतकेच प्रभावी, नादमय..
___/\___
कळले असे वाटतानाच सटकणारे :) ;)
बाकी सुसाटटोण्या, सावनटवळी, दर्पटवाळ्या, पिसाटपिंजर हे खूप आवडलं ;)
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
26 May 2009 - 10:28 am | मराठमोळा
जबराट....
जोरदार विडंबन... =)) =)) =)) =))
=D> =D> =D>
काव्य'कर्तरी' चालवताना काय मेंदूला टोचून गेले
सुसाटटोण्या, सावनटवळी 'पेय दुधारी' टाकून मेले
पिसाटपिंजर कपाळमाथी लावा सत्वर अधीर भामटी
हसतो 'रंग्या' विकट सुरसुरी जटिल विडंबन दर्पण चंपी!
हसुन हसुन बेजार....
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
26 May 2009 - 10:55 am | कपिल काळे
मस्त!!
26 May 2009 - 11:50 am | परिकथेतील राजकुमार
=)) =))
ज ह ब र्या
मला आधी मुळ कविता 'पिपात मेले ओल्या उंदीर' चे विडंबन वाटले होते.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
26 May 2009 - 12:28 pm | केशवसुमार
रंगाशेठ,
ज ह ब ह रा हा.. चंपी..चालू दे..
(चंपीवाला)केशवसुमार
26 May 2009 - 1:05 pm | जयवी
विडंबन सम्राटांचा विजय असो :)
अफाट........ !!!!!!!!!!
26 May 2009 - 2:03 pm | श्रावण मोडक
_/\__/\__/\_
26 May 2009 - 7:27 pm | लवंगी
धन्य आहात तुम्ही..
26 May 2009 - 9:16 pm | लिखाळ
जोरदार कावनजट !
तेथे पाहिजे जातीचे ! हेच खरे :)
-- (भोळा)लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
26 May 2009 - 11:39 pm | संदीप चित्रे
>> टकुरे थोडे हलवुन गेले केस कातरी अडकून मेले
या ओळीलाच आधी फसकन हसलो.
पिडाकाकाने म्हटल्याप्रमाणे एकदम विडंबन एकदम 'तद माताय' जमलय ! :)
लिहिता रहा रे बाबा...
26 May 2009 - 11:53 pm | बिपिन कार्यकर्ते
____ (लोटांगणाची स्मायली आहे ही.)
बिपिन कार्यकर्ते