गाथा इराणी (ऐसी अक्षरे -२१)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
3 Dec 2024 - 10:58 pm

गाथा इराणी -लेखिका मीना प्रभू
A
इराण हा देश आंतरराष्ट्रीय राजकारणात सतत गाजत आला आहे. सर्वप्रथम या विषयी भयावह भावनाच येते. तिथे झालेल्या 'इस्लामिक क्रांती' १९७९ नंतर हा देश खूपच गूढ झाला. हळू हळू वाचनातून समजत होतेच की इराण हा आर्याचा देश होता. भारताचा एका हरवलेला भाऊच म्हणजे इराण!
इराणचा नकाशा
अ
संस्कृत भाषा, अवेस्ता-वेदांचे साम्य, अग्निपूजा- यज्ञ साम्य, झोराष्ट्रीय देवता - वैदिक देवता साम्य, इराणी-फार्सी भाषा- मराठी असे अनेक दुवे मला वरवरच माहिती होते.

तेव्हा इराण विषयक अवघड अभ्यासू पुस्तक वाचण्यापूर्वी हे हलके-फुलके पर्यटनपुरक पुस्तक घेतले. त्यातही पुस्तकाच्या लेखिका मीना प्रभु

यांनी या पूर्वीही अनेक इस्लामिक देश देशांना भेटी दिल्या आहेत परंतू तिथे कोठेही हिजाब /चादोरची सक्ती पर्यटकांवर नव्हती. परंतू इराणमध्ये त्यांना सतत हिजाब / चादोर घालावी लागली. याचा सतत विरोध त्यांनी पुस्तकात तर केलाच आहे, पण इराणी स्त्रियांवरच्या या अनेक अन्यायांची चीड वेळोवळी मांडली आहे.लेखिका समग्र इराण तीन महिन्यांत फिरल्या आहेत. यासाठी त्यांनी 'नौरूज (२१ मार्च आसपासचा काळ)'सणाचा काळही जाणीवपूर्वक निवडला हे विशेष आहे.

इराणची राजधानी तेहरान पासून हा रोमांचकारी प्रवास सुक होतो. या प्रवासात असंख्य वाटाडे, सहृदयी इराणी नागरिक यांची लेखिकाला मदत मिळते. प्रत्येक इराणींयांकडून राहण्याची, खाण्यापिण्याची ,सुकामेवा फळांची बडदास्त ,पाहुणचार ,चांगली वागणूक या विषयी इराणीय एकामेद्वितीय आहेत हे जागोजागी दिसते.

तेहरान शहर
Q
पहिले काही इराणीय स्थळे शिराझ, पर्सेपोलिस याझ्द, चकचक हे पर्शियन साम्राज्याची शान होते. पर्सेपोलिस याविषयीची भव्यता अनोखी आहे. सायरस, दारियुस यांनी भारतापर्यंत राज्य पसरवले होते. त्यांनी इराणचे नाव पार्सी - पर्शियन लोकांचे नगर ठेवले. अगदी रोमही जिंकला. पण इ.स ३३० मध्य अलेक्झांडरने इराण जिंकले आणि पर्सेपोलीसची राख रांगोळी केली. ७ व्या शतकात अरबी इस्लामने इराण जिंकला.

झोराष्ट्रीयन (पारशी) लोकांची काशी म्हणजेच चॅकचॅक हे धर्मपीठाची माहितीही रोचक मांडली आहे. झरुताष्ट्र, फर्वहार देवता, अवेस्ता धर्मग्रंथ, अनोखा अंतिम संस्कार विधी यांची रोचक माहिती स्थळ भेटीतून सांगितली आहे. ज्यात नगराबाहेर बांधलेल्या मोठ्या गोलाकार खोलीत मृतदेह ठेवला जात. गिधाडे-पक्षी त्यान्चे मांस खात असे. अशाप्रकारे तेव्हा अग्नी वा दफन हा प्रकार होत नसे, निसर्गाचा-हास नको म्हणून ही पद्धत होती.
ऊ
चॅकचॅक
1

पर्सेपोलिस
ए
ग
जरी इराण इस्लाम राष्ट्र आहे तरीही त्यात एक पारंपरिक पर्शियाही वसते.जे लोक आजही फार्सी बोलतात,फार्सी कवींनी त्यांच्या काव्याला जपतात.पारसी नौरुज मोठ्या उत्साहाने तेरा दिवस साजरा करतात.नौरूजची खुप अनोखी माहिती यानिमित्ताने समजली..

नौरोझच्या आगमनापूर्वी, कुटुंबातील सदस्य हॅफ्ट-सिन टेबलाभोवती जमतात आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मार्च विषुववृत्ताच्या अचूक क्षणाची प्रतीक्षा करतात. झेंड-अवेस्तामध्ये नमूद केल्याप्रमाणे क्रमांक ७ आणि अक्षर S हे सात अमेषसेपंतांशी संबंधित आहेत. ते अग्नि, पृथ्वी, वायू, पाणी या चार घटकांशी आणि मानव, प्राणी आणि वनस्पती या तीन जीवन प्रकारांशी संबंधित आहेत. आधुनिक काळात, स्पष्टीकरण सोप्या करण्यात आले की हफ्ट-सिन ( फारसी : هفتسین , sin (س) अक्षराने सुरू होणाऱ्या सात गोष्टी आहेत:

सब्जे ( पर्शियन : سبزه ) - गहू , बार्ली , मूग , किंवा मसूर स्प्राउट्स एका ताटात उगवले जातात.

समनु ( पर्शियन : سمنو ) - गव्हाच्या जंतूपासून बनवलेली गोड खीर

पर्शियन ऑलिव्ह ( फारसी : سنجد , रोमनीकृत : senjed )

व्हिनेगर ( पर्शियन : سرکه , रोमनीकृत : सेर्क )

सफरचंद ( पर्शियन : سیب , रोमनीकृत : sib )

लसूण ( पर्शियन : سر ​​, रोमनीकृत : सर )

सुमाक ( फारसी : سماق , रोमनीकृत : somāq )

Haft-sin टेबलमध्ये आरसा, मेणबत्त्या, पेंट केलेली अंडी , पाण्याची वाटी, सोनेरी मासे , नाणी, हायसिंथ आणि पारंपारिक मिठाई यांचा समावेश असू शकतो. कुराण , बायबल , अवेस्ता , फेरदौसीचा शाहनाम , किंवा हाफेजचा दिवाण यासारखे "शहाणपणाचे पुस्तक" देखील समाविष्ट केले जाऊ शकते. Haft-sin चे मूळ स्पष्ट नाही. गेल्या 100 वर्षांपासून ही प्रथा लोकप्रिय झाल्याचे मानले जाते.-विकिपिडिया

इराण हे वास्तुशास्त्र विषयावर जगात सर्वोच्च होते.इथे पाण्याचे दुर्भिक्ष तरीही जिथे पाणी असेल तिथे जमिनीखाली बांधलेले कॅनॉल,धबधबे,बागा ,बर्फाचे फ्रीज, नैसर्गिक वातानुकूलित यंत्रणा यांची माहिती, वर्णन थक्क करते.

पुढच्या काही शहरांत लेखिका इस्फहान, राश्त, झाशाद इ. शहरात येथे मोठमोठ्या मशीदींना भेट देते. यातील मशिदीमध्ये जांभळट, मोरचूदी रंगांचे मोझाईक टाईल्स /फरशी वापरून केलेले भव्य बांधकाम, काचांची भित्तीनक्षी यांचे वर्णन शानदार आहे.

इराणमधील काही भव्य सुंदर मशीदी
छ

इस्फॉन
ध

इराणमधील सर्वात मोठा नैसर्गिक वरद‌हस्त म्हणजे तेलाची खाण।
यासाठी शूश, अहवाज या ठिकाणची बीपी- ब्रिटिश पेट्रोलियम या ब्रिटीश कंपनीची माहिती, त्यांचा तत्कालीन कार्यकालही दिला आहे. कशाप्रकारे २६ मे १९०८ ला तेलाच्या शोधाने या देशाचे नशिब बदलले व ते आता कसे कड़वे धोरणाने काळोखले जात आहे, याचा परत पुनरुच्चार आला.ताब्रिझचे गरम पाण्याचे झरे,केरमानचे धरण, शुशटार सिल्क रुट, इमादानची सर्वांत लांब भूयारी नदी, तेहरानचे सर्वात मोठे हिरे-जवाहरांचे संग्रहालय, कारवान वाळवंटातही बांधलेली उद्‌याने अशी अनेक उत्तम उत्तम जागतिक स्थळे इराणमधली पाहिलीच पाहिजेत अशी इच्छा जागी होते.

ब्रिटिश पेट्रोलियम कंपनी
प

हे सर्व लिहितांनाच इथल्या सुसंस्कृत पुढारलेले शहा यांच्याकाळातील इराण ते कडवे इस्लामिक खोमेनी खोमनेई यांचे इराण याविषयी त्या सतत नागरिकांशी चर्चा करत राहतात, जे खूपच धाडसाचे वाटते.
चादोरधारी महिला
त

एकंदरीत मीना प्रभू यांच्या एकाच पर्यटनविषयक पुस्तक वाचनाने मी त्यांची चाहती झाली आहे.

-भक्ती

मुक्तकप्रवासप्रतिक्रियाआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

कंजूस's picture

4 Dec 2024 - 4:27 am | कंजूस

हे पुस्तक वाचलं आहे.

प्रदेश पर्यटनाची मीना प्रभू यांची बरीच पुस्तकं आहेत. ती वाचली तेव्हा कळलं की त्या डॉक्टर असल्याने आणि आंतरराष्ट्रीय संस्थेशी जोडलेल्या असल्याने तिकडच्या स्थानिक लोकांची मदत होते पर्यटन दौरा आखण्यात. सामान्य पर्यटकाला हे काही मिळत नाही. स्वतः जाणे किंवा पर्यटन आयोजकांतर्फे जाणे यात स्थळे, वेळ आणि पैशांचे बंधन पडते. ( पुस्तकातील चित्रांना प्रताधिकार असणार.)

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Dec 2024 - 9:43 am | चंद्रसूर्यकुमार

छान लेख. इराण म्हटले की नॉट विदाऊट माय डॉटर हा चित्रपट आठवतो.

सुसंस्कृत पुढारलेले शहा यांच्याकाळातील इराण ते कडवे इस्लामिक खोमेनी खोमनेई यांचे इराण याविषयी त्या सतत नागरिकांशी चर्चा करत राहतात, जे खूपच धाडसाचे वाटते.

अयातुल्ला खोमेनी अगदीच धर्मांध होता यात अजिबात शंका नाही. पण तो खोमेनी सत्तेत यावा यासाठी अनुकूल परिस्थिती कोणी निर्माण केली? तर ती अमेरिकेने. १९५१ मध्ये इराणमध्ये निवडणुक झाली होती आणि मोहंमद मोसादेघ इराणचे पंतप्रधान झाले. तेल विहिरींमधून तेल काढण्याबद्दल सरकारला किती रॉयल्टी द्यायची यावरून वर उल्लेख केलेल्या ब्रिटिश पेट्रोलियमशी मोसादेघ यांच्या सरकारचे वाजले. इराण सरकार अधिक रॉयल्टीची मागणी करत होते तर त्याला ब्रिटिश पेट्रोलियम तयार नव्हती. मग मोसादेघने ब्रिटिश पेट्रोलियमला त्यांच्या देशातून हाकलून देऊन सगळा तेल उद्योग इराण सरकारच्या मालकीचा (राष्ट्रीयीकरण) केले. मग इंग्लंड अमेरिका खवळले. मोसादेघना सत्तेवरून खाली खेचायचा चंग त्यांनी बांधला. त्यावेळेस जगात कम्युनिस्ट जगात शिरजोर होतील ही भिती अमेरिकन्सना होती. त्यातून मग मोसादेघ हे कम्युनिस्ट आहेत असा अपप्रचार अमेरिकेने सुरू केला. तेल उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले तरी मोसादेघ कम्युनिस्ट नव्हते. पण आपण म्हणू तसे न करणार्‍या राज्यकर्त्याला कम्युनिस्ट म्हणणे अमेरिकेच्या सोयीचे होते. मग सी.आय.ए ने इराणमधील पत्रकार, विचारवंत यांना चारापाणी टाकून मोसादेघ कसे हुकूमशहा आहेत, कसे वाईट आहेत, कसे अमुक आहेत, कसे तमुक आहेत असे लेख इराणी वर्तमानपत्रात यायला लागले. मग हळूहळू असेच पैसे दिलेले लोक मोसादेघ सरकारविरोधात रस्त्यावर आले. रस्त्यावर आलेल्या लोकांना बघून मोसादेघ खरोखरच वाईट आहेत असे वाटून आणखी काही लोक रस्त्यावर आले, मग आणखी काही असे करत करत डॉमिनो इफेक्ट झाला आणि सरकारविरोधात मोठी निदर्शने वगैरे झाली. हा सगळा सी.आय.ए ने घडवून आणणेला manufactured dissent होता. शेवटी मोसादेघना सत्ता सोडावी लागली आणि राजे शहा पेहलवी यांच्याकडे सर्वाधिकार आले. एकूण झाले काय की अमेरिकेने काड्या घातल्या आणि त्यातून अमेरिकाविरोधी वातावरण इराणमध्ये आले त्याचा फायदा खोमेनीसारख्या धर्मांधाने घेतला. रझा पेहलवी अमेरिका सांगेल तसे करत होते म्हणून ते खूप सुसंस्कृत वगैरे त्यांचे कौतुक झाले. नंतरच्या काळात सत्तेत आलेले खोमेनी पाहता त्यातुलनेत पेहलवी नक्कीच आधुनिक आणि सुसंस्कृत होते. पण अमेरिकेने काड्या घातल्या त्यातूनच खोमेनी सत्तेत यायला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली.

अमेरिकेने घडवून आणणेला हा पहिला रेजिम चेंज. साधारण त्याच काळात अमेरिकेने ग्वातेमालामध्येही असाच नालायकपणा केला होता. इराणमध्ये ब्रिटिश पेट्रोलियमशी सरकारचे वाजले तर ग्वातेमालामध्ये अमेरिकन फ्रुट कंपनीशी सरकारचे वाजले. दोन्ही ठिकाणी परिणाम तोच झाला. त्यानंतर ग्वातेमाला कित्येक वर्षे अस्थिर होता. हे रेजिम चेंजचे खटलं २०२४ मध्ये बांगलादेशापर्यंत चालू आहे. म्हातारड्या थेरड्या जो बायडनने भारतातही शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने तोच किळसवाणा प्रकार करायचा प्रयत्न केला असे दिसते.

मुक्त विहारि's picture

7 Dec 2024 - 12:13 pm | मुक्त विहारि

धन्यवाद....

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Dec 2024 - 4:36 pm | अमरेंद्र बाहुबली

शेवटची ओळ सोडली तर उत्तम प्रतिसाद.

खुप चांगली माहिती दिली.योगायोगाने आता 'एका तेलियाने' पुस्तक हाती आले आहे. ,यातल पहिलं प्रकरण ब्रिटिश - अमेरिका तेल धोरण विरोधात लढणारा पहिला तेलिया इराणीय मोसादेघ यावरच आहे.एकदम हीच माहिती आणखिन सविस्तर आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Dec 2024 - 1:22 pm | अमरेंद्र बाहुबली

माझ्या बॅग मध्येही एका तेलियानेर पडून आहे पण सध्या मी दुसऱ्या महायुद्धात श्री. हिटलर ह्यांच्या सोबत बीसी असल्याने त्याला स्पर्श केलेला नाही.

महायुद्ध संपल्यानंतर नक्की वाच ;)

टर्मीनेटर's picture

9 Dec 2024 - 1:40 pm | टर्मीनेटर

योगायोगाने आता 'एका तेलियाने' पुस्तक हाती आले आहे.

'एका तेलियाने' हे पुस्तक अवश्य वाचा... आणि मग त्या पुस्तकाच्या लेखकाचे लोकसत्तातले गेल्या दशकातले सगळे संपादकीय लेख वाचा. गिरीश 'कुबेर' हे लेखक महोदय पुढे वैचारिकदृष्ट्या इतके 'दरिद्री' कसे काय झाले असतील हा प्रश्न पडल्याशिवाय रहाणार नाही!

मालक सांगेल त्यावर भुंकायचे अशी भूमिका संपादकाने स्वीकारली की काय होते ह्याचे (मदर टेरेसा नामक भंपक संतावर लिहिलेला लेख मागे घेणारे) गिरीश कुबेर हे गेल्या दिडेक वर्षातले पहिले उदाहरण... दुसरे कुठले ते सांगायची गरज आहे असे वाटत नाही 😀

मुक्त विहारि's picture

10 Dec 2024 - 3:45 am | मुक्त विहारि

लोकसत्ता, मटा, सकाळ इथे पण संपादकीय खूप काही वैचारीक लिहीत नाहीत.

आमचे बाबा महाराज दोंबोलीकर म्हणतात की, "दिगू कधीच वेडा झाला."

मुक्त विहारि's picture

10 Dec 2024 - 3:41 am | मुक्त विहारि

हे पुस्तक आधी वाचं...

एका तेलियाने, हा "हा तेल नावाचा इतिहास आहे." ह्या पुस्तकाची suppliment किंवा Annexture.

कर्नलतपस्वी's picture

7 Dec 2024 - 12:52 pm | कर्नलतपस्वी

आवडला. नवनवीन पुस्तक ओळखीमुळे वाचनाची आवड आणखीन वाढत आहे.
धन्यवाद.

काही मिपाकरांचा सखोल अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचून ज्ञानात भर पडत आहे.

त्यांचेही आभार.

मुक्त विहारि's picture

7 Dec 2024 - 3:19 pm | मुक्त विहारि

"काही मिपाकरांचा सखोल अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचून ज्ञानात भर पडत आहे."

पण , काही वयाने वाढलेल्या पण अज्ञानी लोकांचे प्रतिसाद वाचतांना मनोरंजन पण होते.

त्यामुळे, मिपा हे ज्ञाना बरोबर मनोरंजनाचे पण उत्तम साधन आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Dec 2024 - 4:36 pm | अमरेंद्र बाहुबली

छान लेख. पुस्तक वाचायची उत्सुकता वाढली.

मुक्त विहारि's picture

7 Dec 2024 - 4:58 pm | मुक्त विहारि

त्यामुळे सुरुवात, "माझे लंडन" ह्या पासून कर.

लेखिकेचा जीवनप्रवास समजला की ह्यांचे प्रवासवर्णन वाचायला जास्त मजा येईल.

शक्यतो, ह्यांची पुस्तके विकत घे. काही पुस्तकांच्या बरोबर, CD पण आहे. पुस्तक वाचता वाचता, CD वरील फोटो बघत जायचे.

मनो's picture

8 Dec 2024 - 8:40 am | मनो

काही सुधारणा
ताई, काही उच्चार थोडे चुकले आहेत, ते सांगतो.

हफ्ट - हे हफ्त हवे, जसे हिंदीत आठवडा, सात दिवस याला हफ्ता म्हणतात.

व्हिनेगर ( पर्शियन : سرکه , रोमनीकृत : सेर्क ) हे सिरका हवे, शेवटचा ह silent म्हणून आ उच्चार होतो.

सफरचंद ( पर्शियन : سیب , रोमनीकृत : sib ) हे सेब, आपले हिंदी सफरचंद!

फार पूर्वीपासून अरबी आणि इतर भाषा, फार्सी, संस्कृत इत्यादींत अक्षर मूल्ये आकड्यात असण्याची पद्धत आहे. ती वापरून एक कविता करून त्याचा कालश्लेश बनवतात. म्हणजे 'ही इमारत अमक्या तमक्याने बनवली ' यातील अक्षरांच्या मूल्याची बेरीज केली की त्या प्रसंगाचे वर्ष येते.

बिस्मिल्ला ... या कुराणातील पहिल्या आयाचे अक्षर मूल्य ७८६ येते म्हणून त्या आकड्याला काही मुसलमान शुभ मानतात.

प्रभू बाईंचे लंडन मला आवडले होते, त्यानंतर त्यांनी एकच छापाची भाराभर पुस्तके लिहिल्याने ते एकसुरी प्रवास वर्णन वाचण्याचा कंटाळा येऊन वाचन सुटले.

असो, लेख उत्तम झाला आहे, अजून काही लिहा!

पण,

चीन विषयी चांगली माहिती दिली आहे.

धन्यवाद मनो नौरूजची माहिती मी विकिपीडियाहून कॉपी पेस्ट केली.पुस्तकात तुम्ही लिहिल्याप्रमाणे आहे.अक्षरमूल्य कन्सेप्ट सध्या तरी समजली नाही,पुढे कधीतरी नक्की समजून घेउन.

चामुंडराय's picture

8 Dec 2024 - 9:26 am | चामुंडराय

छान लेख !

का कोणास ठाऊक परंतु इराण बद्दल नेहेमीच आकर्षण आणि उत्सुकता वाटत आली आहे.
एका इराणी कलीग बरोबर बऱ्याचदा इराण बद्दल चर्चा होत असते.

वरती एका प्रतिसादात चंसूकु ह्यांनी "नॉट विदाऊट माय डॉटर" ह्या चित्रपटाचा उल्लेख केला आहे.
हा चित्रपट ज्या पुस्तकावर आधारित आहे (त्याच चित्रपटाच्या नावाचे) ते माझ्या संग्रही आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या एका इराणी माणसाबरोबर लग्न केलेल्या अमेरिकन स्त्री ची कथा आहे.
तिला आणि मुलीला तो इराणला फक्त भेटीसाठी जाऊ असे सांगून घेऊन जातो.
इराणमध्ये गेल्यावर मात्र तिचा पासपोर्ट ताब्यात घेऊन डांबून ठेवतो, इस्लामिक रितीरिवाज आणि वेशभूषा तिच्यावर लादतो.
ती इराण मधून पळून जाण्याचा प्रयत्न करते. तिथले एजन्ट तिला सांगतात तुला आम्ही बाहेर पडायला मदत करू परंतु तुझ्या लहान मुलीला बरोबर नेणे शक्य नाही. ती मुलीला न घेता एकटी बाहेर पडायला तयार होत नाही. "नॉट विदाऊट माय डॉटर" असे स्पष्ट सांगते.
पुढे ती लहान मुलीबरोबर अनेक प्रसंगानं तोंड देत, चालत, हाल अपेष्टा सहन करत इराणची सरहद्द ओलांडते आणि अमेरिकन एम्बसी मध्ये आश्रय घेते व अमेरिकेला परतते. त्या अनुभवांवर तिने ते पुस्तक लिहिले आहे.
अतिशय थ्रिलिंग आहे, जरूर वाचावे.

मुक्त विहारि's picture

9 Dec 2024 - 3:12 am | मुक्त विहारि

एक नंबर पुस्तक आहे...

"नॉट विदाऊट माय डॉटर "मी १२ वर्षांपूर्वीच हे पुस्तक वाचले आहे.या प्रकारची गोष्ट घेऊन एक हिंदी सिनेमा आला होता 'शक्ती'!एखादा इंग्लिश सिनेमाही असावा.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Dec 2024 - 1:45 pm | अमरेंद्र बाहुबली

हा सिनेमा मी कालच इंटरनेटवरून उतरवला, हिंदीत नाहीये, इंग्रजीत पाहतो.

टर्मीनेटर's picture

9 Dec 2024 - 1:53 pm | टर्मीनेटर

बघा... 'थोडा' स्लो वाटला तर स्पीड वाढवून बघा. पण सिनेमा चांगला आहे!

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Dec 2024 - 2:00 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्स.