तुम्हाला आश्चर्य वाटेल पण साक्षरतेचा बेरोजगारी आणि आरक्षणाची सरळ संबंध आहे. मेकॉले पूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेत बेरोजगारी नावाचा प्रकार नव्हता. "द ब्युटीफुल ट्री" या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीने १८३० ते १८५० मध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत केलेले सर्व्हे उपलब्ध आहे. त्याकाळी देशात सहा लाखांच्या वर गुरुकुल होते. प्रत्येक गावात एक गुरुकुल निश्चित होते. वयाच्या 13 वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा गणित इत्यादीचे ज्ञान दिले जात होते. सामान्य व्यक्तीसाठी एवढे ज्ञान पुरेसे आहे. त्यानंतर अधिकांश विद्यार्थी त्यांच्या परंपरागत व्यवसायांचे ज्ञान गुरुं कडून प्राप्त करायचे. हुशार विद्यार्थी घर, तलाव बांधणे ते वैद्यकीय शिक्षण घ्यायचे. काही विद्यार्थी साहित्य आणि संगीताचा अभ्यास करायचे. राजकीय आश्रय नाही मिळाला तर त्यांच्यासमोर ही बेरोजगारीची समस्या राहत असे. अत्यंत हुशार मुले वेदाध्ययन करायचे. त्यांनाही रोजगाराची ग्यारंटी नव्हती. तरीही त्या काळी बेरोजगारी दर अत्यंत कमी होती.
नंतर मेकॉले शिक्षण आले त्यासाठी आधी विद्यमान असलेल्या गुरुकुलांची आर्थिक नाळ तोडली. मेकॉले शिक्षणाच्या मुख्य हेतू जनतेला समाजाला साक्षर करणे होते. सरकार चालवायला बाबू पाहिजे होते. सरकारने शिक्षण त्याच उद्देश्याने देण्याची व्यवस्था केली. रोजगार देणारे शिक्षण दिले नाही. स्वतंत्रता मिळाल्या नंतर ही धोरण बदलले नाही. जुन्या शिक्षण पद्धतीतील १९७७ ची आमची बॅच ही शेवटची होती. दिल्लीत पाचवी बोर्ड होता. त्याचा परिणाम ७० टक्के लागायचा. नंतर आठवी बोर्ड होता. त्याचा परिणाम ही ६०-७०% लागायचा. नंतर अकरावी बोर्ड. अकरावीत नववी, दहावी ,अकरावी तीन वर्षांचा अभ्यास बोर्डाच्या परीक्षेत यायचा. आमच्या वेळी सुद्धा परीक्षा परिणाम ६०% टक्के असेल. दुसऱ्या शब्दात पहिलीत ऍडमिशन घेतलेल्या शंभर मुलांपैकी फक्त ३० ते ४० मुले अकरावी पास करत असेल. त्यातील २० एक टक्के विद्यार्थी ग्रॅज्युएशन करण्यासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेत असे. तरी देखील सर्वांना व्हाईट कॉलर नोकरी मिळणे अशक्य होते. १५ वर्षांचे शिक्षण घेऊन ही जगात जगण्यासाठी रोजगार करण्याचे कोणतेही ज्ञान अधिकांश विद्यार्थ्यांना मिळत नव्हते.ची
आत्ताची परिस्थिती तर अतिशय गंभीर आहे. "इधर से आलू डालो उधर से ग्रॅज्युएट निकालो". पहिली ते ऍडमिशन घ्या आणि पंधरा वर्षांनी ग्रॅज्युएट व्हा. दहावीपर्यंत कोणालाही नापास करता येत नाही. गेल्या वर्षी दिल्लीत दहावीचा परिणाम ९८ टक्के होता. बारावीचा परिणाम ही ९५% टक्यांचा वर. हीच परिस्थिती देशातील अधिकांश राज्यात आहे. ९० टक्यांच्या वर मार्क्स सहज मिळतात. सरकारी कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही मिळाली तरी उदा. नोएडात एमिटी सारख्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी सिटी आहेत. अश्या हजारहून जास्त प्राइवेट युनिव्हर्सिटी भारतात असतील. या शिवाय पत्राचार, इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी इत्यादी ही आहेत. दुसऱ्या शब्दांत पहिलीत प्रवेश घेतलेल्या नंतर ७० टक्यांच्या वर विद्यार्थी स्नातक होणारच. अधिकांश विद्यार्थी आर्ट्स हा विषय घेऊन पास झालेले असतात. साध्या बीकॉम, बीएससी पास तरुणापाशी कोणतेही टेक्निकल ज्ञान नसते किंवा अत्यंत अल्प असते. यातले ८० टक्के बेरोजगार राहणार किंवा अत्यंत कमी पगाराची नोकरी करतील.
२०१७ मध्ये जुना सोफा सेटची (१+२) अवस्था खराब झालेली होती. पण लाकडाचा बेस मजबूत होता. जेल रोड वरून कापड, फोम इत्यादी सामान सहा हजारात विकत घेतले आणि कारपेंटर करून नवीन सोफा बनवून घेतला. एका दिवसात त्याने सोफा सेट तयार केला. त्याचे त्यांनी साडेतीन हजार रुपये घेतले. तो कारपेंटर महिन्याचे ५० ते ६० हजार कमवत होता. ज्या दुकानात तो काम करायचा त्याला एक सोफा सेट तयार करण्याचे अडीच हजार रुपये मिळायचे. त्याचा मुलगा स्नातक झाला. तो ८००० रू ची नोकरी करत होता. त्याने मुलाला आपल्या धंद्यात आणायचा प्रयत्न केला तर मुलगा म्हणाला आता या वयात मला कारर्पेंटरी शिकणे अशक्य आहे. उलट त्याने प्रश्न केला, तुम्ही मला कशाला एवढे शिकविले. वयाची २१वी उलटल्यानंतर मेहनतीचे काम शिकणे अशक्यच असते.
दुसरीकडे अधिकांश मुसलमानांची मुले मात्र मदरसेत शिक्षण घेतात. पंधरा- सोळा वर्षाची होताच ते व्यवसायिक शिक्षण घेतात. किंवा फळ भाज्या विकू लागतात. ठेल्यावर सामान ही विकू लागतात. माझा एक मित्र नोएडात एका सोसायटीत राहतो. तो एकदा मला म्हणाला त्यांच्या सोसायटी वीज वाला, प्लंबर, कारपेंटर इत्यादी सर्व मुस्लिम आहे. शोधूनही हिंदू सापडणार नाही. शहाबेरीच्या फर्निचर मार्केटमध्ये सर्व दुकाने मुस्लिम समाजाची आहेत. आज उत्तम नगर मेट्रो स्टेशन जवळ फळ विकणारे सर्व विक्रेता मुस्लिम समाजाचे आहे. आमच्या भागातील ८० टक्के न्हावी मुस्लिम आहे. आता सैलुन चालवतात. जास्त कमाई ही होते. मुस्लिम समाजात बेरोजगारीचा प्रश्न उद्भवत नाही. कारण कमी साक्षर असल्याने सर्व शारीरिक मेहनतीची कामे करायला ते सदैव तत्पर राहतात
आता बिना ज्ञान प्राप्त करता ग्रेजुएट होणाऱ्या लाखो बेरोजगार युवकांचा वापर राजनेता करणारच. शिवाय समाजाला जाती-जाती वाटून निवडणूक ही सहज जिंकता येते. मंडल आरक्षणाच्या मागे बेरोजगार साक्षर युवकांची फौज होती. आत्ताच्या मराठा आरक्षणामागे ही बेरोजगार साक्षर युवकांची फौज आहे. आरक्षणाचा गाजर देऊन राज नेता निवडणूक जिंकतात पण त्याने बेरोजगारीची समस्या दूर होईल का? महाराष्ट्रात जवळपास १८ लक्ष सरकारी नोकऱ्या आहेत. अधिकांश कर्मचारी वीस ते पंचवीस वयात नोकरीला लागतात. अर्थात ३० ते ३५ वर्षाची नोकरी सर्वच करतात. वर्षाला ५० हजार हून जास्त नोकऱ्या महाराष्ट्र सरकार देऊ शकत नाही. यातही पोलीस, शिक्षक, स्वास्थ कर्मचारी, इंजिनीयर आणि अनेक तकनीकी पदे ही आहेत. जास्तीत जास्त पंचवीस एक हजार नोकऱ्या शिपाई आणि सर्व प्रकारच्या बाबूंच्या असतील. आता कितीही आरक्षण दिले तरीही कोणत्याही समाजाचा बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही. उदाहरण मराठा समाजाला १० टक्के वेगळे आरक्षण दिले तरी फक्त ५००० युवकांना सरकारी नोकरी मिळेल. महाराष्ट्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनवर बजेटचा ३५ टक्के पेक्षा जास्त खर्च करते. दरवर्षी हा खर्च वाढत जात आहे. अनेक राज्यांची याहून वाईट परिस्थिती आहे. भविष्यात सरकारी पदांची संख्या कमी करण्याची संभावना जास्त आहे. तसेही राजा आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा खर्च बजेटचा १६ टक्केहून जास्त नसला पाहिजे.
मी गेल्या महिन्यात १०० वर्षानंतर (आजोबा १०० वर्षांपूर्वी दिल्लीत आले होते) दिल्ली सोडून ग्रेटर नोएडा इथे शिफ्ट झालो आहे. घराचे इंटेरियर करणारे, वीज काम करणारे, प्लंबर, सफेदी करणारे सर्व कारीगर मुस्लिम समाजाचे होते. ठेकेदार हिंदू असूनही त्याला हिंदू कारीगर मिळत नाही. कारण हिंदू कारीगरांनी आपल्या मुलाना ग्रेजुएट केले आणि बेरोजगारीच्या लाईनीत उभे केले. त्यातले अधिकांश आरक्षणाच्या खेळात मग्न आहे. "इधर से आलू डालो उधर से ग्रेजुएट निकालो" या शैक्षणिक धोरणाने समाज नपुंसक बनला आहे, हेच सत्य.
मग काय करावे. प्राचीन गुरूकुल पद्धती बघितली तर उत्तर मिळते. आठवी बोर्ड पुन्हा सुरू करून ५० टक्के मार्क्स ज्यांचे येतील त्यांनीच पुढे सामान्य शिक्षण घ्यावे. दहावी आणि बारावी बोर्डात ही ५० टक्के मार्क्स पास होण्यासाठी अनिवार्य करणे. आठवी, दहावी, बारावी नापास झालेले तरुण पुन्हा शारीरिक मेहनतीचे कामांकडे वळतील. त्यांच्यासाठी वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंट साठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले पाहिजे. जेणे करून स्व:रोजगार सुरू करण्याचे ज्ञान त्यांच्यापाशी राहील. जे स्नातक होतील त्यांना ही रोजगार मिळण्याची शक्यता वाढेल. समाजाला मूर्ख बनविण्याचा आरक्षणाचा खेळ ही संपेल. जाती द्वेषाची राजनीतीचा ही अंत होईल.
प्रतिक्रिया
19 Sep 2024 - 2:01 pm | कंजूस
आता निवडणुकीच्या जाहीरनाम्यातली कलमं पाहा.
गरीबी हटवण्याचे कलम काढून टाकले आहे. गरिबांना महिन्याला इतके रुपये, विधवांना इतके, निवृत्तांना इतके, बेरोजगारांना इतके. या रकमा पुढे वाढतच जातील. कोण शिकून खटाटोप करेल? घरीच बसेल.
कालचाच हरियाणा साठीचा कॉन्ग्रेसचा जाहिरनामा पाहा.
20 Sep 2024 - 7:08 pm | विवेकपटाईत
काँग्रेस जाहीर नाम्यावर कधीच अमल करत नाही. निवडणूक ही नंतर सहज विसरून जाते.
19 Sep 2024 - 5:18 pm | कॉमी
जातीव्यवस्था संपवा आधी. मग आरक्षणावर गप्पा मारूया.
19 Sep 2024 - 10:40 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
20 Sep 2024 - 4:47 am | चौकस२१२
एकीकडे म्हण्य्याचे जातीवयवस्था संपवा आणि दुसरी कडे जातीनिहाय आरक्षण मागायच?
ती संपवण्याची साठी जातीनिहाय आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक दुर्बलांना द्या मग मदत होईल संपायला .. पण तुमची विचारसरणी स्वार्थ साठी त्याला साथ देणार नाही उलट जातीनिहाय जंगम मागणार आणि त्यापेक्षाही बेकार म्हणजे आता तर काय धर्मावर बेतलेल आरक्षण ?
20 Sep 2024 - 7:36 am | कॉमी
तुम्हाला हा विषय नीट समजतं नाही. जातीनिहाय जनगणनेमूळे तुम्ही इतके तंतरताय kaaran तुम्हाला माहितीये कीं त्याने जी विषमता तुम्हाला चटईखाली सारायची आहे ती वर येईल. जातीव्यवस्था असल्यामुळे जातीवर आधारित आरक्षण द्यावे लागते. जातीव्यवस्था आरक्षणाच्या आधीपासून आहे. जातीव्यवस्था काय आरक्षणामुळे तयार झाली नाही किंवा फक्त आज आरक्षण आहे म्हणून जातव्यवस्था अजून जिवंत आहे असेही नाही. तसें म्हणणे म्हणजे अत्यंत मूर्खपणाचे होईल. जातीचे ऑलरेडी होत्या आणि आहेत. त्यात पिचलेल्या लोकांना मदत करण्यासाठी जाती acknowledge करून मदत देणे म्हणजे जातीव्यवस्था टिकवून ठेवणे होतं नाही.
जातीनिहाय आरक्षण हा गरिबी निर्मूलन कार्यक्रम नाहीये. जातीमुळे डिस्क्रिमिनेशन होते त्यावर केलेला उपाय आहे.
20 Sep 2024 - 2:28 pm | चौकस२१२
सगळं समजतंय, तशी जनगणना कार्यायाची आणि म्हणायचे बघा एवढे एवढे . आहेत त्यामुळे द्याच.... ओरबड... झुंडशाही नुसती
आर्थिक दुर्बलाना मदत याला तुमचा विरोध का तुमचा ?
कारण चराऊ कुरण पाहिजे तुम्हाला ... जनतेला पण आणि राजकारणाऱ्यानं पण
आणि मुस्लिमांना आरक्षण हे कस काय? घाणरेर्ड्या नालायक हिंदू धर्मात जशी जातीवयवसतः आहे, तशी त्यांच्यात नाही.. अल्ला ला नामंजूर आहे मग तिथे कसले आरक्षण?
आंबेडकरांनी सुद्धा काय कायमचे आरक्षण ठेवा असे म्हणले नवहते
20 Sep 2024 - 4:19 pm | कॉमी
आर्थिक दुर्बलांना मदत करा कीं. माझा अजिबात वितोध नाही. तुम्ही का जातीपातीला चटईखाली सारण्याचा प्रयत्न करताय?
21 Sep 2024 - 9:04 am | चौकस२१२
आमचं म्हणणं आहे कि या पुढे फक्त आर्थिक दुर्बळांनाच मदत करा, जाती निहाय नको... पण तुम्हाला जात हा प्रश्न भिजत घोंगड्या सारखा ठेव्याचा , आणि केली जातीनिहाय जनगणना तर तुम्ही काय जाती वरील आरक्षणाची मागणी कमी करणार आहात ? नाही उलट म्हणणार हे इतके ते तितके आणि द्या त्याप्रमाणात ...
अरे समाज जर जाती वयस्थेपासून दूर न्यायाचा असले तर जाती मुले जी विषमता होत राहिली ती म्हणजे शिक्षण, ते द्या ना सवलतीचं दरात पण आर्थिक दुर्बलांना
20 Sep 2024 - 4:25 pm | कॉमी
भारतात मुस्लिमांमध्ये सुद्धा जातपात पाळली जाते.
21 Sep 2024 - 9:07 am | चौकस२१२
हो ना मग हिंदूंना का दोष देताय आम्ही तर नालायक आहोतच जाती पाळणारे पण प्रिय मुस्लिम आणि नवबुद्धी तर नाहीत ना तसे? त्यांनी जातीचे जोखड झुगारले ना मग राहा ना "ओपन कॅटॅगिरीत करा कष्ट आणि कंमवा
लै चापलुसी झाली .. इतके वर्षे,,, एक देश एक कायदा सर्वांनां समान वागणूक आणि संधी , जोडो इंडिया झिंदाबाद , नाही तोडो इंडिया मुर्दाबाद
20 Sep 2024 - 2:57 pm | सुक्या
१. ज्या विषमते विषयी तुम्ही बोलता आहात त्याचे एखादे उदाहरण देता येईल का?
२. जातीनिहाय आरक्षण दिल्याने जातीमुळे होणारे डिस्क्रिमिनेशन थांबेल का? आता (२०२४ मधे) जातीवरुन काय डिस्क्रिमिनेशन होते ते सान्गता का? म्हणजे फलाना आमक्या जातीचा आहे म्हनुन त्याला घरात नाही घेतला वगेरे वगेरे. मग तो फलाना तहसिलदार का असेना.
तुमच्या मुदलातच घोळ आहे. आजच्या जमाण्यात टॅलेंट चा ढोल वाजतो. काम करण्याची तयारी असेल तर काहीही सर करता येते. कामचुकार पणा करायचाच असेल तर मग आरक्षणाच्या कुबड्या लागतात. मी तर म्हणतो जातीनिहाय आरक्षण घ्या आनी फुल्ल जात पात पाळा .. हाय काय अन नाय काय....
डिस्क्लेमरः मी या तथाकथीत मागास जातीचा आहे. आजवर कधीच, पुन्हा सांगतो आजवर कधीच आरक्षणाचा लाभ घेतला नाही. मेहनत करुन आज मजेत जीवन जगतो आहे. माझ्या मुलांच्या दाखल्यावर जात हा रकाना रिकामा आहे ...
20 Sep 2024 - 4:23 pm | कॉमी
उदाहरण वैगेरे कशाला? थेट जातीनिहाय माहिती मिळवू आणि बोलू. एकदोन उदाहरणे कशाला हवीत. ती सुद्धा सजग पणे बघितली तर दिसतील.
जर टॅलेंटचा ढोल वाजतो तर मग तुम्ही तर जातीनिहाय सर्वेक्षणाला समर्थन केले पाहिजे. कारण तुमच्या मते खुप काही फरक सापडणार नाहीत, कारण सगळे तर टॅलेंट वर चालते ना. मग तर होऊद्या सर्वेक्षण, तुमचाच मुद्दा खरा ठरेल कीं बघा, आता सगळे कसे आलबेल झाले आहे.
20 Sep 2024 - 10:55 pm | सुक्या
बघा, पाया पोकळ असला की इमारत बांधता येत नाही. तुमची सुई जातीनिहाय सर्वेक्षणावरच अडकलेली आहे तेव्हा जास्त काही निष्पन्न होणार नाही.
मी दोन प्रश्न विचारले होते. तुमच्या दाव्याच्या समर्थनार्थ तुम्हाला एकाचे ही उत्तर देता आले नाही. कारण तशी परीस्थीती नाही. कदाचित मागास भागात असेलही परंतु आजकाल कुणीही जात विचारत फिरत नाही. एक महाभाग आहेत जे जिथे तिथे जात विचारत फिरतात. पण त्यांना कुणी सिरियस ली घेत नाही तो भाग अलहीदा.
जग हे प्रतिभेवरच चालते. प्रतिभेला मेहनतीची जोड लागते. मेहेनत न करता आरामात पैसा कमवायचा असेल तर मग असले आरक्षण वगेरे लागते ... सर्वेक्षण केल्याने यात शष्प फरक पडणार नाही.
21 Sep 2024 - 5:30 am | कर्नलतपस्वी
+1
9 Oct 2024 - 10:09 am | कॉमी
https://timesofindia.indiatimes.com/city/agra/dalit-man-hangs-self-after...
21 Sep 2024 - 9:15 am | चौकस२१२
जर टॅलेंटचा ढोल वाजतो तर मग तुम्ही तर जातीनिहाय सर्वेक्षणाला समर्थन केले पाहिजे.
हे कय? कय कलानाय
20 Sep 2024 - 6:06 pm | Bhakti
कौतुक आहे तुमचे.
जातीभेद संपवण्यासाठी हा एक मार्ग आहे.आणि दुसरा म्हणजे विविध जातीत रोटी बेटी सहज घडवता यायला हवा.पण या दोन्ही मार्गांसाठी बौद्धिक अथवा व्यवहारीक पातळी उच्च पाहिजे.यासाठी शिक्षण पाहिजे.त्यामुळे कमी शिकून पुढची पिढी पैसा बक्कळ मिळवू शकेल,पण सुशिक्षित चांगले शिक्षण घेऊनच होऊ शकते. शहरात शिकलेले हे दोन्ही मार्ग सहज हाताळू शकतात पण खेड्यात अजून खुप प्रबोधन बाकी आहे.
20 Sep 2024 - 7:23 pm | विवेकपटाईत
तुम्हाला विषय समजलेलाच नाही. माझ्या लेखाचा जातीशी काहीही एक संबंध नाही. मी फक्त शिक्षण व्यवस्थेतील दोष दाखविले आहे. सर्वांनाच वाटते त्याचा मुलगा ग्रॅज्युएट व्हावा आणि व्हाईट कॉलर जॉब मिळावी. केंद्र आणि राज्य सरकार ती ईच्छा पूर्ण करते आहे. प्रत्येक तरुण ग्रेजुएट होत आहे.. त्यामुळे कौशल प्रशिक्षण घेण्याची कोणाचीही इच्छा होत नाही. हे साक्षर बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. जातीनिहाय जनगणना केली तरी काय साध्य होणार. सरकारी व्हाईट कॉलर नोकऱ्या वाढणार आहे का? भविष्यात महाराष्ट्र सरकार वर्षा पन्नास हजार तरुणांनाही सरकारी नोकरी देऊ शकणार नाही. वाढता सरकारी खर्च कमी करण्यासाठी केंद्र असो किंवा राज्य सरकार सर्वच कॉन्ट्रॅक्ट लेबर भरती करू लागले आहे. दिल्लीत ही अतिथी शिक्षकांची संख्या स्थायी शिक्षकांपेक्षा जास्त आहे. ही स्थिती सर्व राज्यांत असेल.
21 Sep 2024 - 9:28 am | चौकस२१२
प्रत्येक तरुण ग्रेजुएट होत आहे.. त्यामुळे कौशल प्रशिक्षण घेण्याची कोणाचीही इच्छा होत नाही. हे साक्षर बेरोजगारीचे मुख्य कारण आहे.
विवेक जी आपण म्हणत ते बरोबर आहे,, लेखमागे मूळ मुद्दा "कोणत्या प्रकारचे शिक्षण आणि त्यातून कोणत्या प्रकारचे कामगार देशात असावेत याबद्दल आहे आणि मी सुधा त्यावर प्रतिसाद ना देत जात य वर वर बोलत बसलो
( येथे कामगा र म्हणजे काम करणारे मग ते मेंदूवर उपचार करणारे विवाद्य कि रस्ते साफ करणारे दोन्ही हि असा अर्थ जिवा )
खरे तर देश एवढा मोठा आहे कि "आय टी आय" पासून ते "आय आय टी" दोन्ही प्रकारचेह शिक्षण घेणार भरपूर असतील त्यामुळे समतोल राखलं जाईल असे वटते
सगळेच जर फक्त संगणक क्षेत्रात गेले तर मग उत्पादन करायाला कुशल कामगार कुठीऊन मिळणार असे प्रश्न काही देशात येतो हे खरे तो काही भागात येत असणार पण पूर्ण देशात येईल असे वाटत नाही
नुकतेच मी चे उद्धरण दिले हा उद्योग जवळचे "आय टी आय" चालवते ते खेडयापाडयात हात कामगार / कलाकुसर करणाऱ्या पण ना शिकलेल्या लोकांचं मुलांना प्रोत्साहन देऊन
जगात छोटी लोकसंख्या आणि भरपूर श्रीमंती ( कुवेत , कतार, सिंगापुर) आशय परिस्थिती काही ठराविक काम स्थानिक जनतेला करायची नास्तात कारण त्यात शारीरिक कष्ट असतात ( जरी कौशलय लागत असले तरी ) तिथे हा प्रश्न होतोय पण तो वेगळं मुद्दा झाला
एकूण भारताची अर्थव्यवस्ताह मोकळी झाल्यावर पूर्वी जय क्षेत्रात काम अगदी कमी होते किंवा नवहते ते उपलब्ध झाले , चांगलेच आहे
जशी समृद्धी येईल तसे " हलक्या किंवा धिक्याचं " क्षेत्रातील काम सुसहाय होत जाईल आणि लोकं त्या साठी लागणारे शिकशान घेऊ लागतील
19 Sep 2024 - 5:20 pm | कॉमी
हया एका वाक्यावरून लेखकाची अप्रामाणिकता दिसते.
19 Sep 2024 - 10:41 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
20 Sep 2024 - 7:26 pm | विवेकपटाईत
वेद पाठ करणे सहज कार्य नाही. हुशार मुले करायचे. त्यांना सन्मान आणि राजाश्रय ही मिळायचा. जसे आज हुशार मुले डॉक्टर, आय आय टी, इत्यादी करतात.
19 Sep 2024 - 5:56 pm | धर्मराजमुटके
कारण कमी साक्षर असल्याने सर्व शारीरिक मेहनतीची कामे करायला ते सआfunction at() { [native code] }
ठेकेदार हिंदू असूनही त्याला हिंदू कारीगर मिळत नाही.
अशा काही दोन चार वाक्यांशी तंतोतंत सहमत.
बाकी लेखाचा विषय लै हार्डय आहे. आरक्षण, संविधान नावाचे शब्द तर तोंडावाटे काढायला देखील भिती वाटते आजकाल.
असो.
19 Sep 2024 - 7:39 pm | कर्नलतपस्वी
मी ज्या शाळेत शिकलो तीथे सुतार काम,मशिन ड्राॅईंग,टर्नर,फिटर असे व्यावसायिक शिक्षण दिले जायचे. बरेच विद्यार्थी पॉलिटेक्निक मधे जाऊन डिप्लोमा घ्यायचे. नोकरी किवा स्वताच व्यवसाय सुरू करण्यात इतर विद्यार्थ्यां,म्हणजे आर्ट, काॅमर्स घेतलेल्या पेक्षा पुढे असायचे.
शिक्षण पद्धतीत फरक करायला हवा.
बाकी आपल्या विचारांशी बहुतेक सहमत.
20 Sep 2024 - 4:54 am | चौकस२१२
अनुक्रम
आय टी आय
डिप्लोमा
डिग्री
मास्टर डिग्री
पी एच डी
19 Sep 2024 - 7:51 pm | कंजूस
जर्मनीत ट्रेड असतात.
आपण इंग्लीश पद्धत अनुसरली. एक साहेब आणि बाकी चिल्लर. पगारात खूप तफावत.
20 Sep 2024 - 4:51 am | चौकस२१२
इंग्लीश पद्धत = एक साहेब आणि बाकी चिल्लर.?
ट्रेड ला फक्त जर्मनीत पैसे आणि मान असे नाही तर इंग्लंड आणि त्यातून वसलेले बहुतेक पाश्चिमात्य देश येथेहि असेच आहे अर्थात त्यासाठी ३-४ वर्षाचे उत्तम शिक्षण घयावे लागते
येथे एक प्लबर किंवा इलेक्ट्रिशिअन एखाद्या कॉमर्स पदवीधर पेक्षा जास्त कमवतो
19 Sep 2024 - 11:55 pm | तिता
मी पुण्यात बघितलेले बहुतेक कारागीर यूपी मधून आले आहेत. आणि ते सर्व हिंदू आहेत. उत्तम काम करतात. न शिकलेले मागेच राहतात, धर्म कोणताही असला तरी.
20 Sep 2024 - 7:36 pm | कर्नलतपस्वी
जात,पात, धर्म, पंथ या वर समाज विभाजन करून पुढारी आपली रोटी शेकत आहेत. सामान्य जनता उगाच भरडली जात आहे. अर्थात माझे मत आहे.
उरलं सुरलं रेवड्या वाटून मतदारांना आकर्षित करत आहेत. लाडकी बहीण मग भाऊ,आजोबा,काका,पुतण्या वगैरे दोडके का?
सरकार आणी विरोधी पक्ष जनतेने आपल्या हितासाठीच व राष्ट्र हितासाठीच निवडून दिले आहेत. दोघे मिळून एकत्र जनहितासाठी काम का करत नाहीत?
निराशाजनक परिस्थिती आहे.