अहल्या शिळा राघवे मुक्त केली
पदी लागतां दिव्य होऊनी गेली.
जया वर्णिता सिणली वेदवाणी
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी.
समर्थ म्हणतात, श्रीरामांच्या चरणांचा स्पर्श होताच शिळा रुपी अहल्या मुक्त झाली. हा श्लोक वाचतना, अनेक प्रश्न मनात आले. अहल्या खरोखर शिळा झाली होती का? श्रीरामांच्या चरणाचा स्पर्श होतास ती पुन्हा मूळ स्वरूपात आली, हे कसे संभव आहे? समर्थांच्या या श्लोकाचा भावार्थ वाल्मिकी रामायणातील कथेत शोधण्याचा प्रयत्न मी आपल्या अल्प बुध्दीने केला आहे.
महर्षि विश्वामित्र, राम, लक्ष्मण आणि अनेक ऋषी मुनीं सोवत मिथिलेत पोहोचले. श्रीरामांना तिथे एक ओसाड निर्जन आश्रम दिसले. श्रीरामाने महर्षि विश्वामित्रांना विचारले या आश्रमात ऋषी, मुनी, आचार्य, ब्रह्मचारी इत्यादी कोणीच का दिसत नाही? ऋषी विश्वामित्र म्हणाले, हे आश्रम गौतम ऋषींचे आहे. पूर्वी देवराज इंद्राने महर्षि गौतम ऋषींच्या पत्नी अहल्येवर बलात्कार केला होता. अहल्या निर्दोष होती तरी समाजाने अहल्येलाच दोषी ठरवले आणि गौतम ऋषींच्या आश्रमावर बहिष्कार टाकला. आज ही परिस्थिती विशेष बदललेली नाही. स्त्रीवर अत्याचार झाला तरी लोक स्त्रीलाच दोष देतात. त्यावेळी ही समाजाने इंद्रासोबत अहल्येलाही दोषी ठरवले. तिला वाळीत टाकले.
एकदा समाजाने ज्या व्यक्तीशी "रोटी आणि बेटीचा" व्यवहार बंद करून वाळीत टाकले की त्या व्यक्तीची स्थिती एखाद्या वाळवंटातील दगडा सारखीच होते. अहल्येची स्थिती अशीच झाली होती म्हणून समर्थाने तिला शिळा असे संबोधित केले. समाजाने बहिष्कृत केले तरी काय झाले, परमेश्वरापासून तिला कोणीच दूर करू शकत नव्हता. माता अहल्येने श्रीरामांच्या भक्तीत जगण्याचा आधार शोधला. आपले दुःख आणि पीडा विसरून ती तपस्वी, प्रभुरामचंद्रांच्या नाम स्मरणात दंग झाली. असो.
समाजातील वरिष्ठ, प्रतिष्ठीत लोकांना, उदा. गावातील सरपंच ते राजा इत्यादींना, बहिष्कृत व्यक्तिला पुन्हा समाजात घेण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार होता. पण निर्णय राबविण्यासाठी समाजाने त्या व्यक्तीचे आतिथ्य स्वीकार करून त्याला पुन्हा समाजाने स्वीकार केले याची पावती देणे ही गरजेचे. बहुधा यासाठीच बहिष्कृत व्यक्तीने समाजाला किंवा गाव जेवण देण्याची परंपरा सुरू झाली. सौप्या शब्दांत बहिष्कृत व्यक्तीचे आतिथ्य स्वीकार करणे म्हणजे समाजाने त्याला स्वीकार करण्याची पावतीच.
माता अहल्या निर्दोष आहे, समाजाने तिच्या स्वीकार केला पाहिजे या हेतूने श्रीराम गौतम ऋषींच्या आश्रमात आले. गौतम ऋषी आणि माता अहल्याने सर्वांची पाद्यपूजा करून स्वागत केले. स्वतः माता अहल्याने पाण्याने श्रीरामांचे चरण धुऊन ते वस्त्राने पुसले. श्रीरामाच्या चरणांचा स्पर्श अहल्येला झाला. त्याचेच वर्णन समर्थांनी श्लोकात केले आहे. श्रीराम आणि लक्ष्मणाने माता अहल्या आणि गौतम ऋषींचे चरण स्पर्श करून त्यांना नमस्कार केला. श्रीराम, महर्षि विश्वामित्र, सहित अनेक ऋषी मुनींनी त्यांचे आतिथ्य स्वीकार केले. ते दृश्य पाहून स्वर्गातील देवतांनी पुष्पवृष्टी करून श्री रामांच्या कृतीचे समर्थन केले. असे वर्णन वाल्मिकी रामायणात आहे. माता अहल्येवर समाजाने टाकलेला बहिष्कार संपला. तिला पुन्हा समाजात मान ताठ करून जगणे शक्य झाले. गौतम ऋषींच्या आश्रमात पुन्हा ऋषी, मुनी आचार्य आणि शिक्षणासाठी ब्रम्हचारी येऊ लागले. पूर्वी प्रमाणे आश्रमात यज्ञादी कार्य पुन्हा सुरू झाले. असो.
अहल्या उध्दार ज्ञात इतिहासातील एकमेव अद्वितीय घटना आहे, जिथे एक राजा, एका पीडित निर्दोष स्त्रीला न्याय देण्यासाठी स्वयं तिच्या घरी गेला. तिचे आतिथ्य स्वीकार केले. समर्थ पुढे म्हणतात, श्रीराम आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करत नाही. वंचित, पीडित समाजाला न्याय देण्यासाठी श्रीरामचंद्र सदैव तत्पर असतात. अश्या भक्तवत्सल प्रभू रामाचे वर्णन करताना वेदवाणी ही शिणली, त्यात आश्चर्य काय.
प्रतिक्रिया
11 Feb 2024 - 10:57 am | कॉमी
अर्थ:
अर्थः हिन्दी (गीताप्रेस गोरखपुर)
नवर्यानेच शाप दिला असताना रोटी बेटी व्यवहाराचा, समाजाने वाळीत टाकायचा प्रश्नच येत नाही. शाप काय आहे ?
अर्थ-
हिंदी-
(इंद्राचा शाप- त्याची वृषणं गळून पडली.)
जमिनीवर फक्त हवा खात पडून राहणे, कुणाला नजरेत न येणे हे शिळेचे वर्णन वाटते. त्यानंतर "तु पुन्हा तुझ्या मूळ रुपात येशील" या उःशापावरुन अहील्येचे कशात तरी परिवर्तन झालेले हे समजते.
11 Feb 2024 - 11:39 am | प्रसाद गोडबोले
ह्या शब्दाचा ठार निषेध करतो. वर कॉमी ह्यांनी मुळ श्लोक दिलेलाच आहे. अहिल्येला स्पष्ट ठाऊक होते की समोरचा व्यक्ती हा आपला पती नसुन देवराज इन्द्र आहे , आणि तरीही ती त्याच्याशी रत झाली , मग ह्याला बलात्कार कसे म्हणाता येईल? हे तर म्युचुअल कन्सेट ने झालेले अफेयर आहे !
हे ठार चुकीचे अनुमान आहे, अहिल्या निर्दोष नव्हतीच . ब्रह्मचर्येऽपि वर्तन्त्याः साध्व्या ह्यपि च श्रूयते । हृद्यं हि पुरुषं दृष्ट्वा योनिः संक्लिद्यते स्त्रियाः । । २८
तुम्ही पुढचे दोन श्लोक वाचा म्हणजे तुम्हाला अहिल्येचा काय अॅटीट्युड होता तेही लक्षात येईल :
अथाब्रवीत् सुरश्रेष्ठं कृतार्थेनान्तरात्मना ।
कृतार्थास्मि सुरश्रेष्ठ गच्छ शीघ्रमितः प्रभो ॥ २० ॥
आत्मानं मां च देवेश सर्वथा रक्ष गौतमात् ।
इन्द्रस्तु प्रहसन् वाक्यमहल्यामिदमब्रवीत् ॥ २१ ॥
सुश्रोणि परितुष्टोऽस्मि गमिष्यामि यथागतम् ।
रतिक्रिडेनंतर तिने देवराज इंद्रास संतुष्टचित्त होऊन म्हटले - "सुरश्रेष्ठ ! मी आपल्या समागमाने कृतार्थ झाले आहे. प्रभो ! आता आपण शीघ्र येथून निघून जावे. देवेश्वर ! महर्षि गौतमांच्या कोपापासून आपण आपले आणि माझे सर्व प्रकारे रक्षण करावे." ॥ २० ॥ तेव्हां इंद्राने हसत हसत अहल्येस म्हटले - "सुंदरी ! मीही संतुष्टचित्त झालो आहे. आता जसा आलो होतो तसाच परत निघून जाईन. ॥ २१ १/२ ॥
ह्यावरुन स्पष्ट दिसुन येते की झालेला प्रकार बलात्कार नव्हता , व्यवस्थित तेरीभी चुप मेरीभी चुप असे शिस्तीत केलेले डांगडिंग होते. त्यामुळे बलात्कार हा शब्द संपादित केला पाहिजे.
______________________________________________
बाकी लेखाविषयी काय बोलणार ? जाऊ द्या.
धर्माची अशी ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बालीश संकल्पना असणार्या लोकांच्यामुळे खरे कडक सनातनी लोकं बदनाम होतात , हे पुनरेकवार नमुद करु इच्चितो.
इत्यलम.
14 Feb 2024 - 10:56 am | विवेकपटाईत
अपराधी व्यक्तीला दिला जाणार दंड इंद्राला दिला. बलात्कार केला होता म्हणून.
ज्या श्र्लोकांच्या आधारावर हा लेख आहे त्यात ती निर्दोष आहे आणि ऋषी गौतम तिच्या सोबत आश्रमात होते.त्यांनी श्राप दिला असता तर ते तिच्या सोबत आश्रमात नसते. यावरून दोन निष्कर्ष निघतात.
१. अहल्या दोषी ठरविण्याचा भाग नंतर जोडला असेल.
२. वाल्मिकी ने समाजात पसरलेल्या प्रवादाचे वर्णन केले असेल.
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम अपराधी स्त्रीच्या आश्रमात जाणे शक्य नाही. बाकी मी खरा सनातनी आहे.
11 Feb 2024 - 4:53 pm | विवेकपटाईत
आपल्या सर्वच धर्मग्रंथात बदलता काळ आणि परिस्थिती अनुसार भेसळ झाली आहे. वाल्मिकी रामायणात अयोध्या कांड सर्ग ४८ आणि ४९ मध्ये विरोधाभास आहेत.याचा एकच अर्थ त्यात भेसळ झाली आहे. ४९ सर्गातील श्लोक १२ ते २२ जी कथा सांगतात त्या आधारावर वरील विवरण आहे. या कथेत गौतमाने अहल्येचा त्याग केला असा उल्लेख नाही. त्याच्या आश्रमाला लोकांनी वाळीत टाकले असाच एक अर्थ निघतो.
11 Feb 2024 - 6:06 pm | कॉमी
१. पहिली चूक, (अनावधानाने झाली असेल.) आपण आयोध्याकान्ड नाही तर बालकान्डाबद्दल बोलत आहोत. अहिल्येची गोष्ट बालकान्डात आहे.
२. ४८व्या सर्गात अहिल्येला शाप कसा मिळाला ह्याची गोष्ट आहे. त्यात अजून राम-लक्ष्मण-विश्वामित्र त्रिकूटाने अजुन आश्रमात प्रवेश केला नाही. ४९व्या सर्गात इन्द्राला बोकडाचे वृषण कसे आले ह्याचे वर्णन आहे, त्यानन्तर त्रिकूट आश्रमात प्रवेश करते, आणि रामाकरवी अहिल्येचा उद्धार होतो. ह्या सर्गामध्ये पुन्हा शाप कसा मिळाला ही गोष्ट येत नाही. उ:शाप कसा असेल ह्यामध्येही ४८ आणि ४९व्या सर्गात कसलाही विरोधाभास नाही. त्यामुळे कोणताही विरोधाभास दिसला नाही. तुमच्या "वाळीत टाकले" थियरीला कसलाही आधार नाही. वर मार्कस ह्यांनी इन्द्रावर आरोप कसा चुकीचा आहे लिहिलेच आहे.
14 Feb 2024 - 11:21 am | विवेकपटाईत
अयोध्या कांड एवजी बालकांड वाचावे.
11 Feb 2024 - 7:02 pm | प्रचेतस
पटाईतकाका विनोदी लिहून सनातन धर्माला बदनाम करत असतात.
11 Feb 2024 - 7:48 pm | प्रसाद गोडबोले
अवांतर :
पण वल्लीसर , हे असे लेख वाचुन आणि लोकांचे धर्माचे ज्ञान पाहुन माझ्या मनात कायम एक विचार येत असतो,
जाणकार अभ्यासु लोकांनी धर्मध्वजा हातात घेतली नाही तर ती पटाईत काकांसारख्या भोळ्या भाबड्या भाविकांच्याच हातात जाणार अन शुध्द तर्कशास्त्र , अन लोकोत्तर अशा औपनिषदिक तत्वज्ञानावर आधारित अशा सनातन धर्माला ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बाष्कळ अशी पुटं चढत जाणार ! ह्या सार्यात काही अंशी आपल्यासारख्या जाणुन कळुनही अलिप्त राहणार्या लोकांचा थोडा का होईना दोष आहे असे म्हणायला वाव आहे :(
स्वामी विवेकानंद म्हणालेले - मला दुर्जनांच्या सक्रियतेची भीति नाही वाटत , मला सज्जन्नांच्या निष्क्रियतेची भीती वाटते. तसे काहीसे.
आपण काही धर्माचे सखोल जाणकार नाही पण थोडेफार तरी अभ्यास केलेले , मुळ ग्रंथांच्या संहितांवर आपले आकलन तपासुन घेतलेले , सत्यासत्यता तावुन सुलाखुन पाहिलेले आहोत.
आपण काहीतरी करायला हवे.
13 Feb 2024 - 8:59 am | प्रचेतस
तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे, चित्ती असू द्यावे समाधान ॥
आपला आपणच अभ्यास करावा आणि वेळोवेळी त्यासंबंधी लिहित जावे इतकेच करु शकतो.
13 Feb 2024 - 10:07 am | कर्नलतपस्वी
भले तरी देऊ कासेची लंगोटी....
.
13 Feb 2024 - 10:11 am | कॉमी
तुका म्हणे ?
13 Feb 2024 - 11:52 am | प्रचेतस
येथे मूळचा ग्राम्य शब्द आचार्य अत्रेंनी संपादित करून 'कासे'ची असा केलाय.
14 Feb 2024 - 8:30 am | Bhakti
प्रगो एक यूट्यूब चैनल बनवा बघा!
14 Feb 2024 - 1:41 pm | Trump
बनवतील असे वाटत नाही. त्यापेक्षा मिसळपाववर लिहा.
अर्थातच ज्ञान वाटणार नाहीत, फक्त लिहतील त्यांच्यावर टिका करत राहणार.
14 Feb 2024 - 11:24 am | विवेकपटाईत
ज्या इतिहासाचे वर्णन समर्थानी आणि वाल्मिकी ऋषींनी केले आहे तिचे लिहले आहे. अहल्या निर्दोष होती म्हणून तिला अपराध मुक्त केले. जरा थंड डोक्याने लेख वाचाल तर कळेल.
14 Feb 2024 - 3:25 pm | प्रसाद गोडबोले
आवरा .
निर्दोष व्यक्तीला अपराध मुक्त कसं करतात ?=))))
ऐश आहे राव अहिल्येची. स्वेच्छेने मजा मारून सुध्धा ती निर्दोष. अन् बिचारा इंद्र, त्याला अहिल्येने फुल्ल सिग्नल दिला, पूर्ण कन्सेट दिला सेक्स करायला, तरी तो बलात्कारी . अगाध तर्क आहे हा . आता अहिल्या लगेच #metoo म्हणायला रिकामी. =))))
ही असली बाष्कळ विचारसरणी असणारे लोक समाजात आहेत हे मी माझ्या मित्रांना सांगितले तर त्यांचा जुन्या एक्स गर्लफ्रेंडस चां सोबतीतील "आठवणी" आठवून भीतीने थरकाप उडेल.
अन् मग मटण च्यां दुकानात बोकडाचे वृषण शोधत फिरायची वेळ येईल
=))))
12 Feb 2024 - 12:18 pm | कर्नलतपस्वी
उठ सुट हिन्दू धर्मावरून शककुशंका काढून काही बाही लिहिण्याची फॅशन आणी पॅशन झाली आहे. इतर धर्मावरून काहीही बोलले तरी त्या धर्माचे लोक गंभीर दखल घेतात.
13 Feb 2024 - 2:30 am | नठ्यारा
प्रसाद गोडबोले,
प्रचंड सहमत. धर्माची माहिती अचूक असणे अभिप्रेत आहे. ती नसल्यास चिंतन करावे. पण मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतरच चिंतनाचा मार्ग अनुसरावा. अन्यथा चिंतन अर्धवट माहितीवर आधारित राहते.
खरंतर नेमका असाच प्रकार विज्ञानाच्या बाबतीतही आढळून येतो. विज्ञानाची व वैज्ञानिक चिकित्सेची बालिश संकल्पना असणाऱ्या लोकांच्यामुळे खरे कडक विज्ञानवादी नाहक बदनाम होतात. धर्म आणि विज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ( किंवा असायला हव्यात ).
-नाठाळ नठ्या
13 Feb 2024 - 12:02 pm | अमरेंद्र बाहुबली
पटाईत आणी निनाद ह्याचे लेख म्हणजे ”दोन हाणा पण आमच्या संस्कृतीला चांगलं म्हणा.”
14 Feb 2024 - 11:45 am | विवेकपटाईत
धर्मग्रंथात भेसळ होते. आपले विचार ऋषि मुनींच्या नावाने धर्मग्रंथात खपविले जातात. धर्मग्रंथ नाहक बदनाम होतात. राजा भोजच्या काळात महाभारताचे श्लोक वीस पासून पंचवीस हजार पर्यंत पोहचले. त्यांनी यावर कडक नियम बनविले होते आणि दंड ही दिल्याचे उदाहरण आहेत. तरीही श्लोक वाढत राहिले हे वेगळे. त्यामुळे धर्मग्रंथ वाचताना भेसळ वेगळी करून त्यांचे अर्थ समजले पाहिजे. लेख लिहिताना वाल्मिकी रामायणाचे उदाहरण देताना फक्त अहल्येला निर्दोष ठरविणारे श्लोकांचे उदाहरण दिले.
14 Feb 2024 - 11:48 am | कॉमी
काय भेसळ आणि काय नाही हे कोणत्या आधारावर ठरवता ? जे आवडते ते ओरिजनल आणि नाही आवडत ते भेसळ ???
14 Feb 2024 - 1:00 pm | अहिरावण
>>>>राजा भोजच्या काळात महाभारताचे श्लोक वीस पासून पंचवीस हजार पर्यंत पोहचले. त्यांनी यावर कडक नियम बनविले होते आणि दंड ही दिल्याचे उदाहरण आहेत
राजा भोज हाच का? इ स ११ वे शतक
इ स दुसरे शतकातच महाभारत लक्षश्लोकी झाले होते. मग वीस चे पंचवीस काय ? दंड काय? आले मनात दिले ठोकून
हेच कारण सनातनी बदनाम होण्याचे.
केवळ मी सनातनी आहे असे लिहून चालत नाही. वागावे लागते.
13 Feb 2024 - 2:34 pm | अहिरावण
तद्दन बिनडोक लेखन
13 Feb 2024 - 4:08 pm | सुरिया
घरच्या सीतेला चूक नसताना प्रजेच्या समधानासाठी अग्निपरिक्षा आणि पुन्हा वनवास.
बाहेर करणार अहिल्येचा उध्दार आणि प्रजेला शिकवणार वाळीत टाकलेल्यांना कसे स्वीकारायचे ते.
.
वाह प्रभू अगाध तेरी लीला.
13 Feb 2024 - 4:15 pm | अमरेंद्र बाहुबली
शंबूकाला शिक्षण घेतोय म्हणून प्राण द्यावा लागला.
खरंच प्रभूची लिला अगाध आहे.
13 Feb 2024 - 6:13 pm | प्रसाद गोडबोले
शंबुक कसले शिक्षण घेत होता ? कुठे ऍडमिशन घेतलेले त्याने की ऍडमिशन न घेताच कॉलेजात घुसून बसलेला ? एलिजिबिलिटी एक्साम पास केली होती का त्याने ?
शूद्रयोन्यां प्रजातोऽस्मि तप उग्रं समास्थितः ।
देवत्वं पार्थये राम सशरीरो महायशः ॥ २ ॥
न मिथ्याऽहं वदे राम देवलोकजिगीषया ।
शूद्रं मां विद्धि काकुत्स्थ शम्बूकं नाम नामतः ॥ ३ ॥
जो जो धर्माला विरुद्ध असे कृत्य करेल त्याचा त्याचा नाश रामारायानी केलेला आहे. मग त्यात शूद्र शंबुक आला, वानर वाली आला, स्त्री त्रातिका आली , अन् ब्राह्मण रावणही आला.
श्रीरामाच्या चरित्रात कोठेही नाव ठेवायला जागा नाही. ते साक्षात धर्मस्वरुप आहेत. ( आणि त्यांनतर दुसरा म्हणजे युधिष्ठिर.)
रामो विग्रहवान् धर्मः साधुः सत्यपराक्रमः ।
राजा सर्वस्य लोकस्य देवानाम् इव वासवः ॥
राम मूर्तिमंत सनातनधर्म आहे.
हे वर्णन राक्षस मारीच ने केलेलं आहे, कोणी ब्राह्मण अथवा क्षात्रियाने नाही. पण कावीळ झालेल्यांना ते समजणार नाही.
इत्यलम
13 Feb 2024 - 6:46 pm | कॉमी
अनेक राक्षस इत्यादी तप करून वाट्टेल ते वर घेऊ शकतात. शुद्राने तप केले तर राजा येऊन मस्तक उडवून टाकतो आणि देव देवता फुलांचा वर्षाव करतात, आणि म्हणतात, ह्याला सदेह स्वर्गात जाऊ दिले नाही बरे केले.
13 Feb 2024 - 5:45 pm | प्रसाद गोडबोले
हे असं होतं बघा.
@विवेक पटाईत काका, हे पहा वराचे काही मोजके प्रतिसाद.
तुमच्या अनाभ्यासातून म्हणा किंवा भोळ्या भाबड्या भक्तिभावतून आलेल्या बाळबोध लेखांमुळे लोकांचे कसे फावते ते.
म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो. ह्या म्हणीचे जिवंत उदाहरण इथे दिसून येत आहे.
तुम्ही भक्तिभावाने काहीतरी बालिश लिहून जाता, त्याने सनातन धर्माला काही फरक पडत नाही पण लगेच धर्माची बदनामी करणाऱ्या अनभ्यासू लोकांना मोकळे रान मिळते, स्वतचा अजेंडा रेटायची संधी मिळते. हे जास्त गंभीर आहे.
पुढे - आपण जास्त विचार अन् अभ्यास करून, मूळ संहिता पाहून, मगच लेख लिहावेत अशी सद्बुद्धी आपल्याला मिळो हीच प्रभू रामारायाच्या चरणी प्रार्थना.
13 Feb 2024 - 5:56 pm | कॉमी
काय चूक लिहिले आहे येऊ द्या तपशीलात.
13 Feb 2024 - 6:19 pm | प्रसाद गोडबोले
संपूर्ण वाल्मिकी रामायण ह्या इथे उपलब्ध आहे , तेही अत्यंत सुगम मराठी भाषांतर सह!
https://satsangdhara.net/vara/prastavik.htm
तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊ नका, मी ३.५% वाला आहे.
तुम्ही मूळ संहिता वाचा, तुमचे तुम्हालाच कळेल की काय चूक आहे ते.
अभ्यासोनी प्रकटावे। नाहीतर झाकोनी असावे।
प्रकटोनी नासावे।हे बरे नव्हे।।
- समर्थ रामदास स्वामी
13 Feb 2024 - 6:33 pm | कॉमी
तुम्हीच तुमचा पाळला नाहीये. प्रगट झाला आणि आता म्हणता आहात तुमचे तुम्ही बघा. तुम्हाला तुमचे म्हणणे स्पष्ट करायचे नव्हते तर झाकोनी असावे, हे सार्थ झाले नसते का ?
इंद्र कसा बलात्कारी नाही हे सांगायला कसा आलेला तसाच इथेही या, की वर सुरिया ह्यांनी काय चुकीचे लिहिले आहे सांगायला.
बाकी कोण कुठल्या टक्क्यातले ह्याचे भारीच ऑब्सेशन दिसते तुम्हाला.
13 Feb 2024 - 7:20 pm | प्रसाद गोडबोले
कशाला वेळ वाया घालवायचा ?
रामायण न वाचता रामावर टीका करणारे लोक बहुतांश वेळा ब्राह्मणद्वेष्टे आणि इन जनरल हिंदुद्वेषी असतात.
मी कितीही श्लोक अन् संदर्भ दिले तरी त्याचा काहीही उपयोग नाही. मग कशाला वेळ वाया घालावा.
बाकि विवेक पटाईत काका, हे धर्म द्वेष्टे नाही, उलट भोळे भाविक आहे, त्यांचे अहील्येविषयी, इंद्राविषयीचे चुकीचे आकलन हे अनाभ्यासतून आलेले आहे , द्वेषातून नाही , त्यांचा मूळ हेतू शुद्ध आहे म्हणून मी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे.
बाकि कोणाशी मला बोलायची इच्छा नाही.
13 Feb 2024 - 6:52 pm | Trump
हे विधान तद्दन मुर्खपणाचे आहे. हिंदु समाजाच्या/धर्माच्या, भारताच्या अवनतीला जिथे-तिथे जन्माधारीत जात आणि वर्ण घुसवणारे लोक आहेत.
13 Feb 2024 - 7:05 pm | मुक्त विहारि
लिंक बद्दल धन्यवाद...
जमल्यास महाभारताची लिंक मिळेल का?
13 Feb 2024 - 6:47 pm | नठ्यारा
लोकहो,
पटाईतकाकांनी अस्सल स्रोत न वापरल्याने त्यांच्यावर टीका केली गेली. हे एका अर्थी उचित आहे. मात्र ती जरा जास्तंच तीव्र भाषेत केली गेली, असं माझं मत आहे. पटाईतकाका हिंदू धर्माच्या बाजूने लिहिणारे आहेत. ते दुखावले गेले नसतील अशी आशा आहे.
प्रक्षेपांमुळे खरंच सनातन हिंदू लोकं बदनाम होतात का, असा प्रश्न आहे. हेच या संदेशामागील प्रयोजन आहे. एक उदाहरण देतो. राधा हे पात्र व्यासरचित महाभारतात नाही. तरीपण राधे-राधे संप्रदाय जोरात चालू आहे. त्यामुळे हिंदू धर्मास काही हानी पोचली आहे असं सकृतदर्शनी तरी दिसंत नाही.
तेव्हा या विषयावर अधिक खोलात चर्चा करायला आवडेल.
-नाठाळ नठ्या
-नाठाळ नठ्या
13 Feb 2024 - 7:26 pm | अहिरावण
प्रक्षेपांमुळे हिंदू धर्माला काहीही हानी पोहोचत नाही. मात्र देशमुखरानडेसंप्रदायातील नवपुरोगामी भुक्कडांना गरळ ओकायची संधी मिळते, त्यांचे फावते.
14 Feb 2024 - 11:57 am | विवेकपटाईत
प्रतिसाद आवडला. वाल्मिकी रामायणात जे आहे त्याचेच वर्णन आहे. अहल्या निर्दोष होती म्हणून श्रीरामाने तिचे आतिथ्य स्वीकार करून पुन्हा समाजात आणले. त्यामुळे तिला दोषी ठरविणारे श्लोक १०० टक्के भेसळ आहेत किंवा वाल्मिकीने त्यावेळी तिच्या बाबतीत समाजात पसरलेल्या प्रवादांचे वर्णन केले आहे.
14 Feb 2024 - 8:19 am | Bhakti
प्रगो बरोबर बोलतोय.कोमी यांनी 'संदर्भ' मांडलेत.हा तुमचा लेख मी एक वर्षांपूर्वी जरी वाचला असता तर भारावून गेले असते.पण गेल्या वर्षांपासून इतकं सनातन शोधून ऐकतेय,वाचतेय, समजून घेत आहे की बस!यू ट्यूब तर एका क्लिकवर आहे तेव्हा अमी गणात्रा(ex IIM) आणि विनित अग्रवाल(Dr.) जे आजच्या पिढीचे आहेत यांना महाभारत आणि रामायण यांच्या विषयी 'अचूक' बोलतांना नक्की ऐका.
हे रामायण मधील राम ,सीता, हनुमान,अहिल्या,दशरथ इ.यांच्या कृतींची पडलेल्या प्रश्नांची हमखास उत्तरं देतो.
"अहिल्या तपस्वी आहे रामा तिचे पाय धर,"असे विश्वामित्र म्हणतात.अहिल्येप्रमाणेच एकेकाळी विश्वामित्र लस्ट/मोह या इंद्रिय लोभाने भरकटले होते.तेव्हा तिची स्थिती विश्वामित्र यांना भलेभाती समजली होती.माणसाला दुसरी संधी नक्कीच द्यायला हवी.
https://youtu.be/hppH--9iDxg?si=XgOl_bKgBV_ix5cE