कसाबचे नवीन वकील अब्बास काझमी, यांनी या अतिरेक्याचे वकीलपत्र घेतले म्हणून त्यांना मुंबईच्या प्रतिष्ठीत इस्लाम जिमखान्याच्या विश्वस्तपदावरुन काढून टाकण्यात आले. या संदर्भात आज बाळासाहेबांनी सामनामधे "हा इस्लाम आम्हालाही कबूल आहे" म्हणून अग्रलेख लिहीला आहे. त्यातील मुद्दे:
- अंजली वाघमारे वकीलपत्र घेऊन स्वतःच आधी कोर्टात खोटे बोलल्या होत्या.
- महेश भट, शबाना आझमी, मेधा पाटकर, टिस्टा सेटलवाड हे नेहमीचे यशस्वी कलाकार चिडीचूप आहे. अतिरेकाविरुद्धची आग ही मेणबत्त्यांबरोबरच विझली आणि अतिरेक्याला मानवतावादी वागणूक मिळवण्यावरून पणत्या पेटल्या.
- या मार्गाने जर भारतातील मुस्लिम समाज आधीच गेला असता, तर आज भारताचे चित्र वेगळे झाले असते.
- कसाबच्या जागी एखादा हिंदू असता तरी आमची भुमिका बदलली नसती. उलट ती अधिकच प्रखर झाली असती.
- कसाबचे वकीलपत्र घेणे, हे सैतानाची वकीली करण्यासारखे आहे आणि हे इस्लामलाही अमान्य आहे म्हणून जिमखान्याच्या विश्वस्त मंडळावरुन अब्बास काझमींची हकालपट्टी करण्याचा इस्लाम जिमखान्याने घेतलेला निर्णय बरोबर आहे.
- अशा इस्लामला आम्ही राष्ट्रधर्म मानतो आणि त्याला मानाचा मुजरा करतो. मुसलमान या विचाराने वागले व जगले तर भांडण उरतेच कोठे?
प्रतिक्रिया
6 May 2009 - 7:38 pm | प्राजु
खरंच आहे.. "असा इस्लाम आम्हाला कबूल आहेच आहे. " :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
6 May 2009 - 7:48 pm | अवलिया
हेच बोलतो
--अवलिया
6 May 2009 - 7:51 pm | छोटा डॉन
आज सकाळीच अग्रलेख वाचला, बर्यापैकी आवडला ...
पण आता विकासरावांचा लेख वाचुन "त्यांना" नक्की काय म्हणायचे हे समजले नाही ...
इथे "अश्या इस्लाम"वर चर्चा अपेक्षीत आहे का ?
का आपण फक्त बाळासाहेब काय म्हणतात हे मिपाकरांना सांगु इच्छिता ?
बाकी हा लेख "जनातलं मनातलं" मध्ये आल्याने चर्चा/काथ्याकुट अपेक्षीत नाही हे ओघाने आलेच ...
माझे मत :
काझी महाशयांच्या हकालपट्टीमागे जे "इस्लामला अमान्य" चे कारण दिले आहे ते प्रथमदर्शनी आकर्षक आणि कौतुक करण्याजोगे वाटते.
हे पाऊल नक्कीच स्वागतार्ह्य आहे ...
पण इथे "इस्लामचा" संबंध कुठे आला हे माझ्या अल्पमतीस समजले नाही, देशावर उठलेल्या कसाबचे संरक्षण करायला जर कोणी उठत असेल तर त्याला विरोध करताना आपण "राष्ट्रभक्ती" पाहणार की "धर्माची चौकट" ???
"इस्लामला अमान्य" आह एम्हणुन हकालपट्टी हे काही पटाले नाही, राष्ट्र आधी की इस्लाम ?
निदान जेव्हा ही घोषणा करण्यात आली तेव्हा ह्या मुद्द्यांचा आधारे मत मांडले गेले असते बरे वाटले असते, इथे "धर्म" कशाला मध्ये आणला हे अनाकलनीय आणि अस्विकॄत आहे. चालायचेच, त्याशिवाय पब्लिसिटी कशी होणार म्हणा ...
आम्ही निर्णयाचे स्वागत करतो पण ह्या मागे "इस्लामला अमान्य" हे कारण देण्यात आले आहे ते आम्हाला अमान्य आहे ...
बाकी सामनाच्या लेखाचे आश्चर्य वाटले नाही, त्यांची तशी लिखाणाची पद्धत आहे ...
मात्र ह्या निमीत्ताने "कटुता" मिटत असेल तर आम्हाला आनंद होईल, मात्र इथे "धर्म" हा मुद्दा कुठेच येत नाही असे आमचे स्पष्ट मत असल्याने आमच्या मते " हा इस्लाम आम्हाला मान्य" असे लिहण्याची आवश्यकता नव्हती. ही धर्माची अत्यंत संकुचीत व्याख्या झाली ....
जसे कट्टरपंथी सोईसाठी धर्म वाकवतात तसाच आपणही धर्माचा सोईस्कर अर्थ काढायला लागलो की काय ???
असो.
------
( आधी राष्ट्र आनि मग धर्म मानणारा ) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
6 May 2009 - 9:01 pm | मराठमोळा
ह्या कसाबने आधी लोकांचा जीव घेतला, दहशत निर्माण केली. आणी आता लोकांचा वेळ आणी डोके खात आहे.
कसाबशी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष संबंध असलेला हा ७वा धागा असावा. कसाबचे भांडवल अजुन्किती दिवस पुरणार आहे देव जाणे.
बाकी चालु द्या.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
6 May 2009 - 10:03 pm | विकास
वरील छोटा डॉन यांच्या प्रतिसादात तसेच मराठमोळां नी विचारेल्या प्रश्नासंदर्भातः
>>>कसाबशी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष संबंध असलेला हा ७वा धागा असावा. कसाबचे भांडवल अजुन्किती दिवस पुरणार आहे देव जाणे. (:मराठमोळा)<<<
अहो जो पर्यंत त्याच्यासंदर्भात जो पर्यंत काही महत्वाचे बदल दिसणार्या घटना घडणार तो पर्यंत त्यासंदर्भात कोणी न कोणी तरी लिहीत राहणारच. शिवाय हा धागा कसाबवर असण्यापेक्षा या (अतिरेकी) घटनेने देशबांधव हे धर्मबांधवा पेक्षा महत्वाचे हे कृतीतून दाखवून देणारे दिसले आणि त्याला लगेच "हिंदू फॅनॅटीक" असे म्हणणार्या बाळासाहेबांनी मानाचा मुजरा केला या संदर्भात आहे.
>>>पण आता विकासरावांचा लेख वाचुन "त्यांना" नक्की काय म्हणायचे हे समजले नाही ...(: छोटा डॉन) <<<
वरच्या परीच्छेदात हा उद्देश थोडाफार आला असे वाटते. तरी देखील मला जे काही वाटते त्या काही गोष्टी अधिक स्पष्ट करतो:
तुमचा "राष्ट्र आधी की इस्लाम" हा मुद्दा एकदम चपखल आहे. त्यामुळे यात विशेष काय असे वाटणे आणि म्हणणे हे देखील गैर वाटणार नाही. पण समाजातील कुठल्याच गोष्टींकडे बघताना कृष्ण-धवल नजरेतून बघता येत नाही. मात्र दुर्दैवाने इस्लामिक धर्ममातंड, (कुठलेही) राजकारणी आणि प्रसारमाध्यमे यांनी अशी कृष्ण-धवल वृत्ती आणि नजर तयार केली आणि बहाल केली. त्यामुळे इतिहासात कितीही खोल वर जाता येत असले तरी, स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासात खिलाफत चळवळीस पाठींबा देत तुर्कस्तानचा खलीफा (ज्याला तुर्कांनी घालवले होते) तो आमचा पण बादशहा असे म्हणायला म. गांधीं म्हणत राहीले पण दुसरीकडे त्याच वेळेस रस्त्यावरील मुसलमान भिकारी हा केवळ मुसलमान आहे म्हणून गांधींपेक्षा जवळचा असे म्हणणारे मुसलमान नेतृत्व त्याचवेळेस अतित्वात राहीले.
आता जरा फास्ट फॉरवर्ड केले आणि नंतर स्वातंत्र्यानंतर पण पाहीले तर मुसलमानी सामन्य जनतेस मुसलमानी सुशिक्षित हे अधुनिकतेपासून दूरच ठेवत आले आहेत. शबाना आझमी, दिलीप कुमार यांच्यासारखे प्रथितयश कलाकार तसेच अनेक विविध क्षेत्रातील बुद्धीवंत मुसलमान हे त्यांच्या समाजाला अधुनिक व्हा हे शिक्षण देण्यापासून कारणे काही असोत चार हात लांबच राहीले. मात्र जेंव्हा धार्मिक तेढ आली तेंव्हा मात्र स्वतःच्या धर्माची बाजू घेत असल्याचा देखावा करत राहीले - मग व्यक्तिगत धर्म खरेच इतर सामान्यांसारखा पाळत नसले तरी काय बिघडले?
हाच प्रकार हिंदूंच्या बाबतीतही झाला आहे - विशेष करून जातीचे राजकारण आणत. तरी देखील एकाच एका धर्ममार्तंडांची मनावरील सत्ता सुदैवाने हिंदू समाज त्या अर्थी एक नसल्याने कधी येऊ शकली नाही. (कारण कुणाला गजानन महाराज आहेत, कुणाला मुरारी बाबू, तर कुणाला नरेंद्र दाभोळकर :) ) शिवाय महाराष्ट्राच्या बाबतीत तर अजून एक नशिब: शाहू महाराज, महात्मा फुले, न्या. रानडे, आगरकर, कर्वे, आंबेडकर आणि इतर अनेकांनी वेळोवेळी नुसता वैचारीक विरोध केला नाही तर त्यांच्या त्यांच्या समर्थक/समाजात शिक्षणाचे महत्व सातत्याने सांगत त्यांना जागे करायचे काम केले. (म. फुल्यांचे वाक्य आठवते का?: विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतिविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले)
काही अपवदात्मक उदाहरणे सोडली तर मुसलमान समाजामधील कुठल्याच प्रकारचे नेतृत्व, संघटना, ह्यांनी जेथे जेथे इस्लामिक अतिरेकी कारवायांचा संबंध येतो तेथे कधी आवाज उठवला नाही अथवा पाकीस्तान जिंकले म्हणून फटाके उडवणार्यांना जरा समाजशिक्षण देण्याच्या कानपिचक्या दिल्या नाहीत...
ह्या सर्व पार्श्वभूमीवर "इस्लाम जिमखाना" या प्रतिष्ठीत संघटनेने आवाज उठवला. तो उठवताना अर्थातच त्यांना त्यांच्या सभासद आणि समाजाच्या भावनांचा विचार करावा लागला असेल. इतके वर्षे सतत प्रत्येक धार्मिकच नव्हे तर सामाजीक गोष्टपण इस्लाम आधी या पद्धतीनेच विचार करायला लावायची सवय एकदम घालवता येणार नाही. म्हणून त्यांनी जर "हे इस्लामच्या विरोधात आहे" असे म्हणत कृती केली म्हणून काही त्याचे महत्व कमी वाटायला नको.
जसे या बातमीतून इस्लामीक सुधारकांचे विचार स्पष्ट कृतीत दिसले तसेच बाळासाहेबांना काय म्हणायचे असते हे देखील तितकेच स्फटीका इतके स्वच्छ दिसले. दुर्दैवाने अशा व्यवस्थित लिहीलेल्या वैचारीक लेखाला इंग्रजी माध्यमे प्रसिद्धी देणार नाहीत कारण त्यावर त्यांना त्यांची रोजीरोटी मिळत नाही... सगळेच चांगले झाले तर झाली ना बोंब.. त्यापेक्षा राहूंदेत जरा फरक, राहूंदेत समाजाचा काही भाग अडाणी, काही भाग धर्मांध, म्हणजे आपली न्यूजरीळे चालू राहतील आणि बातम्यांच्या वेळेस चॅनल्सचा टिआरपी पण वाढेल, शिवाय आपन बुद्धीवादी ठरू ते वेगळेच. अर्थात या संदर्भात इ-सकाळ ने ही बातमी प्रसिद्ध करून स्वतःचा वेगळेपणा दाखवून दिला आहे हे नक्कीच येथे सांगायला हवे.
6 May 2009 - 10:16 pm | प्राजु
ह्या सर्व पार्श्वभूमीवर "इस्लाम जिमखाना" या प्रतिष्ठीत संघटनेने आवाज उठवला. तो उठवताना अर्थातच त्यांना त्यांच्या सभासद आणि समाजाच्या भावनांचा विचार करावा लागला असेल. इतके वर्षे सतत प्रत्येक धार्मिकच नव्हे तर सामाजीक गोष्टपण इस्लाम आधी या पद्धतीनेच विचार करायला लावायची सवय एकदम घालवता येणार नाही. म्हणून त्यांनी जर "हे इस्लामच्या विरोधात आहे" असे म्हणत कृती केली म्हणून काही त्याचे महत्व कमी वाटायला नको.
१००% सहमत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
6 May 2009 - 10:25 pm | छोटा डॉन
विकासरावांचा अतिशय उत्तम आणि सखोल उहापोह करणारा प्रतिसाद आवडला.
आम्हाला नक्की हेच जाणुन घ्यायचे होते ती इस्लाम जिमखान्याचा निर्णय आणि त्याचे बाळासाहेबांनी केलेले कौतुक ह्याचा आपण आपल्या विचारकोषातुन काय अर्थ काढतो.
वरील प्रतिसादात बहुतांशी सर्व मुद्दे अगदी व्यवस्थितपणे मांडले गेल्याने ह्या लेखाचा हेतु सफल झाला हे मानायला हरकत नाही ...
तुमचे म्हणणे बरोबर आहे ...
थोडा काही झाले की "इस्लाम खतरे मे है" म्हणुन बांग देणारे शबाना, जावेद अख्तर आणि दिलीपकुमारसारखे सो कॉल्ड बुद्धिवादी ह्यावेळी मुग गिळुन गप्प कसे ह्याचा जाब खरेतर मुस्लीम समाजातील विचारवंतांनी विचारायला हवा होता. बाळासाहेबांनी हे मुद्दे उचलले की ह्याला आपसुकच धार्मिक रंग येतो ...
पण आजही त्यातल्या त्यात राष्ट्र महत्वाचे असा विचार करणारे व तेच म्हणणे थोड्या वेगळ्या भाषेत धर्माचा आधार घेऊन मांडणारे काही सुजाण लोक आहेत हे पाहुन आनंद झाला, ह्यांना खरोखर सपोर्ट देणे महत्वाचे आहे ,तेच बाळासाहेबांनी केले ...
जरी मी वर "सामनाच्या लेखाचे आश्चर्य वाटले नाही" असे लिहले असले तरी त्यामागचा अर्थ वेगळा आहे.
सामना हा बहुतेकवेळा समाजाच्या प्रतिक्रियेची पर्वा न करता रोखठोकपणे आपले म्हणणे मांडत असतो, अर्थात त्यात बहुसंख्यवेळा थोडासा कट्टरपणापणे झुकणारा लेखाचा अंश असतोच. पण ह्यावेळी तसे झाले नाही ह्याचे आम्हाला कौतुक आहे.
बाळासाहेबांनी कट्टर वैर्याच्याही गुणांचे कौतुक करताना कधी हात आखडता घेतला नाही, खुद्द शरद पवारांना ते मैद्याचे पोते म्हणत असले तरी कौतुक करताना "शरदबाबु" म्हणुन मुक्तहस्ताने बर्याच वेळा स्तुतीसुमने उधळली आहेत. असो,तो मुद्दा इथे नाही ...
मात्र बाळासाहेब वारंवार ज्या "देशभक्त मुसलमानाचा" उल्लेख करतात तो त्यांना आज दिसल्याने भावुक होऊन हा वैचारीक अग्रलेख उतरला ...
आमचे मत फक्त ह्याचा "संकुचित" अर्थ काढु नये असे होते ...
आपल्या प्रतिसादात सर्व मुद्दे स्पष्ट झाल्याने आता लेखाला हा रंग येणार नाही ह्याची खात्री वाटते व त्याबद्दल आपले आभार मानावे वाटतात. मुळ लेखात काय दिले आहे ह्यापेक्षा त्यामागची भुमिका स्पष्ट करणारे वैचारीक लिखाण अपेक्षीक होते, आता ते मिळाले, आनंद झाला ...
------
(समाधानी)छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
7 May 2009 - 2:38 am | वाहीदा
कोणाच्या आठवणीत नसेल तर एक जूना Live Show स्म्रूतीपटलावर आणू ईच्छीते ...
जेव्हा ईमाम बुखारी ला विचारले होते एका Live Show वर 'अगर तुम इस्लाम को जानते हो और जिहाद के मायने सही जानते हो तो उसका गलत मतलब नहीं कहोंगे, क्या जिहाद का मतलब होता है मासूमोंकें खुन से खेलना ?? क्यूं तुम ईस्लाम को बदनाम कर रहे हो ? तुम्हें क्या हक पहूंचता है के तुम ऐसी जलील हरकत जिहाद का / इस्लाम का नाम लेकर करो ?? '
त्या वेळेला त्या निच माणसाने शबाना आझमी ला ' ईक नचनिया के हम मुंह नहीं लगते ' म्हणून उडवून लावले
दुर्दैवाने खरे बोलणे हे मर्मावर बोट ठेवण्यासारखे आहे अन असे बोलणार्यांचे तोंड बंद कर ण्यासाठी चारित्रांवर घाणेरडे शिंतोडे उडविले जातात दुर्दैवाने त्यात तर बाई किंवा मुलीवर तर सहज अन सोईस्कर पणे :-(
असो त्या वेळी तेथे जमलेल्या खुपश्या मुस्लीम ग्रुहीणीं ज्या त्या Live Show हजर होत्या त्यानी ईमाम ला वेठीस धरले अन विचारले 'अगर तुम जिहाद को जानते हो और ईस्लाम को जानते हो तो ईसका गलत मतलब नहीं फैलाओगे ..क्यों ईस्लाम को बदनाम कर रहे हो ? तुम हमारे बच्चोंको क्यू गुमराह कर रहे हो ?? तुम जैसे लोगोंने ईस्लाम को कहांसे कहां पहूंचा दिया खुदा का खौफ रखो बहोत बुरी मौत का सामना करोगे '
अर्थात त्यांचे उत्तर बुखारी कडे नव्हते . 'तुम्हारी आवाज मेरे कानोंतक नहीं पहूंच रही' म्हणून बुखारीने अंग झाडून घेतले
Jihad does not mean this. जिहाह हा शब्द जद्दो-जहद या शब्दावरून आला आहे
खालील उर्दू वाक्य पहा
'मेरे वालदायन (अम्मी) ने हमारे वालीद के ईन्तेकाल के बाद जिंदगी से जद्दो - जहद कर के हमें ईस काबिल बनाया के हम किसीके मोहताज न बनें'
मी माझ्या मुस्लीम समाजा बध्द्ल असेच काहीसे म्हणेन
कुछ और भी है हमारे जिंदगी की तसविरें ,
हम वो नहीं जो तुमने और बालासाहब ने हमें आजदिन तक समझा है !!
दिल ही दिल मै सुलगते रहें हम ...और रहे हम दूर ही दूर !!
ईस सरजमींन से हर मुसलमान को ईतना ही प्यार है जितना तुम्हे अपनी मां से है !!
इतमिनान रखना !! कभी तो अपना अंदाज बदल के देखो .. कभी तो अपना समझ कर देखो ...
हमारे भी पुरखोंने भी ईस सरजमीं के लिए खुन बहाया है !! :-)
~ वाहीदा
कह र हा है दरीयांसे समंदर का सुकूत (शांतता)
जिसमें जितना दफ्त (गहराई ) है, उतना ही वो खामोश है !!
7 May 2009 - 10:36 am | विकास
वाहीदा जी,
आपल्या विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद. इमाम बुखारींचा किस्सा अर्थातच माहीत नव्हता. मात्र त्यांना "सामान्य (प्रसिद्धीच्या झगमगाटात नसलेल्या)" स्त्रीयांनी प्रश्न विचारून "कॉर्नर" केले हे ऐकून बरे वाटले पण चांगल्या अर्थाने आश्चर्य वाटले नाही. कारण मी जे काही वर लिहीले आहे आणि तसे बर्याच जणांना वाटते त्या प्रमाणे हा सर्व प्रश्न सामान्य मुसलमान समाजाने तयार केलेला नाही. मात्र तो (समाज) त्यात त्याच्याच नकळत बळी पडला आहे असे वाटते. मात्र आधी म्हणल्याप्रमाणे इस्लामधर्मातील धार्मिक ढुढ्ढाचार्य (बुखारी वगैरे) तसेच माझ्या लेखी शबाना आझमी सारख्या समाजसेवीका (काही अंशी मला तीचा आदर आहे मात्र बर्याच अंशी तिचे वागणे समाजभेदी वाटते. आणि समाज म्हणजे धार्मिक नाही तर भारतीय) तसेच मुस्लीम नसलेले पण निधर्मीवादाच्या मुखवट्याखाली समाजात फूट पाडणारे हे याचे दोषी आहेत. स्वतःच्या पोळ्या भाजत रहाव्यात म्हणून या सर्वांनी आणि राजकारणी लोकांनी सामान्यांना असल्या वादात खेळत ठेवले...
म्हणूनच:
हे जे आपण म्हणता आहात त्यासंदर्भात किमान माझ्या बाबतीत तरी काही संबंध नाही. (बाळासाहेबांना काय वाटते ते, त्यांचे त्यांना माहीत!)
मी तुम्हाला काय किंवा अजून कोणा भारतीयाकडे काय केवळ भारतीय म्हणून पहातो. जातीनेपण पहात नाही अथवा धर्माच्या चष्म्यातून पण पहात नाही. अपवाद फक्त एकच - कोणी प्रथितयश मराठी असला तर त्याबद्दल (अभिमानापेक्षा जास्त) आनंद होतो . अर्थात आता देशाबाहेर राहील्याने तो चष्मापण गळून पडला आहे.... फक्त भारतीयच दिसतात. तरी देखील, उदाहरण म्हणून मला जेंव्हा सुलोचनाचे काम आवडते तेंव्हा त्यांचा धर्म दिसत नाहीतर मराठमोळे व्यक्तीमत्व दिसते. नर्गीस ही केवळ एक उत्कृष्ठ नटी आणि समाजसेवीका म्हणून दिसते (सुनीलदत्त बद्द्ल पण मला तसा आदर नव्हता). तुमच्याशी हा संवाद साधतानापण, आपण तसेच मी देखील केवळ भारतीय आणि मराठी आहोत इतकेच समजतो. आपली त्याला हरकत नसावी. आपण (आणि इतरांनी) पण केवळ याच दृष्टिकोनातून येथे बोलावे/लिहावे आणि व्यवहारात वागावे असे वाटते.
माझे कायमचे म्हणणे आहे, की धर्म, श्रद्धा वगैरे जे काही आहे ते आपले आपल्यापाशी ठेवावे. थोडक्यात "हम और तुम" हे हिंदी गाण्यातला मुखडा म्हणून ठिक आहे. कुठल्याही दोन समाजातील भेद म्हणुन या शब्दांचा वापर नसावा. मग असे हे चालू का व्हावे? अशी दोन धार्मिक समाजात तेढ का यावी? कारणे अनेक असू शकतीलः ऐतिहासीक, राजकीय, अतिरेकी, इत्यादी... पण जो पर्यंत काश्मीरमधील तसेच इतरत्र दहशतवाद असोत, बांग्लादेशींचे अनधिकृत आक्रमण असोत, किंवा अजून भारतावरील कुठलाही प्रकारचा हल्ला असोत तो हल्ला करणारे आतले अथवा बाहेरचे जर त्या शत्रूंविरुद्ध आवाज उठवताना, त्यांचा धर्म कुठला हे न पहाता, शत्रू/गुन्हेगार म्हणूनच जर जाहीरपणे पाहीले तर टिकाकारांची तोंडे गप्प होऊ शकतील. आणि मग राजकारण्यांना त्याचा (गैर)फायदा घेणे अवघड होईल.
माझ्या लेखी एक कारण मी आधी दिले ते आहे: जेंव्हा बहुतांशी समाज हा अज्ञानाच्या अंधकारात राहतो, अधुनिकतेपासून वंचीत राहतो आणि त्याला वर ओढण्यासाठी समाजधुरीण काहिच करत नाहीत तेंव्हा सर्वच चुकत जाते. कदाचीत २१व्या शतकातील जग जवळ आणणारी अधुनिकता येई पर्यंत सर्व काही चालू शकले पण आता सगळे बिघडू शकते असे वास्तव डोळ्यासमोर दिसू लागले आहे.
विचार करा, आज इस्लाम जिमखान्याच्या एका कृतीने बाळासाहेब ठाकर्यांसारखा माणूस पण "अंदाज बदलत" जाहीर पणे "अशा इस्लामला मानाचा मुजरा" करू लागला. कारण काय तर त्यात आपण म्हणालात तसे, "कभी तो अपना समझ कर देखो" हे असा निर्णय घेणार्यांनी " स्वधर्माआधी स्वदेशाला अपना समझके" करून दाखवले, हे आहे.
थोडक्यात, "अंदाज आणि अपनापन " यांचा सूर हा मनापासून वाजवलेल्या "टाळीच्या नादासारखा " असतो. आणि आपल्याला माहीत असेलच की टाळी ही एका हाताने वाजत नाही.
धन्यवाद.
7 May 2009 - 10:49 am | चिरोटा
तेढ नाहिच आहे. गेल्या २५/३० वर्षात धर्माच्या नावाखाली ज्या लोकानी पोळी भाजुन घेतली ते लोक ही तेढ निर्माण करत आहेत्.ऐतिहासिक वास्तुंची नावे बदलायला सांगणे,जुन्या धार्मिक स्थळांवरुन वाद उकरून काढणे,वेगवेगळ्या पध्धती वापरून 'ते' लोक कसे बाहेरुन आले आहेत्,पाकिस्तानात त्याना हाकलल्या शिवाय भारताची सुधारणा होणार नाही असा प्रचार करणे ही कामे ह्या संघटना करीत असतात्.सुदैवाने -हो सुदैवानेच सध्या आर्थिक मंदी असल्याने लोकाना सध्या 'रोटी,कपडा,मकान' ह्याच गोष्टी महत्वाच्या आहेत.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
7 May 2009 - 11:13 am | आंबोळी
भेंडी तुझे वय काय रे?
आंबोळी
7 May 2009 - 12:02 pm | दशानन
येथे वयाचा संबध कुठे येतो आहे ?
भेंडी ह्यांनी जे लिहले आहे त्याला मी सहमत आहे.
थोडेसं नवीन !
7 May 2009 - 1:59 pm | आंबोळी
तेढ नाहिच आहे. गेल्या २५/३० वर्षात धर्माच्या नावाखाली ....
त्या आगोदर ७००/८०० वर्ष दोन्ही समाज गुण्यागोविंदाने रहात होते पण अता फक्त हिंदू धर्मांध (भेंडीच्या वरिल प्रतिसादात तरी तसेच वाटतय) गेल्या २५/३० वर्षात भांडणे उकरून काढत आहेत आणि तेढ वाढवत आहेत असे एकंदर बालिश विचार दिसले म्हणून त्याला वय विचारले....
पूर्वी जिझिया कर वगैरे काही नव्हतेच. बाबराने राम मंदीर (आणि इतर अनेक मंदीरे) पाडलिच नाहीत.
सक्तिची धर्मांतरे झालिच नाहीत.
४७ ला फाळणी अगदी गुण्यागोविंदाने झाली. पाकिस्तानातून/मधे ट्रेन भरून लोक हसत खेळत आले / गेले.
बंगालला त्यावेळी दंगल झालिच नाही आणि गांधीजी तिकडे जाउन उपोषणाला बसलेच न्हवते.
असो.
क्ष चांगला अन य वाईट इतके सधे सरळ सोपे काही नसते.
हे असे कृष्ण्-धवल रंगात रंगवता येणारे चित्र नव्हे. याला अनेक पदर आहेत. खूप व्यापक विषय आहे हा.
बाकी चालु द्या.
आंबोळी
7 May 2009 - 2:54 pm | दशानन
तुमचे मुद्दे बरोबर आहेत हो, पण तुम्ही वय काढण्यापेक्षा जर हेच मुद्दे वर लिहले असते तर ?
तुमच्या मुद्दे खरोखर महत्वाचे आहेत पण किती वर्ष अजून आपण त्यांनी केले म्हनून... ही विचार सरणी ठेवणार आहोत ? १९४७ / बंगला देश विसरा राव खुप झालं, दोन्ही चांगले अथवा दोन्ही वाईट असे नाही म्हणत पण चुका दोन्ही कडून झाल्या आहेत, कोणाकडून जास्त कोणाकडून कमी पण का त्यामुळे आपण नेहमीच तलवार बाळगायची हाताशी ?
नको त्या भांडणामुळे देशाचे खुप नुकसान आधीच झाले आहे कमीत कमी आता तरी जागे होणे गरजेचे नाही का ?
थोडेसं नवीन !
7 May 2009 - 4:44 pm | आंबोळी
नको त्या भांडणामुळे देशाचे खुप नुकसान आधीच झाले आहे कमीत कमी आता तरी जागे होणे गरजेचे नाही का ?
अगदी योग्य बोललात राजे.
पण जागे होणे ही क्रिया दोन्हीकडून व्हायला हवी. तरच देशाचे भले होईल.
मी शक्यतोवर असल्या जातीय्/धार्मिक प्रत्यक्षात्/आंतर्जालिय भांडणात पडत नाही. पण ऐतिहासिक वास्तुंची नावे बदलायला सांगणे,जुन्या धार्मिक स्थळांवरुन वाद उकरून काढणे,वेगवेगळ्या पध्धती वापरून 'ते' लोक कसे बाहेरुन आले आहेत्,पाकिस्तानात त्याना हाकलल्या शिवाय भारताची सुधारणा होणार नाही असा प्रचार करणे ही कामे ह्या संघटना करीत असतात्. हे वाक्य सरळ सरळ हिंदूना लक्ष केलेले , एकांगी आणि अत्यंत खोडसाळ वाटले म्हणून बोललो.
पण किती वर्ष अजून आपण त्यांनी केले म्हनून... ही विचार सरणी ठेवणार आहोत ? १९४७ / बंगला देश विसरा राव खुप झालं.
माझ्या माहिती प्रमाणे ४७/४८ नंतरची कुठलीही हिंदू - मुस्लीम दंगल या मुद्द्यांवरुन हिंदूनी सुरू केलेली नाही.
असो.
यावर चर्चा करू तितकी थोडी आहे. पण येथे माझ्याकडून ही चर्चा थांबवत आहे. बाकी काही असेल तर खवत बोलूच.
आंबोळी
या वरून एक सुंदर वाक्य आठवले, "इतिहासातून आपण फक्त येवढेच शिकतो की ' इतिहासातून आपण काहीही शिकत नाही'"
10 May 2009 - 2:46 am | कलादालन
वाहीदा जी,
प्रतिसाद खुपच सुंदर दिला आहे. प्रतिसाद विस्तृत असला तरीही कमी शब्दात बरेच काही सांगण्याची तुमची शैली
(अदा :-) बरोबर आहे का शब्द ?? ) आम्हाला खुपच म्हणजे खुपच आवडली. :-)
चांगले संस्कार झालेलीच व्यक्ती अश्या सुंदर शैलीतून भाष्य करू शकते. (Reading between the lines - तुमच्या मनाची जडणघडण अश्याच चांगल्या संस्काराची उपजत असावी जी तुमच्या शैलीतून डोकावते) जरी हे मराठी व्यासपिठ असले तरी ही तुमचे उर्दू शब्द अप्रतिमच वाटतात !!
मी ही उच्चभ्रू हिन्दू समाजातून आहे . पण कदाचित आम्ही बरेच वेळा राजकारणातील वादळाला बळी पडून चुकीची समज घेऊन पूर्ण एका समाजाला टारगेट करत असतो (कळत नकळत) त्याचे पडसाद मुस्लीम समाजावर ही पडत असतील जसे सगळेच मुस्लीम वाईट नसतात तसे सगळे हिंदू ही धुतळ्या तांदळासारखे स्वच्छ असतीलच याचीही ग्यारंटी नाही .. या राजकारणातील वादळात स्वार्थी राजकारणी आपले वर्चस्व टिकविण्यासाठी हे खेळ खेळत असतात. हाताची सगळी बोटे सारखी नाहीत मग सगळीच लोकं सारखी कशी असणार ?
तुमच्या सारखे असे असंख्य मुसलमान कदाचित आम्हाला माहीत नसावे किंवा Politically correct राजकारणी (खुले अन छुपे )लोकांनी त्यांची दडपशाही ही केली असेल पण अश्या दडपशाही ला न जुमानता तुम्ही पुढे यावे ही शुभेच्छा ! अनेक आशिर्वाद !!
शुभेच्छूक ,
कलादालन
6 May 2009 - 10:14 pm | स्वामि
आपला प्रतिसाद अगदी योग्य आहे.
7 May 2009 - 10:01 am | विशाल कुलकर्णी
इस्लाम असाच आहे. फक्त काही विकृत धर्मांध जिहादच्या नावाखाली इस्लामची अवहेलना करतात.
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
7 May 2009 - 3:02 pm | चिरोटा
बाबराने छ्प्पन मंदिरे पाडली असतील पण तो विषय २१व्या शतकात उकरुन काढून लोकांच्या भावना भडकवण्यात काय अर्थ आहे?आपल्याला आवडेल असा ईतिहास अर्धवट पुराव्यांवर काढायचा, नावडत्या ईतिहास्कारांची सुडो सेक्युलर म्हणून टवाळकी करायची ह्याला माझा आक्षेप आहे.बरे, दंगली मध्ये मरणार तो माथे भडकावलेला माणुस्. हे आणि ह्यांची बाळे झेड सुरक्षेत सुखरूप. १५० वर्षे ब्रिटिशानी भारताला लूट लूट लुटले.तो इतिहास हल्लिचाच्.आता पेटा की ब्रिटिशांविरुध्ध. आहे दम?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
7 May 2009 - 3:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
का हो भेण्डीबाजार, अलिकडच्या काळात लुटलं म्हणून इंग्रज वाईट आणि त्यांच्याआधी लुटलं म्हणून बाबर, अल्लाउद्दीन खिल्जी चांगले का??
लुटणार्या इंग्रजांनी आपल्याला स्वतःच्या सोयीकरता का होईना, दिलंही बरंच काही! खिल्जी आणि बाबर (+ त्याचे वंशज) इथे गाढवाचा नांगर चालवायचे ना??
आजच्याच लोकसत्तेत बातमी आहे, त्याच ब्रिटीशांच्या वंशजांनी विजय साळसकरांच्या मुलीला वेस्टमिन्स्टर विद्यापीठात शिकायला शिष्यवृत्ती दिली आहे.
तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे या प्रतिसादातून?
7 May 2009 - 3:40 pm | दशानन
हा वाद येथे का चालू आहे हेच कळत नाही आहे मला तरी.
अहो तो काळ गेला वेळ गेली आता आपण त्या मुद्द्यावर का भांडायचे हे कोणी मला समजावून सांगेल काय ?
थोडेसं नवीन !
7 May 2009 - 4:16 pm | चिरोटा
असे मी अजिबात म्हंटलेले नाही.ईतिहासावर राजकारण करुन माणसे भडकावायला माझा विरोध आहे.इंग्रज काय बाबर काय्,देशावर राज्य करुन लुटायलाच आले होते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
7 May 2009 - 4:57 pm | विकास
>>>असे मी अजिबात म्हंटलेले नाही.ईतिहासावर राजकारण करुन माणसे भडकावायला माझा विरोध आहे.इंग्रज काय बाबर काय्,देशावर राज्य करुन लुटायलाच आले होते.<<<
इतिहासावरूनच नाही तर माझा धर्मावरून पण माणसांना भडकावायला विरोध आहे. मी आधी म्हणल्याप्रमाणे कुणाला धर्माच्या नजरेतून बघत नाही. तसेच जेंव्हा मी स्वतःला हिंदू धर्मिय म्हणतो तेंव्हा इतर धर्मियांना समानच लेखतो.
आपण पण सर्वधर्म समान आहेत, कोणी कमी नाही की जास्त नाही हे मान्य करायला तयार आहात का हे येथे सांगितले तर बरे होईल. त्यामुळे बर्याचदा होत असलेला गैरसमज कमी होयला तरी काही अंशी मदत होईल असे वाटते.
7 May 2009 - 3:50 pm | बिपिन कार्यकर्ते
मिष्टर भेंडि ....
मान्य. सहमत. आणि हाच विचार सगळ्यांनी करावा ही अपेक्षा.
माझ्या आजपर्यंतच्या निरिक्षणावरून मला असे वाटते, की या पापाचे धनी तथाकथित डावे इतिहासकारच अधिक आहेत. किंबहुना प्रत्येक अभ्यास / ज्ञान शाखेचे विचारसरणीच्या चष्म्यातून आकलन / विश्लेषण करणे ही मार्क्सवादाची अधिकृत भूमिकाच आहे. आणि त्या मुळे सत्याचा विपर्यास झाला तरी चालतो.
सुडो सेक्युलरच्या ऐवजी 'बूर्झ्वा' शब्द टाकला की हेच वाक्य दुसर्या बाजूकडून पण (अधिकच) वापरले जाते हाही अनुभव आहेच.
हे सगळ्यांच्याच बाबतीत खरे आहे. आणि याचेच अजून एक विस्तारण म्हणजे मुलाबाळांना परदेशी शिकायला पाठवणे. जरा रिसर्च केला तर डावे - उजवे सगळेच यात येतील.
अच्छा, म्हणजे आपल्याला न पेटताच स्वातंत्र्य मिळाले तर... तुमच्या वाक्याचा असाच अर्थ होतोय. आणि ब्रिटिशांनी लुटलं... मग त्या पूर्वीचे आक्रमक (अगदी अलेक्झांडर पासून ते बाबर / गझनिचा महमूद / खिलजी पर्यंत) काय सहज फिरत फिरत आले होते काय? केवळ ते आक्रमक धर्माने मुसलमान होते म्हणून त्यांच्यावर टीका करू नये का? हा तर रिव्हर्स जात्यंधपणा नव्हे का?
आक्रमक हा आक्रमकच आणि लूट ही लूटच. अन्याय हा अन्यायच. मला व्यक्तिशः जुन्या शहरांची मूळ नावे परत बहाल करणे, किंवा औरंगाबादसारख्या एखाद्या जुलमी शासकाच्या नावाऐवजी संभाजीनगर सारखे एखाद्या स्वाभिमानी छाव्याचे नाव देणे वगैरे पटते, पटत नाही ते त्यावरून होणारे राजकारण... जे सगळेच (डावे-मध्यममार्गी-उजवे) सगळेच करतात. आणि हे जगभर चालतेच. दुसर्या महायुध्दात स्टालिनने कम्युनिझमच्या नावावर वगैरे नव्हे तर 'मदर रशिया'च्या भावनिक आधारावरच लोकांना चेतवले होते. बंगालात कम्युनिस्ट असले तरी ते आधी बंगाली आहेत मग कम्युनिस्ट.
तात्पर्य : तुमची टीका एकांगी वाटली. म्हणून लिहिले.
बिपिन कार्यकर्ते
7 May 2009 - 3:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बिपिन, उत्कृष्ट प्रतिसाद. राजे हे पुन्हा 'उकरून' काढायचं कारण असं आहे की माणसाने आपला इतिहास विसरू नये. चुका कराव्यात पण किमान त्यांची पुनरावृत्ती टाळावी. आणि पुनरावृत्ती न होण्यासाठी इतिहासाचं आकलन महत्त्वाचं असतं.
विरोध असावा तो इतिहासाचं (मतपेटीवालं) राजकारण करायला! बिपीनने हाच मुद्दा अगदी मस्त मांडला आहे.
7 May 2009 - 3:54 pm | दशानन
ह्म्म्म्म, विपिनशी सहमत.
थोडेसं नवीन !
7 May 2009 - 4:49 pm | आंबोळी
बिका,अदिती यांच्याशी सहमत.
अवांतरः हेच विचार मांडायचे होते (वर) पण निट भाषेत मांडता येणार नाहीत या भिती पोटी नाही मांडले.
आंबोळी
7 May 2009 - 4:15 pm | परिकथेतील राजकुमार
बिका अप्रतीम प्रतिसाद.
खरतर अनेक रथी महारथी येथे लिहित असताना आपण आपल्या अक्कलेचे शिंतोडे कसे उडवावे हा विचार करत होतो म्हणुन अजुन लिहिले न्हवतो.
मी गेली काहि वर्षे सातत्याने बघतोय की काहि घडले उदा. बाँबब्लास्ट, मुर्तीची विटंबना, शोभायात्रेवर हल्ला इ. की ताबडतोब ४ अक्कलवंत धावत येतात आणी हिंदुना धार्मीक सलोखा राखा, शांत व्हा वगैरे आवाहन करायला सुरुवात करतात.
मला हा विनोदच कळला नाहिये आजवर. येव्हड्या तेव्हड्या कारणावरुन दंगल पेटवणारे, समाजाला हानी वगैरे पोचवणारे हिंदु मी आजवर तरी बघितले नाहियेत. तुमच्या या आवाहनाचा अर्थ काय ? तुम्हाला काय दाखवुन द्यायचे आहे ? की हिंदु ही एक अतिशय तापट व धर्मांध जमात असुन, येव्हड्या तेव्ह्ड्या कारणावरुन ती दंगे धोपे चालु करते ? खरच हिंदु येव्हडे आक्रमक आहेत ?
हिंदु धर्म आजवर तरी कोनावर लादला गेलेला मी तरी बघितला नाहिये. सक्तीने हिंदु धर्मात प्रवेश करायला भाग पाडले वगैरे बातमीही अजुन कधि वाचली नाहिये. मग हे सल्ले कायम हिंदुना का ? सोशीक आहेत म्हणुन ? का तुम्हाला अरे ला कारे ? करत नाहीत म्हणुन ?
स्वधर्माला नावे ठेवणे, त्यातल्या (नसलेल्या) चुका दाखवत हिंडणे हि आजकालची फॅशन झाली आहे. 'आमच्या घरी संध्याकाळी आई दिवा लावते मगच आम्ही जेवायला बसतो ' ह्या वाक्यापेक्षा 'मी आणी डॅड काल टेरेसवरच बसलो होतो लावायला आणी वुई वेअर डिस्कसींग अबाऊट स्टुपीड हिंदु धर्मा' हे सांगायला कसे हुच्च वाटते नाही ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
7 May 2009 - 5:11 pm | आनंदयात्री
>>स्वधर्माला नावे ठेवणे, त्यातल्या (नसलेल्या) चुका दाखवत हिंडणे हि आजकालची फॅशन झाली आहे. 'आमच्या घरी संध्याकाळी आई दिवा लावते मगच आम्ही जेवायला बसतो ' ह्या वाक्यापेक्षा 'मी आणी डॅड काल टेरेसवरच बसलो होतो लावायला आणी वुई वेअर डिस्कसींग अबाऊट स्टुपीड हिंदु धर्मा' हे सांगायला कसे हुच्च वाटते नाही ?
क्या बात है परा !! जिंकलन जिंकल तु !!
:)
7 May 2009 - 5:19 pm | निखिल देशपांडे
पराच्या प्रतिसादाशी सहमत
की हिंदु ही एक अतिशय तापट व धर्मांध जमात असुन, येव्हड्या तेव्ह्ड्या कारणावरुन ती दंगे धोपे चालु करते ? खरच हिंदु येव्हडे आक्रमक आहेत ?
हेच प्रश्न मला नेहमी लोकांना विचारावे वाटतात...
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
7 May 2009 - 5:21 pm | बिपिन कार्यकर्ते
परा......
बर्यापैकी सहमत.
परत एकदा बर्यापैकी सहमत. पण मला 'आमच्या घरी संध्याकाळी आई दिवा लावते मगच आम्ही जेवायला बसतो 'या मधे काहीच गैर वाटत नाही, पण 'मी आणी डॅड काल टेरेसवरच बसलो होतो लावायला आणी वुई वेअर डिस्कसींग अबाऊट स्टुपीड हिंदु धर्मा' या वाक्यात पण ''मी आणी डॅड काल टेरेसवरच बसलो होतो लावायल' इथपर्यंत पण काहीच गैर वाटत नाही. 'आणी वुई वेअर डिस्कसींग अबाऊट स्टुपीड हिंदु धर्मा' हे नक्कीच चु़क वाटते पण मी काही बळजबरीने हे थांबवायचा प्रयत्न करणार नाही (बहुतेक मी हिंदू असल्यामुळेच).
बिपिन कार्यकर्ते
7 May 2009 - 4:10 pm | चिरोटा
असे अजिबात नाही.टीका करायला माझा अजिबात आक्षेप नाही.बाबर्,औरंगझेब ह्यांचे धर्मांध राजकारण आपणास ठावूक आहेच. ह्या ईतिहासावर राजकारण करुन लोकाना पेटवायला माझा आक्षेप आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
7 May 2009 - 4:39 pm | बिपिन कार्यकर्ते
बास तर, मग जमलंच आपलं तुपलं... पण तुमच्या प्रतिसादात काही ठराविक अंगाने जाणारी नावं, विचार वगैरे आले होते उदाहरण म्हणून. त्यामुळे लिहावे लागले. तुम्ही जर का विविध उदाहरणं दिली असती तर असे झाले नसते कदाचित. असो.
बिपिन कार्यकर्ते
7 May 2009 - 5:15 pm | मेथांबा
पैगंबरांनी इस्लाम हा धर्म शांती आणि भाईचारा यासाठी स्थापन केला. मुळात इस्लामी समाज अतिशय शांतता प्रिय आणि प्रेमळ व सत्शील आहे. माझे अनेक मुसलमान मित्र म्हणजे मानवतेचे शांतिदुत आहेत.
स्वातंत्र्योत्तर काळात तरी निदान या समाजाला पुढे आणण्यासाठी सवलती देणे गरजेचे आहे. एकदा का निरक्षरता, अज्ञान, गैरसमज दूर झाले की त्या धर्मातील वाट चुकलेले माथेफिरु परत चांगल्या मार्गाला लागतील. यासाठी गरज आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची. त्यासाठी त्यांना पण जातीनिहाय आरक्षण दिले पाहिजे.
गाद्यांमध्ये रुपयांची बंडले शांतपणे भरून आनंदाने त्यावर झोपणारा,
मेथांबा
7 May 2009 - 5:16 pm | दशानन
=))
भ या न क वि नो द आ व ड ला तु म चा !
थोडेसं नवीन !
7 May 2009 - 5:50 pm | परिकथेतील राजकुमार
ठ्ठो !!!
=)) =))
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
7 May 2009 - 6:43 pm | आंबोळी
खरच भयानक विनोद होता
आंबोळी
7 May 2009 - 7:16 pm | प्रदीप
मेथांबा साहेब, आपण आपल्या पार्टीच्या विषयी काही गंभीर पण झटकून टाकता येऊ नये असे आरोप केले जातात तेव्हा कुठे असता? आणि आताच एकदम तिसरी आघाडी काय, येथे मुसलमानांबद्दल टिप्पणी काय!! तेव्हा कदाचित तुम्ही पार्टीच्या कार्यात खूप व्यग्र असाल असे मानून चालतो. आता हे दर्शवून दिल्यानंतर तरी काही उत्तरे द्या त्या आरोपांची. तसे आपण केले नाहीत तर तुमच्या येथील वावराबद्दल आम्हाला उगाचच शंका येत राहील. धन्यवाद.
7 May 2009 - 9:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कोणा धर्माविरुद्ध माझं मत आहे असं नाही, पण पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक, हे देश फार शांततेत नांदत आहेत असं दिसत नाही. या देशांमधे मुसलमानच बहुसंख्येने आहेत.
मिपाच्या वाचकांना अशा भल्या लोकांची ओळख करून दिलीत तर फार उपकार होतील.
सवलती देऊन समाज पुढे कसा येईल याबद्दल आपल्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.
हे मात्र लगेच पटलं. एकदा का शिक्षण, नोकरी/व्यवसाय, पर्यायाने पैसा आणि समृद्धी आली की उगाच बंदूकांच्या नादी लागणारे फारच थोडे असतात.
मुसलमानांमधेही जाती असतात? मला वाटलं ही कीड फक्त आमच्या हिंदू धर्मालाच आहे.
असो. हिंदू समाजातल्या अनेक जातींना आरक्षण दिलं आहे, त्याचा कसा आणि किती फायदा झाला यावरून आपण एक विस्तृत विवेचन लिहिलंत तर बराच ज्ञानप्रसार होईल.
(अज्ञान) अदिती