आता ऑफिस सुरु होणार म्हणून एकदा घरी जाऊन येऊ म्हणलं आणि गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाय खूप वाईट मुरगळला. आईच्या शब्दात “आल्या आल्या घेतलं का तंगडं मोडून?” तिची कामामुळे होणारी दगदग पाहून खूप वाईट वाटत होतं पण आता गप एका जागेवर बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता.
घरी गेल्यावर मोबाईलला हातपण लावायचा नाही असा ठरवलं होतं पण एका जागी बसून दुसरं करणार तरी काय? म्हणून मग किंडलवर “काबुलीवाल्याची बंगाली बायको” वाचायला सुरु केलं. सुश्मिता बॅनर्जी यांनी लिहिलेल्या या मूळ बंगाली सत्यकथेचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे मृणालिनी गडकरी यांनी.
मुळच्या कोलकाताच्या, नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्या सुश्मिता, १९८८ मध्ये जानबाज खान या अफगाणी व्यावसायिकाशी लग्न करतात आणि सासरच्या मंडळींना भेटायला मोठ्या उत्सुकतेने अफगाणिस्तानात जाऊन पोहचतात. तिथे गेल्यावर आपली झालेली फसवणूक त्यांच्या लक्षात येते. महिना - दोन महिने अफगाणिस्तानमध्ये राहून भारतात परत येण्याच्या उद्देशाने गेलेल्या सुश्मिता तिथे तब्बल आठ वर्षे अडकून पडतात. या आठ वर्षात त्यांना अफगाणिस्तानात आलेले अनुभव, सासरच्या मंडळींचे तऱ्हेवाईक वागणे (हा खूपच सौम्य शब्द वापरत आहे मी) धर्मांध आणि संस्कृतीहीन तालिबान्यांचे फतवे, त्या फतव्यांचा सुश्मितांनी कडाडून केलेला विरोध, त्यांच्या नवऱ्याचे एकटेच परत भारतात पळून येणे आणि अशा या सगळ्या कठीण परिस्थितमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल आठ वर्षे सुश्मिता कशा राहिल्या असतील याची आपल्यासारख्यांनी कल्पना करणेपण कठीण.
या आठ वर्षाच्या काळात पराकोटीचा शारीरिक, मानसिक छळ सोसूनही सुश्मितांचा हिंदू धर्माविषयीचा अभिमान आणि भारतात परत येण्याची इच्छा वाढतच जाते. भारतात पळून येण्याचा फसलेला पहिला प्रयत्न गाठीशी बांधून आणि रानटी तालिबान्यांशी निकराचा लढा देऊन भारतात via पाकिस्तान पळून येण्याच्या या प्रवासात पाकिस्तानी लोकांनी त्यांना केलेल्या मदतीचे अनुभव केवळ थक्क करणारे आणि त्याच वेळी भारतीय अधिकाऱ्यांनी केलेल्या अडवणुकीचे अनुभव अतिशय चीड आणणारे आहेत. या सगळ्या संघर्षात त्यांना भेटलेली काही चांगली माणसं, अफगाणिस्तानातील सर्वसामान्य माणसाचे जीवन, तिथल्या extreme weather conditions आणि त्याला अनुसरून केली जाणारी शेती, त्यांच्याप्रमाणेच अफगाणी माणसाशी लग्न करून अफगाणिस्तानमध्ये गेलेल्या आणि तिथेच अडकून पडलेल्या अनेक भारतीय मुली, तिथल्या कामचलाऊ (प्रत्यक्षात अगदीच बिनकामाच्या) आरोग्यसेवा, त्यांनी तिथे सुरु केलेला छोटासा दवाखाना अशा सगळ्या अनुभवांची मांडणी केलेली आहे. ज्या लव्ह जिहादची आपल्याला आज जाणीव होते आहे, तो प्रकार असा ऐंशीच्या दशकात किंवा कदाचित त्याच्याही आधीपासून सुरु असल्याचे पाहून प्रचंड संताप होतो.
असामान्य धैर्याने आल्या प्रसंगाला तोंड देऊन मायभूमीमध्ये परत येण्याचा हा थरारक प्रवास अक्षरशः नि:शब्द करून सोडतो.
पुस्तक वाचून झाल्यावर मोठ्या उत्सुकतेने सुश्मितांबद्दल गुगल केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतामध्ये परत आल्यावर इथे काही वर्षे राहून सुश्मिता २०१३ मध्ये परत अफगाणिस्तानमध्ये आरोग्य सुविधा देण्यासाठी आणि तिथल्या स्त्रियांच्या अधिकारांना वाचा फोडण्यासाठी जातात. दुर्दैवाने या वेळी तालिबानी अतिरेक्यांनी त्यांची राहत्या घरात घुसून हत्या केली. त्यामुळे मुळात एकदा भारतात आल्यावर अफगाणिस्तानमध्ये परत जाण्याचे कारण काय, सुश्मिता खरचं भारतीय गुप्तहेर होत्या का, असे प्रश्न निःशब्द करून सोडतात.
--
प्रतिक्रिया
20 Jul 2022 - 8:36 am | कंजूस
अफगाणिस्तानातील जीवनावर बरीच पुस्तकं वाचनालयात आहेत. नवं शोधायला हवं.
20 Jul 2022 - 9:58 am | चिमी
नक्की वाचा.
20 Jul 2022 - 9:08 am | क्लिंटन
छान पुस्तक परिचय. पुस्तक वाचले आहे. ते पुस्तक वाचणे हा अक्षरशः शहारे आणणारा अनुभव आहे. यावर एस्केप फ्रॉम तालिबान हा हिंदी चित्रपट आहे. अपेक्षेप्रमाणे तो चित्रपट एकदम फिका आहे.
या सुश्मिता बॅनर्जी एकदा अफगाणिस्तानातून पळून जाण्यात यशस्वी झाल्या होत्या. पण त्यांना परत तिथे जायची बुध्दी का झाली असेल हे समजण्यापलीकडचे आहे. ८-९ वर्षांपूर्वी तालिबानने त्यांना तिथल्या गावात गोळी घालून ठार मारले.
20 Jul 2022 - 10:00 am | चिमी
पुस्तक वाचून झाल्यावर मोठ्या उत्सुकतेने सुश्मितांबद्दल गुगल केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतामध्ये परत आल्यावर इथे काही वर्षे राहून सुश्मिता २०१३ मध्ये परत अफगाणिस्तानमध्ये आरोग्य सुविधा देण्यासाठी आणि तिथल्या स्त्रियांच्या अधिकारांना वाचा फोडण्यासाठी जातात. दुर्दैवाने या वेळी तालिबानी अतिरेक्यांनी त्यांची राहत्या घरात घुसून हत्या केली. त्यामुळे मुळात एकदा भारतात आल्यावर अफगाणिस्तानमध्ये परत जाण्याचे कारण काय, सुश्मिता खरचं भारतीय गुप्तहेर होत्या का, असे प्रश्न निःशब्द करून सोडतात.
हा शेवटचा परिच्छेद चुकून टाकायचा राहिला. आता edit करायला जमत नाहीये. :(
20 Jul 2022 - 9:30 am | कंजूस
कमालच आहे.
20 Jul 2022 - 9:32 am | कंजूस
उत्साह ओसरला.
20 Jul 2022 - 10:02 am | चिमी
तरी नक्की वाचा. मला तरी वाटत आहे की त्या भारतीय गुप्तहेर असाव्यात.
20 Jul 2022 - 10:30 am | कंजूस
या विषयी त्याच समाजातील लोकांनी पुढे येऊन निराकरण करायला हवे. दुसऱ्यांनी बाहेरून येऊन का लक्ष घालायचे? फुले,आंबेडकर,सानेगुरुजी ही काही महाराष्ट्रातील उदाहरणे.
सती प्रथा विरोधी आंदोलन सुरू झाल्यावर ब्रिटिशांनी लक्ष घातले. १८५७ नंतर त्यांनी ठरवून टाकले होते की धार्मिक बाबींत घुसायचं नाही.
20 Jul 2022 - 10:58 am | सौंदाळा
छान पुस्तक आहे. अफगाणिस्तान मधून पाकिस्तान मधे गेल्यावरचे त्यांचे अनुभवसुध्दा वाचण्यासारखे आहेत.
20 Jul 2022 - 11:36 am | ॲबसेंट माइंडेड ...
छान परीचय.
20 Jul 2022 - 12:26 pm | कर्नलतपस्वी
पुस्तक वाचायला आवडेल. गुप्तचर आणतील तर शेवट अपेक्षित.
20 Jul 2022 - 12:27 pm | कर्नलतपस्वी
"असतील तर "
वाचावे
20 Jul 2022 - 12:41 pm | श्वेता व्यास
पुस्तक परिचय आवडला.
20 Jul 2022 - 1:56 pm | विजुभाऊ
नॉट विदाउट माय डॉटर या पुस्तकाची आठवण झाली
20 Jul 2022 - 6:22 pm | गामा पैलवान
चिमी,
पुस्तक परिचय रंजक आहे. सुस्मिता वंद्योपाध्याय यांचं आयुष्य त्याहूनही रोचक व थरारक आहे.
त्यांच्याबद्दल विकिवर महिती वाचली. एकंदरीत चित्रं असं उभं राहिलं की त्या गुप्तचर असाव्यात. त्यांचे वडीलही गुप्तवार्ता विभागात कामाला असावेत. त्यांचा नवरा जानबाझ खान हा ही भारतीय हस्ती ( asset ) असावा.
बाई गांधारातनं भारतात पळून आल्यावर त्यांना तिथेच दुसरी कामगिरी करावयास भाग पाडण्यात आलं. त्यानुसार त्या तिथं परत गेल्या. पण भारतीय परराष्ट्रखात्यातल्या हमीद अन्सारी छाप देशद्रोह्यांना बाईंचं हिंदुत्व सहन झालं नाही. भारतातनंच त्यांचा परस्पर काटा काढायच्या सूचना दिल्या गेल्या. तालिबानच्या कोणत्याही मुख्य गोटाने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. यावरून हा अंतर्गत स्पर्धेचा गळेकापू प्रकार असावासं प्रथमदर्शनी वाटतं.
पुस्तक वाचायची उत्सुकता आहे. पुस्तकपरिचयाबद्दल धन्यवाद! :-)
आ.न.,
-गा.पै.
20 Jul 2022 - 6:55 pm | कानडाऊ योगेशु
बाप्रे.अंगावर काटा आला हे वाचुन. फार कणखर मनस्थितीची स्त्री असणार.
20 Jul 2022 - 7:00 pm | क्लिंटन
भारतातूनच त्यांचा परस्पर काटा काढायच्या सूचना दिल्या गेल्या याचा काही संदर्भ आहे का?तालिबानच्या कोणत्याही गोटाने समजा त्यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारली नसली याचा अर्थ तालिबानने त्यांची हत्या केली नाही असा कसा होईल? तालिबान्यांनी हजारो-लाखो हत्या केल्या होत्या. प्रत्येक हत्येची जबाबदारी कोणीतरी स्विकारायचे का?
21 Jul 2022 - 6:48 pm | गामा पैलवान
क्लिंटन,
यांचा काटा काढायची सूचना भारतातनं दिल्या गेलेल्या असाव्यात असा माझा समज कशामुळे झाला ते सांगतो.
आम्ही भावनेच्या भरात बामियानचे बुद्धपुतळे पाडले. असं तालिबानचा तत्कालीन नेता म्हणतोय : https://www.youtube.com/watch?v=bbdr_LZTBW4
याचाच अर्थ जर भारताने तीव्र आक्षेप घेतला असता तर तालिबानने ते नष्ट केले नसते. नव्या दिल्लीतून कोणीतरी या विध्वंसक मोहिमेस आशीर्वाद दिलेला असणार. बहुतेक वाजपेयी सरकार होतं. तरीही डीप स्टेट ने आपलं काम बजावलंच.
तसाच काहीसा प्रकार सुस्मितावाईनच्या बाबतीत घडलेला दिसतोय.
आ.न.,
-गा.पै.
21 Jul 2022 - 7:37 pm | मुक्त विहारि
तालिबानी धर्मांध आहेत...
नक्राश्रूंना किंमत देऊ नका.
21 Jul 2022 - 7:45 pm | अमरेंद्र बाहुबली
कंधार प्रकरण डीसेंबर १९९९ ला घडलं व मार्च २००० ला बामीयान मुर्त्या ऊडवल्या गेल्या. कंधार प्रकरणावेळी वाजपेयीं सारख्या दुबळ्या पंतप्रधानाची कार्यक्षमता पाहून तालिबान ने त्यांचं एकलं असतं ह्याची शंकाच आहे.
21 Jul 2022 - 10:25 pm | क्लिंटन
या लॉजिकला _/\_
तालिबानने कंदाहारला विमान नेले तेव्हाही सोवळेपणाचा आव आणून त्यांचा अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांशी काहीही संबंध नाही असे चित्र उभे केले होते. इतका की आपल्या मीडियातून नेहमीचे यशस्वी कलाकार friendly Taliban वगैरे बोलायला लागले होते. अशा गोष्टी खऱ्या थोडीच असतात?
दुसरे म्हणजे बामियानचे पुतळे पाडले तेव्हा पूर्ण जगातून निषेध झाला होता, भारतातून सुध्दा. तरीही तालिबान्यांनी त्या निषेधाला हिंग लावून विचारले नव्हते. त्याचा अर्थ बामियानचे बुध्द पाडा हा आदेश तालिबानला भारतातून गेला होता? जसे काही तालिबान ' कधी एकदा भारतातून आदेश येतो ' याची वाटच बघत होते.
तिसरे म्हणजे मुळात बामियान मधील मूर्ती पाडायची घटना आणि भारत याचा संबंधच तुम्हाला लावता आलेला नाही तेव्हा त्याचं धर्तीवर सुश्मिता बॅनर्जी यांची हत्या भारतातून सूत्रे हलविली म्हणून झाली हे कसे मान्य करणार? म्हणजे भारतात तालिबानी प्रवृत्तीचे लोक नाहीत असे मला अजिबात म्हणायचे नाही. फक्त भारतातून सूत्रे हलल्याने या घटना घडल्या हे आपण छातीठोकपणे म्हणण्याइतका आधार आपल्याकडे आहे असे वाटत नाही.
20 Jul 2022 - 8:15 pm | चिमी
एका तालिबान्यानी स्वीकारली होती म्हणे जबाबदारी..
त्यांचा नवरा जानबाझ खान हा भारताचा asset असावा – हो हे पण नक्की असू शकत.
20 Jul 2022 - 7:43 pm | डँबिस००७
सुश्मिता बॅनर्जी बद्दल फार पुर्वी बातमीत वाचल होत. भारतात परतल्यावर पुन्हा अफगानिस्तानात गेलेल्या व तिथेच त्यांची हत्या झालेली पाहुन कोड पडल होत की ईतकी मेहनत करुन भारतात परतलेल्या ह्या स्त्रीने अफगानिस्तानात परत का गेली ?
तिने तिथे जाण्या मागे हेर गीरी असेल ह्याचा किंचीतसाही संदेह आला नाही.
बाकी परराष्ट्रखात्यातल्या हमीद अन्सारीने इराण मधल्या भारताच्या बर्याच रॉ च्या अॅसेट्सना रॉ अधिकार्याच्या मानेवर सुरा फिरवलेला आहे. ह्या गुप्तहेराच्या मृत्युमागे अश्या नराधमाचा हात असु शकतो.
20 Jul 2022 - 8:13 pm | Nitin Palkar
सुरेख पुस्तक परिचय. पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली.
20 Jul 2022 - 8:21 pm | चिमी
तुमच्या प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद. _/\_
21 Jul 2022 - 11:15 am | टर्मीनेटर
पुस्तक परिचय, पुस्तकाचे "काबुलीवाल्याची बंगाली बायको" हे शिर्षक आणि तुमची लेखनशैली सगळेच आवडले 👍
वरती विजुभाऊंनी म्हंटल्या प्रमाणे हा लेख वाचताना मलाही "नॉट विदाउट माय डॉटर" ह्या पुस्तकाची आठवण आली!
मागे तुम्ही लिहिलेला "जंगल" बद्दलचा लेखही आवडला होता. चित्रपट, पुस्तकाचा परिचय करून देताना लेखनाला छोट्याशा कथानकाची पार्श्वभूमी देण्याची कल्पनाही छानच. त्यामुळे लिहित्या रहा, वाचायला आवडेल!
29 Jul 2022 - 11:31 pm | चिमी
खुप खुप धन्यवाद आणि "जंगल" बद्दल लिहिलेला लेख तुमच्या लक्षात आहे, हे पाहून तर खूपच छान वाटले .. _/\_ _/\_
21 Jul 2022 - 2:06 pm | सिरुसेरि
छान पुस्तक परिचय . वरील प्रतिक्रियांमधे उल्लेख केल्याप्रमाणे हा लेख वाचताना "नॉट विदाउट माय डॉटर" ह्या पुस्तकाची आठवण आली .
तसेच शेवटचा परिच्छेद वाचुन "राजी" आणी "Munich" हे चित्रपट आठवले .
21 Jul 2022 - 2:23 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
22 Jul 2022 - 12:01 am | श्रीगुरुजी
हे पुस्तक वाचले आहे. या सुशिक्षित मुली आंधळेपणाने एखाद्याच्या प्रेमात कशा पडतात याचे मला कायमच कुतुहल वाटत आले आहे. तो मुलगा परधर्मी म्हणजे स्त्रियांना कस्पटाचीही किंमत न देणारा मुस्लिम, त्यातून अफगाणिस्तान या अत्यंत कट्टर धर्मांध भागातून आलेला. असा मुलगा या लेखिकेला आवडणे, त्याची व त्याच्या कुटुंबियांची शून्य माहिती असूनही त्याच्याशी लग्न करणे आणि हे का केले तर म्हणे तिचा आधीच्या बॉयफ्रेंढबरोबर ब्रेकअप झाला म्हणून. बुद्धीची सर्व दारे, डोळे, कान वगैरे पूर्ण बंद केल्यानंतरच असले आत्मघातकी निर्णय सुचतात.
लग्नानंतर ही सुशिक्षित मुलगी अफगाणिस्तान या अत्यंत मागास देशात जाऊन झोपडीत राहते. तेथे गेल्यावर तिला समजते की त्याचे आधीचे कुटुंब तेथेच आहे व त्यांची सेवा करीत बसावे लागते. तो मात्र तिला तेथेच सोडून भारतात निघून येतो. रोज खाण्याची मारामार. रोजचे अन्न म्हणजे चहा आणि नान. असल्या भीषण परिस्थितीतून जिवानीशी सुटून कलकत्त्याला परत आल्यानंतरही आपण पराकोटीचा मूर्खपणा केला होता हे हिला समजतच नाही. ती पुन्हा एकदा त्याच्याबरोबर अफगाणिस्तान नावाच्या नरकात जाऊन शेवटी जीव गमावते. हे सर्व अनाकलनीय आहे.
_______________
अशीच कथा आशा पाटील नावाच्या एका बेळगावच्या मुलीची आहे. आंतरजालावर ओळख झालेल्या एका पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात ती पडते. इतके प्रेम वाढते की त्याच्याशी फोनवरून लग्न करण्याचे मान्य करते. त्यासाठी हिंदू असूनही घरच्यांचा विरोध असूनही धर्म बदलते, कुराण शिकते, बुरखा वापरायला लागते आणि हे सर्व एकदाही न पाहिलेल्या, ज्याची शून्य माहिती आहे अशा पाकिस्तानातील संपूर्ण अनोळखी मुस्लिमासाठी.
नंतर काही वर्षे धडपडून व्हिसा मिळाल्यानंतर नवऱ्याकडे पाकिस्तानात जाते. तिथे तर अजून भयंकर वातावरण. तिच्या दुर्दैवाने २ वर्षातच नवरा मरतो. मग हिला परत बेळगावात यावेसे वाटते. पण तिने आता दिराशी लग्न करावे अशी बळजबरी सासरी सुरू होते. शेवटी बरीच धडपड करून ती भारतात आईवडिलांकडे परत येते व काही दिवसांनंतर पुन्हा सासरी पाकिस्तानात जाण्यास निघते कारण तिला म्हणे सासूसासऱ्यांची सेवा करण्याचीक इच्छा आहे. पुढे काय झाले माहिती नाही.
______________
मूर्खपणाला मर्यादा नाही असे बहुतेक आईनस्टाईन म्हटले होते.
22 Jul 2022 - 1:01 am | अमरेंद्र बाहुबली
सुशिक्षित मुली आंधळेपणाने एखाद्याच्या प्रेमात कशा पडतात याचे मला कायमच कुतुहल वाटत आले आहे.
स्वानूभावावरून सांगतो. मी १३ साली फेसबूक चॅटींग करायचो बर्याच मूलींशी, एक पनवेल ची मूलगी तर घरदार सोडून पळून यायला तयार होती. त्यासाठी खुप मागेही लागली होती, मी त्या मूलीला कधी पाहीलं/भेटलोही नव्हतो तरी. मूली प्रेमात एकदा फसल्या की काहीही करायला तयार असतात, प्रेमवीरांना जग कायम लक्षात ठेवतं, अमरप्रेमकथा वगैरे हे टीवी सिरीयल्स नी प्रत्येक सिनेमात दाखवलेलं असतंचं, आपणही तसंच काहीतरी करावं ही भावना भयानक ऊचंबळून आलेली असते, त्यात मग जाती पाती ची भिंत असेल तर ती तोडायला त्या ऊत्स्फूर्त असतात, मग पुढे धर्म नी देश वगैरे आले तर त्या प्रेम स्ट्रगल ला आणखी धुमारे फूटतात. तो अनूभव घ्यायची तर त्यांची भयानक ईच्छा होते. प्रत्येक लवस्टोरीला व्हिलन असावा लागतो, मग ह्या मुली आई, बाप, भाऊ ह्यांनाच व्हिलन बनवतात. काही दिवसानी मग हे स्ट्रगल वगैरे ओसरलं, नी समाज, आई,वडील,भाऊ ह्यांनी वार्यावर सोडलं की खाडकन डोळे ऊघडतात. काही परत येऊन स्थिरावतात, काहींचे परतीचे दोर कापले जातात, काहीना काहीच न सुचल्याने परत सासरी जाऊन बसतात.
तो मुलगा परधर्मी म्हणजे स्त्रियांना कस्पटाचीही किंमत न देणारा मुस्लिम, त्यातून अफगाणिस्तान या अत्यंत कट्टर धर्मांध भागातून आलेला
आधी कुणीही कट्टर वगैरे असल्याचं दाखवत नाहीत, बर्याच फसवणूकात तर मूलांनी हिंदू नाव धारण केलेलं असतं, बाकी कितीही सुशिक्षीत असो अनेक मुलींना आपल्या राज्यातील जिल्हे नीट माहीत नसतात तर अफगाणीस्तान वगैरे माहीत असण्याची शक्यता शून्य. बी. ई मेकॅनीकल झालेल्या मूलींचं आरटीओ प्री परिक्षेसाठीचं मेरीट शंभर पैकी फक्त १ मार्काला लागलं होतं. सरकारी नियमाप्रमाणे ० चं मेरीट लावता येत नाही नाहीतर सरकारने ते लावलं असतं, ईतकं पक्कं जीके असतं मूलींचं. पुण्यातच कितीतरी मूलींना जळगाव दक्षीणेला की बेळगाव ऊत्तरेला विचारलं तर सांगता येत नाही हे मी स्वत: पाहीलंय. वास्तवीक जगाचं भान ह्या बाबतीत मूली फार म्हणजे फारच कमजोर असतात. ह्यावर एक लेख पाडू म्हणतो…..22 Jul 2022 - 1:30 am | गामा पैलवान
क्लिंटन
या ( व बामियान व कंदाहार च्या ) प्रकरणांत reading between the lines करायचं असतं. या असल्या गोष्टींचे माग कोणी आपणहून सोडून जात नसतं. मी जी काही विधानं केलीयेत ती अन्वेषणाची पहिली पायरी आहेत. तुम्हांस ती अंतिम निष्कर्ष वाटली तर क्षमस्व.
आ.न.,
-गा.पै.
22 Jul 2022 - 10:43 pm | मदनबाण
पुस्तक परिचय आवडला !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Full Song (Video) Shyama Aan Baso X Arre Dwaarpalon Kanhaiya Se Kehdo♥️ | Sachet♥️Parampara