काSSSSSSयपो छे....

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
31 Jan 2011 - 1:18 pm

एखाद्या देशाची संस्कृती त्या देशाच्या सणांवरुन दिसते असे कोणीसे म्हंटले आहे.
महाराष्ट्राची संस्कृती गणेशोत्सव दिवाळी पाडवा या सणांवरून दिसते. कोकणातला गणेशोत्सव हा अगदी आगळाच. कोकणी माणसाचा देवबाप्पाला पाहुणा म्हणून वाजतगाजत आणण्याचा उत्साह त्याच्या मनात वर्षभर गाजत असतो.
गुजरातच्या पतंगोत्सवाबद्दल मी बरीच वर्षे ऐकून होतो . या वर्षी तो योग आला. संक्रान्तीच्या दिवशी गुजरातची पतंगनगरी अहमदाबाद ( गुजरातीत अमदावाद) मध्ये होतो.
संक्रान्तीचा मह्त्व म्हणजे दक्षीणायन संपून उत्तरायण सुरु होते. इकडे त्याला उतराण म्हणतात.
संक्रान्तीची तयारी जवळजवळ महीनाभर अगोदरपासूनच सुरू होते.
पतंग मांजा चकरी पतंग उडवण्यासाठी अत्यावश्यक असे चष्मे टोप्या असे बरेच काही घेवुन दुकाने सजली जातात
1

इथला माणेक चौकातील पतंग बाजार अक्षरशः रात्रभर चालू असतो. पतंग खरेदीला येणारांची झुंबड उडालेली असते
9
संध्याकाळी सुरु झालेला बाजार सकाळी पाच सहा च्या सुमारास थंडावतो. इथे पतंगाचे शेकडो प्रकार बघायला मिळतात.
5
नुसते चौकोनीच नव्हे तर गोल ,पक्ष्याच्या आकाराचे, कागदाचे , सिल्क चे, प्लॅस्टीकचे असे अनेक प्रकारचे पतंग पहायला मिळतात.
2
लोक थंडीची तमा न बाळगता पतंग खरेदी करेत असतात.
11
इथले लोक देवाला देखील पतंग चकरी मांजा वहातात. ( बाळकृष्ण लहान बाळ आहे .त्याला खेळायला पतंग देतात)
खास देवासाठी म्हणून पतंग मांजे चकरी बनवल्या जातात
3
हे एवढ्यावरच भागत नाही . मांजा बनवायचे कारखाने रस्तोरस्ती दिसू लागतात.
पतंगाचे प्रेम इतक्यावर थांबत नाही. खास उतरणच्या दिवसासाठी म्हणून हलवायांची दुकाने तयारीला लागतात.
त्यावेळेस दुकानाची /पदार्थांची जहीरात करणारे बोर्ड सुद्धा पतंगाच्या आकाराचे असतात
4
इथे उतराणच्या दिवशी घरात एकच चर्चा असते पतंगाची. अर्थात चर्चा करायला कोणी घरात नसतेच मुळी.
सगळेजण ग्राउन्ड वर गच्चीत ,छपरावर रस्त्यावर जागा मिळेल तेथुन मनसोक्त पतंग उडवत असतात.
दुकानात पतंग घ्यायला गेले तर एक दोन पतंग घेणारे गिर्‍हाईक नसतेच. इथे पतंगाचे मोजमाप करायला "कोडी" हे युनीट वापरले जाते . वीस पतंगाची एक कोडी. लोक अक्षरशः दोनशे तीनशे पतंग घेतात.
8

घराच्या छपरावर सर्व कुटुंबीय जमतात . काका मामा आत्या शेजारी पाजारी , नातेवाईक , मुलाबाळांचे मित्र, पै पाहुणे वगैरे सर्व एकत्र दिवसभर आणि रात्रभर घराच्या गच्चीतच असतात. कोणी येताना पाच एकशे पतंग आणतो. कोणी तीस चाळीस फिरक्या ( चक्र्या ) आणतो , कोणी खावामाटे मिश्टान्न आणतो , उतराणच्या निमित्ताने घरोघरी तरतर्‍हेचे लाडू केले जातात. यात चुरमुर्‍याचे लाडू , बेसनाचे लाडू, मेथीचे लाडून , शेंगदाण्याचे लाडू , लाह्याचे , पोह्याचे , शेवेचे , चुरमा लाडू ,
सुटीयानो लाडवो , तिळाचे , हरबर्‍याच्या डाळीचे ,खजुराचे लाडू असे अनेक प्रकार असतात .
खाण्यासाठी उंधीयो , लिलवानी कचोरी हे नेहमीचे यशस्वी असतातच.
उतराणच्या निमित्ताने पतंग उडवण्याचा आनंद लहान मुले मुलीच काय पण वयाची साठी कधीच मागे ठेवलेली आज्जी आजोबा सुद्धा पतंग उडवत असतात.
6

घराच्या गच्ची वर एक मस्त गेट टुगेदर असते.
आकाशात पतंगांची अक्षरशः ठिपक्याची रांगोळी असते.
क्षितीजावर कुठेही पाहिले तर पतंगच पतंग दिसत असतात.
प्रत्येक घराच्या गच्चीचा एक किल्ला झालेला असतो. एखाद्या गच्ची वरून " काssssssयपो छे " अशा आरोळ्या ऐकु आल्या की समजावे पतंग कटली म्हणून. म्हातारी आजोब आज्जी सुद्धा मुलांच्या उत्साहाने काटाकाटी खेळत असतात.
12
रस्तोरस्ती पानझडीत पानांचा सडा पडवा तसा रस्त्यावर पतंगांचा सडा पडलेला असतो. तुटलेला पतंग /मांजा लुटायला वेळच कोणाकडे असतो? रस्त्यावर कर्फ्यू असावा तसा शुकशुकाट असतो
दिवस मावळायल येतो तसा काटाकाटीचा मुड बदलतो. मावळत्या दिनकरासोबतच क्षितीजावरील पतंग घरट्यात परतु लागतात. पण दिवस मावळला म्हणून लोकांचा उत्साह मावळत नाही. एखादा भला मोठ्ठा पतंग भक्कम दोरा लावून उडवला जातो. पतंगसाहेब थोडे वर जाऊन स्थिरस्थावर झाले की त्या दोर्‍याला कागदाचे कंदील बांधले जातात. त्यात लहान लहान मेणबत्त्या लावून धाग्याबरोबर वर कंदील जातात.
आकाशात ठीकठीकाणहून दिव्यांच्या माळा आकाशात झगमगत असतात.
कोणे एउत्साही वीर हॉट एअर बलून बनवतात त्यात दिवे ठेवून ते आकाशात उडवले जातात.
पतंग उडवून झाल्यावर जमलेली मंडळींचा उत्साह अजुन ओसरलेला नसतो. गच्चीवरच " गरबा " करायची हुक्की येते.
रात्री तीन चार वाजता श्रमपरीहार करून मंडळी घरे निघतात.
दुसर्‍या दिवशी सुर्य मध्यावर येपर्यन्त गाव निजलेले असते.
पण निजण्यापूर्वी मात्र बच्चे कंपनी , तरूण तरुणीनी ,आई वडीलानी आणि आज्जी आजोबानी सुद्धा आपल्या आठवणीत एका आनन्दी दिवसाची नोंद केलेली असते.
( टीपः या लेखातील सर्व छायाचित्रे ही मी स्वतः काढलेली असुन फ्लीकरमार्फत ती येथे मांडलेली आहेत)

संस्कृतीअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

बेस्ट रिपोर्ताज विजुभाऊ.
सगळं शहर पतंग उडवतानाचे फोटो भारी आलेत.

अवांतर: पतंगाच्या मांज्यामुळे जखमी झालेल्या रक्तबंबाळ पक्षांचे होर्डींग सुरतमध्ये पाहिले होते. :(

नन्दादीप's picture

31 Jan 2011 - 2:15 pm | नन्दादीप

>>अवांतर: पतंगाच्या मांज्यामुळे जखमी झालेल्या रक्तबंबाळ पक्षांचे होर्डींग सुरतमध्ये पाहिले होते. Sad
हेच म्हणतो...एवढया प्रमाणात पतंग उडवल्यावर जखमी पक्ष्यांच काय??? त्यांच्या साठी काही उपाय्योजना असतात की नाही??? मुम्बैत तरी अशा संस्था आहेत. तेथे असतात की नाही???

जखमी पक्षांवर उपचार करणारी मंडळे सुरतमध्ये दिसली होती; त्यांनीच होर्डींग लावली होती.
अधिक माहिती विजूभाऊ देऊ शकतील.

परिकथेतील राजकुमार's picture

31 Jan 2011 - 1:32 pm | परिकथेतील राजकुमार

जबर्‍या आढावा घेतलाय इजुभौ.
एकदम महोत्सवात उंडारुन आल्यासारखे वाटले.

कच्ची कैरी's picture

31 Jan 2011 - 1:35 pm | कच्ची कैरी

आम्हीही दर वर्षी संक्रांतीला नंदूरबारलाच (महाराष्ट्र-गुजरात सीमेवर)असतो तिथेही संक्रांत खूपच उत्साहाने साजरा करतात सकाळी ६ ते ७ वाजल्यापासुनच सगळे गच्चीवर असतात खूपच मजा येते .यावर्षीही खूप मजा केली ,हात कापले गेले होते मांज्याने

गोगोल's picture

31 Jan 2011 - 1:35 pm | गोगोल

मस्त हो विजुभाऊ :)

गुजराती संस्कृतीचा हा पैलू देखील लै झकास. आमचे विजुभाऊ नुसते गुजराती खाद्य संस्कृतीचेच नाही तर पतंगोत्सवाचे देखील किती छान वर्णन करु शकतात बघा. उगाच ताईत नाहीत ते मिपाच्या गळ्यातले.

Only Some Massages Have Happy Endings ...

वा विजुभाऊ वा !@@ गुजरातवरुन येताना मला विविध प्र्कार चे १० पतंग .. आणि ३-५ मांज्यांचे बंडलं विथ आसारी घेऊन या. प्लिज !

- पतंग राव

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Feb 2011 - 9:24 am | llपुण्याचे पेशवेll

आसारी
बास बास हाच शब्द चक्री, फिरकी च्या ऐवजी आपल्याकडे वापरतात.
या वर्षी जयपूरला होतो संक्रांतीला. तिथेही पब्लिक दुर्वा आणल्यासारख्या पतंगांच्या २०-२० च्या ५-६ जुड्या घेऊन येतं. १०-१० आसार्‍या असा सगळा थाट असतो. आपला पतंग उडवण्यापेक्षा दुसर्‍याचा काटण्यातच रस जास्त (सगळे शूरवीर पराक्रमी शक्तीशाली रजपूत इतके वर्ष मुसलमानी अंमलाखाली कसे काय राहीले याचे थोडेसे उत्तर मिळाल्यासारखे वाटले.) असतो. पतंग काटला की काSSSSSSटो करून जोरात ओरडतात. सकाळी १० ते सायं ५ या पिक टाईम मधे शहरात प्रत्येक मिनीटाला १०० तरी पतंग कापले जात असतील. गुल होऊन आलेला पतंग, मांजा लुटायचा आणि त्याला आपला मांजा बांधून तोच परत वर चढवायचा इतकाच उपक्रम हौशीनी करणारे "लुटेरे" देखील असतात. दिवसभर गच्चीतच खाणे पिणे चालते. वालाच्या डाळीची भजी हौशीनी खाल्ली जातात. मिठाया, गज़क(तिळ, गूळ इ. वापरून केलेला तिळगूळाचा आतेभाऊ) अगदी भजी देखील किलोच्या मापात विकत आणतात. हौशी लोक लाऊड स्पीकरवर गाणी लावून गच्चीत पतंगनृत्य करत असतात. (गणपतीतलं नाचणं बघितलेल्या पतंगनृत्य म्हणजे काय ते वेगळं समजवायला नको). आख्खे कांदे, बटाटे व पनीर घातलेली एक तिखट भाजी केली जाते. त्याबरोबर हरभरा, बाजरी अशा मिश्र पीठाचे तूपमाखले रोट रात्री खायचे.
थोडक्यात काय मज्जा मज्जा असते. विजुभौंमुळे त्या सुंदर आठवणींना उजाळा मिळाला.

मस्त वाटलं हो विजुभौ तुमचा हा धागा पाहुन.
अगदी ५ ते १० पैश्यांन्या पतंग विकत घेतल्याच आठवतय.
बचपन के दिन भी क्या दिन थे. :)

आवांतर : तिरंग्याचा पतंग दिसायला छान असला तरी आवडला नाही. या पतंगाची अवस्था नंतर काय होते ते आपण सर्व जाणतोच.

बचपन के दिन भी क्या दिन थे.

असं बोलू नकोस गणपा....
गवि अजून एक लेख टाकतील ;)

५० फक्त's picture

31 Jan 2011 - 2:12 pm | ५० फक्त

खा प्या पतंग उडवा मजा करा विजुभाउ आणि आम्हाला वाटु द्या वाईट आम्ही तिथं का नाही याचे.

असो, दिवे लावलेल्या पतंगाचा एखादा फोटो टाका ना इथे.

हर्षद.

झकास फोटू विजू भाव

तेवढे गांधींच्या आश्रमाचे फोटो टाकता आले तर बघा

प्यारे१'s picture

31 Jan 2011 - 2:44 pm | प्यारे१

चोक्कस बीजूभाई....!!!

मुलूखावेगळी's picture

31 Jan 2011 - 2:57 pm | मुलूखावेगळी

छान आनि सुन्दर चित्रे
मस्त विजुभाउ
येनकेन प्रकारे मेजवानि देता तुम्ही

- फक्त उड्ता पतन्ग आवडणारी

नरेशकुमार's picture

31 Jan 2011 - 3:03 pm | नरेशकुमार

क्लास वन !.

नंदन's picture

31 Jan 2011 - 3:06 pm | नंदन

फोटू आणि या सणाचं, उत्साहाचं वर्णन - बन्नेव बो सरस :)

डावखुरा's picture

31 Jan 2011 - 3:21 pm | डावखुरा

खुन्नस देउन पतंग काट्ल्यागत वाटतंय लेख वाचुन...
एकदम दिल्खुलास आणि मस्त वृत्तांत...
काSSSSSSयपो छे....

अमोल केळकर's picture

31 Jan 2011 - 4:33 pm | अमोल केळकर

खुप छान

अमोल

रामदास's picture

31 Jan 2011 - 4:46 pm | रामदास

लंपनच्या फाटकसाहेबाची आठवण झाली.
वा विजूभाऊ ,सुंदर लेख .
उत्तरोत्तर तुमची कंपनी तुम्हाला अशीच ठिकठिकाणी पाठवू देत आणि आम्हाला असेच छान लेख वाचायला मिळू देत अशी जगन्नियत्याच्या चरणी प्रार्थना.
तुम्ही मिपाचे राघोभरारी.
ही प्रतिक्रीया माझी स्वतःची असल्याचे सत्यकथन मी करीत आहे.

sneharani's picture

31 Jan 2011 - 5:19 pm | sneharani

मस्त माहितीपर लेख...मस्तच!!

फोटो न दिसल्याने निराशा झाली

उत्तम सांस्कृतिक शब्दचित्र.

मराठे's picture

31 Jan 2011 - 7:28 pm | मराठे

सही!
माझा एक चुलत भाऊ गिरगावात राहायचा. तिथे लहानपणी मकर संक्रांतीच्या निमित्ताने एकदाच जाणं झालेलं पण ती मजा अजून आठवतेय... इथे तर त्याच्या तिप्पट जल्लोश आहे!
शेअर केल्याबद्धल धन्यवाद विजूभाऊ!

यशोधरा's picture

31 Jan 2011 - 8:06 pm | यशोधरा

मस्त लेख आणि फोटो.

अभिज्ञ's picture

1 Feb 2011 - 9:23 am | अभिज्ञ

असेच म्हणतो ..छान फोटो आणि छानच लेख.
:)

अभिज्ञ.

स्वाती२'s picture

31 Jan 2011 - 8:15 pm | स्वाती२

छान फोटो आणि लेख !

आमोद शिंदे's picture

31 Jan 2011 - 8:43 pm | आमोद शिंदे

असेच म्हणतो ..छान फोटो आणि लेख !

धागा सरस छे !

कंदीलवाला पतंग काय भानगड असते नक्की ? कधी बघितला नाहीय !

धमाल मुलगा's picture

31 Jan 2011 - 8:58 pm | धमाल मुलगा

विजुभाऊ ब्याक इन अ‍ॅक्शन पाहून छान वाटलं. :)

पण सालं मांजा विकत घ्यायचा? ह्यॅ:!!! सोत्ताच्या हातानं सोडावाटरच्या बाटल्या कुटुन, त्याची काच लावलेला मांजा तयार करुन पतंग उडवण्यात खरी मजा . :)

निखिल देशपांडे's picture

31 Jan 2011 - 9:12 pm | निखिल देशपांडे

पण सालं मांजा विकत घ्यायचा? ह्यॅ:!!! सोत्ताच्या हातानं सोडावाटरच्या बाटल्या कुटुन, त्याची काच लावलेला मांजा तयार करुन पतंग उडवण्यात खरी मजा . Smile

येस्स्स!!!
कोरफड का काय त्याचा रस पण वापरायचो.
श्री धमाल मुलगा यांनी माजाची पाकृ टाकावी हि विनंती.

अवांतरः विजुभाउ छान लेख हो

धनंजय's picture

1 Feb 2011 - 1:55 am | धनंजय

मस्त!

सुधीर काळे's picture

1 Feb 2011 - 2:59 am | सुधीर काळे

विजुभाऊ,
लेख आणि छायाचित्रे आवडली. मस्त!
'मुकुंद' कंपनीत काम करताना संक्रांतीच्या दिवशी आमचे बरेच गुज्जूभाई सहकारी या कारणास्तव अदृश्य व्हायचे व इतरांना (जास्त काम पडल्याने) त्यांची 'आर्ततेने' आठवण व्हायची!
आणखी गुजरात-परिचय येऊ दे.

शिल्पा ब's picture

1 Feb 2011 - 3:34 am | शिल्पा ब

मस्त...

Nile's picture

1 Feb 2011 - 7:29 am | Nile

पतंगावर मागे एकदा सविस्तर दिलेला प्रतिसाद इथे आहे.

पाषाणभेद's picture

1 Feb 2011 - 9:42 am | पाषाणभेद

एकदम झकास पतंगवर्णन विजूभौ!

चिगो's picture

1 Feb 2011 - 2:47 pm | चिगो

ही आमची लहानपणीची पतंग उडवतांनाची आरोळी... :-)
जबर्‍या वर्णन विजुभाऊ..

मदनबाण's picture

1 Feb 2011 - 7:07 pm | मदनबाण

मस्त लेख इजुभाऊ... :)
फोटो बी लयं भारी !!! :)

प्राजु's picture

1 Feb 2011 - 10:32 pm | प्राजु

सुंदर वर्णन आणि फोटो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2011 - 9:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो अन् वृत्तांत लंबर एक.

-दिलीप बिरुटे

विटेकर's picture

20 Jan 2014 - 6:01 pm | विटेकर

क्या मस्त काटा स्वारी क्या मस्त टंका है !
विजुभौ मजा आली वाचून ! फारच चित्रदर्शी !

मुक्त विहारि's picture

20 Jan 2014 - 6:07 pm | मुक्त विहारि

लेख आणि छायाचित्रे आवडली.

विजुभाऊ's picture

13 Jan 2016 - 4:54 pm | विजुभाऊ

गुजरातमधल्या संक्रांतीची पुन्हा एकदा आठवण आली

विजुभाऊ's picture

14 Jan 2022 - 8:42 pm | विजुभाऊ

दहा वर्षा पूर्वी याच दिवशी याच शहरात होतो.

कानडाऊ योगेशु's picture

15 Jan 2022 - 12:09 pm | कानडाऊ योगेशु

सध्या उज्जैनमध्ये आहे तिथेही काल जाम माहोल होता. मी स्वतः जवळपास १० पतंग उडवले. १० च्या १० ही काटले गेले आणि तेवढेच मिळाले. ;)
करोना काळात तेवढाच विरंगुळा असल्यामुळे व घराच्या गच्चीवरुन ह्या सार्वजनिक खेळात भाग घेता येत असल्यामुळे असेल ह्यावेळी एकुण धिंगाणा वगैरे अमळ जास्तच वाटला.

चौथा कोनाडा's picture

15 Jan 2022 - 12:55 pm | चौथा कोनाडा

व्वा, झकास रिपोर्ताज, विजूभाऊ !

कोणताही प्रचि गायब झाले नाही याचे कौतुक वाटले. फ्लिकर बरंच विश्वासार्ह दिसतंय !

दोन वर्षांपुर्वी पतंगोत्सव आणी उत्तरायचा अनुभव अमदावादेत ( हे स्थानिक नाव, उदा. बेटावद, कलावद, कसरावद ई. सारखे. यातील वद हा प्रत्यय वाडी... वाड ... वाड ... वद असा तयार झाला असावा. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा) भरपूर अनुभवला. एक आठवडा मुक्काम होता ! सगळी जनता गच्चीत आणि रस्ते सुमसान म्हणजे काय याचा याचीदेही याचीडोळा अनुभव घेतला ! रिव्हरफ्रण्ट तीरावरच्या मोठ्या मैदानात कारपेट टाकून पर्यटकांना पतंगबाजीची सोय केली होती, तेथेही धमाल करता आली !

त्याचेही रिपोर्ताज केलेले आहे.
शोधून वर आणतो

कर्नलतपस्वी's picture

16 Jan 2022 - 11:39 am | कर्नलतपस्वी

प्रत्येक ठिकाणी आसे काहितरी वेगळे आसते त्याने तेथील आठवणी कायम मनात रेगांळत रहातात, धन्यवाद, तीळगुळ घ्या आणि गोड गोड लिहा आपलं बोला

कंजूस's picture

16 Jan 2022 - 5:21 pm | कंजूस

आवडला लेख आणि फोटो।