✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काSSSSSSयपो छे....

व
विजुभाऊ यांनी
Mon, 01/31/2011 - 13:18  ·  लेख
लेख
एखाद्या देशाची संस्कृती त्या देशाच्या सणांवरुन दिसते असे कोणीसे म्हंटले आहे. महाराष्ट्राची संस्कृती गणेशोत्सव दिवाळी पाडवा या सणांवरून दिसते. कोकणातला गणेशोत्सव हा अगदी आगळाच. कोकणी माणसाचा देवबाप्पाला पाहुणा म्हणून वाजतगाजत आणण्याचा उत्साह त्याच्या मनात वर्षभर गाजत असतो. गुजरातच्या पतंगोत्सवाबद्दल मी बरीच वर्षे ऐकून होतो . या वर्षी तो योग आला. संक्रान्तीच्या दिवशी गुजरातची पतंगनगरी अहमदाबाद ( गुजरातीत अमदावाद) मध्ये होतो. संक्रान्तीचा मह्त्व म्हणजे दक्षीणायन संपून उत्तरायण सुरु होते. इकडे त्याला उतराण म्हणतात. संक्रान्तीची तयारी जवळजवळ महीनाभर अगोदरपासूनच सुरू होते. पतंग मांजा चकरी पतंग उडवण्यासाठी अत्यावश्यक असे चष्मे टोप्या असे बरेच काही घेवुन दुकाने सजली जातात 1 इथला माणेक चौकातील पतंग बाजार अक्षरशः रात्रभर चालू असतो. पतंग खरेदीला येणारांची झुंबड उडालेली असते 9 संध्याकाळी सुरु झालेला बाजार सकाळी पाच सहा च्या सुमारास थंडावतो. इथे पतंगाचे शेकडो प्रकार बघायला मिळतात. 5 नुसते चौकोनीच नव्हे तर गोल ,पक्ष्याच्या आकाराचे, कागदाचे , सिल्क चे, प्लॅस्टीकचे असे अनेक प्रकारचे पतंग पहायला मिळतात. 2 लोक थंडीची तमा न बाळगता पतंग खरेदी करेत असतात. 11 इथले लोक देवाला देखील पतंग चकरी मांजा वहातात. ( बाळकृष्ण लहान बाळ आहे .त्याला खेळायला पतंग देतात) खास देवासाठी म्हणून पतंग मांजे चकरी बनवल्या जातात 3 हे एवढ्यावरच भागत नाही . मांजा बनवायचे कारखाने रस्तोरस्ती दिसू लागतात. पतंगाचे प्रेम इतक्यावर थांबत नाही. खास उतरणच्या दिवसासाठी म्हणून हलवायांची दुकाने तयारीला लागतात. त्यावेळेस दुकानाची /पदार्थांची जहीरात करणारे बोर्ड सुद्धा पतंगाच्या आकाराचे असतात 4 इथे उतराणच्या दिवशी घरात एकच चर्चा असते पतंगाची. अर्थात चर्चा करायला कोणी घरात नसतेच मुळी. सगळेजण ग्राउन्ड वर गच्चीत ,छपरावर रस्त्यावर जागा मिळेल तेथुन मनसोक्त पतंग उडवत असतात. दुकानात पतंग घ्यायला गेले तर एक दोन पतंग घेणारे गिर्‍हाईक नसतेच. इथे पतंगाचे मोजमाप करायला "कोडी" हे युनीट वापरले जाते . वीस पतंगाची एक कोडी. लोक अक्षरशः दोनशे तीनशे पतंग घेतात. 8 घराच्या छपरावर सर्व कुटुंबीय जमतात . काका मामा आत्या शेजारी पाजारी , नातेवाईक , मुलाबाळांचे मित्र, पै पाहुणे वगैरे सर्व एकत्र दिवसभर आणि रात्रभर घराच्या गच्चीतच असतात. कोणी येताना पाच एकशे पतंग आणतो. कोणी तीस चाळीस फिरक्या ( चक्र्या ) आणतो , कोणी खावामाटे मिश्टान्न आणतो , उतराणच्या निमित्ताने घरोघरी तरतर्‍हेचे लाडू केले जातात. यात चुरमुर्‍याचे लाडू , बेसनाचे लाडू, मेथीचे लाडून , शेंगदाण्याचे लाडू , लाह्याचे , पोह्याचे , शेवेचे , चुरमा लाडू , सुटीयानो लाडवो , तिळाचे , हरबर्‍याच्या डाळीचे ,खजुराचे लाडू असे अनेक प्रकार असतात . खाण्यासाठी उंधीयो , लिलवानी कचोरी हे नेहमीचे यशस्वी असतातच. उतराणच्या निमित्ताने पतंग उडवण्याचा आनंद लहान मुले मुलीच काय पण वयाची साठी कधीच मागे ठेवलेली आज्जी आजोबा सुद्धा पतंग उडवत असतात. 6 घराच्या गच्ची वर एक मस्त गेट टुगेदर असते. आकाशात पतंगांची अक्षरशः ठिपक्याची रांगोळी असते. क्षितीजावर कुठेही पाहिले तर पतंगच पतंग दिसत असतात. प्रत्येक घराच्या गच्चीचा एक किल्ला झालेला असतो. एखाद्या गच्ची वरून " काssssssयपो छे " अशा आरोळ्या ऐकु आल्या की समजावे पतंग कटली म्हणून. म्हातारी आजोब आज्जी सुद्धा मुलांच्या उत्साहाने काटाकाटी खेळत असतात. 12 रस्तोरस्ती पानझडीत पानांचा सडा पडवा तसा रस्त्यावर पतंगांचा सडा पडलेला असतो. तुटलेला पतंग /मांजा लुटायला वेळच कोणाकडे असतो? रस्त्यावर कर्फ्यू असावा तसा शुकशुकाट असतो दिवस मावळायल येतो तसा काटाकाटीचा मुड बदलतो. मावळत्या दिनकरासोबतच क्षितीजावरील पतंग घरट्यात परतु लागतात. पण दिवस मावळला म्हणून लोकांचा उत्साह मावळत नाही. एखादा भला मोठ्ठा पतंग भक्कम दोरा लावून उडवला जातो. पतंगसाहेब थोडे वर जाऊन स्थिरस्थावर झाले की त्या दोर्‍याला कागदाचे कंदील बांधले जातात. त्यात लहान लहान मेणबत्त्या लावून धाग्याबरोबर वर कंदील जातात. आकाशात ठीकठीकाणहून दिव्यांच्या माळा आकाशात झगमगत असतात. कोणे एउत्साही वीर हॉट एअर बलून बनवतात त्यात दिवे ठेवून ते आकाशात उडवले जातात. पतंग उडवून झाल्यावर जमलेली मंडळींचा उत्साह अजुन ओसरलेला नसतो. गच्चीवरच " गरबा " करायची हुक्की येते. रात्री तीन चार वाजता श्रमपरीहार करून मंडळी घरे निघतात. दुसर्‍या दिवशी सुर्य मध्यावर येपर्यन्त गाव निजलेले असते. पण निजण्यापूर्वी मात्र बच्चे कंपनी , तरूण तरुणीनी ,आई वडीलानी आणि आज्जी आजोबानी सुद्धा आपल्या आठवणीत एका आनन्दी दिवसाची नोंद केलेली असते. ( टीपः या लेखातील सर्व छायाचित्रे ही मी स्वतः काढलेली असुन फ्लीकरमार्फत ती येथे मांडलेली आहेत)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19228 वाचन

💬 प्रतिसाद (48)

प्रतिक्रिया

बेस्ट रिपोर्ताज विजुभाऊ. सगळं

यकु
Mon, 01/31/2011 - 13:26 नवीन
बेस्ट रिपोर्ताज विजुभाऊ. सगळं शहर पतंग उडवतानाचे फोटो भारी आलेत. अवांतर: पतंगाच्या मांज्यामुळे जखमी झालेल्या रक्तबंबाळ पक्षांचे होर्डींग सुरतमध्ये पाहिले होते. :(
  • Log in or register to post comments

>>अवांतर: पतंगाच्या

नन्दादीप
Mon, 01/31/2011 - 14:15 नवीन
>>अवांतर: पतंगाच्या मांज्यामुळे जखमी झालेल्या रक्तबंबाळ पक्षांचे होर्डींग सुरतमध्ये पाहिले होते. Sad हेच म्हणतो...एवढया प्रमाणात पतंग उडवल्यावर जखमी पक्ष्यांच काय??? त्यांच्या साठी काही उपाय्योजना असतात की नाही??? मुम्बैत तरी अशा संस्था आहेत. तेथे असतात की नाही???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

जखमी पक्षांवर उपचार करणारी

यकु
Mon, 01/31/2011 - 16:15 नवीन
जखमी पक्षांवर उपचार करणारी मंडळे सुरतमध्ये दिसली होती; त्यांनीच होर्डींग लावली होती. अधिक माहिती विजूभाऊ देऊ शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

जबर्‍या आढावा घेतलाय

परिकथेतील राजकुमार
Mon, 01/31/2011 - 13:32 नवीन
जबर्‍या आढावा घेतलाय इजुभौ. एकदम महोत्सवात उंडारुन आल्यासारखे वाटले. Image removed.
  • Log in or register to post comments

मजा आली

कच्ची कैरी
Mon, 01/31/2011 - 13:35 नवीन
आम्हीही दर वर्षी संक्रांतीला नंदूरबारलाच (महाराष्ट्र-गुजरात सीमेवर)असतो तिथेही संक्रांत खूपच उत्साहाने साजरा करतात सकाळी ६ ते ७ वाजल्यापासुनच सगळे गच्चीवर असतात खूपच मजा येते .यावर्षीही खूप मजा केली ,हात कापले गेले होते मांज्याने
  • Log in or register to post comments

मस्त हो विजुभाऊ हा

गोगोल
Mon, 01/31/2011 - 13:35 नवीन
मस्त हो विजुभाऊ :) गुजराती संस्कृतीचा हा पैलू देखील लै झकास. आमचे विजुभाऊ नुसते गुजराती खाद्य संस्कृतीचेच नाही तर पतंगोत्सवाचे देखील किती छान वर्णन करु शकतात बघा. उगाच ताईत नाहीत ते मिपाच्या गळ्यातले. Only Some Massages Have Happy Endings ...
  • Log in or register to post comments

वा विजुभाऊ वा !@@ गुजरातवरुन

टारझन
Mon, 01/31/2011 - 13:42 नवीन
वा विजुभाऊ वा !@@ गुजरातवरुन येताना मला विविध प्र्कार चे १० पतंग .. आणि ३-५ मांज्यांचे बंडलं विथ आसारी घेऊन या. प्लिज ! - पतंग राव
  • Log in or register to post comments

आसारी बास बास हाच शब्द

llपुण्याचे पेशवेll
Wed, 02/02/2011 - 09:24 नवीन
आसारी बास बास हाच शब्द चक्री, फिरकी च्या ऐवजी आपल्याकडे वापरतात. या वर्षी जयपूरला होतो संक्रांतीला. तिथेही पब्लिक दुर्वा आणल्यासारख्या पतंगांच्या २०-२० च्या ५-६ जुड्या घेऊन येतं. १०-१० आसार्‍या असा सगळा थाट असतो. आपला पतंग उडवण्यापेक्षा दुसर्‍याचा काटण्यातच रस जास्त (सगळे शूरवीर पराक्रमी शक्तीशाली रजपूत इतके वर्ष मुसलमानी अंमलाखाली कसे काय राहीले याचे थोडेसे उत्तर मिळाल्यासारखे वाटले.) असतो. पतंग काटला की काSSSSSSटो करून जोरात ओरडतात. सकाळी १० ते सायं ५ या पिक टाईम मधे शहरात प्रत्येक मिनीटाला १०० तरी पतंग कापले जात असतील. गुल होऊन आलेला पतंग, मांजा लुटायचा आणि त्याला आपला मांजा बांधून तोच परत वर चढवायचा इतकाच उपक्रम हौशीनी करणारे "लुटेरे" देखील असतात. दिवसभर गच्चीतच खाणे पिणे चालते. वालाच्या डाळीची भजी हौशीनी खाल्ली जातात. मिठाया, गज़क(तिळ, गूळ इ. वापरून केलेला तिळगूळाचा आतेभाऊ) अगदी भजी देखील किलोच्या मापात विकत आणतात. हौशी लोक लाऊड स्पीकरवर गाणी लावून गच्चीत पतंगनृत्य करत असतात. (गणपतीतलं नाचणं बघितलेल्या पतंगनृत्य म्हणजे काय ते वेगळं समजवायला नको). आख्खे कांदे, बटाटे व पनीर घातलेली एक तिखट भाजी केली जाते. त्याबरोबर हरभरा, बाजरी अशा मिश्र पीठाचे तूपमाखले रोट रात्री खायचे. थोडक्यात काय मज्जा मज्जा असते. विजुभौंमुळे त्या सुंदर आठवणींना उजाळा मिळाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मस्त वाटलं हो विजुभौ तुमचा हा

गणपा
Mon, 01/31/2011 - 13:48 नवीन
मस्त वाटलं हो विजुभौ तुमचा हा धागा पाहुन. अगदी ५ ते १० पैश्यांन्या पतंग विकत घेतल्याच आठवतय. बचपन के दिन भी क्या दिन थे. :) आवांतर : तिरंग्याचा पतंग दिसायला छान असला तरी आवडला नाही. या पतंगाची अवस्था नंतर काय होते ते आपण सर्व जाणतोच.
  • Log in or register to post comments

बचपन के दिन भी क्या दिन

स्पा
Mon, 01/31/2011 - 14:28 नवीन
बचपन के दिन भी क्या दिन थे. असं बोलू नकोस गणपा.... गवि अजून एक लेख टाकतील ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

खा प्या पतंग उडवा मजा करा

५० फक्त
Mon, 01/31/2011 - 14:12 नवीन
खा प्या पतंग उडवा मजा करा विजुभाउ आणि आम्हाला वाटु द्या वाईट आम्ही तिथं का नाही याचे. असो, दिवे लावलेल्या पतंगाचा एखादा फोटो टाका ना इथे. हर्षद.
  • Log in or register to post comments

झकास फोटू विजू भाव तेवढे

स्पा
Mon, 01/31/2011 - 14:27 नवीन
झकास फोटू विजू भाव तेवढे गांधींच्या आश्रमाचे फोटो टाकता आले तर बघा
  • Log in or register to post comments

चोक्कस बीजूभाई....!!!

प्यारे१
Mon, 01/31/2011 - 14:44 नवीन
चोक्कस बीजूभाई....!!!
  • Log in or register to post comments

छान आनि सुन्दर चित्रे मस्त

मुलूखावेगळी
Mon, 01/31/2011 - 14:57 नवीन
छान आनि सुन्दर चित्रे मस्त विजुभाउ येनकेन प्रकारे मेजवानि देता तुम्ही - फक्त उड्ता पतन्ग आवडणारी
  • Log in or register to post comments

क्लास वन !.

नरेशकुमार
Mon, 01/31/2011 - 15:03 नवीन
क्लास वन !.
  • Log in or register to post comments

छान

नंदन
Mon, 01/31/2011 - 15:06 नवीन
फोटू आणि या सणाचं, उत्साहाचं वर्णन - बन्नेव बो सरस :)
  • Log in or register to post comments

काSSSSSSयपो छे....

डावखुरा
Mon, 01/31/2011 - 15:21 नवीन
खुन्नस देउन पतंग काट्ल्यागत वाटतंय लेख वाचुन... एकदम दिल्खुलास आणि मस्त वृत्तांत... काSSSSSSयपो छे....
  • Log in or register to post comments

खुप छान अमोल

अमोल केळकर
Mon, 01/31/2011 - 16:33 नवीन
खुप छान अमोल
  • Log in or register to post comments

पतंगसाहेब

रामदास
Mon, 01/31/2011 - 16:46 नवीन
लंपनच्या फाटकसाहेबाची आठवण झाली. वा विजूभाऊ ,सुंदर लेख . उत्तरोत्तर तुमची कंपनी तुम्हाला अशीच ठिकठिकाणी पाठवू देत आणि आम्हाला असेच छान लेख वाचायला मिळू देत अशी जगन्नियत्याच्या चरणी प्रार्थना. तुम्ही मिपाचे राघोभरारी. ही प्रतिक्रीया माझी स्वतःची असल्याचे सत्यकथन मी करीत आहे.
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Mon, 01/31/2011 - 17:19 नवीन
मस्त माहितीपर लेख...मस्तच!!
  • Log in or register to post comments

फोटो न दिसल्याने निराशा झाली

गणेशा
Mon, 01/31/2011 - 18:48 नवीन
फोटो न दिसल्याने निराशा झाली
  • Log in or register to post comments

उत्तम सांस्कृतिक शब्दचित्र.

शुचि
Mon, 01/31/2011 - 19:24 नवीन
उत्तम सांस्कृतिक शब्दचित्र.
  • Log in or register to post comments

सही! माझा एक चुलत भाऊ

मराठे
Mon, 01/31/2011 - 19:28 नवीन
सही! माझा एक चुलत भाऊ गिरगावात राहायचा. तिथे लहानपणी मकर संक्रांतीच्या निमित्ताने एकदाच जाणं झालेलं पण ती मजा अजून आठवतेय... इथे तर त्याच्या तिप्पट जल्लोश आहे! शेअर केल्याबद्धल धन्यवाद विजूभाऊ!
  • Log in or register to post comments

मस्त लेख आणि फोटो.

यशोधरा
Mon, 01/31/2011 - 20:06 नवीन
मस्त लेख आणि फोटो.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो ..छान फोटो आणि

अभिज्ञ
Tue, 02/01/2011 - 09:23 नवीन
असेच म्हणतो ..छान फोटो आणि छानच लेख. :) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

छान फोटो आणि लेख !

स्वाती२
Mon, 01/31/2011 - 20:15 नवीन
छान फोटो आणि लेख !
  • Log in or register to post comments

+१

आमोद शिंदे
Mon, 01/31/2011 - 20:43 नवीन
असेच म्हणतो ..छान फोटो आणि लेख !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

धागा सरस छे ! कंदीलवाला पतंग

शाहरुख
Mon, 01/31/2011 - 20:45 नवीन
धागा सरस छे ! कंदीलवाला पतंग काय भानगड असते नक्की ? कधी बघितला नाहीय !
  • Log in or register to post comments

झक्कास!

धमाल मुलगा
Mon, 01/31/2011 - 20:58 नवीन
विजुभाऊ ब्याक इन अ‍ॅक्शन पाहून छान वाटलं. :) पण सालं मांजा विकत घ्यायचा? ह्यॅ:!!! सोत्ताच्या हातानं सोडावाटरच्या बाटल्या कुटुन, त्याची काच लावलेला मांजा तयार करुन पतंग उडवण्यात खरी मजा . :)
  • Log in or register to post comments

पण सालं मांजा विकत घ्यायचा?

निखिल देशपांडे
Mon, 01/31/2011 - 21:12 नवीन
पण सालं मांजा विकत घ्यायचा? ह्यॅ:!!! सोत्ताच्या हातानं सोडावाटरच्या बाटल्या कुटुन, त्याची काच लावलेला मांजा तयार करुन पतंग उडवण्यात खरी मजा . Smile
येस्स्स!!! कोरफड का काय त्याचा रस पण वापरायचो. श्री धमाल मुलगा यांनी माजाची पाकृ टाकावी हि विनंती. अवांतरः विजुभाउ छान लेख हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

छान

धनंजय
Tue, 02/01/2011 - 01:55 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

आणखी गुजरात-परिचय येऊ दे.

सुधीर काळे
Tue, 02/01/2011 - 02:59 नवीन
विजुभाऊ, लेख आणि छायाचित्रे आवडली. मस्त! 'मुकुंद' कंपनीत काम करताना संक्रांतीच्या दिवशी आमचे बरेच गुज्जूभाई सहकारी या कारणास्तव अदृश्य व्हायचे व इतरांना (जास्त काम पडल्याने) त्यांची 'आर्ततेने' आठवण व्हायची! आणखी गुजरात-परिचय येऊ दे.
  • Log in or register to post comments

मस्त...

शिल्पा ब
Tue, 02/01/2011 - 03:34 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments

छान.

Nile
Tue, 02/01/2011 - 07:29 नवीन
पतंगावर मागे एकदा सविस्तर दिलेला प्रतिसाद इथे आहे.
  • Log in or register to post comments

एकदम झकास पतंगवर्णन विजूभौ!

पाषाणभेद
Tue, 02/01/2011 - 09:42 नवीन
एकदम झकास पतंगवर्णन विजूभौ!
  • Log in or register to post comments

व्वो क्काट...

चिगो
Tue, 02/01/2011 - 14:47 नवीन
ही आमची लहानपणीची पतंग उडवतांनाची आरोळी... :-) जबर्‍या वर्णन विजुभाऊ..
  • Log in or register to post comments

मस्त लेख इजुभाऊ... फोटो बी

मदनबाण
Tue, 02/01/2011 - 19:07 नवीन
मस्त लेख इजुभाऊ... :) फोटो बी लयं भारी !!! :)
  • Log in or register to post comments

सुंदर वर्णन आणि फोटो.

प्राजु
Tue, 02/01/2011 - 22:32 नवीन
सुंदर वर्णन आणि फोटो.
  • Log in or register to post comments

लै भारी हं विजुभौ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/02/2011 - 09:35 नवीन
फोटो अन् वृत्तांत लंबर एक. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

झकास !

विटेकर
Mon, 01/20/2014 - 18:01 नवीन
क्या मस्त काटा स्वारी क्या मस्त टंका है ! विजुभौ मजा आली वाचून ! फारच चित्रदर्शी !
  • Log in or register to post comments

मस्त!

मुक्त विहारि
Mon, 01/20/2014 - 18:07 नवीन
लेख आणि छायाचित्रे आवडली.
  • Log in or register to post comments

गुजरातमधल्या संक्रांतीची

विजुभाऊ
Wed, 01/13/2016 - 16:54 नवीन
गुजरातमधल्या संक्रांतीची पुन्हा एकदा आठवण आली
  • Log in or register to post comments

दहा वर्षा पूर्वी याच दिवशी

विजुभाऊ
Fri, 01/14/2022 - 20:42 नवीन
दहा वर्षा पूर्वी याच दिवशी याच शहरात होतो.
  • Log in or register to post comments

सध्या उज्जैनमध्ये आहे तिथेही

कानडाऊ योगेशु
Sat, 01/15/2022 - 12:09 नवीन
सध्या उज्जैनमध्ये आहे तिथेही काल जाम माहोल होता. मी स्वतः जवळपास १० पतंग उडवले. १० च्या १० ही काटले गेले आणि तेवढेच मिळाले. ;) करोना काळात तेवढाच विरंगुळा असल्यामुळे व घराच्या गच्चीवरुन ह्या सार्वजनिक खेळात भाग घेता येत असल्यामुळे असेल ह्यावेळी एकुण धिंगाणा वगैरे अमळ जास्तच वाटला.
  • Log in or register to post comments

व्वा, झकास रिपोर्ताज, विजूभाऊ

चौथा कोनाडा
Sat, 01/15/2022 - 12:55 नवीन
व्वा, झकास रिपोर्ताज, विजूभाऊ ! कोणताही प्रचि गायब झाले नाही याचे कौतुक वाटले. फ्लिकर बरंच विश्वासार्ह दिसतंय ! दोन वर्षांपुर्वी पतंगोत्सव आणी उत्तरायचा अनुभव अमदावादेत ( हे स्थानिक नाव, उदा. बेटावद, कलावद, कसरावद ई. सारखे. यातील वद हा प्रत्यय वाडी... वाड ... वाड ... वद असा तयार झाला असावा. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा) भरपूर अनुभवला. एक आठवडा मुक्काम होता ! सगळी जनता गच्चीत आणि रस्ते सुमसान म्हणजे काय याचा याचीदेही याचीडोळा अनुभव घेतला ! रिव्हरफ्रण्ट तीरावरच्या मोठ्या मैदानात कारपेट टाकून पर्यटकांना पतंगबाजीची सोय केली होती, तेथेही धमाल करता आली !
  • Log in or register to post comments

त्याचेही रिपोर्ताज केलेले आहे

विजुभाऊ
Sun, 01/16/2022 - 12:02 नवीन
त्याचेही रिपोर्ताज केलेले आहे. शोधून वर आणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

सुदंर

कर्नलतपस्वी
Sun, 01/16/2022 - 11:39 नवीन
प्रत्येक ठिकाणी आसे काहितरी वेगळे आसते त्याने तेथील आठवणी कायम मनात रेगांळत रहातात, धन्यवाद, तीळगुळ घ्या आणि गोड गोड लिहा आपलं बोला
  • Log in or register to post comments

झकास

कंजूस
Sun, 01/16/2022 - 17:21 नवीन
आवडला लेख आणि फोटो।
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा