हळदीघाटातील रण संग्राम ई-पुस्तक विमोचन

योगविवेक's picture
योगविवेक in जनातलं, मनातलं
16 Jun 2021 - 11:13 pm

बर्‍याच काळानंतर घागा लिहित आहे.
त्याला कारण ही मजबूत आहे.

विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेले "हळदी घाटातील युद्ध" ई-बुकच्या माध्यमातून प्रकाशित होत आहे.
इंग्रजी पुस्तकाचे लोकार्पण ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या हस्ते दि १८ जून (कारण याच तारखेला ते युद्ध घडले होते) रोजी सकाळी ११ वाजता होईल. हिंदी मधील ईपुस्तक लेफ्टनंट जनरल दुष्यंत सिंह यांच्या हस्ते १८ जून रोजी सायंकाळी ६.३० ला होणार आहे. तर मराठीतील पुस्तकाचे लोकार्पण मा. पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते १८ जून रोजी रात्री ९ वाजता होणार आहे.
या सर्वांची झूम मीटची लिंक लवकरच इथे द्यावी अशी ओक सरांना मी विनंती करतो.
या सर्व भाषेतील पुस्तकाचे सवलतीचे मूल्य ₹५० (मूळ किंमत ₹ १००) आहे.
सरांनी मला हे पुस्तक अभिप्रायार्थ पाठवले आहे. त्यांच्या परवानगीने त्यातील काही स्लाईड्स सादर करत आहे. एकूण ३५ स्लाईड्समधून मुगल सैन्याची जमवाजमव होऊन ते मोलेला नावाच्या टेकडीपाशी येऊन थडकले आहे. मेवाडकर सैन्याला समरात खेचायला ते सिद्ध झाले आहेत इथपर्यंत कथाभाग आहे.

मराठी १
1

2

4


5
हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर विकत मिळेल. ज्यांना या तीन पैकी एका प्रकाशनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायला आवडेल त्यांनी ओक सरांशी संपर्क साधावा.

मांडणीइतिहासप्रतिसादआस्वादमाध्यमवेध

प्रतिक्रिया

कंजूस's picture

17 Jun 2021 - 4:41 am | कंजूस

शशिकांंत सर नवनवीन उपक्रम राबवत असतात. संशोधन करतात आणि फोटो, लेखन करतात. केवळ अनुवाद न करता स्वत: पाठपुरावा करून लेखन करणे चांगली गोष्ट आहे.

मोगलांना त्यांच्या अफाट सैन्याला छोट्याशा सैन्यबळावर मैदानात विरोध करणे सोपे काम नव्हते. कित्येक राजस्थानी राज्यांना मोगलांचे मांडलिक व्हावे लागले. त्यांनाच मेवाडविरुद्ध लढण्यासाठी पाठवून जय मिळवला. हीच हळदीघाटी लढाई. तरीही मेवाड संस्थानने मोगलांची शक्ती कमी करण्याचे मोठे काम केले.

झुमची लिंक अवश्य शेअर करावी...

त्यांची सिध्द हस्त लेखणी सतत चालु राहुदे हीच या मंगल प्रसंगी इश्वर चरणी भावना...

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Jun 2021 - 2:27 pm | ज्ञानोबाचे पैजार

ओक सरांना हार्दिक शुभेच्छा
पैजारबुवा,

कुमार१'s picture

17 Jun 2021 - 8:52 pm | कुमार१

हार्दिक शुभेच्छा !

धन्यवाद विवेक चौधरी,
१० मिनिटे आधी साईट उघडेल.
हळदी घाटातील युद्ध - मराठीतील ई- पुस्तकाचे मा. पांडुरंगजी बलकवडे यांच्या हस्ते लोकार्पण
Friday, 18 June⋅20:45 – 21:45
Location:
https://us04web.zoom.us/j/77801361489?pwd=UkRmSiszOUtQOVFuRnpPeGZlUlVLZz09
Description:Shashikant Oak is inviting you to a scheduled Zoom meeting.

Join Zoom Meeting
https://us04web.zoom.us/j/77801361489?pwd=UkRmSiszOUtQOVFuRnpPeGZlUlVLZz09

Meeting ID: 778 0136 1489
Passcode: y63zqe

चार दिवसापूर्वीच तिथीप्रमाणे जेष्ठ शुद्ध ३ रोजी महाराणा प्रताप यांची जयंती होती आणि त्यानंतर लगेचच आपला लेख आला. त्या निमित्ताने माझ्या आठवणीतील दोन वर्षांपूर्वीच्या सहलीतील फोटो.

१. महाराणा प्रताप स्मारक, उदयपूर .
उंच टेकडीवरील (पर्ल हिल) हे भव्य स्मारक असून येथून फतेह सागर तलावाचे मनोहर दर्शन होते. येथे एक संग्रहालयही आहे.

२. हळदी घाट संग्रहालय येथे युद्धातील एक प्रसंग.
मुघलांकडे हत्तीची संख्या जास्त होती. हत्तींना भ्रमित करण्यासाठी घोड्याला सोंड असलेला मुखवटा घालून महाराणा प्रताप हे राजा मानसिंगवर हल्ला करतांना .

शशिकांत ओक's picture

18 Jun 2021 - 12:53 pm | शशिकांत ओक

गोरगावलेकर जी,
आपण सादर केलेले फोटो सुंदर आहेत. या पुढील भागात प्रत्यक्ष संग्रामाचे चित्रण आहे.

मदनबाण's picture

18 Jun 2021 - 6:37 pm | मदनबाण

ओक सरांचे अभिनंदर आणि खुप सार्‍या शुभेच्छा ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी “Whenever we want to combat our enemies, first and foremost we must start by understanding them rather than exaggerating their motives.” :- Criss Jami

मदनबाण's picture

18 Jun 2021 - 6:38 pm | मदनबाण

वरती अभिनंदर च्या जागी अभिनंदन असे वाचावे. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी “Whenever we want to combat our enemies, first and foremost we must start by understanding them rather than exaggerating their motives.” :- Criss Jami

शशिकांत ओक's picture

5 Jul 2021 - 12:38 am | शशिकांत ओक

विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेले "हळदी घाटातील युद्ध" भाग १ ई-बुकच्या माध्यमातून प्रकाशित झाले आहे. ३४ स्लाईड्स मधून त्यांनी मेवाड आणि मुगल सेनेचे धोरण, सैन्य वाहतूक मार्ग, यातून युद्धाची पार्श्वभूमी दाखवत आपल्याला युद्धभूमीपाशी आणून सोडले आहे.
मला सरांच्या अन्य उपलब्ध पुस्तकांची यादी सादर करायची संधी मिळत आहे. माफक किंमत हे आणखी एक वैशिष्ठ्य लक्षात येते.
मिसळपाव या त्यांच्या आवडत्या मंचावर त्यांचे लेख आधीपासून येत असतात. दुर्गविहारींनी विनंती केल्याप्रमाणे ईपुस्तकांच्या माध्यमातून मिपाकरांना माहितीसाठी इथे लिंक सादर करत आहे. ज्यांना पेमेंट लिंक हवी असेल त्यानी सरांशी संपर्क करावा. व्यवस्थानकांनी परवानगी दिली तर इथे ही ती लिंक मला सादर करायला आवडेल.
https://alkaoaksebookshoppy.online/

शशिकांत ओक's picture

5 Jul 2021 - 12:49 am | शशिकांत ओक

विवेक यांनी वरील धाग्यातील लिंक जोडून मला सादर करायला विनंती केली म्हणून मी ती सादर केली आहे.