२६ मे २०२१ पासून लागू झालेल्या (मिपासारख्या समाज माध्यम संस्थळांनाही) नियमावलीतील खालील अंशाच्या मराठी अनुवादात साहाय्य हवे आहे.
Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021
PART I Definitions.—(1)
(w) ̳social media intermediary‘ means an intermediary which primarily or solely enables online interaction between two or more users and allows them to create, upload, share, disseminate, modify or access information using its services;
(x) ̳ user‘ means any person who accesses or avails any computer resource of an intermediary or a publisher for the purpose of hosting, publishing, sharing, transacting, viewing, displaying, downloading or uploading information and includes other persons jointly participating in using such computer resource and addressee and originator;
(y) ̳user account‘ means the account registration of a user with an intermediary or publisher and includes profiles, accounts, pages, handles and other similar presences by means of whicha user is able to access the services offered by the intermediary or publisher.
3 PART II . (1) (b)
(i) belongs to another person and to which the user does not have any right;
(ii) is defamatory, obscene, pornographic, paedophilic, invasive of another‘s privacy, including bodily privacy, insulting or harassing on the basis of gender, libellous, racially or ethnically objectionable, relating or encouraging money laundering or gambling, or otherwise inconsistent with or contrary to the laws in force;
(iii) is harmful to child;
(iv) infringes any patent, trademark, copyright or other proprietary rights;
(v) violates any law for the time being in force;
(vi) deceives or misleads the addressee about the origin of the message or knowingly and intentionally communicates any information which is patently false or misleading in nature but may reasonably be perceived as a fact;
(vii) impersonates another person;
(viii) threatens the unity, integrity, defence, security or sovereignty of India, friendly relations with foreign States, or public order, or causes incitement to the commission of any cognisable offence or prevents investigation of any offence or is insulting other nation;
(ix) contains software virus or any other computer code, file or program designed to interrupt, destroy or limit the functionality of any computer resource;
(x) is patently false and untrue, and is written or published in any form, with the intent to mislead or harass a person, entity or agency for financial gain or to cause any injury to any person;
3 PART II . (२) (b) The intermediary shall, within twenty-four hours from the receipt of a complaint made by an individual or any person on his behalf under this sub-rule, in relation to any content which is prima facie in the nature of any material which exposes the private area of such individual, shows such individual in full or partial nudity or shows or depicts such individual in any sexual act or conduct, or is in the nature of impersonation in an electronic form, including artificially morphed images of such individual, take all reasonable and practicable measures to remove or disable access to such content which is hosted, stored, published or transmitted by it
उपरोक्त नमुद नवीन नियमावली अनुसार, समाज माध्यम संस्थळांनी व्यक्तिंच्या खासगीपणाचा भंग करणारा मजकुर लौकरात लवकर वगळला जाण्याची व्यव्स्था करणे. तसेच गार्हाणे (तक्रार) अधिकार्याची नेमणूक करुन २४ तासात गार्हाण्याची पोच देणे आणि १५ दिवसात निपटारा करणे अभिप्रेत आहे असे दिसते. (मिपा धोरण धाग्यावरील अधिक चर्चा दुवा)
उपरोक्त नमुद नियमावली अंशाच्या मराठी अनुवादात साहाय्य हवे आहे.
* नवीन समाजमाध्यम वावर नियमावली मोठ्या समाजमाध्यमात वावरतानाही लागू होते हे लक्षात घ्या अर्थात हा धागा मुख्यत्वे मिपासारख्या लहान समाजमाध्यम संस्थळांच्या दृष्टीने काढला आहे.
* हा धागा अतीमोठ्या समाजमाध्यमांबद्दल नाही कायदेशीर दृष्ट्या मिपासारख्या लहान प्लॅटफॉर्मला लागू न होणारी, अनुषंगिक नसल्यास त्यांची चर्चा या धाग्यात टाळावी. तसे करण्यासाठी अनेक आभार.
* अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतर चर्चा, व्यक्तिगत टिका टाळण्यासाठी अनेक आभार.
प्रतिक्रिया
27 May 2021 - 9:14 am | माहितगार
या धागालेखाच्या प्रतिसादातून उपलब्ध केलेले अनुवाद प्रताधिकार मुक्त समजले जातील.
27 May 2021 - 10:31 am | गॉडजिला
उत्तर हो असेल तर आपला पास, मिपाचे माननीय व जबाबदार साहित्य संपादक हे सर्व हाताळायला त्यांचे ते समर्थ होते आणी आहेत त्यांना सदस्यांकडून या विषयासंबंधी कसल्याही स्पष्टीकरणाची गरज न्हवती आणि नाही असा माझा ठाम विश्वास आहे.
27 May 2021 - 11:23 am | माहितगार
* उपरोक्त नविन नियमावलीत नमुद मर्यादा सर्वसामान्यांना लागू होणार आहेत आणि समाज माध्यमांना स्पष्टीकरण मागण्याचा अधिकारही सर्वसामान्यांना देणार आहेत. लागू समाज माध्यमांना होत असली तरी सर्वसमान्य व्यक्तींना सुयोग्य प्रमाणात अंकुश ठेवण्यास जागा निर्माण होते त्यामुळे सकारात्मकपणे पहाणे श्रेयस्कर असावे.
* नियमावली केवळ मिपा नव्हे सर्वच समाज माध्यमांना लागू होत असल्यामुळे महत्वाची सर्वसामान्यांच्या माहितीसाठी महत्वाची आहे, आणि इतरांनाही मिपाबाह्य परिस्थितीत सहज वापरली जावी म्हणूनच उपलब्ध केले जाणारे अनुवाद कॉपीराईट फ्री प्रताधिकारमुक्त राहील असे नमुद केले आहे.
* मी मिपाचा सर्वसामान्य सदस्य आहे मिपा प्रशासनाचा प्रतिनिधी नव्हे मी इतर सर्वांप्रमाणे अधून मधून मिपा निती इत्यादीवर सभ्य पण कठोर टिकाही करतो, सर्वसामान्यांना साहाय्यभूत कायदे विषयक बाबींवर लेखन ते अनुवाद (मिपाशी संबंध असो नसो) मी नेहमीच पुढाकार घेतला आहे हा ही त्याचाच भाग आहे.
27 May 2021 - 1:10 pm | गॉडजिला
आपण मिपाचेच सर्वसामान्य सदस्य आहात मिपा प्रशासनाचा प्रतिनिधी नव्हे हे मान्य आहे...
... तरीही मिपा व्यवस्थापन आपण धाग्यात दिलेल्या नियमावलीचा जो अर्थ स्पष्ट करण्यास सक्षम आहे त्याचेच मिपावर पालन करायचे कि त्या प्रत्यक्ष नियमावलीचे पालन करत मिपावर राहायचे कि मिपाने ती नियमावली मिपासाठी सुधारित केल्यावर त्याचे पालन करत मिपावर नांदायचे याबाबत अत्यन्त कन्फ्युज झालो असल्याने मिपा साहित्य मंडळानेच यावर प्रकाश टाकणे योग्य असे माझे मन झाले आहे.
कारण एकदा मिपाने माझ्या कन्फ्युजन मधे क्लेरीटी दिली कि त्याआधारे यापूर्वी मिपावर प्रसिद्ध असलेला व मी ही वाचलेला कोण कोणता मजकूर उडवावा लागेल यावर मि खनबीरपणे मार्गदर्शन करू शकतो असे मला सकृत दर्शनी इंग्रजीतील नियमावली वाचून खात्रीने वाटत आहे...
27 May 2021 - 2:31 pm | माहितगार
नविन नियमावली धोरणात जोडण्यासाठी सुविधादात्यांना आपण विनंती/आग्रह करु शकता. भारतीय राज्यघटना ती नुसार पारीत कायदे आणि नियमावली सुप्रीम कोर्टाचे निकाल लक्षात घेऊन यांची प्रधानता बंधनकारक असणे अभिप्रेतच असते. त्या नंतर तुमचे सुविधादाते जसे मिसळपाव यांनी जारी केलेली नियमावलीतून अधिकचे काही जोडले असेल (आणि भारतीय कायद्यास अनुसरुन असेल) ते ते सर्व लागू होणे अभिप्रेत असावे. नविन नियमावली उपरोक्त नियमांचा माध्यम सेवादात्यांच्या नियमावलीत समावेश करण्याचा आदेश देते. पण जरी काही सेवासुविधा दात्यांनी हयगय केली तरी भारतीय राज्यघटना ती नुसार पारीत कायदे आणि नियमावली व कोर्टाचे निकाल लागू रहातातच यात कन्फ्युजन खुपसा वाव आणि कारण दिसत नाही, म्हणून आपले कन्फ्युजन समजले नाही.
27 May 2021 - 3:56 pm | गॉडजिला
मी मिपावर कोणत्या गोष्टी ठेवल्या नाही पाहीजेत यावर खनबीरपणे मार्गदर्शन करायला सक्षम आहे याची मला खात्री पटली आहे.
27 May 2021 - 5:53 pm | माहितगार
एकुणच अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयाचा आवाका आणि बारकाव्यांची संख्या मोठी आहे. सर्वांनाच अगदी चांगले इंग्रजी समजणार्यांनाही ईंग्रजीभाषेतील कायदा आणि नियमावलीत वापलेल्या भाषेचे सर्व बारकावे आणि काँटेक्स्ट ठाऊक असतातच असे नाही. त्यामुळे आधी अनुवादास प्राधान्य, मग स्वतः नियमावलीचे पालन करणे आणि मग इतरांनी पालनाचा आग्रह हा अधिक श्रेयस्कर मार्ग असावा असे माझे व्यक्तिगत मत आहे. अनेक आभार
27 May 2021 - 12:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शकतत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिशास्त्र कोड) नियम 2021
भाग I व्याख्या .— (1)
(डब्ल्यू) ̳ सोशल मीडिया इंटरमीडियरी ’म्हणजे एक मध्यस्थ जो प्रामुख्याने किंवा पूर्णपणे दोन किंवा अधिक वापरकर्त्यांमधील ऑनलाइन संवाद सक्षम करतो आणि त्यास सेवा वापरुन माहिती तयार, अपलोड, सामायिकरण, प्रसारित, सुधारित किंवा प्रवेश करण्याची परवानगी देतो;
(एक्स) ̳ वापरकर्त्याचा अर्थ असा आहे की कोणतीही व्यक्ती जो माहिती, होस्टिंग, प्रकाशन, सामायिकरण, व्यवहार, पहाणे, प्रदर्शित करणे, डाउनलोड करणे किंवा अपलोड करणे या उद्देशाने मध्यस्थ किंवा प्रकाशकाच्या कोणत्याही संगणकाच्या संसाधनावर प्रवेश मिळविते किंवा त्याचा उपयोग करीत असेल आणि ज्यात वापरण्यात सहभागी असलेल्या इतर लोकांचा समावेश असेल अशा संगणक स्त्रोत आणि पत्ता आणि प्रवर्तक;
(वाय.) 'खाते खाते' म्हणजे मध्यस्थ किंवा प्रकाशकाच्या वापरकर्त्याची खाते नोंदणी आणि त्यात प्रोफाइल, खाती, पृष्ठे, हँडल आणि इतर तत्सम समावेश ज्याचा उपयोग मध्यस्थ किंवा प्रकाशकाद्वारे ऑफर केलेल्या सेवांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम आहे.
3 भाग II. (१) (बी)
(i) दुसर्या व्यक्तीचे आहे आणि ज्याचा वापरकर्त्यास कोणताही हक्क नाही;
(ii) बदनामीकारक, अश्लिल, अश्लील, अर्धांगवायू, शारीरिक गोपनीयतेसह, दुसर्याच्या गोपनीयतेस आक्रमक आहे, लिंगाच्या आधारावर अपमान किंवा छळ करणे, निंदनीय, वांशिक किंवा वांशिकदृष्ट्या आक्षेपार्ह, पैशाच्या लँडिंग किंवा जुगाराशी संबंधित किंवा प्रोत्साहित करणे किंवा अन्यथा विसंगत अंमलात असलेल्या कायद्यांसह किंवा त्याविरूद्ध;
(iii) मुलासाठी हानिकारक आहे;
(iv) कोणत्याही पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट किंवा इतर मालकी हक्कांचे उल्लंघन करते;
(v) सध्या अस्तित्त्वात असलेल्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन;
(vi) संदेशाच्या उत्पत्तीबद्दल पत्ता किंवा दिशाभूल करतो किंवा मुद्दाम खोटी किंवा दिशाभूल करणारी कोणतीही माहिती जाणूनबुजून आणि हेतुपुरस्सर संप्रेषित करते परंतु कदाचित त्यास तथ्य म्हणून समजले जाऊ शकते;
(vii) दुसर्या व्यक्तीची तोतयागिरी करते;
(viii) भारताची ऐक्य, अखंडता, संरक्षण, सुरक्षा किंवा सार्वभौमत्व, परदेशी राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेस धोका आहे किंवा कोणत्याही संज्ञेय गुन्ह्यासंबंधी चिथावणी दिली जाते किंवा कोणत्याही गुन्ह्याचा तपास रोखू शकतो किंवा इतर देशाचा अपमान करतो आहे;
(ix) मध्ये सॉफ्टवेअर व्हायरस किंवा इतर कोणत्याही संगणक कोड, कोणत्याही संगणकाच्या संसाधनाची कार्यक्षमता व्यत्यय आणणे, नष्ट करणे किंवा मर्यादित करण्यासाठी डिझाइन केलेली फाईल किंवा प्रोग्राम आहे;
(एक्स) हे स्पष्टपणे खोटे आणि चुकीचे आहे आणि एखाद्या व्यक्तीला, संस्थेला किंवा एजन्सीला आर्थिक फायद्यासाठी किंवा कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचवण्यासाठी चुकीच्या मार्गाने किंवा छळविण्याच्या उद्देशाने हे कोणत्याही स्वरूपात लिहिले किंवा प्रकाशित केले गेले आहे;
3 भाग II. (२) (बी) या उपनियमांतर्गत एखाद्या व्यक्तीने किंवा त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्तीने केलेल्या तक्रारीच्या प्राप्तीनंतर मध्यस्थाने, चोवीस तासांच्या आत, अशा सामग्रीच्या संबंधात जे या स्वरूपाचे प्राथमिक स्वरूप आहे अशी सामग्री जी अशा व्यक्तीचे खाजगी क्षेत्र उघड करते, अशा व्यक्तीस पूर्ण किंवा आंशिक नग्नतेने दर्शवते किंवा अशा व्यक्तीस कोणत्याही लैंगिक कृतीत किंवा आचरणामध्ये दाखवते किंवा चित्रण करते किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात तोतयागिरीच्या स्वरुपात आहे अशा कृत्रिमरित्या मोर्फेड प्रतिमांसह वैयक्तिकरित्या, त्याद्वारे होस्ट केलेले, संग्रहित, प्रकाशित केलेले किंवा प्रसारित केलेल्या अशा सामग्रीमध्ये प्रवेश काढून टाकण्यासाठी किंवा अक्षम करण्यासाठी सर्व वाजवी आणि व्यवहार्य उपाय करणे.
टीप : गूगल ट्रांसलेट या एप्लीकेशनमधे भाषांतर करुन इथे टाकलेय. थोड़ा वेळ मिळाला की काही शब्द बदलून वाक्य रचना आणि अर्थ लागेल असे बदल करीन. किंवा कोणीही केले तरी चालेल.
-दिलीप बिरुटे
27 May 2021 - 2:42 pm | माहितगार
धन्यवाद,
कायदाविषयास अनुरुप अधिक सुयोग्य पारिभाषिक शब्द व वाक्यरचना उपलब्ध होण्यासाठी दोन तीन संस्करणातून अद्ययावत करावे लागेल. आपण दिलेले मशिन ट्रान्सलेशन मी गुगल डॉक मध्ये सेव्ह केले आहे. सावकाशीने वेळ देईन.
* उद्या कुणि तुमच्या लेखनामुळे आमची दिशाभूल झाली असे म्हणावयास नको आणि माहितीची खात्री करून घेण्याची जबाबदारी माहितीच्या वापरकर्त्याची असते याचे स्मरण देण्यासाठी उत्तरदायीत्वास नकार नमुद केलेला बरा पडतो.
अनेक आभार
27 May 2021 - 2:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>कायदाविषयास अनुरुप अधिक सुयोग्य पारिभाषिक शब्द व वाक्यरचना उपलब्ध होण्यासाठी दोन तीन संस्करणातून अद्ययावत करावे लागेल.
हम्म. ओके. व्यस्थित आणि सुटसुटीत अर्थ लावण्यासाठी एक प्रयत्न करुन पाहीनच.
>>उद्या कुणि तुमच्या लेखनामुळे आमची दिशाभूल झाली असे म्हणावयास नको आणि माहितीची खात्री करून घेण्याची जबाबदारी माहितीच्या वापरकर्त्याची असते याचे स्मरण देण्यासाठी उत्तरदायीत्वास नकार नमुद केलेला बरा पडतो.
हे कायम उपयोगी पडणारे आहे. आभार.
-दिलीप बिरुटे
27 May 2021 - 5:58 pm | माहितगार
हो त्यात साहाय्य हवेच आहे कारण माझी स्वतःची भाषा बर्याच जणांना बर्याच वेळा अवजड का बोजड वाटते. पण सुलभीकरण करताना एखाद्या शब्दात कायदेविषयक बारकावे असतील तर ते सुटावयास नको म्हणून अनुवाद एखाद दोन संस्करणातून गेलेला बरा पडेल असे वाटते. अनेक आभार
27 May 2021 - 12:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझं पण 'उत्तरदायित्वास नकार लागू' ( माहीतगारसेठ) हेही प्रकरण सविस्तर समजून सांगा.
च्यायला, उगाच काही लचांड नको.
-दिलीप बिरुटे
(सावध)
27 May 2021 - 1:37 pm | गॉडजिला
खरं असेल तर पृथ्वीवरील एका देशातील एका सत्ताधारी राजकीय पक्षाची आयटी सेल बंद तर करावी लागणार नाही ना ?
27 May 2021 - 2:49 pm | माहितगार
कायद्याच्या अभ्यासकांना सल्लागारपदांच्या संधीचे नवे क्षेत्र खुले होताना दिसते आहे.