सांगली कट्टे,

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
6 Apr 2021 - 6:33 am

"मित्र ", हा माझा विक पाॅइंट आणि त्यातही ते "मिपाकर" असतील तर, फारच उत्तम, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे...

त्यामुळे कधीही नविन गावात जायचे असेल तर, कुणी मिपाकर त्या गावांत आहेत का? अशी हाकाटी पिटवतो. जगांत असे एकही ठिकाण नाही की, ज्याच्या आसपास मिपाकर रहात नाहीत.

मुलगा 21 वर्षांचा झाला (2016-17) आणि त्याची एकूण शैक्षणिक प्रगती बघून, त्याला योग्य अशी मुलगी शोधायला सुरूवात केली. एप्रील 2020 मध्ये एका मुलीने आमच्या मुलाला पसंत केले. 9-10 महिने, त्या दोघांनी एकमेकांना जाणून घेतले आणि पुढील बोलणी करायला, मी आणि आमची सौ. सांगलीला निघायचे नक्की केले.

नेहमी प्रमाणे, सांगली येथे राहणारे कुणी मिपाकर आहेत का? (https://misalpav.com/node/48375) अशी हाक मारली आणि दोन जणांनी, कट्टा करायला बोलावले...

विनोद बेडगे, हे सांगली पासून जवळच रहात असल्याने आणि सुयश तात्या, त्याच सुमारास भारता बाहेर असल्याने, विनोदला लगेच भेटायचे ठरवले...
---------
विनोद बेडगे, यांच्या बरोबरचा शेतकट्टा, दिनांक 24-02-2021

आमची सौ, आमच्या कट्टे प्रेमाला आधी विरोध करत होती. पण जसे-जसे ती पण कट्ट्याला हजेरी लावायला लागली, तसा-तसा तिचा विरोध मावळायला लागला.

मिपाकर आणि त्यातही शेतकरी असल्याने, मी कट्टा करायला जास्त उत्सुक होतो.

ठरल्या प्रमाणे, विनोदची भेट झाली आणि त्याच्या घरी चहा पिऊन, मी, आमची सौ., सूनबाई आणि सुनबाईंची बहीण आणि भाऊ, शेतावर गेलो..

आमच्या कोकणात, द्राक्षे होत नाहीत. त्यामुळे मला द्राक्ष शेतीतच जास्त रस होता. कट्ट्याचे विषय शेती आधारितच होते.

द्राक्ष लागवड बघतांना एक गोष्ट लक्षांत आली की, मध्येच बरीच जागा मोकळी राहते. तिथे, मिरी रोपे लावता येतील का? ही शंका मनांत निर्माण झाली.

मिरे लागवडचे एक वैशिष्ट्य म्हणजे, मिरे सावलीत किंवा अर्ध प्रकाशात वाढू शकतात. शिवाय, सध्या एक नविन जात विकसीत झाली आहे आणि ती म्हणजे, आजकाल रोपे मिळायला लागली आहेत. मिरवेल ही संकल्पना, घरचा मजूर असतील तरच शक्य होते.

सांगली भागात अजून एक गोष्ट लक्षांत आली आणि ती म्हणजे, ह्या भागांत "नारळ" अतिशय उत्तम होतात.

शेती ही पिढ्यान पिढ्या टिकणारी गोष्ट असली तरी, प्रथम शेतीत पाऊल टाकणारी एक पिढी, खूप उपभोग घेऊ शकत नाही आणि आर्थिक ओढाताण पण जास्त होते... हा मुलभूत नियम, परत एकदा मनांत ठसला...

आमच्या सौ.ला देखील, शेती ह्या विषयांत रस असल्याने, ती पण भरपूर खूष झाली. पण तिला सगळ्यात जास्त आनंद, ताजी द्राक्षे खातांना झाला. आमचे द्राक्ष प्रेम बघून, विनोदने, ताजी वांगी, टोमॅटो आणि द्राक्षे भेट म्हणून दिली.

भारतीय शेतकरी, पाहुण्याला रिक्त हस्ते कधीच पाठवत नाही.
--------------------
मुलाचा साखरपुडा, एक एप्रिलला, सांगलीला सुनेच्या घरातल्या घरात करायचे ठरले आणि त्याच दिवशी, "सुयश तात्या" यांच्या बरोबर, रात्री कट्टा करायचे ठरले.

मिपा ही खरोखरच रत्नांची खाण आहे. इथे तुम्हाला आमच्या सारखे अशिक्षित, गावंढळ आणि अडाणी माणसे पण भेटतील, सुबोध खरे, म्हात्रे, कुमार1, दातरंगे, अजया, बहुगूणी यांच्या सारखे उत्तम वैद्यकीय सेवा देणारे, वेळप्रसंगी, किमान पैशांत उत्तम सल्ला देणारे डाॅक्टर पण मिळतील. सायकल ते कार ह्याची उत्तम माहिती देणारे मिपाकर कमी नाहीत.

"सुयश तात्या" हे पण असेच एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व. सकाळी झालेली जुजबी ओळख, बियर आणि मटणचा आस्वाद घेता घेता, पक्क्या मैत्रीत रुपांतरीत कधी झाली, ते समजलेच नाही.

कट्टूयाचा खरा उपयोग काय? तर, आपण सगळेच जण, इथे कितीही पराकोटीची विरुद्ध मते मांडत असलो तरी, वैयक्तिक पातळीवर "मैत्री" होतेच.
-----------

फोटो चिकटवता येत नसल्याने, वल्लींची मदत घेत आहे..

समाजजीवनमानबातमीअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

6 Apr 2021 - 8:33 am | सौंदाळा

मस्तच,
फोटो आल्यावर सविस्तर प्रतिसाद देईनच
साखरपुडा झाल्यामुळें मुलाचे आणि तुम्हा सर्व कुटुंबियांचे अभिनंदन

नविन मुलगी घरात येत असल्याने अभिनंदन..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Apr 2021 - 9:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान ! आपल्या कुटुंबात नवीन सदस्य येत आहेत, तेव्हा आपल्या दोन्ही कुटुंबाचं अभिनंदन.

कट्टूयाचा खरा उपयोग काय? थोड़ा फार फायदा, थोड़ी फार मदत, थोड़ा फार आनंद, निस्वार्थ याची देही याची डोळा मिळणारा आयुष्यातला सर्वश्रेष्ठ आनंद, असे कितीतरी पैलू सांगता येतील.

बाकी, ''मागच्या जन्मी आपण काहीतरी वेडे-वाकडे पाप केले म्हणून ह्या देशात जन्म झाला'' 'हा देश सोडून गेले पाहिजे' वगैरे अशी आपली मतं असतांना आपल्यात झालेले बदल लक्षणीय आहेत, हेही नमूद केले पाहिजे.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

पण, मिपाकर हे वेगळे आहेत .... "यांबू" सारख्या दुर्लक्षित गावात देखील, मिपाकर आहेत...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Apr 2021 - 9:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> देशाबाबतीत, हे मतं अजूनही तशीच आहेत.....

अरे वाह ! मग कोणत्या देशात जाणार वगैरे, काही प्रगती. त्या दृष्टीने काही प्रयत्न. लेखन येऊ द्या त्यावरही. मस्त मजेत राहा तिकडे.शुभेच्छा आहेतच.

बाकी आम्हाला आमच्या देशावर तो जसा आहे तसा त्यावर आमचं प्रेम आहेच. आता भारत आणि संबधीत विषयांची आपण फार काळजी करू नये..असा एक सल्ला देऊनच टाकतो. :)

-दिलीप बिरुटे
(भारतीय)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Apr 2021 - 9:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपली मतं कितीही एकमेकांविरुद्धची कशीही असली तरी आपली मिपा मैत्री कायम आहेच....! :)

-दिलीप बिरुटे
(मूवींच्या लेखनाचा फ्यान)

मुक्त विहारि's picture

6 Apr 2021 - 10:48 am | मुक्त विहारि

सहमत आहे

मुक्त विहारि's picture

6 Apr 2021 - 10:53 am | मुक्त विहारि

चालू आहेत....

काही मिपाकर मदतीला आहेत, त्यामुळे चिंता नाही...

सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत.

आणि असे आनंदाचे क्षण, मिपाकरां बरोबर नक्कीच शेयर करीन...

प्रचेतस's picture

6 Apr 2021 - 9:14 am | प्रचेतस

अभिनंदन मुवि.
कट्ट्याचे वर्णनही मस्त. मिपाधर्म तुमच्यामुळे वाढत आहे.

सतिश गावडे's picture

6 Apr 2021 - 9:15 am | सतिश गावडे

मुवि, तुमच्या मुलाचे, तुमचे आणि तुमच्या कुटुंबियांचे अभिनंदन !!!

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

6 Apr 2021 - 9:33 am | ॲबसेंट माइंडेड ...

अभिनंदन.

कंजूस's picture

6 Apr 2021 - 10:07 am | कंजूस

एक फोटो देतोय . बाकीचे येतीलच.
१)

सुरिया's picture

6 Apr 2021 - 10:11 am | सुरिया

अरे वा,
अजून एक दोन बकरे गळाला.
गावावाल्यानी ह्या पुण्यामुंबैकर काव्याला बळी पडू नका. गोड गोड बोलून काहीतरी काम काढून तुमच्याकडे येतील. तुम्ही कामाचे वेळ दवडून ह्यांची सरबराई करताल. जी द्राक्षे तिकडे १०० ला किलो भावाने घेतील तीच दाबून हानतील. सोबत बांधून घेतील. स्वतच्या सोयीने फुकटात अग्रो पर्यटन करून घेतील. तेच तुम्ही त्यांच्याकडे गेलात की आज ऑफिस आहे, ऑटोफस्तेशन आहे असले काही बाही सांगून तुम्हाला कलाटी मारतील. त्याच्यावर अजून आपण भेटलो नाही तरी समोरच्या ९० वर्षे जुन्या परंपरेच्या हाटेलात १० रुपड्याचा अमृततुल्य चहा मात्र तुमच्याच पैशाने अवश्य पिऊन जा असा उपदेश करायला पुढे मागे बघणार नाहीत. इतके करून परत शेतकरी कसा भिकार हे अहमहिकेने सांगायला हेच पुढे होतील.
आपापली सोय बघा, असल्याच्या भेटीगाठी मैत्र ऋणानुबंध वगैरे भावनिक आवाहनाला बळी पडू नका. व्यवहार सगळ्यांना असतो हे त्यांनाही शिकू द्या.

हवे असतील तर, जुने कट्ट्याचे धागे शोधून काढा...

सुरिया's picture

6 Apr 2021 - 12:22 pm | सुरिया

पाहिले की. सगळे तिथलेच दोन गावातले टिटीएमेम कट्टे.
इतके कौतुक करवून घेतले स्वतच्या शेताचे कधी बोलावले का शेतात कट्टा करू म्हणून. गेलाबाजार छताकभर हळद लावली असती तरी पाहुणचार झाला असता.
गोड गोड बोलून इनकमिंग पाहिजे फक्त. आउटगोइंग म्हणले की व्यवहार आठवतो.

सुबोध खरे's picture

6 Apr 2021 - 12:41 pm | सुबोध खरे

आपले मिपावर अस्तित्व 1 month 2 weeks आहे.

याचा अर्थ एक तर आपण कुणाचे तरी डू आय डी आहात ( मोगा खान/ चंपाबाई हितेश इ इ) आणि इथे जुनी मढी उकरून काढताय

अन्यथा आपल्याला मिपाबद्दल काहीही माहिती नसताना केवळ कळफलक हातात आहे म्हणून काहीही बडवताय.

आपण मुवि ना किती ओळखता?

असो

आपले कल्याण व्हावे अशी परमेश्वर चरणी प्रार्थना

कपिलमुनी's picture

6 Apr 2021 - 9:25 pm | कपिलमुनी

संमं किंवा सासं इकडे लक्ष देउन यांना निर्वाणास पाठवतील काय?

सुबोध खरे's picture

7 Apr 2021 - 12:54 pm | सुबोध खरे

यात चीप काय आहे?

आपण मुवि ना ओळखता का?

तसे असते तर असा प्रतिसाद आपल्याकडून आला नसता

आपले पण परमेश्वर कल्याण करो अशी प्रार्थना.

विद्याधर३१'s picture

7 Apr 2021 - 3:15 pm | विद्याधर३१

प्रतिसाद कोणाला दिला आहे ते तर बघा आधी

कपिलमुनी's picture

8 Apr 2021 - 12:23 pm | कपिलमुनी

मी त्या आयडीच्या कमेंटला चीप म्हणालो आहे .
मुविंचा आणि माझा ओळख आणि स्नेह आहे , त्यांन कसे काहि म्हणेन ?

जरा नीट वाचून रीप्लाय करा
आपले पण परमेश्वर कल्याण करो अशी प्रार्थना.

सुबोध खरे's picture

8 Apr 2021 - 12:43 pm | सुबोध खरे

आपला प्रतिसाद माझ्या प्रतिसादाच्या खालीच आला असून त्यात @ XX असे काहीही नाही.

मी काही मन कवडा नाही.
असो
__//__

Bhakti's picture

6 Apr 2021 - 10:33 am | Bhakti

वाह वाह!
अभिनंदन मुलाचे आणि सुनबाईंचे!

कंजूस's picture

6 Apr 2021 - 10:36 am | कंजूस

फोटो क्र. २)

फोटो क्र. ३)

फोटो क्र. ४)

फोटो क्र. ५)

फोटो क्र. ६)

कुमार१'s picture

6 Apr 2021 - 10:40 am | कुमार१

आपल्या दोन्ही कुटुंबाचं अभिनंदन.
छान !

चौथा कोनाडा's picture

6 Apr 2021 - 1:27 pm | चौथा कोनाडा

व्वा, झकास कट्टा ! प्रचि वरून कट्टा किती "रंगला" असावा हे लक्षात येतेय !
दोन्ही कुटुंबांना हार्दिक शुभेच्छा !
मिपा परिवार वाढत आहे !

सिरुसेरि's picture

6 Apr 2021 - 1:45 pm | सिरुसेरि

मस्त कट्टा वर्णन आणी फोटो .

सुयशतात्या's picture

6 Apr 2021 - 2:45 pm | सुयशतात्या

काका ना भेटुन खुप मज्जा आलि अनि दोन नविन मित्र झाले ..

चौकटराजा's picture

6 Apr 2021 - 4:10 pm | चौकटराजा

या दुधाच्या धाग्यात सुद्धा मीठ पडले बरे वाटले , मिपावर आल्याचे सार्थक झाले ! बाकी मिपावर चा मित्र हा खाजगी आयुष्यात मित्र वा शत्रू असे काही निस्चित प्रमेय नाही असा माझा अनुभव आहे. लाईफ स्टाईल, जगायचे तत्वज्ञान , आवडी निवडी यातून ओढ निर्माण होते त्याला मैत्री म्हणतात ! समान शीले व्यसनेषु सख्यं याचा अर्थ दोघान्चा
" ब्रॅन्ड " एक निघाला की झाली मैत्री इतकी खरी मैत्री सोपी नसते व नसावी !!

आपण एकदा, घारापुरी लेणी बघायला गेलो होतो.

आठवतंय?

मी तो पण कट्टा कधीच विसरणार नाही.

एका नखावरून, अख्खे लेणे, वल्लीने उलगडून दाखवले होते...

वल्ली, ही काय चीज आहे, हे तेंव्हा प्रत्यक्ष अनुभवता आले आणि वल्लींची थोडी मस्करी करण्याचे धाडस पण आले...

आता चिंचवडला आलो की भेटूच.. तुमच्या बरोबरचा एक चहा कट्टा बाकी आहे...

चौकटराजा's picture

6 Apr 2021 - 8:23 pm | चौकटराजा

आपण दोनदा भेटलो . एकदा सावरकर उद्यान निगडी प्राधिकरण व कर्जत जवळ चे रम्य ठिकाण .... विसरलो आता नाव ! मी घारापुरी कट्याला नव्हतो .

मुक्त विहारि's picture

7 Apr 2021 - 6:30 pm | मुक्त विहारि

ओके ....

टवाळ कार्टा's picture

7 Apr 2021 - 10:55 am | टवाळ कार्टा

भारी

चौकटराजा's picture

7 Apr 2021 - 2:15 pm | चौकटराजा

मूवि भारी ,मित्र भारी,,द्राक्ष भारी ,द्राक्षाची भारी , बाटलीचा ब्रँड भारी .. मुवींच्या मुलाच्या लग्नाची बातमी भारी की मुवि मनातून खवळून जाईल तो प्रतिसाद भारी ..... ??

प्रचेतस's picture

7 Apr 2021 - 3:39 pm | प्रचेतस

=))

अत्रुप्त आत्मा's picture

7 Apr 2021 - 7:25 pm | अत्रुप्त आत्मा

हाही हाही हाही हाही

नवं दांपत्यास अनेक शुभेच्छा !

सिरुसेरि's picture

10 Apr 2021 - 6:49 pm | सिरुसेरि

सांगलीचे कपाले भडंग पुण्यात कुठे मिळते ?

मुक्त विहारि's picture

10 Apr 2021 - 7:13 pm | मुक्त विहारि

लसूण वाला, मला जास्त आवडला ...

चौथा कोनाडा's picture

11 Apr 2021 - 1:06 pm | चौथा कोनाडा

आम्ही त्या साईडचे गोरे भडंग, भोरे भडंग हे बर्‍याचदा खातो. कपाले ब्रॅण्ड ऐकला नव्हता.
सांगली कोल्हापूर सातारा या ठिकाणच्या पदार्थांची चव अफलातून असते !

मुक्त विहारि's picture

11 Apr 2021 - 7:07 pm | मुक्त विहारि

तांबडा आणि पांढरा रस्सा, A1 ....

चौथा कोनाडा's picture

12 Apr 2021 - 6:05 pm | चौथा कोनाडा

कधी खाल्लं नाही !
हे व्हेजीटेरीयन मध्ये देखिल असतं का ?

मसुराचा पांढरा रस्सा छान होतो (मित्रंकडुन ऐकले आहे, प्रत्यक्ष अनुभव नाही)
बटाटयाचा तांबडा छान होतो. (अधुन मधुन घरी करतो)
पण मटणाच्या तांबड्या पांढर्‍याची चव काही न्यारीच.

बटाटयाचा तांबडा छान होतो.

कृती मिळेल का?

सौंदाळा's picture

12 Apr 2021 - 6:30 pm | सौंदाळा

चिकनचे वाटण वापरुनच आम्ही करतो.
कांदा आणि सुके खोबरे, खडा मसाला भाजुन त्याची मिक्सरमधे पेस्ट करायची.
तेलावर बारीक चिरलेला कांदा परतुन घ्यायचा, हळद, तिखट, गरम मसाला टाकुन त्यात उकडुन घेतलेले आणि कापलेले बटाट्याचे तुकडे घालायचे. नंतर वर केलेले वाटण, पाणी आणि मीठ घालायचे.
नुसता रस्सा प्ययला एकदम झक्कास लागतो.

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 6:42 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 6:12 pm | मुक्त विहारि

फक्त, मटणाचे पाणी, वापरायचे नाही...

पण असा रस्सा, म्हणजे, अमृताशिवाय स्वर्ग ..

सिरुसेरि's picture

15 Apr 2021 - 6:57 pm | सिरुसेरि

त्या साईडचे गोरे भडंग, भोरे भडंग , डॉन भडंग , घोडके भडंग हे पुर्वीपासुन प्रसिद्ध ब्रॅण्ड आहेत . अलिकडच्या काळात कपाले ब्रॅण्डही प्रसिद्ध आहे . इतर ब्रॅण्ड बद्दल -

किल्लेदार भडंग - हे पद्मा टॉकिजच्या समोरील स्टॉल वर मिळते .
सांगली भडंग - हे राम मंदीर चौकातुन kwc college कडे जाताना वाटेत असलेल्या सांगली बेकरीमधे मिळते .

मुक्त विहारि's picture

15 Apr 2021 - 7:35 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद ...

कपाले भडंग आवडले

आता इतर ट्राय करतो

अनुपम भडंग, दुकान: अनुपम स्वीटस मारुती रोड. अगदी लोकल हवे असेल तर.

पै भडंग, होटेल पै प्रकाश काउंटर, विश्रामबाग.

मुक्त विहारि's picture

16 Apr 2021 - 5:40 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

16 Apr 2021 - 2:48 pm | चौथा कोनाडा

भडंग ब्रँड्सची बरीच माहिती मिळाली, हे इतरही वापरून पाहायला हवेत.

शा वि कु's picture

16 Apr 2021 - 8:16 pm | शा वि कु

डॉन (dawn) भडंग छानच, त्यांचे लभंग (लसूण भडंग) सुद्धा छान असते. नुसते शेवचिरमुरे सुद्धा असतात, ते सुद्धा छान.

सिरुसेरि's picture

17 Apr 2021 - 10:20 am | सिरुसेरि

छान आठवणी . प्रत्येक ब्रॅन्डचा आपापला चाहता वर्ग आहे त्यामुळे पसंत अपनी अपनी याचा प्रत्यय येतो . काही इतर लक्षात राहिलेले ब्रॅन्ड -
महाराजा भडंग , लांजेकर मिठाईवाले यांचे भडंग , मंगल मिठाई यांचे भडंग , वाडीकर भडंग .

डॉन दांडेकर ब्राण्डचे होते बहुधा. त्यात गरम मसाल्याचा अंश असावा. दोन्ही बाबतीत चुभूद्याघ्या.

कपाले आणि कपोल हे तुलनेत नंतरचे ब्राण्ड आहेत. तेही चांगले आहेत.

सांगलीत पूर्वी मसाला दूध आणि भडंग असा बेत कोजागिरीस अनेक जण करत. आता कल्पना नाही. दशके होऊन गेली. सर्व संदर्भ बदललेले असू शकतात.

Rajesh188's picture

16 Apr 2021 - 12:20 pm | Rajesh188

मिपाकर मंडळी चा स्नेह ह्या कट्ट्या मधून बघायला मिळाला.
फोटो पण मस्त आणि आणि वर्णन पण मस्त