आणि अश्या वेळी,
चंद्राने लपायला हवं ढगांआड...
अन लपेटून घ्यायला हवं आपण,
भोवतालचं गुलाबी धुकं...
एकमेकांच्या श्वासांमधून
उधळायला हवीत,
प्रितीची गंधफुले...
घट्ट मिटायला हवीत,
डोळ्यांची नक्षत्रं...
टेकवायला हवेत
गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे,
ओठ एकमेकांवर...
आणि मग पहावं,
श्वास रोखले जातात की;
हृदय धडधडायचं थांबतं..?
-कौस्तुभ
प्रतिक्रिया
26 May 2020 - 3:13 pm | संजय क्षीरसागर
लगे रहो.
26 May 2020 - 3:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरेख....!
-दिलीप बिरुटे
26 May 2020 - 3:47 pm | मनिष
व्व्वा. भारीये....
26 May 2020 - 7:32 pm | गणेशा
वा.. छान..
काल परवा पासून पासून चंद्र, ढग, पाऊस असलेच लिहितोय त्यामुळे तर अजूनच जवळची वाटली कविता
27 May 2020 - 11:17 am | रातराणी
सुरेख!!
31 May 2020 - 12:48 am | मन्या ऽ
वाह!