महाराष्ट्र दिन २०२० - शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
1 May 2020 - 12:04 am

महाराष्ट्र दिन २०२० - शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख

नमस्कार मंडळी,
सस्नेह जय महाराष्ट्र.

मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।धृ.।।
- गोविंदाग्रज

सर्वप्रथम मिपाकरांस, वाचकांस, हितचिंतकांस व मराठीवर प्रेम करणाऱ्या तमाम रसिकांस महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
शतशब्दकथा स्पर्धा ही काही आता आपल्याला आता नवीन राहिलेली नाही. पण मिपावरचा हा अत्यंत लोकप्रिय महोत्सव आहे यात शंका नाही. या वेळची महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर घेतलेली ही स्पर्धा विशेष होती, कारण या स्पर्धेला लॉकडाऊनची पार्श्वभूमी आहे. यातील बहुतांश कथांवर लॉकडाऊनचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो. विशेष म्हणजे 'लॉकडाऊन' याच नावाची कथा पहिल्या क्रमांकाने विजयी झाली आहे यावरून सध्याचा काळ आपल्यावर किती परिणामकारक आहे याची जाणीव होते.

शतशब्दकथा स्पर्धेनिमित्त आपल्याला अनेक नवीन लेखक मिळत असतात असा अनुभव आहे. या वेळच्या स्पर्धकांची नावे बघितल्यास आपल्या ते सहज लक्षात येईल. काही सदस्यांनी तर मिपावर ऐन वेळी खाते खोलून आपल्या कथा पाठवल्या आहेत. आणि काही सदस्यांच्या लिखाणात खंड पडला होता, ते या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा लिहिते झाले.

या वेळेस स्पर्धेत एकूण ८४ कथा आल्या. तसेच १३००+ एवढे तुडुंब प्रतिसाद आले. मेनबोर्डाची पहिली तीन पाने कित्येक दिवस शशकनेच भरून गेली होती, इतके घवघवीत यश या वेळी स्पर्धेला लाभले. कदाचित या लॉकडाऊनमुळे कित्येकांच्या प्रतिभेला बहर आला. मिपाचे व्यासपीठ नेहमीच अशा प्रतिभावान लेखकांना खुणावत राहते आणि त्यांचे जोरदार स्वागतही करते. यानिमित्ताने सर्व स्पर्धक, प्रतिसादक आणि वाचक यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत.

विजेत्या कथा आपणच मतदान करून निवडलेल्या आहेत व त्या कोणत्या असतील याचा आपल्याला अंदाज आलाच असावा. पण आपणा सर्वांना उत्सुकता आहे ते या कथांचे लेखक कोण असावेत याची. केवळ विजेतेच नाही, तर सर्वच कथांचे लेखक कोण आहेत हे जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता असेल. कदाचित लेखकांची नावे कळल्यावर आपल्याला एखादी कथा पुन्हा नव्याने कळेल.

स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. पहिल्या तीन विजेत्यांमध्ये केवळ एकाच गुणाचे अंतर आहे. शिवाय पाचव्या क्रमांकाच्या दोन्ही कथांचे गुण समान आहेत, म्हणून पाचवा क्रमांक विभागून देत आहोत.

पहिल्या तीन विजेत्यांना ठरल्याप्रमाणे मिपा दिवाळी अंक २०१९ची छापील प्रत भेट देण्यात येईल. यासाठी व्यवस्थापनाकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात येईल व लॉकडाऊन संपल्यानंतर ही बक्षिसे वितरित करण्यात येतील.

विजेत्या कथा पुढीलप्रमाणे :

 महाराष्ट्र दिन २०२० - शतशब्दकथा स्पर्धा : निकाल

स्थान 
शीर्षक
लेखक

प्रथम 
लॉकडाऊन
माझीही शॅम्पेन

द्वितीय 
हेवा
ज्योति अळवणी

तृतीय 
प्रसाद
मायमराठी

चतुर्थ 
चानस
सिरुसेरि

पंचम
छंद
स्मिताके

वनवास
चांदणे संदीप

विजेत्यांचं दणदणीत अभिनंदन आणि सर्वच स्पर्धकांचे मनापासून कौतुक.
लॉकडाऊनच्या अपूर्ण संधीचा लाभ घेत आपले छंद, आवडी जोपासत राहा. हो, मात्र घरातल्या घरात हं! सध्या मिपावर सुरू असलेल्या लॉकडाऊन विशेष लेखमालेतून हीच प्रेरणा मिळत आहे, त्याचाही अवश्य लाभ घ्या!!

लवकरच घेऊन येत आहोत एक नवीन उपक्रम!!!
तोपर्यंत लिहीत राहा, वाचत राहा... मिसळपाव!

स्पर्धकांची ओळख :

SR
शीर्षक
लेखक

1
लॉटरी
चौकटराजा

2
गुद्दे
जेम्स वांड

3
सूड
तेजस आठवले

4
स्फुल्लिंग!
राघव

5
प्रसाद
मायमराठी

6
बखरीचं शेवटचं पान
अनन्त्_यात्री

7
प्रसिद्धी
भागो

8
आधुनिक 'सीता'
Cuty

9
वनवास
चांदणे संदीप

10
पॅनडेमिक
सावि

11
गृहिणी
स्मिताके

12
छंद
स्मिताके

13
आजी
बिपीन सुरेश सांगळे

14
हेवा
ज्योति अळवणी

15
कजाग
बिपीन सुरेश सांगळे

16
तानाजी आन नाथाजी
चांदणे संदीप

17
शिकारी
गुल्लू दादा

18
बंदिनी
बेंगुताई

19
मिष्टेक
अनन्त्_यात्री

20
चानस
सिरुसेरि

21
मुक्ती
बबन ताम्बे

22
जमा
चैतू

23
सॄजन!
राघव

24
कमाई
चौकटराजा

25
पिंजरा
गुल्लू दादा

26
भयस्मृती
गोंधळी

27
अपराध
निओ

28
प्रतीक्षा
शब्दसखी

29
कुबेर, कर्ण आणि...
मायमराठी

30
कातरवेळ
पैलवान

31
गेम
कुलस्य

32
चित्र
गणेशा

33
खाकी
डोरू

34
इच्छा
गणेशा

35
रात्रीस खेळ चाले
MipaPremiYogesh

36
धनाची पेटी
ऊर्जा

37
प्रपोज
शब्दानुज

38
अर्थतज्ञ
तिमा

39
लव्हमॅरेजचा किडा
डोरू

40
एका माणसाचा भ्रमनिरास
शा वि कु

41
धिंगाणा
जव्हेरगंज

42
बिलीव इट ऑर नॉट
बेंगुताई

43
दुर्लक्ष
शा वि कु

44
सपन
 बाबुराव

45
बहिष्कार
अमरेंद्र बाहुबली

46
अटॅक
गोंधळी

47
आकर्षणाचा सिद्धांत
हॅरी पॉटर

48
वाटेकरी
पलाश

49
सरमिसळ
सिरुसेरि

50
कसाई
OBAMA80

51
किक
समीरसूर

52
प्रश्न
ईश्वरदास

53
बाबांचं स्वप्न
ऊर्जा

54
चंद्र आहे साक्षीला
लोथार मथायस

55
लॉकडाऊन
माझीही शॅम्पेन

56
लोचट
ज्ञानोबाचे पैजार

57
शुक शुक
ज्ञानोबाचे पैजार

58
फत्ते
ऋतु हिरवा

59
अग्निदिव्य
ज्योति अळवणी

60
आणि...
प्रमोद देर्देकर

61
सोशल डिस्टन्स
चहाबाज

62
माल
चहाबाज

63
कनेक्ट विथ फ्रेन्ड्स
नूतन

64
मोका
OBAMA80

65
चेंडूची गोष्ट
जेम्स वांड

66
दुवा मे याद रखना, बस!
बोलघेवडा

67
सहवास
रश्मिन

68
कडं
योगी९००

69
मेजवानी
जव्हेरगंज

70
बातमी
शब्दानुज

71
बिर्थडे गिफ्ट
हॅरी पॉटर

72
संसार
Prajakta२१

73
एफ यू : लॉकडाऊन !
संजय क्षीरसागर

74
तिसरा मजला
चॅट्सवूड

75
समाधी
मोहन

76
रिटायर
मोहन

77
अशुद्ध
चिनार

78
लक्ष
अमरेंद्र बाहुबली

79
ताळेबंद
मधुका

80
प्लॅन
Prajakta२१

81
Appraisal
ब़जरबट्टू

82
स्त्री जन्मा तुझी कहाणी
मनस्विता

83
घालमेल
मनस्विता

84
बँक बॅलन्स
चॅट्सवूड

याआधीच्या स्पर्धेतील विजेत्या शतशब्दकथा :

मराठी भाषा दिन २०१९ - शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख

SR
शीर्षक
लेखक

प्रथम 
गळ
mayu4u

प्रथम 
गॅस चेंबर
वकील साहेब

तृतीय 
ग्लास
समीरसूर

चतुर्थ 
तिकीट
चिनार

पंचम 
दखल
शब्दसखी

शतशब्दकथा स्पर्धा २०१७ : निकाल
स्पर्धकांची ओळख

SR
शीर्षक
लेखक

प्रथम 
आम्ही येतोय
अॅस्ट्रोनाट विनय

प्रथम 
ऑक्टोबर- मार्च 
मराठी कथालेखक

तृतीय 
वेट अ मिनिट! 
जव्हेरगंज

चतुर्थ 
ईश्वराचा शोधं 
भृशुंडी

पंचम 
ईमारत 
चिनार

शतशब्दकथा स्पर्धा २०१५ : अंतिम निकाल
पहिली  फेरी

SR
शीर्षक
लेखक

प्रथम 
लोकमान्य
मृत्युन्जय 

व्दितीय 
येक रुपाया
चांदणे संदीप 

तृतीय 
निकाल
मधुरा देशपांडे 

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);

background-size: 1900px;
}

हे ठिकाणकथाप्रकटनशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

गणेशा's picture

1 May 2020 - 12:47 am | गणेशा

सर्वांचे अभिनंदन....

आपल्याला चहा मिळेल हीच आशा.. माझीही शॅंपेन भाऊ.. काय म्हणता..

अग्निदिव्य आणि लोचट ह्या कथा पण आपल्याला लय आवडल्या होत्या.

माझीही शॅम्पेन's picture

1 May 2020 - 12:05 pm | माझीही शॅम्पेन

धन्यवाद गणेश , नक्कीच रे , तुझ्या प्रतिकीया उपयोगी ठरल्या __/\_

सुबोध खरे's picture

8 May 2020 - 7:01 pm | सुबोध खरे

हायला

त्यांचं नाव शॅंपेन आणि तुम्ही फक्त चहा मागताय?

बाकी शॅंपेन भाऊ मन:पूर्वक अभिनंदन.

गामा पैलवान's picture

1 May 2020 - 1:37 am | गामा पैलवान

सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
सर्व स्पर्धकांना पुढल्या वाटचालीस शुभेच्छा!
सर्व वाचकांना या नव्या साहित्यप्रकारास भरभरून दाद दिल्यानिमित्त विनम्र अभिवादन!

-गा.पै.

गामा पैलवान's picture

1 May 2020 - 9:59 pm | गामा पैलवान

च्यायला, संयोजक, साहित्य संपादक, प्रशासक व मालकांना धन्यवाद द्यायचं राहूनंच गेलं. गृहीत धरणं का कायसं म्हणतात ते हेच!
-गा.पै.

चांदणे संदीप's picture

1 May 2020 - 8:34 am | चांदणे संदीप

लवकरच निकाल जाहीर झाला!
विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांचे सहभागी होऊन स्पर्धेत रंगत व चुरस आणल्याबद्दल तसेच मिपाचे स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आभार!

सर्वांना महाराष्ट्रदिनानिमित्त शुभेच्छा!

सं - दी - प

चौकटराजा's picture

1 May 2020 - 8:43 am | चौकटराजा

सर्व स्पर्धकांचे व विजेत्यांचे तसेच सम्पादकांचे त्रिवार अभिनंदन !!

प्रचेतस's picture

1 May 2020 - 8:50 am | प्रचेतस

सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल साहित्य संपादक, मिपा व्यवस्थापन ह्यांचेही मनापासून आभार.खूप छान कथा वाचायला मिळाल्यात.

नावातकायआहे's picture

1 May 2020 - 9:02 am | नावातकायआहे

सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन!

कुमार१'s picture

1 May 2020 - 10:11 am | कुमार१

विजेत्यांचं दणदणीत अभिनंदन आणि सर्वच स्पर्धकांचे मनापासून कौतुक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 May 2020 - 10:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व विजेत्यांचं मन:पूर्वक अभिनंदन. विजेत्या लेखकांच्या कथा वेगळ्याच होत्या यात काही वाद नाही. पण इतर कथा लेखकांच्या कथाही तितक्याच् उत्तम आणि सकस होत्या. कमी शब्दात मोजका आशय बसवायला मेहनत घ्यावी लागते. आशय जाऊ नये म्हणून कोणता शब्द ठेवावा आणि कोणता वगळावा यासाठी कसब लागते. येरा गबाळयाचं काम नव्हे. माझ्याकडून सर्व सहभागी लेखकांना. +१००.

सर्वांचं पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना तहेदिलसे शुभेच्छा...!!!

-दिलीप बिरुटे
(महाराष्ट्रीयन)

चौथा कोनाडा's picture

1 May 2020 - 11:25 am | चौथा कोनाडा

सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
मिपा संपादक, स्पर्धा संयोजक, कार्यकर्ते, खंदे समर्थक यांना मानाचा मुजरा !
वाचकांना शशक स्पर्धेस भरभरून दाद दिल्या बद्दल त्यांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच !

hsdfk

रुपी's picture

1 May 2020 - 11:28 am | रुपी

सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन! साहित्य संपादक आणि मिपा प्रशासनाने स्पर्धा आयोजित केल्याबद्दल धन्यवाद!

काही स्पर्धकांनी इतरही बर्‍याच कथांना +१ दिलेत. त्यांच्या खिलाडू वृत्तीबद्दल त्यांचे कौतुक!

माझीही शॅम्पेन's picture

1 May 2020 - 12:08 pm | माझीही शॅम्पेन

साहित्य संपादक , मिपा प्रशासन , ज्यांनी मतदान केलं त्यांचे मी, सह लेखकांचे मनापासून आभार , इतका भरभरून प्रतिसाद मिळेल असं वाटलंच नव्हतं , मिपाचा छापील अंकाची आता पासून वाट पाहत आहे :)

गुल्लू दादा's picture

1 May 2020 - 12:12 pm | गुल्लू दादा

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेबद्दल आयोजकांचे आभार. नवीन स्पर्धाची वाट बघतोय. काहीतरी उपक्रम चालू करावा लवकरच.

+१...
नवीन काहीतरी कराच!

विजेत्यांचे अभिनंदन!
स्पर्धकांचे कौतुक!!
आणि आयोजकांचे आभार!!!

तुषार काळभोर's picture

1 May 2020 - 12:40 pm | तुषार काळभोर

विजेत्यांचे अभिनंदन,
सर्व स्पर्धकांचे, मतदारांचे, आयोजकांचे आभार!!

टीप : यंदा भरघोस प्रतिसाद लाभला. आणि त्यामुळे बॅकग्राउंड काम तितकंच जास्त होतं. त्यात दोन सदस्यांचा सिंहाचा वाटा आहे.
जव्हेरगंज यांनी कथा तत्परतेने प्रकाशित करण्याचे कार्य एकहाती पूर्ण केले. शेवटची कथा ११.४५ ला व्य नि ने पोचली आणि ती ११.५२ ला प्रकाशित सुद्धा झाली. जवळ जवळ सर्व कथा व्य नि ने पोचल्यावर त्यांनी काही मिनिटांत प्रकाशित केल्या आहेत. काही कथा तर मध्यरात्र उलटून गेल्यावर प्रकाशित केल्या गेल्या. त्याशिवाय कथांचे बॅकग्राऊंड, शीर्षक रचना, निकालाचा ड्राफ्ट ही सर्व क्लिष्ट कामे त्यांचीच.
प्रशांत यांनी जवळ जवळ २४*७ उपलब्ध राहून सर्व तांत्रिक सहाय्य केले. नुसता निकाल जाहीर ना करता, भेटवस्तू देण्याची कल्पना त्यांचीच! सर्व प्रवेशिका एका पानावर ठेवणे, मतदान बंद झाल्यावर प्रवेशिका वाचनमात्र करणे (रात्री १२ वाजता), मिपाच्या सर्व पानांवर स्पर्धेचे अन् मतदानाचे आवाहन ठेवणे, अशा महत्त्वाच्या अॅक्टीविटी व्हॉटसअप च्या एका मेसेज वर त्यांनी करून दिल्या.

या दोन सिंहामुळे ही स्पर्धा इतक्या नीटनेटकेपणाने , वेळेत आणि यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकली. जव्हेरगंज अन् प्रशांत यांचे मनःपूर्वक आभार.

संजय क्षीरसागर's picture

1 May 2020 - 1:30 pm | संजय क्षीरसागर

.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 May 2020 - 1:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जव्हेरजंगसेठचं आभार. खुप मेहनत घेतली. ग्रेट. & thanks...!
सर्व प्रवेशिका एका पानावर नेणारे आणि तांत्रिक काम पाहणारे प्रशांतशेठ यांचेही आभार. समस्त साहित्य संपादक टीम यांचे आभार...!!

-दिलीप बिरुटे

मनःपूर्वक आभार सर्वांचे.. पुन्हा लिहिते केल्याने कायम आभारी राहील

मोदक's picture

1 May 2020 - 4:18 pm | मोदक

>>>या दोन सिंहामुळे ही स्पर्धा इतक्या नीटनेटकेपणाने , वेळेत आणि यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकली. जव्हेरगंज अन् प्रशांत यांचे मनःपूर्वक आभार.

सहमत.

धन्यवाद प्रशांत आणि जव्हेरगंज साहेब.

नि३सोलपुरकर's picture

1 May 2020 - 1:03 pm | नि३सोलपुरकर

सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन , छान कथा वाचायला मिळाल्या.
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन , आणि स्पर्धकांचे कौतुक!!

साहित्य संपादकांचे आभार. _/\_

बिपीन सुरेश सांगळे's picture

1 May 2020 - 1:11 pm | बिपीन सुरेश सांगळे

वेगवेगळ्या कथा वाचायला मिळाल्या . मजा आया
सर्व विजेत्यांचे अभिनंदन , आणि स्पर्धकांचे कौतुक!!
उत्तम सह्भाग
साहित्य संपादकांचे आभार.

केंट's picture

1 May 2020 - 1:32 pm | केंट

विजेत्यांचे अभिनंदन!

सर्व विजेत्यांचे अभिनंदन

सर्व विजेत्यांचे अभिनंदन

जव्हेरगंज सर आणि प्रशांत सरांचे आभार आणि कौतुक

नूतन's picture

1 May 2020 - 2:24 pm | नूतन

विजेत्यांचे अभिनंदन!
स्पर्धकांचे कौतुक!!
आणि आयोजकांचे आभार!!!

अनन्त्_यात्री's picture

1 May 2020 - 4:28 pm | अनन्त्_यात्री

अभिनंदन!

अनन्त्_यात्री's picture

1 May 2020 - 4:29 pm | अनन्त्_यात्री

या कथांच्या लेखकांची नावे दिसत नाहीत.

आवडाबाई's picture

1 May 2020 - 4:53 pm | आवडाबाई

विजेत्यांचे अभिनंदन.
सर्वच लेखकांचे सहभागाबद्दल कौतूक .
कार्यकर्त्यांचे आभार.

..... नविन उपक्रमाच्या प्रतिक्षेत.

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2020 - 5:53 pm | अत्रुप्त आत्मा

विजेते,सहभागी सर्वांचे अभिनंदन.

मीअपर्णा's picture

1 May 2020 - 7:35 pm | मीअपर्णा

मला आवडलेली एक विजेत्यांमध्ये आहे हे पाहून बरं वाटतंय :)
या निमित्ताने हापिसकाम करता करता एक दोन मिनिटांचे ब्रेक घेताना काय वाचावे हा प्रश्न आला नाही. पुन्हा वाचाव्या लागतील. मला फक्त वाटतं स्पर्धा असल्यामुळे लोकं नुस्तं +१ करतात का? बरेच ठिकाणी प्रतिसाद नाहीच आहेत. ते थोडं बदललं असतं तर चाललं असतं. अर्थात स्पर्धेत हे नेहमीच होत असेल तर माहित नाही मला पण मी जर लिहणारी असते तर मला नुस्तं +१ पेक्षा काहीतरी वाचायलाही आवडलं असतं प्रतिसादात.

स्मिताके's picture

1 May 2020 - 8:28 pm | स्मिताके

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धकांचेही. इतक्या निरनिराळ्या विषयांवरच्या सुरेख श श क वाचायला मिळाल्या. नेटक्या स्पर्धेबद्द्ल आयोजकांचे आणि भरघोस मतदानाने धावफलक हलता ठेवून चुरस वाढवल्याबद्द्ल वाचकांचे अनेक आभार. पुढील उपक्रमाच्या प्रतिक्षेत.
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

सौंदाळा's picture

1 May 2020 - 8:53 pm | सौंदाळा

विजेत्यांना मानाचा मुजरा.
सर्व स्पर्धक आणि आयोजकांचे आभार.
उत्तमोत्तम शशक वाचायला मिळाल्या.

माझ्यासाठी या स्पर्धेत भाग घेणेच खूप आहे. शंभर शब्दात काही मांडणे याला कसब लागते त्यामुळे मी सर्वांचेच अभिनंदन करेन

प्रशांत's picture

1 May 2020 - 10:49 pm | प्रशांत

सर्व स्पर्धकांचे व विजेत्यांचे तसेच सम्पादकांचे त्रिवार अभिनंदन !!

आणि भरभरुन प्रतिसाद देणार्‍यांना मिपाकरांना (लिहणारे व वाचणमात्र) धन्स... !

लवकरच नवीन स्पर्धा येत आहे.

- प्रशांत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 May 2020 - 3:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला नक्की माहिती आहे, पाककृती स्पर्धाच असेल.
बटाट्यापासून करायचे असे पदार्थ अशी थीम असेल का ?

नै मग मार्केटमधून बटाटे आणायला. ;)

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

2 May 2020 - 6:22 pm | तुषार काळभोर

उपासाचे पदार्थ...

संपादकांचे आभार आणि अभिनंदन

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि स्पर्धकांचे कौतुक!!

मी पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेतला होता. तसा मी नवलेखक...पण कल्पक कथा वाचून खूप काही शिकलो. लेखक म्हणून किती वेगवेगळे विषय हाताळले गेले...वा.

साहित्य संपादकांचे अनेकानेक आभार.

सिरुसेरि's picture

2 May 2020 - 2:00 pm | सिरुसेरि

सर्वांचे खुप अभिनंदन व धन्यवाद .

साहित्य संपादक, मिपा प्रशासन, वाचक आणि प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार!

स्पर्धेत भाग घेणे आणि नंतर मिळणारे प्रतिसाद तपासणे ह्यात मजा आली.

वेगवेगळ्या विषयांवरील शशक वाचायला पण आवडले.

मनस्विता's picture

2 May 2020 - 3:27 pm | मनस्विता

कारण दुसरी कथा पाठवताना कशीबशी वेळ गाठली होती आणि अगदी तत्परतेने प्रकाशित करण्यात आली.

विजेत्यांचे अभिनंदन. सामना समिती चे मनपुर्वक आभार

सर्व संयोजकांचे आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन.
स्पर्धेच्या निमित्ताने चांगले लिखाण वाचायला मिळाले.

अनिंद्य's picture

2 May 2020 - 6:32 pm | अनिंद्य

सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन !

स्पर्धकांनी इतरही कथांना +१ दिले. त्यांचे विशेष कौतुक!

मायमराठी's picture

3 May 2020 - 8:52 am | मायमराठी

मिपा प्रशासन,
आपापले उपद्व्याप सांभाळून आमचे शाब्दिक ताप सहन करत प्रकाशितही करणं, ही फार मोठी कसरत आहे. निव्वळ मराठी भाषेसाठी, तिच्या लेकरांसाठी अशा स्पर्धा हातात घेणं आणि पारदर्शकपणे पार पाडणं हे कौतुकास्पद आहे.

ह्यात मिळाली तर एखादी समाधानाची पोचपावती मिळू शकते नाहीतर तिरकस, समतोल ढळलेल्या खोचक प्रतिक्रियाही वाट्याला येऊ शकतात. भाषेचं मंथन आरंभल्यावर हे सगळं आलंच. आरोप प्रत्यारोपाच्या माला घातल्या जात असतील; भेदभावाचे टिळेही लागत असतील. पण कथेचे चषक भरलेली ताटं पुढे येत राहिली. 'चिअर्स' म्हणत सर्वांनी त्यातला रस चाखायचा प्रयत्न केलाच. प्रत्येक कथा सीतेसारखी. आपलं नाव न लावता (सा.सं) यांच्या नावाने ती काही दिवस राहते. ( सा. सं यांना रावण अजिबात म्हणायचे नाहीए) मतदानाने रोज अग्निपरीक्षा होत जाते. उजळून निघालेलली कथा गालावर थोड्याश्या जळलेल्या भाजलेल्या तात्पुरत्या उमटलेल्या काळ्या खुणा घेऊन पुन्हा लेखकाकडे परत येते. (लेखकांना राम वगैरे करायचं नाहीए). हा उत्सुकतेचा, धुकधूकीचा प्रवास २९ तारखेपर्यंत लॉकडाऊनच्या काळात अपार सुखावह होता. माझ्याकरता ही पहिलीच स्पर्धा. प्रत्येक कथा सीतेसारखीच तेजस्वी आणि काही न काही वेगळं मांडायचा प्रयत्न करणारी अशी स्वतंत्र विचारांची असते. मी माझ्या कथेला मत नाही दिलं. मला ते योग्य नाही वाटलं. मी जेव्हा माझी कथा पाठवली म्हणजे मला ती अतिशय आवडलीय म्हणूनच. इतर अनेक कथांना आवर्जून गुण दिले . त्यातले अनेक शब्द, कथानक वाचून थक्क व्हायला झालं.

पडद्यासमोर व मागे काम करणाऱ्या सर्व व्यक्तींचे मनोमन आभार. मतदान करणाऱ्या व न करणाऱ्या सर्वांचे मनोमन धन्यवाद. संपादकीय खुर्च्या नेहमीच हॉट सीट असतात. त्यात बसल्यावरच त्यांची धग कळते. स्पर्धक म्हणून काम फार स्वस्तातलं आणि सोपं आहे. चार घटका विरंगुळा, थोडं प्रबोधन, मायमराठीची थोडी सेवा म्हणून अजून स्पर्धा याव्यात , अशी नम्र विनंती.

शब्दसखी's picture

3 May 2020 - 9:29 pm | शब्दसखी

लॉकडाऊनच्या काळात शशक स्पर्धा आयोजित करून सर्व मिपाकरांना कामाला लावल्याबद्दल स्पर्धा संयोजकांचे मनापासून आभार!!
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठीच्या सर्व पडद्यामागच्या कलाकारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. स्वतःचे कामधंदे सांभाळून उत्तम संयोजन करणे ही खरोखरच सोपी गोष्ट नाही.
स्पर्धेच्या निमित्ताने माझ्या कीबोर्डलासुद्धा थोडं काम मिळालं. थोडा तरी बोळा निघाला.

सर्व विजेत्यांचे आणि त्यांच्याबरोबरच सर्व स्पर्धकांचे सुद्धा मनापासून अभिनंदन!!

पुढच्या उपक्रमाच्या प्रतीक्षेत!!!

तिमा's picture

5 May 2020 - 10:18 am | तिमा

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. माझ्या कथेवर काहींनी नक्की काय ते न कळल्याचे प्रतिसाद दिले होते. त्यांच्यासाठी -
शेवटी जो लिस्टचा उल्लेख होता ती कामावरुन कमी केलेल्यांचीच लिस्ट अभिप्रेत होती. अर्थतज्ञ नायक त्या कपातीला बळी पडला, हेच दाखवायचे होते.
अवांतरः- मला अजूनही वाटते की सुरवातीच्या लॉकडाऊनच्या योग्य निर्णयानंतर सरकारने अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे. कोरोना हा जास्त काळ रहाणारा आगंतुक पाहुणा आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळत आपल्याला सर्व व्यवहार चालू करावेच लागतील, नाहीतर गरीबांचे अतोनात हाल होतील.

मोगरा's picture

9 May 2020 - 8:36 am | मोगरा

अभिनंदन सर्वांचे ||

आधी वाचक होते फक्त
कविता देण्याचे पाहते आता

~~~
प्रिती

समीरसूर's picture

15 May 2020 - 2:24 pm | समीरसूर

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!! आणि मिपाचे शतशः आभार!

धन्यवाद!
समीर