आत्म्याच्या आठवणी..., - दिखाऊ यजमानीण*

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
17 Oct 2019 - 3:43 pm

ढिश्श-क्लेमर:-आम्मी भटजी असलो,तरी सदर लेखण हे प्रत्यक्ष वास्तविक तथा वास्तवावर आधारीत नसूण केवळ काल्पनिक मणोरंजणात्मक या प्रकारातले आहे. ते तितक्यानेच-घ्यावे! ,अशी विणम्र विनंती.
------------–---–---------------------------------------------------------------------

(*पौरोहित्य कामात क्लायंटला यजमान म्हणतात व त्याच्या बायकोस यजमानीण)

यज-मानीण:- गुरुजी,पोह्यांवर दही वाढू?
मी:-वाढा!

वाढलं ते तरी किती?तर चांगल्या* मेसमधे वरणभातावर (ग्राहक हक्क संरक्षण कायद्या अंतर्गत)जेव्हढी तुपाची रेघ-ओढतात ना, तेव्हढच! (*पुणेरी मेस मधे साधी,चांगली आणि वाईट मेस,असे मेसचे तीन फेस असतात!)

अजून वाढा, म्हटलं तर अजून एक केली 'सही' !
मग मी मनात म्हटलं, जेव्हढ दही,तेव्हढीच सही! छोटं पेन,छोटी वही! ह्ही ह्ही ही! 

जरा वेळानी अजून पोहे येत नैत, तर तीच यजमानीण तशीच येते.

यज-मानीण:- गुर्जी,लोणचं!?
मी:- कोणचं!? 
य:-हळदीचं
मी:- वाढा

परत तसच वाढलं..थोड्डस्स्स्!!! लहान मुलांना लंगोटात शी होते...तितकंच! 
श्शी!!! 
किती तो आखडता हात! दुष्ट दुष्ट!

नन्तर चहा आला. भांड्यातून ! मंजे प्राचीन पुणेरी मराठीत ज्याला फुलपात्र म्हणतात ,त्यात! 
ते भांडही साधारण आत 1 लिंबू अंग टाकून बसेल ,एव्हढच होतं! खाली छोटीशी बशी..ती ही श्टीलचीच!

मी न राहावून विचारलं मग, गुरुजींना उपहार वग्रे द्यायच्या 'सेट' मधली आहे का ही पेला बशी!?

य:-हहह्हहह (हे हसणं आहे बरं त्यांचं!अगदी मोजून!) आमचा नातू आहे ना छोटासा,त्याची ही!
मी:- काय?
य:-पेला बशी.
मी:- अशी अशी...
य:- अंSssssssssss?
मी:-ते हे... असं असं.., असं म्हणायचंय मला.
य:- तुम्हाला कमी-पडला का चहा? अजून देते(हवं तर!) ,चांगला तांब्याभर केलाय. 
मी:- स्नान झालय माझं..
य:- काSssय|!???
मी:- अहो वाक्य पूर्ण होऊ देत की,स्नान झालय माझं,तेंव्हा घेतलाय सकाळी खूप. त्यामुळे आता परत नको (अजून!). वाक्य पूर्ण! 
य:- बर बर! आता दक्षिणा काढते. (?)
मी:- (मनात:- कुठून!!!?) उघड:- हो..हो..काढा काढा. 
ती यजमानीण परत येइपर्यंत आलेला विचार. "सांगायला पाहिजे होती आधीच!म्हटलंय आता काढा..काढा..,इतकी येईल की त्यात एक पित्तनाशक काढा'च काढून होईल. 
य:- ही घ्या.
मी:- द्या! 
य:-अहो ते दक्षिणा-घेतानाचा मन्त्र म्हणा की!
मी:-किती आहे?
य:-का???
मी:-मन्त्र शं-भरच्या पटीत असतो.
य:- कुठल्या पट्टीत!?
मी:- पट्टीत नै,पटीत पटीत!
य:- 500/-
मी:- (मनात:-चला ,मिनिमम मीटर पडला ,असे म्हणत) बरोबर. द्या... "हिरण्य गर्भ गर्भस्थम्..." दक्षिणा घेऊन आम्ही जायला उठतो,तोच यज-मानीण:- या हो परत(बोलावल्यावर!)
मी(मनात:-वाट बघा!) उघड:- तर तर...येणारच! 
===========
आत्म्याच्या आठवणी..या-आगाऊ-ग्रँथातून साभार! 

ओली चटणीऔषधी पाककृतीकालवणमराठी पाककृतीमायक्रोवेव्हरस्साऔषधोपचारमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

कोमल's picture

17 Oct 2019 - 6:17 pm | कोमल

मत्त मत्त ओ बुवा..
ग्रॅंथातील पुढील 'प्रकरणे' लवकर उलगडावीत ;)

कुमार१'s picture

17 Oct 2019 - 6:27 pm | कुमार१

छान आहे !

व रोचक असेल म्हणून प्रतीक्षा आहे

अत्रुप्त आत्मा's picture

17 Oct 2019 - 7:35 pm | अत्रुप्त आत्मा

कोमल:- हही हही ही! कोमली, नोटेड युअर पॉइंट.

कुमार१ :- धन्यवाद.

जॉनविक्क :- प्रतिक्षेला निराश करणार नाही.

गणेशा's picture

17 Oct 2019 - 8:12 pm | गणेशा

वाट बघा ... :) बिचार्‍या म्हणत असतील कसे हे गुरुजी चांगले, येवुडश्यावर कसे भागवले... आणि त्यांच्या पुढील हुषारी वर तुम्ही पाणी फिरवणार म्हणजे काय ?

पाषाणभेद's picture

21 Oct 2019 - 7:52 am | पाषाणभेद

ओ, ५००चे मिटर पडलेय की व्यवस्थित.

सुखी's picture

17 Oct 2019 - 10:35 pm | सुखी

ही ही ही

जालिम लोशन's picture

17 Oct 2019 - 11:47 pm | जालिम लोशन

ऊत्तम

पुणेकर भामटा's picture

18 Oct 2019 - 12:58 am | पुणेकर भामटा

"लहान मुलांना लंगोटीत शी होते तितकंच! "
आहा! काय ती उपमा!
आता लोणचं घेताना नक्कीच लेखाची आठवण येईल.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Oct 2019 - 1:31 am | अत्रुप्त आत्मा

उपमा अतिरेकी आहे,लिहिण्याच्या फ्लो मधे येऊन गेली. धन्यवाद!

प्रचेतस's picture

18 Oct 2019 - 7:54 am | प्रचेतस

रम्य त्या आठवणी आणि अद्भूत त्या उपमा

माधव's picture

18 Oct 2019 - 8:32 am | माधव

बर्याच दिवसानी तुमच लिखाण वाचयला मिळाले. छान लिहिलय.

खिलजि's picture

18 Oct 2019 - 5:02 pm | खिलजि

बुवा तुम्ही नेहेमीच भारी माल घेऊन येतात .. हातोहात विकला गेलाच पाहिजे असा .. ह्ही ह्ही ह्ही

असलं काही पुस्तकात पांढऱ्यावर काळे नको.
---------
याच्या उलट उदाहरणे आहेत. गुजराती यजमानांची. अमचे एक नातेवाईक गुरुजी होते. इतर मुलांप्रमाणेच मुंबईत आले. कुर्ला विद्याविहार भाग. एकाने कोणत्यातरी पुजेला बोलावले. पुजा झाल्यावर यजमानांनी साष्टांग नमस्कार घालून त्या कोपऱ्यातून शिधा घ्या म्हटले. हे थोडे उभेच राहिले. यांनी थोडे गहू, तांदूळ झोळीत घेतल्यावर यजमान बोलले "अहो त्या सुपाने घ्या, आणि पुढच्या वर्षी बोलावणं करणार नाही, याच तिथीला याच पुजेला यायचं."

ज्योति अळवणी's picture

18 Oct 2019 - 6:55 pm | ज्योति अळवणी

मस्त

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Oct 2019 - 8:47 am | ज्ञानोबाचे पैजार

"लहान मुलांना लंगोटीत शी होते तितकंच! " ही वास्तवादी तुलना भयंकर आवडली आहे.. त्यात लोणचेही हळादीचे होते त्यामुळे एक मनोरम प्रतिमा डोळ्यासमोर तरळून गेली.

तुम्हाला काय तांब्याने लोणचे वाढायला हवे होते की काय? फॉक कन... काहीही हा गुर्जी...

त्या मानाने फुलपात्रासाठी वापरलेली उपमा अत्यंत मिळमिळीत आहे.

पैजारबुवा,

जॉनविक्क's picture

20 Oct 2019 - 9:53 pm | जॉनविक्क

नाही का ?

खटपट्या's picture

19 Oct 2019 - 6:17 pm | खटपट्या

मत्त मत्त!

पद्मावति's picture

20 Oct 2019 - 5:59 pm | पद्मावति

छान लिहिलंय :)

चौकटराजा's picture

21 Oct 2019 - 8:52 am | चौकटराजा

हायला , आमच्या फिजिशियनांचा मिनिमम मीटर ३०० आहे अर्थात हॉस्पिटलायझेशन झाले की त्यांचा बॅकलॉग भरून निघतो ! तुमचा निघत असेल ,त्यावेळी चार पाच दिवस एकदम मिळतात !