मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आत्म्याच्या आठवणी..., - दिखाऊ यजमानीण*

अत्रुप्त आत्मा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ढिश्श-क्लेमर:-आम्मी भटजी असलो,तरी सदर लेखण हे प्रत्यक्ष वास्तविक तथा वास्तवावर आधारीत नसूण केवळ काल्पनिक मणोरंजणात्मक या प्रकारातले आहे. ते तितक्यानेच-घ्यावे! ,अशी विणम्र विनंती. ------------–---–--------------------------------------------------------------------- (*पौरोहित्य कामात क्लायंटला यजमान म्हणतात व त्याच्या बायकोस यजमानीण) यज-मानीण:- गुरुजी,पोह्यांवर दही वाढू? मी:-वाढा! वाढलं ते तरी किती?तर चांगल्या* मेसमधे वरणभातावर (ग्राहक हक्क संरक्षण कायद्या अंतर्गत)जेव्हढी तुपाची रेघ-ओढतात ना, तेव्हढच! (*पुणेरी मेस मधे साधी,चांगली आणि वाईट मेस,असे मेसचे तीन फेस असतात!) अजून वाढा, म्हटलं तर अजून एक केली 'सही' ! मग मी मनात म्हटलं, जेव्हढ दही,तेव्हढीच सही! छोटं पेन,छोटी वही! ह्ही ह्ही ही!  जरा वेळानी अजून पोहे येत नैत, तर तीच यजमानीण तशीच येते. यज-मानीण:- गुर्जी,लोणचं!? मी:- कोणचं!?  य:-हळदीचं मी:- वाढा परत तसच वाढलं..थोड्डस्स्स्!!! लहान मुलांना लंगोटात शी होते...तितकंच!  श्शी!!!  किती तो आखडता हात! दुष्ट दुष्ट! नन्तर चहा आला. भांड्यातून ! मंजे प्राचीन पुणेरी मराठीत ज्याला फुलपात्र म्हणतात ,त्यात!  ते भांडही साधारण आत 1 लिंबू अंग टाकून बसेल ,एव्हढच होतं! खाली छोटीशी बशी..ती ही श्टीलचीच! मी न राहावून विचारलं मग, गुरुजींना उपहार वग्रे द्यायच्या 'सेट' मधली आहे का ही पेला बशी!? य:-हहह्हहह (हे हसणं आहे बरं त्यांचं!अगदी मोजून!) आमचा नातू आहे ना छोटासा,त्याची ही! मी:- काय? य:-पेला बशी. मी:- अशी अशी... य:- अंSssssssssss? मी:-ते हे... असं असं.., असं म्हणायचंय मला. य:- तुम्हाला कमी-पडला का चहा? अजून देते(हवं तर!) ,चांगला तांब्याभर केलाय.  मी:- स्नान झालय माझं.. य:- काSssय|!??? मी:- अहो वाक्य पूर्ण होऊ देत की,स्नान झालय माझं,तेंव्हा घेतलाय सकाळी खूप. त्यामुळे आता परत नको (अजून!). वाक्य पूर्ण!  य:- बर बर! आता दक्षिणा काढते. (?) मी:- (मनात:- कुठून!!!?) उघड:- हो..हो..काढा काढा.  ती यजमानीण परत येइपर्यंत आलेला विचार. "सांगायला पाहिजे होती आधीच!म्हटलंय आता काढा..काढा..,इतकी येईल की त्यात एक पित्तनाशक काढा'च काढून होईल.  य:- ही घ्या. मी:- द्या!  य:-अहो ते दक्षिणा-घेतानाचा मन्त्र म्हणा की! मी:-किती आहे? य:-का??? मी:-मन्त्र शं-भरच्या पटीत असतो. य:- कुठल्या पट्टीत!? मी:- पट्टीत नै,पटीत पटीत! य:- 500/- मी:- (मनात:-चला ,मिनिमम मीटर पडला ,असे म्हणत) बरोबर. द्या... "हिरण्य गर्भ गर्भस्थम्..." दक्षिणा घेऊन आम्ही जायला उठतो,तोच यज-मानीण:- या हो परत(बोलावल्यावर!) मी(मनात:-वाट बघा!) उघड:- तर तर...येणारच!  =========== आत्म्याच्या आठवणी..या-आगाऊ-ग्रँथातून साभार! 

वाचन 16182 प्रतिक्रिया 0