गणेश पूजा... सन १९७२ बल्ले बल्ले जी...! गनेस पूजे दी!!

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
2 Sep 2019 - 11:57 pm

गणेश पूजा... सन १९७२
बल्ले बल्ले जी...! गनेस पूजे दी!!
भाग १
हवाईदलातील माझ्या आठवणी...

१९७१साली बांगलादेशच्या लढाईची सांगता भारत विजयी होऊन झाल्याने आनंदी वातावरणात गणेशाचे आगमन झाले होते. हवाईदलातील चंदिगढ स्टेशनमध्ये मला पहिल्या पोस्टींगवर रुजू होऊन ५-६ आठवडे झाले होते. तेंव्हा सेक्टर १९ मधील एका मंदिरात सिव्हिलियन्स सोबत हवाईदलातील एयरमन गणेशोत्सव साजरा करत असत.
त्यावेळेस झालेली विसर्जनाची मिरवणूक आजही लक्षात राहिली आहे.
कल्पना करा, गणेशाच्या मोठ्या मोठ्या १०० च्या वर मूर्ती हार-माला घालून आर्मीच्या ट्रकवर सजवून निघालेल्या आहेत. लेझीमींचे बदलते डाव हलगीच्या तालावर जोरावर धडाक्यात चालू आहेत... सुखना लेक पर्यंत संपूर्ण रस्त्यावर जनसागर उसळला होता...
फटाक्यांच्या गर्जना आसमंतात दुमदुमत आहेत... नऊवारीतील मराठी ललना फुगड्यांत रंगलेल्या आहेत.. त्यात बल्ले बल्ले, सदके जावां ची गूंज भांगडा प्रेमी सरदारांच्या जोशाला उधाण आणते आहे... सुंदर रंगीबेरंगी लुंग्यातील सरदारांना त्या दिवशी जो जोश आला होता तो अवर्णनीय होता. माझ्या सारख्या संकोची मराठी माणसाला पायांची थिरक, गुलालाची उधळण खुणावत होती...
पण 'ऑफिसर' असल्याचा भाव मला गप्प करत होता.
ती माझी पहिली वेळ होती... इतक्या मोठ्या प्रमाणावर मराठा आर्मीची युनिट्समधून गणेशोत्सव साजरा केला जात असतो हे समजून घेण्यासाठी...
जे आधीच्या वर्षांच्या मिरवणुकात सहभागी झाले होते त्यांच्या सर्वांच्या तोंडी बोल होते की असा उत्साह, जोश हा प्रथमच अनुभवायला मिळाला आहे...!
नंतरच्या काळात अनेक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात दर वर्षी मी उत्साहाने सहभागी होत असे पण १९७२ ची विसर्जनाची चंदिगढमधील मिरवणूक आजही आठवणीत आहे...
...
तांबरम मधील पहिल्या भेटीतील नाट्य...
पुढील भागात...

समाजमौजमजाआस्वादअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

3 Sep 2019 - 5:12 am | जॉनविक्क

लेखाचा शेवट गूढच.

जब वी मेट या लेखातून काही किस्से सादर करायचे आहेत. त्यातील एक तांबरमच्या काळातील गणेशोत्सवाच्या दरम्यान घडला होता...

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2019 - 11:13 am | डॉ सुहास म्हात्रे

छान आठवण !

दुर्गविहारी's picture

3 Sep 2019 - 5:21 pm | दुर्गविहारी

कृपया पुढील भाग लवकर यावा. लष्कराच्या कथा वाचायला आवडतील.

शशिकांत ओक's picture

6 Sep 2019 - 12:39 am | शशिकांत ओक

धन्यवाद...
पुढील भाग सादर केला आहे.