दाराआडची चमेलीबाई ( आणि ती सटवी रोहिंगीण)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जे न देखे रवी...
8 Apr 2019 - 4:06 am

प्रेरणा: दाराआडची मुलगी.

.

चमेलीबाई दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर ?
स्वत:च्या बाहेर, कमाठीपुर्‍याच्याही पल्याड - भूतभविष्याच्या आरपार ...

तिकडे दूर इस्माईल बसला आहे...

.

केसांचा कोंबडा काढून "दिल का भंवर करे पुकार" ... म्हणत डुलणार्‍या देखण्या नायकाची नायिका बनायला
घर-गाव सोडून चंदेरी दुनियात आलेल्या चमेलीला शेवटी इथे घेऊन आलेला इस्माईल.

पण तोही आता थकत चाललाय ...
करत असेल का तोही अजून तिचा विचार ?
जात असेल का तो गल्लीच्या बाहेर,
तिच्यासाठी कुणी लक्ष्मीनंदन हुडकायला वर्दळीच्या रस्त्यांवर ?

चमेलीबाई दाराबाहेर येऊ शकत नाही.

तेवढ्यात लाचारीनं कुर्निसात करत इस्माईल कुणाला तरी इकडे पाठवतो
दाही बोटात जड अंगठ्या घातलेला, गजरा हुंगत येणारा
मस्तवाल धनदांडगा बघून चमेलीबाई सावरून बसते ...
आपल्या सुरकुतलेल्या ओठांवर पटकन लिपस्टिक फिरवते

पण तिच्याकडे ढुंकूनही न बघता
आठ नंबरमधे नवीनच आलेल्या त्या नटव्या सकीनाच्या खोलीत तो शिरतो ...

... त्या सटव्या रोहिंगा का कोण मुली इकडे आल्यापासून
असंच होतंय ... रोजच असं होतंय ..
आस कोळपलेली चमेलीबाई
भकास नजरेनं दाराआडून बघत रहाते...
बघतच रहाते...

.

कालगंगाकाहीच्या काही कविताजिलबीरतीबाच्या कविताबिभत्ससंस्कृतीजीवनमानराहणीव्यक्तिचित्र

प्रतिक्रिया

नाखु's picture

8 Apr 2019 - 9:38 am | नाखु

आणि अंगावर येणारी कविता.

खरेच या व्यवसायात पेन्शन सोडाच अटेन्शन सुद्धा नसतं, निवृत्ती तर लांबची गोष्ट

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2019 - 4:58 pm | चौथा कोनाडा

या व्यवसायात पेन्शन सोडाच अटेन्शन सुद्धा नसतं, निवृत्ती तर लांबची गोष्ट

खरं आहे. आणखी याच्या भोवतीचे सुद्धा याच हालात मध्ये !

जव्हेरगंज's picture

8 Apr 2019 - 1:36 pm | जव्हेरगंज

nice

पाषाणभेद's picture

8 Apr 2019 - 2:18 pm | पाषाणभेद

चित्र कमी झालीत सर.

प्रसाद गोडबोले's picture

8 Apr 2019 - 6:58 pm | प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त हॅज हिज ओन क्लास !

वरील चित्रे आणी कविता अप्रतिम !

अजुन चित्रांच्या , चित्रकेलेवरच्या लेखानाच्या प्रतिक्शेत !!

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2019 - 4:56 pm | चौथा कोनाडा

+१००१

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Apr 2019 - 1:29 pm | राजेंद्र मेहेंदळे

जबरा!!

कविता आणि फोटो दोन्हि वाचुन/बघुन मन अस्वस्थ झाले. चांगल्या कलाकृतीला हीच पावती.

प्रतिसाद काय लिहावा हे उमगत नाही!
अत्यंत परिणामकारक आणि विदारक.
त्रासदायक आहे हे.

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2019 - 4:59 pm | चौथा कोनाडा

अस्वस्थ करणारं वास्तव !
वाचून हलायला झालं !

फोटोज आणि मजकुर, दोन्हीही जळजळीत !

खरंच भयाण वाटली वाचून .. अजून काय बोलणार ... इथे ते नाखूसाहेब म्हणतात त्याप्रमाणे यीअर एंडिंग , बोनस वगैरे काही नाही . ना कसली जिंदगानी , ना भविष्यातली तरतूद ,,,

सुबोध खरे's picture

10 Apr 2019 - 6:59 pm | सुबोध खरे

या व्यवसायाचे भयाण वास्तव अस्वस्थ करणारे आहे. सर्वसाधारणपणे वारयोषितांचे आयुष्यमान ४० वर्षे एवढेच आहे. आणि बहुतांश त्या १४ ते १६ वर्षाला या व्यवसायात ढकलल्या जातात.
ज्यांना याची प्राथमिक माहिती हवी असेल त्यांनी खालील दुवा उघडून पाहावा
PROSTITUTION IN INDIA(२०१५)
http://factsanddetails.com/india/People_and_Life/sub7_3h/entry-4190.html

दुर्गविहारी's picture

20 Apr 2019 - 1:30 pm | दुर्गविहारी

भयाण आणि विषण्ण करणारे वास्तव.

कर्नलतपस्वी's picture

7 Aug 2023 - 6:07 pm | कर्नलतपस्वी

यावर जास्त लिहीण्याची हिम्मत नाही. आतापर्यंत जे काही वाचनात आले त्यामधे अनिल कांबळे याच्या "त्या कोवळ्या फुलांचा"ह्या गझलेच्या तोडीचे साहित्य वाचनात आले नाही. गझल ऐकताना हृदय पिळवटून येते.

https://youtu.be/BMNQF1OfHWQ

चौथा कोनाडा's picture

7 Aug 2023 - 11:00 pm | चौथा कोनाडा

भयाण वास्तव ... भारी लिहिलंय !
शेवटचे ३-४ परिच्छेद वाचताना कातर झाल्या सारखे वाटले !

ले. समीरबापु गायकवाड यांनी त्यांच्या खूलूस या पुस्तकात अश्या रेड लाईट जगाचा आणि अश्या दुर्दैवी स्त्रीयांच्या आयुष्याचा वेध आणि शोध घेतलाय ! जरुर वाचा ते पुस्तक. त्यांच्या फेबु पेज वर पण त्यातली काही प्रकरणे आहेत !