आमचं कुलदैवत ~ पुलदैवत
पुलंची जन्मशताब्दी असं वाचल्यावर जरा आश्चर्यचकित झालो. पुलं आज असते तर 100 वर्षाचे झाले असते. पण झाले असते? पुलं गेलेच कुठे आहेत..ते अजूनही त्यांच्या पुस्तकातून, वेगवेगळ्या व्यक्तीरेखांतून आजूबाजूलाच आहेत. परवा कोकणात फिरतांना अंतू बरवा दिसले..हेदवी ला शिवराम गोविंद दिसले, बेळगाव- कारवार ला रावसाहेब दिसले. पुलं त्यांच्या पुस्तकांमधून, नाटकांमधून अजूनही आपल्याला भेटतातच की. शेवटी एवढेच म्हणेन की..
सगळ्यांशी "मैत्र" करत, "आपुलकी" दाखवत, "हसवणूक" करत, दुसऱ्यांचे "गुण गाईन आवडी" असे म्हणत, वेगवेगळ्या "व्यक्ती आणि वल्लींचे" किस्से सांगत, "वंग चित्रे" रंगवत, "अपूर्वाई" ने जगत, "गणगोत" जमवत, "जावे त्यांच्या देशात" म्हणत, "पूर्वरंग" रंगवत, आयुष्याची "गोळाबेरीज" करीत, शेवटी "एक शुन्य मी" असे म्हणत पुलं आयुष्य जगले आणि आपल्याला जगवलं.
सगळ्या पुरुषांमध्ये उत्तम असणारे "पुरुषोत्तम", सगळ्यांचे "भाई" असे असणारे "पुलं" आपले "पुलं" दैवतच आहेत.
~ योगेश पुराणिक
23 नोव्हेंबर 2018
प्रतिक्रिया
24 Nov 2018 - 12:21 am | सौन्दर्य
खरं आहे, पु ल सतत सर्वत्र भेटत असतात.
24 Nov 2018 - 12:21 am | सौन्दर्य
खरं आहे, पु ल सतत सर्वत्र भेटत असतात.
24 Nov 2018 - 3:09 am | योगी९००
मस्त लिहीले आहे....
तुमचे आणि माझे नाव-आडनाव सेम आहे.