दिवाळी आणि दिवाळी अंक २०१८

यशोधरा's picture
यशोधरा in जनातलं, मनातलं
3 Nov 2018 - 1:35 pm

मराठी घरांमधून फटाके, फराळ, रांगोळ्या, देवता पूजन, आका़शकंदील, गोडधोड ह्यांसोबत दिवाळी अंक घरात आल्याखेरीज दिवाळी सुफळ संपूर्ण साजरी झाल्यासारखी वाटत नाही. आजच्या जमान्यात नेहमीच्या पारंपारिक अंकसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही उपलब्ध असतील.

ह्या वर्षी मात्र मला अजून एकही दिवाळी अंक घेता वा बघता आलेला नाही - अगदी ऑनलाईन अंकही. फारच वाईट! तरी अंकांविषयी उत्सुकता आहेच. जास्तीत जास्त दिवाळी अंक वाचायला मिळावेत म्हणून ग्रंथालयाचे सदस्यत्व घ्यायचाही विचार आहे, म्हणजे घेईनच. जसजसे वाचेन, तसे इथे लिहीन. तुम्ही कोणी पारंपारिक अंक विकत घेतलेत का? किंवा ऑनलाईन अंक पाहिलेत, वाचलेत का? तर इथे त्या अंकांविषयी लिहा, ही विनंती.

मिपाचा दिवाळी अंकही लवकरच प्रकाशित होईल, तोही वाचायचा आहेच.

अंकांच्या किंमतीही भरमसाट वाढल्या आहेत म्हणा. तरीही एका तरी अंक दिवाळीच्या निमित्ताने घरी आणावासा वाटतो. एकच दिवाळी अंक घरी आणायचा, असं ठरलं तर तुम्ही कोणता अंक आणाल?

संस्कृतीआस्वादमाध्यमवेधमत

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

3 Nov 2018 - 2:05 pm | कुमार१

अवघड आहे पण गतवर्षी चा लोकमत चा अंक आवडला होता. एका विशिष्ट कल्पनेवरील लेख होते. त्यांच्या जाडजूड अंकात जाहिरातींच्या पानांचा मात्र भडक भडिमार असतो !

यशोधरा's picture

3 Nov 2018 - 2:18 pm | यशोधरा

हो, गेल्या वर्षीचा लोकमत सुरेख होता. आत्ताच लोकमत अंकाच्या ऑनलाईन आवृत्तीची जाहिरात पाहिली. दोनशे रुपये किंमत आहे. काही लेख चांगले असतील, असं वाटतं आहे जाहिरातीतील टीझर्स पाहून.

अजून एक दोन ऑनलाईन दिवाळी अंक पाहिले, पण ह्या वर्षी ऑनलाईन अंकही विकत मिळत आहेत. मला वाटते ऑनलाईन अंकाच्या संकल्पनेने जशी पकड घेतली, तशी ही विक्रीची कल्पना निघालेली दिसते.

१९९२ पासूनचे अंक घेत आहे. लिस्ट खाली देत आहे.

१. आवाज (मधूकर पाटकर ह्यांचा)

२. शतायुषी

३. किस्त्रीम

४. जत्रा (रविवारची)

५. अक्षर

६. माहेर

७. कथाश्री

८. मेनका

९. श्री व सौ

१०. अमृत (सध्या बंद झालेले आहे.)

११. धनंजय

१२. सकाळ

१३. महाराष्ट्र टाइम्स

१४. लोकसत्ता

१५. आवाज (दुसरा)

१६. जत्रा (दुसरा)

पुर्वी ताजे दिवाळी अंक विकत घेत असे.(त्यावेळी वलसाड आणि चिपळूणला रहात असल्याने, शिळ्या अंकांचा पर्याय उपलब्ध न्हवता.त्यामुळे अंक विकत घेणे भाग होते.शिवाय एजंट ओळखीचा असल्याने, आगावू नोंदणी केली आणि अ‍ॅडव्हान्स पैसे दिले की, १०% कन्सेशन पण मिळायचे.) पण सध्या दिवाळी अंक, सार्वजनिक दिवाळी अंक, मार्च-एप्रिल मध्ये स्वस्तात विकायला काढतात.२५०० ते ३०००चे दिवाळी अंक २००-३०० रुपयात मिळतात.

यशोधरा's picture

3 Nov 2018 - 3:59 pm | यशोधरा

इतके स्वस्त कुठे मिळतात?

मुक्त विहारि's picture

3 Nov 2018 - 8:59 pm | मुक्त विहारि

ते सांगा.फक्त मार्च-एप्रिल पर्यंत वाट बघायला लागेल.

स्वगत : आम्ही उगाच नाही म्हणत की, डोंबोली हे जगाचे मध्यवर्ती ठिकाण आहे.

डोंबोली हे जगाचे मध्यवर्ती ठिकाण >> ते ठरवू हो नंतर!

वरुण मोहिते's picture

3 Nov 2018 - 5:40 pm | वरुण मोहिते

अनेक विषय त्यात हाताळले जातात. आता माझ्याकडे धनंजय, अक्षरधारा, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स ,उत्तम अनुवाद,लोकप्रभा, माहेर, सामना, झी मराठी , लोकमत इत्यादी अंक आहेत . अजून घेईन मग उद्या परवा.

ह्यातले कोणते वाचायला सुरुवात केलीत? काय काय वाचलेत?

वरुण मोहिते's picture

4 Nov 2018 - 4:02 pm | वरुण मोहिते

धनंजय वाचत आहे. लोकसत्ता वरवर वाचला अंक चांगला आहे. डिजिटल संस्कृती मधील स्थित्यंतरे वर चांगले लेख आहेत. मटा जास्त करून व्यक्ती चित्रांवर लेख आहेत. पुलं, नौशाद, गदिमा , अमृता प्रीतम . इत्यादी. बाकी मार्क्स आजही हा लेख बरा आहे. झी मराठी मध्ये श्री राज ठाकरे ह्यांना भेटायला गेलो होतो (टीम ग्रंथाली तर्फे)अतिशय वेगळ्या अंगाने त्यांनी मुलाखत दिली( माणूस हुशार आहे हे माझे वैयक्तिक मत) अनिल अवचट ह्यांचाही लेख उत्तम आहे. बाकी अजून वाचायचे आहेत . अपडेट करतो मग.

मला ‘कथाश्री’ आवडतो. एक कथा व एक लेख असे एक आड एक छापलेले असतात. त्यामुळे मजा येते.

ह्या वर्षी बघेन कथाश्री. कधी वाचल्याचे आठवत नाही.

झीचा अंक मागच्या वर्षी पाहिला. चानेलवरच्याच मुलाखती,गोष्टी पुन्हा असतात कलाकारांच्या. पण पण पण कलाकार म्हणजे सर्व मराठी मनोरंजनाचे नाहीत, फक्त झीचे.
काही कामाचे नाही.
कालनिर्णय अंक जुनासुद्धा वाचला तरी चालतो.

बाकी दिवाळी अंकांत
नेहमीचे यशस्वी लेखक बटाटेवडे शिळे गरम डब्बलफ्राइ करतात. नवीन लेखकांचे साहित्य वाचावे.

बापरे! इतका राग कशाला म्हणे तो दिवाळी अंकांवर! ऑलमोस्ट अंकांना तुच्छ लेखल्यासारखे वाटतेय!

नाही तुच्छ लेखत. पण झालय काय टिव्हि चानेलसवर अगोदर मनोरंजन झालेले असते. कथा कादंबऱ्यांतल्या सर्व घटनांचे संभाव्य पर्याय रोजच्या चाळीसेक मालिकांतून मांडले जात असतात. राजकीय चर्चा साडेनवाला तीन दाढीवाले आणि दोन बिन दाढीवाले रोजच्या रोज घडवतात. पाककृती (गूळ सोडून) सर्व जिन्नस घालून केलेल्या दाखवल्या जात असतात. कलाकार आतला आवाज थांब म्हणेपर्यंत ऐकवत असतात. आरोग्याचे सल्ले सतत फोनइनमधून सुरूच असतात.
दिवाळी अंकांसाठी वेगळे काही उरतच नाही.
लेखकांना एक चेक येतो मानधनाचा.

हो, काही अंशी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तरीही काही अंक चांगलं साहित्यही देतात. आता मंगळवारी ग्रंथालयात जाऊन अंक आणणार, मग सांगते कोणत्या अंकात काय आवडलं ते.

तुम्ही आणले का अंक? असल्यास कोणते?

नकारात्मक प्रतिसाद उगाचच दिला अगोदर.
--
कंदिल कसा बनवायचा लेख टाकण्याचा विचार होता पण लक्षात आलं कुणाला हाती बनवायचा उत्साह राहिला नाही. बाजारातून आवडलेला घेऊन येतात.

कंकाका,‌ मी बनवला घरीच कंदील. :)
आता अजून कल्पना सुचली आहेत, त्या वापरून पुढील दिवाळीत बनवेन.
तुम्ही टाका धागा, आवडेल पहा, वाचायला.

कपिलमुनी's picture

4 Nov 2018 - 1:28 pm | कपिलमुनी

आमच्या लायब्ररीमध्ये दिवाळी अंक ची स्पेशल स्कीम असते. 4 महिने 100 ₹ फी मध्ये 2 महिने अंक वाचायला मिळतात. त्यानंतर मार्च नंतर ते सर्वांसाठी उपलब्ध होतात.
या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळतो.
( पाकृ ची पाने फाडून ठेवणाऱ्या काकू सोडल्या तर बाकी अंक व्यवस्थित असतो )

मीही मराठी ग्रंथ वाचनालयाच्या स्कीममध्ये नाव नोंदवले आहे.

धनंजयचा दिवाळी अंक एकदोनदा विकत घेऊन वाचला होता तेव्हढेच. बाकी दिवाळी अंक वाचायला फारसे आवडत नाहीत त्यामुळे कधी वाचले जात नाहीत.

तुमच्यासाठी गड, किल्ले, लेणी, इत्यादि विषयांना वाहिलेला दिवाळी अंक हवा. :)

प्रचेतस's picture

4 Nov 2018 - 5:26 pm | प्रचेतस

तसेही अंक आहेत पण खास वाटत नाहीत इतके.

यशोधरा's picture

4 Nov 2018 - 5:30 pm | यशोधरा

अर्र!!

भटकंती अंक पुर्वी चांगला होता. आता ते मासिकसुद्धा बहुतेक बंद झाले॥ पर्यटनाविषयी लेख चांगले असायचे. परंतू आता पर्यटन हे आयोजकांतर्फे ,टुअरमधून करण्याचे प्रमाण फार वाढले आहे. माहिती मिळूनही त्याचा उपयोग करणारे कमीच. स्वत: जाणारेही ट्रिपअडवाइजर, इबिबो इत्यादिंवर विसंबून तेचतेच पाहतात ,ठराविक हॅाटेलांत राहतात. साहस,हुरहुर संपली आहे. मग काही वेगळे लेख आले तर बरे.

यशोधरा's picture

4 Nov 2018 - 5:31 pm | यशोधरा

भटकंती कधीच बंद झाले!

गड, किल्ले, लेणी,इत्यादि तीच असतात आणि आमच्या वर्णनांतला गमतीदारपणा जाऊन भारंभार ऐतिहासिक टिपणं देऊन वाचकांस बेजार करण्याची कठीण शैली शिरू लागली आहे. पंधरावीस वयोगटातली मुलं जाऊन फार गंमतीदार लिहितात, फोटो टाकतात ते वाचायला सर्वांनाच आवडते.

तुषार काळभोर's picture

4 Nov 2018 - 8:21 pm | तुषार काळभोर

अक्षरनामाचा ऑनलाईन आहे. त्यांच्या प्रवृत्तीप्रमाणे थोडा डावीकडे झुकलेला आहे पण काही लेख वाचनीय आहेत.

कालनिर्णय १४० रुपये अनुक्रमणिका

अक्षरधाराची यादी

यशोधरा's picture

5 Nov 2018 - 10:37 am | यशोधरा

अ धा च्या यादीत बरेच अंक दिसतात. त्यांना इतके डिस्काउंट द्यायला कसे परवडते?

तुषार काळभोर's picture

5 Nov 2018 - 2:35 pm | तुषार काळभोर

तिथे गेल्यावर पण इतकाच डिस्काउंट मिळण्याची शक्यता आहे का?

भीडस्त's picture

15 Nov 2018 - 11:17 pm | भीडस्त

बव्हंशी अंकांना दहा टक्के दिसतोय.
पंचवीस टक्के तर एखाद-दुसऱ्या अंकालाच दिसतोय..

दिवाळी अंक घ्यावेसे वाटले की सरळ पुणे गाठतो.
अप्पा बळवंत चौकात पूनम एजन्सीत जातो.
याही वर्षी गेलो होतो, पार दिवाळी संपल्यावर.काही मिळणार नाही असं वाटलं होतं.
त्यांनी दिलेल्या यादीवर खुणा करून दिल्या..

एकवीस अंक झाले. सगळे उपलब्ध होते

डिस्काउंट/सूट वगैरे मागायची नाही.बिल आलं.
४१२० फेस व्हॅल्यू होती
३०९० देय रक्कम होती.
सरळ पंचवीस टक्के कमिशन आहे
फक्त काही अंकांचे परत दहा रुपये प्रत्येकी वाढवले.
ते अंक म टा, लोकप्रभा,अक्षर दिसताहेत...

पुण्यात दिवाळी अंकांची सगळयात जास्त उलाढाल करणारा दुकानदार
मारवाडी/गुजराती असावा हा काव्यगत न्याय आहे...

यशोधरा's picture

15 Nov 2018 - 11:27 pm | यशोधरा

हैला, हे माहीत नव्हते!

अविनाशकुलकर्णी's picture

5 Nov 2018 - 8:16 am | अविनाशकुलकर्णी

मी नवीन दिवाळी अंक वाचत नाही
आमच्या रद्दी च्या दुकानात जुने दिवाळी अंक मिळतात
किंमत १० रु यास एक
काल १० अंकविकत आणले
आता चकली चिवड्या सोबाबत जुन्या अंकाचे वाचन
२०० रु एक नवा अंक परवडत नाही आणि खार म्हणजे वर्थ पण नसतो साहित्यिक दृष्टीने
जुने अंक वाचून झाले की त्याला परत देतो तो एका अंकास एक रुपया दराने परतावा देतो

खुद्द अकुकाका ह्या धाग्यावर! धागा धन्य झाला की! :)
कोणते जुने अंक वाचलेत मग अकुकाका? कोणते लेख आवडले, जरा बैजवार लिहा की.

नाखु's picture

10 Nov 2018 - 10:41 pm | नाखु

संपर्क करुन देणे
काही अंक प्रकाशित होतानाच रद्दड असतात त्यामुळे रद्दी भावाने खरेदी केली तर कुठलेही पातक लागणार नाही.
काही निवडक (अर्थात मागील अंक) संग्रही असलेला जुनाट नाखु वाचकांची पत्रेवाला

समीरसूर's picture

5 Nov 2018 - 3:09 pm | समीरसूर

मी दरवर्षी दोन दिवाळी अंक विकत घेतो. त्यापैकी एक 'धनंजय' असतोच. यावर्षीदेखील घेतला. मजा येते वाचायला. यावर्षी झी मराठीचा 'उत्सव नात्यांचा' घेतला आहे. भेट म्हणून द्यायला देखील हा अंक (अजून दोन प्रती) घेतला आहे. चांगला आहे असे वाटते. मागच्या वर्षी मी 'धनंजय' आणि 'मेनका' घेतले होते. त्या आधी 'धनंजय' आणि 'लोकमत' घेतले होते. 'प्रपंच'देखील घेतला आहे २-३ वेळा. पुण्यात आयडियल कॉलनीमध्ये 'पुस्तक पेठ' नावाचे प्रशस्त दुकान आहे. सगळे दिवाळी अंक तिथे उपलब्ध आहेत. बहुतेक सगळे सवलतीत उपलब्ध आहेत. आणि हिंदी, मराठी, इंग्रजी पुस्तकांची अक्षरशः रेलचेल आहे तिथे. मजा आ जाता हैं. एक-दोन तास कसे निघून जातात कळत नाहीत.

मुक्त विहारि's picture

6 Nov 2018 - 4:36 pm | मुक्त विहारि

माहेर मधला, गोपाळ जोशी, ह्यांच्यावरचा लेख मस्त आहे.

लेखिकेचे नांव विसरलो.

यशोधरा's picture

6 Nov 2018 - 4:43 pm | यशोधरा

आज लोकमत हातात आलाय. प्रथमदर्शनी भरगच्च अंक वाटतोय. राहुल गांधी ह्यांचा एक लेख आहे, तो जरा मिठाच्या चिमटी सकट वाचावा म्हणते. पहिलाच लेख रागाचा म्हणून जरा ऑं असं झालंय खरं.

आता बाकी लेख बघते.

समीरसूर's picture

6 Nov 2018 - 4:46 pm | समीरसूर

लोकमतमध्ये जाहिराती खूप असतात. बरीचशी पाने जाहिरातीतच जातात. पण कागदाचा दर्जा मस्त असतो. मागे कुठल्यातरी वर्षी शाहरुख खान, विद्या बालन वगैरे अभिनेत्यांचे लेख छान होते.

उत्तम धागा अन प्रतिसाद.

तीन तारखेला आमच्या स्थानिक मराठी मंडळाचा दिवाळीनिमित्तचा सोहळा पार पडला. त्यावेळी मंडळाच्या दिवाळी विशेषांकाची छापील आवृत्ती मिळाली. अंक वैविध्यपूर्ण अन वाचनीय आहे. ऑनलाईन आवृत्तीचा दुवा - हितगुज.

डालो होत नाहीये जुइ हा अंक :(
मला ई कॉपी पाठवतेस का?

जुइ's picture

12 Nov 2018 - 5:26 am | जुइ

दुवा देते आहे हितगुज

मुक्त विहारि's picture

12 Nov 2018 - 9:52 am | मुक्त विहारि

धन्यवाद..

ग्रंथालयातून लोकमत आणला होता. अंक एकुणात बरा वाटला.मला सगळेच लेख आवडले.

त्यातल्या त्यात डावे वाटलेले म्हणजे -

भैय्या, क्यू सुने? - राहुल गांधी ह्यांचं नाव लेखक म्हणून आहे पण त्यांनी लिहिलेलं नसावं. लेखाची सुरुवात वाचतानाच, खरंच असा ( आणि इतका) विचार करत असतील का, असं वाटलं. करत असतील तर, त्याचा काही प्रत्यय घडणाऱ्या राजकारणात का दिसत नाही, असं वाटलं. तेव्हा हा लेख बाद.

दुबारा पूछो आणि परतीची सुंदर वा ट - दिपीकाच डिप्रेशन आणि मन्सूर अलीच फार्म हाऊस, हे अनुक्रमे विषय. ह्या दोघांचं कौतुक आहेच पण ह्यांच्यापेक्षा कठीण परिस्थितीमध्ये कित्येक जण असतात, झगडतात आणि यशस्वी होतात, काही जण वाईट हरतात. त्यांच्या विषयी का नाही लिहित? हे म्हणजे गुळगुळीत दू:खांना अजून गोंजारल्यासारख वाटतं, म्हणून इतके नाही आवडले. ठीक आहेत.

विनिता००२'s picture

12 Nov 2018 - 10:05 am | विनिता००२

धनंजय वाचतेय. अंक छान आहे.
क्रांती अग्रणी पर्वमधे लघुकथा आहेत. अंक चांगला आहे :)

रंगासेठ's picture

12 Nov 2018 - 2:23 pm | रंगासेठ

मी बूकगंगा वर पाहिले, धनंजय्/कथाश्री/मौज असे दिवाळी अंक सध्या उपलब्ध नाहीत. अन्य कुठली वेबसाइट आहे का जिथून अंक मागवता येतील?

विनिता००२'s picture

17 Nov 2018 - 4:47 pm | विनिता००२

धनंजयचा त्यांच्याकडून मागवता येईल.

राजेंद्र प्रकाशनला फोन करावा. नंबर हवा असल्यास देईन

यशोधरा's picture

17 Nov 2018 - 6:13 pm | यशोधरा

इथेच टाका नंबर.

समीरसूर's picture

12 Nov 2018 - 5:12 pm | समीरसूर

सगळ्यात जास्त खपतोय आजकाल हा अंक. मी २ दिवसात संपूर्ण वाचला. छान आहे.

धनंजय - सुरुवात केलीये. हा माझा नेहमीचा आवडता अंक.

अ‍ॅमेझॉनवर अंक मिळतात बहुतेक.

रंगासेठ's picture

12 Nov 2018 - 6:22 pm | रंगासेठ

अ‍ॅमेझॉन वर पाहतो. :-)

बुकगंगा, अक्षरधारा ह्यांच्या पोर्टल्स वर देखील मिळतील.

मौज दिवाळी अंक घेऊन आले आहे. बराच भरगच्च अंक दिसतो आहे.

कवितांवरून नजर फिरवली आहे त्यात धामणस्कर ह्यांची किसन ही कविता फार चुटपुट लावणारी आहे. सुरेख. सगळ्या वाचल्या नाहीयेत अजून. पाहत राहतं झाड ही पण एक सुरेख आहे, हेमकिरण पत्की ह्यांची. अजूनही बऱ्याच आहेत, वाचायाच्यात. सशक्त कविता विभाग बघूनच मस्त वाटले! 3 कथा दिसताहेत आणि बाकी अंकात ललित प्रकारचं लेखन अधिक दिसतं आहे. ते बघूनही आनंद झाला. चांगलं ललित प्रकारातलं लेखन वाचायला आवडतं.

वाचून अधिक लिहिते.

मला मौजेतले लेख अधिक आवडले कथांपेक्षा. कथादेखिल चांगल्याच आहेत पण मौजेकडून ज्या अपेक्षा असतात तितपत ग्रेट वाटल्या नाहीत. परिसंवाद उत्तम. लेखांपैकी नरेंद्र चपळगावकरांचा मधु लिमयेंवरचा, आलोक कुलकर्णींचा वडिल श्री. वि. कुलकर्णिंवरचा, मिलिंद बोकिलांचा माया संस्कृतीवरचा आणि मुंबै नगरी ग बडी बाका हे चार लेख अतिशय आवडले. दासू वैद्यांची कविता अप्रतीम. खुप म्हणजे खुप आवडली.

बाकी, पुण्यात जुने दिअंक कुठे मिळू शकतील कुणी सांगू शकेल का? मला १४, १५, १६, १७ चे मौजेचे अंक हवे आहेत.

मी कथा वाचल्या नाहीत, कदाचित वाचणारही नाही. हल्ली बऱ्याच कथांचा ठराविक फॉर्म्युला झालाय, असं वाटतं. वाचायला सुरुवात केली की तोच तोच पणा वाटत राहतो.

खरं सांगायचं तर ह्या वर्षीचा मौज मला जरा ढिसाळ कारभार वाटला. काही विभाग चांगले आहेत, जसं की, लेख विभाग. त्यातील सगळे लेख मला आवडले. तुम्ही उल्लेख केलाच आहे. मात्र, एलकुंचवार ह्यांच्या ललित लेखनाचा आढावा घेणारा लेख जरा अहवाल लिहील्यासारखा वाटला. :( प्रभाकर कोलत्यांनी प्रभाकर बरवे ह्यांच्यावर लिहिलेला लेख आणि चित्रांचे फोटो आवडले.

व्यक्तिचित्रे विभागातील तीनही लेख आवडले. अटलजी, श्रीनिवास कुलकर्णी आणि मधू लिमये ह्यांच्यावरचा. परिसंवाद विभाग अजून वाचून व्हायचाय. उद्या. राहिलेल्या कविताही.

सगळ्यात नावडता लेख म्हणजे लुआंग प्रबांग. किती वाईट. आणि दुसरी चूक म्हणजे डायान फॉसी म्हणून सिगुर्नी वीवरचा फोटो लावलाय! डायान वर जो सिनेमा निघाला त्यात सिगुर्नी ने डायानची भूमिका केली आहे. आणि डायानचे फोटो उपलब्ध आहेत की! म्हणजे ही लेखिकेची चूक म्हणावी की संपादिकेची‌ की अजून कोणी प्रुफे वगैरे तपासतात त्यांची?

जीएंचा लेख किती वाईट आहे हे दुर्दैवाने मला कळू शकले नाही कारण तुम्ही उल्लेखलेला ढिसाळपणा. अक्षरशः पहिलेच पान दोनदा जोडले आहे, उरलेला लेख गायब.
विनया जंगलेंबाबत बरेच ऐकले होते, १६, १७ च्या अंकात त्यांनी लिहिलेले लेख उत्तम असल्याचे बरेच वाचले होते, मला त्यांचा लेख एवढा खास वाटला नाही. चित्रासंबंधीची चूकतर फार भयाण. अक्षम्य म्हणावीशी.
संपादिकेच्या चुका अंकात दिसल्याच. पण लेखकांच्या निवडीबाबतपण अनेकांनी आक्षेप नोंदवलेला दिसला. सतततत त्याच त्याच लेखकांचे लेख छापले जाताहेत असे म्हटले जात आहे. तिथेच संपादिका केवळ सोमवारी १ ते ३ येतात व मौज नवोदितांनी पाठवलेल्या कथा- लेखांबाबत काय झाले हे वेळेवर कळवण्याचीदेखिल तसदी घेत नाहीत अश्या वदंता ऐकल्या.
कवितांचा सेक्शन मला सो सोच वाटला मला तरी.

अनुभव, मुशाफिरी आणि पासवर्ड दिवाळी अंक ई-अंक स्वरूपात विकत घ्यायचे असतील तर खालील लिंक्सवरून घेऊ शकता.

• अनुभव दिवाळी अंक २०१८
https://imojo.in/anubhavdiwali18

• मुशाफिरी २०१८
https://imojo.in/mushafiri2018

• पासवर्ड २०१८
https://imojo.in/password2018

प्रसाद प्रसाद's picture

17 Nov 2018 - 6:15 pm | प्रसाद प्रसाद

मी खालीलप्रमाणे दिवाळी अंक घेतले ह्या वर्षी. किमती भरमसाठ वाढवल्या आहेत या वर्षी –
१. माहेर
२. मेनका
३. चंद्रकांत
४. धनंजय
५. आवाज
६. झी मराठी
७. उत्तम अनुवाद
८. मानिनी
९. ग्राहकहित

माहेरमधील सुरवातीच्या काही गोष्टी वाचल्या, मला चांगल्या वाटल्या, मला वाटतंय मंगला गोडबोलेंची कथा या वर्षी माहेरमध्ये नाहीये. मेनकाची पहिली कथा मात्र मेनकेच्या परंपरेला बिलकुल साजेशी नाही, एव्हढी सरळ सरधोपट पहिली कथा कशी घ्यावी संपादकांनी ते कळत नाही. पुढच्या गोष्टी चांगल्या आहेत. धनंजयमध्ये पण कथा बर्‍या आहेत. निम्म्यावर वाचत आलोय पण अगदी छान वाटावी अशी कथा अजून वाचनात आली नाही. दरवर्षीच्या प्रतिथयश लेखकांनी अगदी पाट्या टाकल्यात. किमतीच्या मानाने धनंजय सुमार आहे. पूर्वीचा धनंजय काय उत्तम असायचा. उत्तम अनुवाद वर हयावर्षी फेसबूक वर उत्तम समीक्षण आले म्हणून घेतला पण म्हणाव्या अशा कथा नाहीत, एखाद दुसरी बरी आहे. आवाजची पहिली खिडकी लहान मुलांच्या एखाद्या अंकासारखी आहे, अजून पुढे वाचला नाही. चंद्रकांत अजून वाचायला घेतला नाही. गेल्या वर्षी, वरच्या यादीपेक्षा ३-४ अंक जास्त घेतले होते किस्त्रीम, जत्रा, वगैरे... किमती प्रचंड वाढल्याने या वर्षी काटछाट केली. गेल्या वर्षी सर्वोत्तम अंक माझ्यामते ग्राहकहितचा होता, दर्जाच्या मानाने किममत नगण्य त्यामुळे हयावर्षीपण घेतला, किमतीच्या मानाने अंक अजूनही बरा आहे – १०० रु.ला मिळाला. पण गेल्यावर्षी इतका उत्तम नाही.

हयावर्षी ह्या अंकांचं काय गणित चुकलय कळत नाहीये, अजून एक दोन अंक वाचायचे आहेत, त्यामुळे आशा आहे. पण किमतीच्या तुलनेत मनोरंजन मूल्य चांगलच घसरलंय असं वाटतंय.

कुमार१'s picture

20 Nov 2018 - 2:27 pm | कुमार१

इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र या शाळेतल्या तासांची आठवण होतेय का ? उजळणी करावीशी वाटतेय ? मग ‘कालनिर्णय’चा अंक वाचायला घ्या !!
ही बघा काही लेखांची यादी :

१. पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांचे योगदान, चर्चिल चे छुपे युद्ध, द ग्रेट गेम १९१७.
२. ब्रम्हदेश, ग्रीस, सायलेंट valley, पाखरांचे स्थलांतर,
३. युक्रांद : संघटित युवाशक्ती

यशोधरा's picture

20 Nov 2018 - 4:57 pm | यशोधरा

मौजेचा अंक परत केला आणि परिसंवाद वाचायचेच राहिले. पुन्हा आणायला हवा. आज लोकसत्ता दिवाळी अंक घेऊन आले. त्यात पुढल्या वर्षाचं भविष्य वाचून जरा तरतरी आली! =))

काश्मीर मधील परिस्थितीची उकल करणारा महेश सरलष्कर ह्यांचा लेख खूप आवडला. अजून वाचून झाल्यावर पुढे लिहिते.

थोडाफार लोकसत्ता वाचला अजून पण फारसे काही पकड घेणारे वाटले नाही, म्हणजे वाईट होते असेही नाही पण नाही क्लिक झाले. माबुदो असावा.

उत्सव नात्यांचा, धनुर्धारी, एक कोणता तरी अजून आणलेला - नाव आठवत नाही - ठीक ठाक. धनुर्धारी मध्ये खरं तर साळगावकर ह्यांचा गोव्याच्या आठवणींबद्दलचा लेख छान आहे पण तो अर्धवटच आहे! :(

अजून कोणी काही वाचले का?

कुमार१'s picture

23 Dec 2018 - 3:29 pm | कुमार१

नुकताच यंदाच्या ‘लोकमत’ दिवाळी अंकातील द.कोरिआबद्दलचा लेख वाचला. त्यांच्या सोल या राजधानीची लोकसंख्या आहे १.१० कोटी. तरीही तिथे अंगावर येणारी गर्दी वा कलकलाट नाही. याचे कारण दीर्घकालीन नियोजन व अंमलबजावणी.

त्यातले ठळक मुद्दे:
१. अनेक कार्यालये व उद्योग दूरच्या शहरांत जाव्यात यासाठी करसवलती आणि प्रोत्साहन दिले.
२. मेट्रोची सुसज्ज आणि कार्यक्षम व्यवस्था. लोक ही वापरतात कारण:
a) खाजगी वाहन पार्क करायचे शुल्क जबरी आहे व
b) taxi सेवा मरणाची महाग आहे.

सोलची लोकसंख्या मुंबईशी तुलना करण्याजोगी असल्याने हे आशियाई उदाहरण भावले.
(हा प्रतिसाद मी 'जय जवान' या धाग्यावरही लिहिला आहे).

यशोधरा's picture

24 Dec 2018 - 5:03 pm | यशोधरा

हो, लोकमत अंक आवडला मला.

मागच्या ३-४ वर्षांपासून दिवाळी अंक विकत आणून वाचणे बंद झालेय. कुठे कुणाकडे मिळाला तर चाळून बघतो.
तसं गूढ कथा म्हणून नवल आवडायचा. धनंजय, किस्त्रीम, जत्रा, माहेर, मेनका, मटा.. बरीच चांगली होतीत/आहेत. प्रसाद आणि संतकृपा नागपुरात येतातच घरी, बाबांमुळे.

बाकी दिवाळी अंक म्हटले म्हणजे "अ ब क ड ई" ची आठवण आल्यावाचून राहत नाही. एका विषयाला धरून संपूर्ण अंक प्रसिद्ध करायचा म्हणजे येरागबाळ्याचे काम नोहे. पण बंद झाले कधीच. "अ ब क ड ई" चे जुने अंक मिळालेत तर वाचायला आवडतील.

कालनिर्णय दिवाळी अंक हातात आलाय. जरासा चाळून झालाय आणि आवडलाय. वाचन सुरू झाले की लिहिते अधिक. अजून कोणी वाचलाय का कालनिर्णय?

नाखु's picture

6 Jan 2019 - 9:24 pm | नाखु

दिवाळी अंक वाचत आहे,(वाचनालय मुदत चार महिने असल्याने तब्येतीत वाचन)
कोकण रेल्वेची कुंडलीसह विवेचन करणारा लेख आहे.सरकार बदलेले की आडकाठी आणली होती त्याचे दुष्परिणामही आणि तपशीलवार वर्णन आहे.
लेखक पत्रकार नसून कोकण रेल्वे अभियंता म्हणून सक्षम जबाबदारी निभावलेला पुरस्कार प्राप्त अधिकारी आहेत.
रेल्वे मंत्री आणि त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी करणारे यावर आपले मत व्यक्त केले आहे.
अंक जालावर उपलब्ध नाही.
मुद्रीत प्रत वाचायला हवी.

नाखु वाचकांची पत्रेवाला