(आज)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
13 Mar 2009 - 12:23 am

क्रांतीताईंची 'आज' ही सुंदर कविता वाचली आणि मग "त्याचे उत्तर माहीत असूनही दिले नाहीस तर डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील" ह्या वेताळाच्या धमकीप्रमाणे, "तुझ्या धर्माला जागला नाहीस तर ह्या ओळी रात्री छळू लागतील" ह्या भीतीने मला हे लिहिणे भाग पडले! ;)

नक्कीच काहीतरी चुकतय आज
कशानं अंग माझं दुखतय आज?

निरोप तिचा होता दोनच ओळी
पिंगा घातला मी भलत्याच वेळी
अनावर रात्री चुकलिच खेळी
थोबाड का असं सुजलय आज?

कालची ती मिशी ओठांवर नाही
डोईवर मुळीच केसही न राही
उजाड माळाची का वाट मी पाही?
पोटात भलतंच गुर्गुरतय आज!

नवीन पत्त्यांची पिसतोय पानं
दारूत बर्फाचं वितळून जाणं
षौकाचं दुखणं जुनं-पुराणं
उफाळून पुन्हा का सलतय आज?

चतुरंग

कविताविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Mar 2009 - 12:52 am | बिपिन कार्यकर्ते

बाई बाई बाई... शोभतं का हे असलं वागणं?

निरोप तिचा होता दोनच ओळी
पिंगा घातला मी भलत्याच वेळी
अनावर रात्री चुकलिच खेळी

थोबाड का असं सुजलय आज?

=)) १ लंबर....

बिपिन कार्यकर्ते

बेसनलाडू's picture

13 Mar 2009 - 1:32 am | बेसनलाडू

(सावध)बेसनलाडू

दशानन's picture

13 Mar 2009 - 9:19 am | दशानन

=))

लै भारी !!!!

अवलिया's picture

13 Mar 2009 - 9:22 am | अवलिया

वा! रंगाशेठ ! सकाळ मस्तच रंगली!
षौक संभाळा हो!!

:)

--अवलिया

प्राजु's picture

14 Mar 2009 - 1:47 am | प्राजु

एकदम फुल्ल ट्टू!
मजा आली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मराठमोळा's picture

13 Mar 2009 - 9:24 am | मराठमोळा

हा हा हा
हसुन हसुन बेजार झालो... कोणाला काय सुचेल त्याचा नेम नाही..विशेषतः विडंबनकारांना..

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

भडकमकर मास्तर's picture

13 Mar 2009 - 9:57 am | भडकमकर मास्तर

सुंदर विडंबन :)
सुजलेल्या थोबाडाची गोष्ट मस्त..
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Mar 2009 - 10:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हाहाहा, मस्तच!

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

राघव's picture

13 Mar 2009 - 12:15 pm | राघव

काय लिहिलंय.. क्लास!!
सुंदर कवितेला साजेसंच सुंदर विडंबन! :)

राघव

विनायक प्रभू's picture

13 Mar 2009 - 1:01 pm | विनायक प्रभू

(आजकाल) कंसवाले कधी येतात त्याची वाट बघत असतो.

दशानन's picture

13 Mar 2009 - 2:17 pm | दशानन

:)

जरा ह्याच पध्दतीचे आम्ही बी केलं विडंबन !

*
जबरा !

लै भारी बॉस !

देशपांडे१'s picture

13 Mar 2009 - 3:38 pm | देशपांडे१

एखाद्या मुरलेल्या चवदार लोणच्या प्रमाणे झालेय विडंबण ..

सन्मय देशपांडे

क्रान्ति's picture

13 Mar 2009 - 9:41 pm | क्रान्ति

काऊन भौ थोबाड सुजवून घेत्ल? आता जरा इडंबनाची दवा-दारू करा आन गुमान मिसळ्पाव खाऊन पडा! तुमि थोबाड सुजवून घेत्ल आनि हासू हासू आमाला बी बेजार केल की बापा! चालू द्या चालू द्या!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

विसोबा खेचर's picture

14 Mar 2009 - 1:17 am | विसोबा खेचर

रंगाभावजी,

क्लासच लिहिलं आहे! :)

तात्या.