अनुभव

पुन्हा 'शिवनाथ एक्सप्रेस' पुन्हा कूपे नंबर - एस-९...

महामाया's picture
महामाया in जनातलं, मनातलं
26 Oct 2019 - 5:34 pm

शिवनाथ एक्सप्रेस...बिलासपुर ते नागपुर...

एस-९

याचं काही नातं जुडलेलं दिसतंय...आषाढी एकादशीच्या दिवशीचा अनुभव मी दिला होता...सप्टेंबर महिन्यात पुन्हा अनुभव आला...

दर महिन्यात मुलीला घेऊन नागपुरला जावं लागतं...यावेळी जातांना आमचं गोंडवाना एक्सप्रेसनी रिझर्वेशन होतं...सकाळी 5.50 ची गाडी...12.30ला नागपुरला पोचून सरळ डॉक्टर जवळ जायचं...त्याने दुपारची दोनची वेळ दिली होती...स्टेशनावर पोचलो तर ट्रेन तीन तास लेट होती...

स्टेशनापासून घर लांब आहे...परत येणं जिवावर आलं...

जीवनमानअनुभव

कथा-चिखल गुलाब

मकरंद घोडके's picture
मकरंद घोडके in जनातलं, मनातलं
17 Oct 2019 - 5:03 pm

जेव्हा पहिल्यांदा या इथं सायकल चालवायला शिकलो असेल तेव्हा अगदी हाफचड्डी होतो मी ..आता फक्त वय वाढलंय बाकी सगळं आहे तिथं आणि तसंच आहे. फुलपॅन्टवाला मोटरसायकलस्वार असा विचार करत नदीच्या कडेने निघाला. त्याची नजर पुन्हा तेच सारं शोधत पुढे निघाली.

कथाअनुभव

आणि आषाढी पावली...

महामाया's picture
महामाया in जनातलं, मनातलं
10 Oct 2019 - 7:25 pm

या वर्षी आषाढी एकादशीला मी नागपूरला होतो...रात्र सरता सरता आलेला अनुभव आषाढी पावल्याची पावती होता...तो इथे देत आहे...

रवींद्र दत्तात्रय तेलंग

काही प्रसंग आठवणीत घर करून जातात.

12 जुलैला आषाढ़ी एकादशी होती...उपासाचा दिवस...मी नागपुरहून शिवनाथ एक्सप्रेसनी बिलासपुरला परत येत होतो. त्रिमूर्तिनगरहून आम्ही रात्री 11 वाजता निघालो...गाडी 11.55 ची होती. इतवारी स्टेशनावर पार्किंगला ही गर्दी...स्टेशनाच्या दारापर्यंत पोचायला वीस मिनिटे लागली.

प्रवासअनुभव

सिकन मटन फिस

मृणमय's picture
मृणमय in जनातलं, मनातलं
27 Sep 2019 - 10:19 am

कॉलेज मध्ये असताना मला अनेक भाषा फाडायला मिळाल्या. कोकाट्याच्या फाडफाड इंग्लिश बरोबरच मी फाडफाड ( तोंडात रोसोगुल्ला ठेवून फॉडफॉड) बंगाली, असामीज आत्मसात कि भस्मसात केली माहित नाही. पण ह्या माझ्या गुणांमुळे मी नॉर्थ च्या खूप मैत्रिणी जमवल्या होत्या. त्यांचे राहणीमान आपल्यापेक्षा खूप वेगळे. त्या दिसायला पण इतक्या वेगळ्या कि नेपाळी किंवा तिबेटियन ,म्हणून सहज खपतील.

संस्कृतीअनुभव

पाभेचा चहा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
24 Sep 2019 - 10:42 pm

चहा पिणे अन पाजणे हे काही आपल्याकडे पुर्वी नव्हते. पुर्वी चहा नव्हताच. लोक गुळपाणी देवून स्वागत करायचे. नंतर कधीतरी बोस्टन टी पार्टी झाली. अमेरीका स्वातंत्र्य झाली. ब्रिटीश भारतात आले. चीन मधल्या चहाला शह देण्यासाठी त्यांनी चहाची भारतात लागवड केली अन त्यानंतर चहा भारतात उत्पादीत होत गेला. चीन नंतर भारत चहा उत्पादनात दोन क्रमांकावर गेला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात रेल्वेस्थानकांवर चहा विकला जावू लागला. चहाची विक्री जाहीरात करून केली गेली. चहा पिणे कसे चांगले हे जाहिरात करून सांगितले जायचे. नंतर लोक चहाचे चाहते झाले.

पाकक्रियामुक्तकप्रकटनआस्वादलेखअनुभवविरंगुळा

एका रम्य पहाटे

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
23 Sep 2019 - 9:40 pm

एका रम्य पहाटे
फेब्रुवारी महिन्यात काही कामानिमित्त पुण्याला जाणे झाले. चिपळूण पुणे अंतर २०० किमी आहे. एकदा दिवसात पुण्यात जाऊन परत यायचं असा प्लॅन ठरला. त्यामुळे पहाटे ४ला चिपळूणहुन निघालो. माझे दोन भाऊ विवेक दादा आणि सुमंता, मी आणि श्रीनिवास असे चौघे जण प्रवासात एकत्र होतो. (त्यावेळी कुंभार्ली घाटाची अवस्था बरी होती) पण पाटण ते उंब्रज रस्ता मात्र वाईट याच अवस्थेत होता. त्यामुळे सुमंता आणि विवेकदादाने एका नवीन रस्त्याने जाऊया म्हणून सुचवले. 'आम्हाला काय ? ड्रायविंग दादा करणार, हवं तिथून ने' असं म्हणून त्याला पूर्ण मोकळीक दिली.

मुक्तकअनुभव

आई बाबा आणि स्मार्ट फोन

मृणमय's picture
मृणमय in जनातलं, मनातलं
18 Sep 2019 - 6:19 am

लोकं स्मार्ट फोन का घेतात त्याला वेगवेगळी करणे आहेत. तरुण पिढीला स्मार्ट फोन हातात असला कि जास्त स्मार्ट झाल्यासारखे वाटते तर जुन्या पिढीला परवडतो हेच एकमेव कारण. तो कसा वापरायचा ...त्यांच्याच भाषेत सांगायचं तर चालवायचा हे माहित नसते. माझ्या आई बाबांना व्हाट्स अँप छान चालवता येते, यु ट्यूब, व्हिडिओ कॉल छान जमतो. हि आयुधे काही तलवारबाजी आणि नेमबाजी पेक्षा कमी नाही आहेत बरंका. एरव्ही नेम बारोबर बसला कि समोरचा माणूस घायाळ होतो आता त्याच्या अगदी उलट होते. त्या छोट्याश्या की पॅड वर किती ध चे मा होत असतील म्हणून सांगू?

धोरणअनुभव

मुलीच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: परीकथेच्या सवे

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
18 Sep 2019 - 12:05 am
साहित्यिकजीवनमानविचारअनुभव