अशी ही बनवाबनवी
आज व्हाट्सअँप वरती एक मेसेज आला कि 'अशी ही बनवाबनवी' ला ३० वर्षे पूर्ण झाली. ते वाचून मला बनवाबनवीबद्दल काहीतरी लिहावे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. २३ सप्टेंबर १९८८ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. या पिक्चरला लोकांनी अफाट प्रेम दिले. हा पिक्चर अफाट गाजला आणि अजूनही गाजतोच आहे. 'Cult Following' असं जे म्हणतात ते या पिक्चरला मिळाले. मी दादा कोंडक्यांच्या जमान्यातला नाही, त्यामुळे त्यांचे चित्रपट किती गाजायचे याचा मला प्रत्यक्ष अनुभव नाही, पण त्याबद्दल ऐकून आहे. तेवढेच किंवा जास्तच प्रेम बनवाबनवीला मिळाले.