नियम कायदे आणि आपल्या सिस्टिम्स
एकीकडे
घाई घाईत सर्वंकष विचार न करता बनवलेले नियम/कायदे ..त्यांची बिनडोक पद्धतीने केलेली अंमलबजावणी..नियम माणसांसाठी का माणसे नियमांसाठी असा प्रश्न पडावा इतका ताठरपणा ....एखाद्या नियमाची कार्यपूरकता लक्ष्यात नं घेता त्याचा अडवणुकीसाठी वापर करण्या कडे कल
दुसरीकडे
पैसा / सत्ता ह्या समोर बहुतेक नियम कायदे ह्यातून सहज पळवाट
आणि सगळ्यात शेवटी
नं पटलेला नियम / कायदा खुशाल ‘भंग’ करण्याची मिळालेली शिकवण आणि आता हाडी मासी रुळलेली सवय...
कधी सुधारणार आपण ??