श श क २०२२

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
8 May 2022 - 12:22

शशक'२०२२ - विमनस्क

अंधाराचा काहूर होता मेघा मनूचा हात घट्ट धरून झपझप चालत होती.

आपला कोणीतरी पाठलाग करतय अशी शंका तिला आली.नजरेचा कटाक्ष तिने मागे टाकला वीजेच्या कडकडाटात तिला एक चेहरा दिसला..... 'रव्या'
इंदूबाईंचा वेडसर मुलगा गचाळ हसत येत होता. वेडा रव्या गावात दगड मारत फिरायचा,शिव्या द्यायचा.मेघाला आता दरदरून घाम फुटला."मनू चल लवकर"मेघा कळवळली .

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
7 May 2022 - 12:05

शशक'२०२२ - कौतुक

मी सांगणार, तो लिहणार, मग मोजत बसणार ! नाही गं जमणार हे या लेखकांसारखे शशक लिहणे, हताश होत तो उद्गारला..
तुम्ही ना गडे आजकाल लवकरच धीर सोडताय, करा ना प्रयत्न अजून ! ती लाडीकपणे..
अस्स ! मी जे केले ते जमेल का तुझ्या मिपावरच्या एका तरी धुरंधराला ?
पुरे झाला तुमचा फाजीलपणा ! तुमच्या त्या +१ च्या नादात मी पण फार वाहवत गेले.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
7 May 2022 - 12:04

शशक'२०२२ - स्क्रीनटाईम

माझ्या वाढत्या स्क्रीनटाईमच्या व्यसनाबाबचा मानसोपचारतज्ञाने दिलेला रिपोर्ट वाचून होताच बायोटेलीपोर्टेशनतज्ञ डाॅ गफलावाला मला म्हणाले," तुला या व्यसनातून कायमचं सोडवीन मी . फक्त माझ्या एका प्रयोगात स्वेच्छेने सहभागी होतोयस असं लिहून सही कर इथे"

"काहीही करीन सर पण..." सही करताना मी म्हणालो.

"गुड. हे हेल्मेट घालून या होलोग्राम प्रतिमेत उभा रहा"

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
7 May 2022 - 12:04

शशक'२०२२ - नियंता

भगीरथ कोसळणार्‍या भुयारातून बाहेर आला. समोरचे दृष्य पाहून त्याचे अवसान गळाले. पाणीच पाणी. तो दिशाहीनपणे धावू लागला. इतरांचीही तशीच धडपड चाललेली. पळतापळता तो धडकला.
“भगीरथ?” बाळकृष्ण होता.
“बाळकृष्ण, तिथे... तिथून प्रकाश येतो आहे..”
“तीचं काय ? ती बाहेर पडली ?”
अंधारात भगीरथला त्याचा चेहरा दिसत नव्हता.
“न..नाही. इतक्या खोलातून यायला काही रस्ता नाही.”

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
7 May 2022 - 12:02

शशक'२०२२ - नथिंग न्यू अंडर द सन

“मुळ्याची भाजी, वेळ पाहुन खावी” अशी म्हण का बरं नाहीये ? चौथी ब मधल्या त्याने तळमळत विचार केला. डोळे मिटलेले होते.
पाच मिनीटं “मौन”मध्ये काढणे अशक्यप्राय. काहीतरी करायलाच पाहीजे.
त्याने डोळे किलकीले केले, आणि टिचर मोबाईल मध्ये डोकं खुपसून आहेत पाहुन त्याला हायसे वाटले.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
3 May 2022 - 13:32

मिपा शतशब्दकथा स्पर्धा - २०२२

मे महिना सुरु झाला आहे, ग्रीष्मातला सूर्य आग ओकतोय, बाहेर पाहिलं तर फक्त रखरखीत वातावरण, टळटळीत ऊन, असह्य उकाडा, जीवाची काहिली होतेय. अशा वातावरणात एक थंड हवेची झुळूक यावी, पावसाचा शिडकावा होऊन आसमंत मातीच्या सुगंधाने दरवळू लागावा, असं वाटत राहतं. अशीच उन्हाळ्यातून थोडी सुटका करून घेण्यासाठी मिपा आयोजित करत आहे - मिपा शतशब्दकथा स्पर्धा - २०२२

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
2 Aug 2021 - 20:28

मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- परिक्षकांचे मत

छायाचित्रण कला स्पर्धेचे परिक्षण दोन प्रकारे करायचे ठरले होते. एक म्हणजे मिपाकरांचा कौल आणि दुसरे म्हणजे या क्षेत्रातील जाणकरांना या छाया चित्रांविषयी काय वाटते?

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
2 Aug 2021 - 20:23

मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धेचा निकाल

छायाचित्रण कला स्पर्धेसाठी छायाचित्रे पाठवणार्‍या मिपाकरांचे मनःपूर्वक आभार. तसेच या स्पर्धे ला भरभरुन मतदान करणार्‍या मिपाकरांचेही मन:पूर्वक आभार.

या निमित्ताने नयनरम्य छायाचित्रांचा आनंद लुटता आला.

या स्पर्धेत १६ मिपाकरांकडून एकूण २९ प्रवेशिका मिळाल्या निसर्गचित्रे विभागात १२ लॉकडाउन विभागात ६ तर मुक्तविभागात विभागात ११ प्रवेशिका जमा झाल्या

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
6 Jul 2021 - 10:59

लॉकडाउन - मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१

a:link {
color: #991f00;
}
.w3-small {
font-size:14px;
padding-top:12px;
}

मिपा छायाचित्रणकला स्पर्धा २०२१ ला दिलेल्या भरघोस प्रतिसादा करता मिपाकरांचे मनःपूर्वक आभार.

लॉकडाउन विभागातल्या प्रवेशिका या धाग्यात प्रकाशित केल्या आहेत.

छायाचित्रावर टिचकी मारली की ते मोठे होइल मोठ्या छायाचित्रावर टिचकी मारली की धागा पूर्ववत दिसायला लागेल

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
6 Jul 2021 - 10:50

मुक्त विभाग - मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१

a:link {
color: #991f00;
}
.w3-small {
font-size:14px;
padding-top:12px;
}

मिपा छायाचित्रणकला स्पर्धा २०२१ ला दिलेल्या भरघोस प्रतिसादा करता मिपाकरांचे मनःपूर्वक आभार.

मुक्त विभागातल्या प्रवेशिका या धाग्यात प्रकाशित केल्या आहेत.

छायाचित्रावर टिचकी मारली की ते मोठे होइल मोठ्या छायाचित्रावर टिचकी मारली की धागा पूर्ववत दिसायला लागेल

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
6 Jul 2021 - 10:36

निसर्गचित्रे - मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१

a:link {
color: #991f00;
}
.w3-small {
font-size:14px;
padding-top:12px;
}

मिपा छायाचित्रणकला स्पर्धा २०२१ ला दिलेल्या भरघोस प्रतिसादा करता मिपाकरांचे मनःपूर्वक आभार.

निसर्गचित्र या विभागातल्या प्रवेशिका या धाग्यात प्रकाशित केल्या आहेत.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
21 Jun 2021 - 11:44

मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१

मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना काही विषय देऊन एक त्या विषयावर काढलेल्या छायाचित्रांची एक स्पर्धा आयोजित करण्याचे ठरले आहे.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
15 Feb 2021 - 14:54

धम्मालपंती प्रवेशिका – ५

५. मिपाकर संदीप चांदणे यांची कन्या धाकटी कन्या मानसी (वय ४ वर्षे) हिचे एक चित्र.
1
.
.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
15 Feb 2021 - 12:49

धम्मालपंती प्रवेशिका – ४

४. मिपा आयडी ढब्ब्या यांचा मुलगा राघवेंद्र देशपांडे (वय ८). एक चित्र.

चित्राचं नाव : बर्ड्स आय - विंटर लँडस्केप

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
11 Feb 2021 - 12:12

धम्मालपंती प्रवेशिका – ३

पॉपकॉर्न यांची कन्या अक्षदा गणेश पवार (वय ६) हिने काढलेली पाच चित्रं

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
11 Feb 2021 - 12:11

धम्मालपंती प्रवेशिका – २

महाराणी यांची कन्या मृण्मयी खडके (वय १४) हिने काढलेली चार चित्रं

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
11 Feb 2021 - 12:10

धम्मालपंती प्रवेशिका – १

धम्मालपंती प्रवेशिका – १

राहुल घाटे यांचा मुलगा दूर्वांक (वय साडेपाच) - प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष कलाकृती

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
20 May 2020 - 23:54

[कविता' २०२०] - क्या उखाड़ लिया?

क्या उखाड़ लिया?

वेळ मिळाला आहे अनायसे, तर संपवूया
कितीतरी वाचायची राहिलेली पुस्तकं,
अर्धवट लिहिलेल्या कविता, काही लेख.
असंच खूप काही, मनापासून ठरवलं.
धावपळीत रोजच्या, बरंच काही हरवलं.
डायरीच्या पानांनी मग हक्काने खडसावलं,
क्या उखाड़ लिया?

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
20 May 2020 - 19:32

[कविता' २०२०] - करवली

करवली

सहजंच फिरता फिरता आज पुन्हा तिथे आलो
आणि आठवली ती पहिलीच मंद झुळूक मोहरून टाकणारी
ते अवखळ चालणं
लटकेच हसणं
पापण्यांची उघडझाप
आणि लगबग पावले
त्यातली तारुण्याची नवाई

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
20 May 2020 - 16:31

[कविता' २०२०] - जळू

जळू

माणसाच्या आयुष्यात
दोन 'जळू' सापडतात

एक... मनाला चिकटलेली
हि धोकादायक
सतत डसणारी, पीडा देणारी
मानसिक स्वास्थ्य खाणारी
हिला वेळीच चटका देणे उत्तम!

दुसरे ... काही क्षूद्र जीव
जे कारण असो किंवा नसो
तुमच्यावर सतत जळतील