श श क २०२२
शशक २०२२ - धडपड"घरुन काम करण्याची मुभा असतानाही या अवस्थेत रोज इतक्या दूर ऑफिसला जायचा हट्ट का लावलायंस?” |
शशक'२०२२ - जॉन डोकुळकुळीत आभाळ, दिवसभर रिपरिप चालूच. मनावर देखील शेवाळंच. |
शशक'२०२२ - कळ१० वर्षाचे कोवळे पोरं ते. शिकायच्या नादात सायकल सरळ टपरीवर उभ्या असलेल्या राणाच्या बुलेटला जाऊन धडकली होती. |
शशक'२०२२ - संपत्तीएका बरोबर एक आला. त्यातून झाले पाच. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले सात. संपत्ती तरी अजून कशाला म्हणतात हो ? पाचांच्या बरोबर पाच आले. त्यातून झाले दहा. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले वीस. संपत्ती तरी अजून चांगलीच जमत होती. दहांच्या बरोबर सहाच आले. त्यातून झाले सहा. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले बावीस. संपत्ती तरी अजून हवीशी वाटत होती. |
शशक'२०२२ - आईचा मारदुपारी भावड्याबरोबर खेळताना झालेल्या भांडणानंतर आईचा मार खाऊन छोटी आन्जी दिवसभर रूसून बसलेली. संध्याकाळी बाबा घरी आले की धावत जाऊन त्यांना बिलगली. "काय झालं बबड्या?" "मला तर वाटतं हा भावड्या नसताच तर बरं झालं असतं बाबा." आन्जी बाबांच्या कुशीत हुंदका देत बोलली. रात्री जेवतानाही बाबांनी आन्जीला बळंच आणून बसवली. आई अजूनही जाणूनबुजून तिच्याकडे लक्ष देत नव्हती. |
शशक'२०२२ - कलियुगात कॉनमॅनसरतशेवटी आज जॉब पूर्ण होणार होता. इतक्या दिवस फोनवर तोंड चालवले त्याचे बक्षीस मिळणार. म्हाताऱ्यांची लूट करताना टोचणी लागते खरी, पण उत्क्रांतीच्या नियमांनुसार- ओटीपी दुसऱ्याला सांगायचा नसतो हे पण माहीत नसलेला माणूस नामशेषच होणारच. |
शशक'२०२२ - चल रे भोपळ्या टुणूक टुणूकम्हातारी भोपळ्यात बसली मुलीचा निरोप घेतला. |
शशक'२०२२ - रँगोगरुडाच्या भीतीने बाटलीत लपलेल्या सरड्याची अवस्था भयंकर झाली जेव्हा गरुडाने बाटलीच उचलून आकाशात भरारी घेतली आणि उंचावरून खाली सोडून दिली. आपला मृत्यू अटळ आहे याची त्याला खात्री पटली. घाबरून त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. मृत्यूचे जवळून दर्शन त्याने यापूर्वीही घेतले होते जेव्हा काचेच्या “सुरक्षित” पिंजऱ्यातून सुटका होऊन तो मुक्त जगात दाखल झाला. |
शशक'२०२२ - उल्कामंगळावरील वसाहतीत प्रचंड धावपळ सुरु होती. तातडीने ग्रह सोडण्याचे आदेश आले होते. एक मोठी उल्का काही तासात मंगळावर आदळणार होती. काउंटडाऊन शून्य झाल्या क्षणी तिने बटन दाबले, तेव्हाच तिच्या आईचा फोन आला. तिच्या बाळला घेऊन आई स्पेसस्टेशनवरच भेटणार होती. “लवकर नीघ बाई...शेवटचे स्पेसशटल सुटण्याची वेळ झाली, बाहेर बघ उल्का चंद्रापेक्षा मोठी दिसते आहे.” आईचा आठवा फोन आला. |
शशक'२०२२ - मलमगावातील पट्टीच्या पोहनार्याने मृतदेह ओढून आणला. पोलिस गाडी नी पाठोपाठ ऐंब्युलन्स निघाली. |
शशक'२०२२ - चोरीमी इन्स्पेक्टर अजय. अनेक चोरांना पकडणारा. माझ्या कपाळावर एक व्रण आहे. लहानपणी काकांनी मला मी त्यांचे पैसे चोरले म्हणून मारलं होतं. तेव्हापासून माझ्या कपाळावर आहे. आईलाही काकू खूप छळायची. त्याच रात्री माझ्या विधवा आईनं माझ्यासकट घर सोडलं. पुढं आम्ही एका महिलाश्रमात राहिलो. मला आईनं शाळेत घातलं. तीही प्राथमिक शाळेत शिक्षिका झाली. मी शिकलो. पोलीसदलात गेलो. |
शशक'२०२२ - तेच तेच पुन्हा पुन्हाकिती छान झोप लागली होती. लोक झोपू पण देत नाहीत. |
शशक'२०२२ - बुडबुडासगळ्या चिंतांनो, त्राग्यांनो, तणावांनो, भित्यांनो.. तुमची युनिटी करा इकडे पहा |
शशक'२०२२- सूचितवडाच्या झाडाखाली एका टपरीवर, तुझा तो बॉयफ्रेंड, त्या काळोखातून बाहेर, |
शशक'२०२२ - योगायोग"फूट्बोर्डवर पाय ठेवा तुम्ही", अभिरुपने चालत्या ट्रेन पकडणार्या मुलीच्या बखोटीला धरुन आत घेतले. |
शशक'२०२२ - फरियादट्रेन स्टेशनमधुन निघाली . त्या दोघांनी धावतपळत आपला डबा गाठला . " हे दागिने ." तिने आपल्या बॅगमधला डबा काढुन त्याला दिला . "आईबाबांना न सांगता मी त्यांचे दागिने घेतले . आपण सेटल झाल्यावर त्यांना नक्की परत करु ." ती रडु आवरत म्हणाली . "जरुर . गावाकडे चाचुचा बडा कारोभार आहे . आपण त्यांच्याकडेच राहुया ." "आई बाबांनाही आपल्याकडेच बोलवुन घेउ ." ती म्हणाली . |
शशक'२०२२ - ठीकायहे भामटे दोस्त..! इकडे रिकाम्या बडवायजर्सचा खच..! मघाशी टुन्न होऊन एकमेकांच्या आणि वेटरच्याही पप्प्या घ्यायलेले..! मग आपापल्या बायकांशी फोनवर दबकत्या आवाजात |
शशक'२०२२ - मोबदला“रमाकांत त्यादिवशीसारखं आज याल का संध्याकाळी माझ्याबरोबर घरी.तुम्हाला पाहिजे तो मोबदला देईन.”रेवतीनी मधाळ आवाजात विचारलं. |
शशक'२०२२ - तुटलेले दोरपहाटेच्या वेळी शहरातुन गावाकडे आलेल्या गाड्या गावच्या वेशीपाशी करकचुन ब्रेक लावुन थांबल्या. समोर नजरेतली ओळख हरवलेले शेकडो गावकरी उग्र मुद्रेने काठ्या घेउन उभे होते . त्यांनी गावात जाणारी वाट अडवली होती . "पावणं , तुम्ही शहरातली रोगराई घेउन गावात येतायसा . तुम्हाला इथं प्रवेश नाही ." |
शशक'२०२२ - व्यसनबॉम्ब फेकून त्याने एकास जायबंदी नी एकास ठार केले. दुसर्या महायुध्दात शोध लागलेला “मोलोटोव” शत्रूने फेकल्याने त्याचा सहकारी होरपळून निघाला. दोन सहकारी संपल्याने युध्द जिंकवण्याची जबाबदारी आपली आहे ह्याची त्याला जाणीव होती. जातीचा सैनिक होता तो. स्नायपर वर स्कोप चढवून त्याने आवाजाच्या दिशेने रोखली. |
- ‹ previous
- 3 of 20
- next ›