सरतशेवटी आज जॉब पूर्ण होणार होता. इतक्या दिवस फोनवर तोंड चालवले त्याचे बक्षीस मिळणार. म्हाताऱ्यांची लूट करताना टोचणी लागते खरी, पण उत्क्रांतीच्या नियमांनुसार- ओटीपी दुसऱ्याला सांगायचा नसतो हे पण माहीत नसलेला माणूस नामशेषच होणारच.
पण म्हाताऱ्याचा फोनवरचा अविर्भाव आज वेगळाच होता. चढ्या आवाजात प्रश्न विचारत होता, पोलिसांत तक्रार करणार म्हणत होता. सगळं मुसळ केरात ! त्याने फणकाऱ्याने फोन ठेवला.
संध्याकाळी, म्हाताऱ्यानं फोनवरून जो डायलॉग मारलेला तोच सेम टू सेम डायलॉग टीव्ही वर सुपरिचित आवाजात ऐकल्यावर तो सटपटला- आणि दगाफटका झाल्याचे दुःख झाले.
त्याने खोलीत जाऊन 'शोले'चे पोस्टर रागाने फाडले. काय कलियुग आहे, च्यामारी एकसुद्धा सेलिब्रिटी फॅन होण्याच्या लायकीचा नाही.
प्रतिक्रिया
10 May 2022 - 1:25 pm | मोहन
+१
10 May 2022 - 1:32 pm | अर्जुन
शशांक समजलीच नाही.
10 May 2022 - 3:07 pm | अमरेंद्र बाहुबली
नाही समजली.
10 May 2022 - 3:21 pm | प्रचेतस
रिश्ते मैं तो हम तुम्हारे बाप होते है..हा शहेनशाहमधला डायलॉग असावा तो.
10 May 2022 - 4:02 pm | चांदणे संदीप
डॉयलॉक 'शोले' मधला असावा. आता डोस्क्याला ताण नाही देत... नंतर विचार करतो.
सं - दी - प
10 May 2022 - 4:49 pm | श्वेता व्यास
+१
10 May 2022 - 6:38 pm | कानडाऊ योगेशु
मला कळली असे वाटते. कथेतला सेलिब्रिटी म्हणजे अमिताभ बच्चन असावा. त्याला हा कॉनमॅन फसवण्याचा प्रयत्न करत असावा. संध्याकाळी केबीसी वर तो सुपरिचित आवाज ऐकतो आणि कथानायक चिडतो असे असावे.
11 May 2022 - 1:03 pm | चौथा कोनाडा
बरोबर.
... आणि कॉनमॅन हा बच्चन या एकमेव सेलीब्रेटीचा फॅन असावा त्या मुळेच " एकसुद्धा सेलिब्रिटी फॅन होण्याच्या लायकीचा नाही" हा विचार.
11 May 2022 - 1:03 pm | चौथा कोनाडा
बरोबर.
... आणि कॉनमॅन हा बच्चन या एकमेव सेलीब्रेटीचा फॅन असावा त्या मुळेच " एकसुद्धा सेलिब्रिटी फॅन होण्याच्या लायकीचा नाही" हा हताशपणाचा विचार.
14 May 2022 - 7:32 am | तुषार काळभोर
संध्याकाळी, म्हाताऱ्यानं फोनवरून जो डायलॉग मारलेला तोच सेम टू सेम डायलॉग टीव्ही वर सुपरिचित आवाजात ऐकल्यावर
>>
शहनशाहच वाटतंय.
1 Jun 2022 - 12:20 pm | अमरेंद्र बाहुबली
कृपया कथा ऊलगडून सांगावी.
1 Jun 2022 - 12:26 pm | विजुभाऊ
डायरेक्ट बच्चनला फोन कसा काय लावू शकला हा प्रश्नच आहे.
आम्ही तर डू नॉट डिस्टर्ब करूनसुद्धा " पैशे हवेत का , लोन वाले , क्रेडीट कार्ड वाले असले फोन येतच रहातात
1 Jun 2022 - 12:51 pm | श्वेता व्यास
मला समजलेला अर्थ - ज्या म्हाताऱ्याला फोन केला होता तो अमिताभची जाहिरात पाहून अलर्ट झाला होता म्हणून फसवणाऱ्याला अमिताभचा राग आला.
1 Jun 2022 - 1:47 pm | कॉमी
करेक्ट. हाच अर्थ अभिप्रेत होता.