शशक'२०२२ - व्यसन

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
8 May 2022 - 12:26 pm

बॉम्ब फेकून त्याने एकास जायबंदी नी एकास ठार केले. दुसर्या महायुध्दात शोध लागलेला “मोलोटोव” शत्रूने फेकल्याने त्याचा सहकारी होरपळून निघाला. दोन सहकारी संपल्याने युध्द जिंकवण्याची जबाबदारी आपली आहे ह्याची त्याला जाणीव होती. जातीचा सैनिक होता तो. स्नायपर वर स्कोप चढवून त्याने आवाजाच्या दिशेने रोखली. एका क्षणासाठी शत्रू खिडकीत आला की “हेडशाॅट” द्यायचा नी खल्लास, तेव्हाच तर आपण “शार्पशूटर” म्हणवले जाऊ. त्याने अर्जूनासारखी एकाग्रता साधली.
“आले, आले”
येनारे आवाज त्याच्या कानापर्यंत येत होते पण त्याला ऐकू येत नव्हते.
त्याला फक्त खिडकी दिसत होती. ईतक्यात त्याच्या कानाखाली पडली, “शत्रूने” जोरदार हल्ला चढवला होता. स्मार्टफोन “आडव्याचा ऊभा” केला पण तोपर्यंत ऊशीर झाला होता.

प्रतिक्रिया

सुरसंगम's picture

8 May 2022 - 4:46 pm | सुरसंगम

+१

पब जी कि जिटीएवाय सिटी

Bhakti's picture

8 May 2022 - 4:56 pm | Bhakti

:))

तुषार काळभोर's picture

8 May 2022 - 5:59 pm | तुषार काळभोर

२००० च्या दशकातील गेमरचे व्यवच्छेदक लक्षण!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2022 - 8:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारी.

-दिलीप बिरुटे

Bhakti's picture

8 May 2022 - 4:56 pm | Bhakti

+१

स्मार्टफोन आडव्याचा उभा केला म्हणजे काय?कळले नाही तोपर्यत ऊशीर झाला म्हणजे मृत्त्यु समोर आला हे कळले व बहुतेक तो मेला हाच शेवट .पण मोबाईल आडव्याचा उभा
केला याचा खुलासा केल्यास छान .

स्मार्टफोन आडव्याचा उभा केला म्हणजे काय?कळले नाही तोपर्यत ऊशीर झाला म्हणजे मृत्त्यु समोर आला हे कळले व बहुतेक तो मेला हाच शेवट .पण मोबाईल आडव्याचा उभा
केला याचा खुलासा केल्यास छान .

स्मार्टफोन आडव्याचा उभा केला म्हणजे काय?कळले नाही तोपर्यत ऊशीर झाला म्हणजे मृत्त्यु समोर आला हे कळले व बहुतेक तो मेला हाच शेवट .पण मोबाईल आडव्याचा उभा
केला याचा खुलासा केल्यास छान .

अमरेंद्र बाहुबली's picture

8 May 2022 - 9:17 pm | अमरेंद्र बाहुबली

बहुतेक तो गेम खेळता खेळता रस्त्याने जात असावा आणी एकाग्रता साधल्याने त्याचं आजूबाजूला लक्ष नसावं, त्यामुळे अपघात होऊन तो मेला असावा. अशी कथा असावी. कथेचे नाव व्यसन आहे म्हणजे मोबाईल गेमचे त्याला व्यसन असावे.

तुषार काळभोर's picture

14 May 2022 - 7:27 am | तुषार काळभोर

ईतक्यात त्याच्या कानाखाली पडली, “शत्रूने” जोरदार हल्ला चढवला होता.
>> भौतेक आईबापानं कानफाटवला असेल!!

अमरेंद्र बाहुबली's picture

14 May 2022 - 1:43 pm | अमरेंद्र बाहुबली

बरोबर. हेच आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 May 2022 - 9:14 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

पालकांनी ठोकुन काढला त्याला.

Bhakti's picture

9 May 2022 - 4:31 pm | Bhakti

होय!असंच दिसतेय.

+१
मला तेच वाटले.
छान आहे कथा

असा मी असामी's picture

9 May 2022 - 3:38 pm | असा मी असामी

+१

प्रचेतस's picture

10 May 2022 - 9:19 am | प्रचेतस

-१
कथा वाचताना अशुद्धलेखन खड्यासारखे बोचतेय.

निओ's picture

10 May 2022 - 3:04 pm | निओ

+१

काड्यासारू आगलावे's picture

10 May 2022 - 4:09 pm | काड्यासारू आगलावे

+१

संजय पाटिल's picture

10 May 2022 - 4:18 pm | संजय पाटिल

+१

कपिलमुनी's picture

10 May 2022 - 8:43 pm | कपिलमुनी

+१

सौन्दर्य's picture

10 May 2022 - 11:10 pm | सौन्दर्य

ठाक ठीक म्हणून मार्क नाही.

ब़जरबट्टू's picture

11 May 2022 - 12:36 am | ब़जरबट्टू

लोल ! पब जी !

तुषार काळभोर's picture

14 May 2022 - 7:28 am | तुषार काळभोर

+१

चेतन सुभाष गुगळे's picture

25 May 2022 - 10:57 pm | चेतन सुभाष गुगळे

स्मार्टफोन ऑनलाईन अभ्यासाकरिता उभा धरायचा आणि गेमकरिता आडवा का? तरीही ठीक आहे.

चौथा कोनाडा's picture

26 May 2022 - 6:13 pm | चौथा कोनाडा

+१

भारी !

सौंदाळा's picture

26 May 2022 - 6:28 pm | सौंदाळा

+१