Skip to main content

शशक'२०२२ - व्यसन

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 08/05/2022 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
बॉम्ब फेकून त्याने एकास जायबंदी नी एकास ठार केले. दुसर्या महायुध्दात शोध लागलेला “मोलोटोव” शत्रूने फेकल्याने त्याचा सहकारी होरपळून निघाला. दोन सहकारी संपल्याने युध्द जिंकवण्याची जबाबदारी आपली आहे ह्याची त्याला जाणीव होती. जातीचा सैनिक होता तो. स्नायपर वर स्कोप चढवून त्याने आवाजाच्या दिशेने रोखली. एका क्षणासाठी शत्रू खिडकीत आला की “हेडशाॅट” द्यायचा नी खल्लास, तेव्हाच तर आपण “शार्पशूटर” म्हणवले जाऊ. त्याने अर्जूनासारखी एकाग्रता साधली. “आले, आले” येनारे आवाज त्याच्या कानापर्यंत येत होते पण त्याला ऐकू येत नव्हते. त्याला फक्त खिडकी दिसत होती. ईतक्यात त्याच्या कानाखाली पडली, “शत्रूने” जोरदार हल्ला चढवला होता. स्मार्टफोन “आडव्याचा ऊभा” केला पण तोपर्यंत ऊशीर झाला होता.

वाचने 13009
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

+१

स्मार्टफोन आडव्याचा उभा केला म्हणजे काय?कळले नाही तोपर्यत ऊशीर झाला म्हणजे मृत्त्यु समोर आला हे कळले व बहुतेक तो मेला हाच शेवट .पण मोबाईल आडव्याचा उभा केला याचा खुलासा केल्यास छान .

In reply to by nutanm

बहुतेक तो गेम खेळता खेळता रस्त्याने जात असावा आणी एकाग्रता साधल्याने त्याचं आजूबाजूला लक्ष नसावं, त्यामुळे अपघात होऊन तो मेला असावा. अशी कथा असावी. कथेचे नाव व्यसन आहे म्हणजे मोबाईल गेमचे त्याला व्यसन असावे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ईतक्यात त्याच्या कानाखाली पडली, “शत्रूने” जोरदार हल्ला चढवला होता. >> भौतेक आईबापानं कानफाटवला असेल!!

+१

+१

-१ कथा वाचताना अशुद्धलेखन खड्यासारखे बोचतेय.

+१

+१

+१

+१

लोल ! पब जी !

+१

स्मार्टफोन ऑनलाईन अभ्यासाकरिता उभा धरायचा आणि गेमकरिता आडवा का? तरीही ठीक आहे.

+१