सगळ्या चिंतांनो, त्राग्यांनो, तणावांनो, भित्यांनो..
रोज थोडंथोडं नका छळू.
तुमची युनिटी करा
आडरानात गाठून मुंडी मुरगाळा
विषय संपवा
सुटकेची एकही आशा ठेवू नका
इकडे पहा
मी इथे ह्या बुडबुड्यात आहे
या आणि पहा
जिवंतपणाची कसलीही सळसळ तुम्हाला दिसणार नाही.
हा बुडबुडा आपोआप फुटायची वाट बघत मी पडून
आहे..
मी स्वतःहून तो फोडणार नाही
तेवढी ऊर्जाही माझ्यात नाही
आणि ज्या रस्त्याचा शेवट माहित नाही, त्या रस्त्याने कधी गेलो नाही..
म्हणून तुम्ही सगळे मिळून या
मला उचलून उघड्या जगात फेका
दोन दिवसांच्यावर मी टिकणार नाही
शब्द देतो..!
बाकी कसाही असलो तरी, मी शब्दाला जागणारा
माणूसाय..!
कारण शब्दांशिवाय दुसरं काही आलंच नाही मला..
प्रतिक्रिया
9 May 2022 - 8:13 am | भागो
+१
आवडली.कविता.
9 May 2022 - 4:31 pm | चांदणे संदीप
-१
शतशब्द'कथा' स्पर्धेत कवितेचं प्रयोजन कळालं नाही. मुक्तक ठीक.
सं - दी - प
9 May 2022 - 5:58 pm | ज्ञानोबाचे पैजार
मुक्तकच वाटतय...
"हे स्वर्गस्थ शक्तींनो" च्या चालीत म्हणुन बघा मज्जा येते, लै भारी वाटतं,
कदाचित एकपात्री कथा म्हणता येईल
पैजारबुवा,
14 May 2022 - 7:22 am | तुषार काळभोर
"हे स्वर्गस्थ शक्तींनो" च्या चालीत म्हणुन बघा मज्जा येते, लै भारी वाटतं,
>> अगदी !!
9 May 2022 - 6:49 pm | कॉमी
आवडली.
9 May 2022 - 11:15 pm | भागो
माझ काही चुकले का? प्रत्येक महान नाटकात अशी गद्य/पद्य आहेत.
श. श. क.
शत शब्द कथा-कविता.
मला अत्यंत आवडले.