श श क २०२२

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
17 May 2022 - 07:49

शशक'२०२२ - चॅरिटी

बरीच वर्षे घासून एममएनसीत नोकरी लागल्यावर लै खूष झालो. दुसर्‍याच माहिन्यापासून चॅरिटीसाठी विनंत्या येउ लागल्या. माझं सहकारी, मित्र-मैत्रिणी आणि परिवारवर्तुळ इतकं मोठं असल्याचं मलाच आश्चर्य वाटलं. सामाजिक परिस्थिती गंभीर होती. कुणाला कचरा वेचक आणि मैला साफ करणार्यांना संरक्षक वस्तू द्यायच्या होत्या, कुणाला दरवर्षी लाखोंच्या संख्येने शिक्षण अर्धवट सोडणार्या मुलींना सॅनिटरी पॅड्स द्यायचे होते.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
16 May 2022 - 07:54

शशक'२०२२ - वेदना

मरण !
हा शब्द ऐकल्यावर माणसं दचकतात. दुसऱ्याचं मरण पाहिलं तरी आणि स्वतःच्या मरणाचा नुसता विचार जरी मनात आला तरी . हा माणसाच्या आयुष्यातला न टाळता येणारा भाग . दुःखद !
पण जो या जगात आलाय तो जाणारच . हा साधा नियम आहे निसर्गाचा. कोणी जगून जातात तर कोणी अकाली जातात . पण जातात हे नक्की !
टिपूर चांदणं पडलेलं . मी दाट झाडीमधून चाललो होतो. लांब. नदीच्या दिशेने .

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
15 May 2022 - 11:36

शशक'२०२२ - लक्षवेध

“युद्ध सीमेवर फार कमी लढले जाणार आहे. शत्रू आता सरकार, प्रशासन , न्यायपालिका , विद्यापिठे, माध्यमे , इत्यादी महत्वाच्या संस्थांमधे शिरकाव करतील. देश खिळखिळा करून घाव घातले जातील. असे युद्ध कमी खर्चाचे व परिणामकारक असेल” राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत सुरक्षा सल्लागार बोलत होते.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
15 May 2022 - 11:35

शशक'२०२२ - अफेअर

तिला पहायला तो आला होता तेव्हा ती मनातून जरा घाबरली होती. खरं तर तो तिला खूप आवडला होता. पण पूर्ण वेळ तो थंडपणे दुसरीकडेच पहात होता. शेवटी त्याचा होकार आल्यानंतर तिला जरा आश्चर्य वाटलं.

साखरपुडा झाल्यावर दोघे रोज भेटायला लागले. अजूनही तो गप्पगप्प असायचा. लग्न जवळ आले तेव्हा ती अधिकाधिक निरूत्साही होत गेली. त्याला कसे सांगावे, त्यावर तो काय म्हणेल याचा तिला अंदाजच येत नव्हता.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
15 May 2022 - 11:35

शशक'२०२२ - गारवा

काय म्हणावं या बाईच्या जन्माला. दिवसभर स्वयंपाक घरात आणि रात्रभर बिछान्यात. नुसती तगमग. नवरोबा दिवसभर चड्डीवर हिंडतो, रात्री तर सांगायलाच नको. कसाबसा दिवस जातो कामामध्ये पण रात्रीचा त्रास काय सहन होत नाही.
सांगता कोणाला. शेजारची जोशीण बाई टोमणा कसा मारते, "आमच्या ह्यांना नाही बाई एवढं सांगावं लागत, एकदा सांगितले कि चुपचाप ऐकतात".

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
14 May 2022 - 07:12

शशक'-२०२२ - आम्हीही महाराजांचेच!

"ए.. दगडं कशाला मारतो आहेस भाड्या.. एवढ्यात चढली काय?"
"मी नाही.. त्या झाडाच्या फांदीनं मला कानफटवलंय आत्ताच.."
"आँ? अरे मला वाटलं तुम्ही दोघांनी हाणलंय मला आत्ता.."
तेवढ्यात त्या काळोख्या रात्रीत, एक कानठळ्या बसवणारा आवाज घोंगावायला लागला.. अन् मग त्या तिघांची पाचावर धारण बसली.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
14 May 2022 - 07:11

शशक'२०२२ - सोन्याच्या बांगड्या

सुखी कुटूंब.आईबाबा,भाऊ,आजी, आजीची लाडकी.

आजोबांच्या पाऊलवाटेवर चालत नुकतीच ती पण डाॅक्टर झाली.आजीला केव्हढा अभिमान .....

महामारीने विक्राळ रूप धारण केले.सारे चिंताग्रस्त पण ती मात्र बिनधास्त. शेजारी पाजारी नाती दुरावली.

पहिल्यांदा भाऊ,आजी आणी पाठोपाठ आई.....उरले फक्त बाबा आणी तीच.

काही दिवसांनी एक आजी वाॅर्ड मधे आल्या.आजी नातीचे नाते जुळले.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
14 May 2022 - 07:09

शशक'२०२२ - वेड?

"...हो ! आणि बाबा चीनहून आल्यानंतर तिचं चहाचं वेड खूपच वाढलं होतं. त्यांनी तिकडून आणलेल्या टी सेटमधून ती सारखी चहा प्यायची. त्याच्याजवळ जरी कोणी गेलं तरी जोरजोरात अंग हलवायची. झोपूनच असायची, आवाज फुटत नव्हता. पण मी आले तेंव्हामात्र माझ्याशी बोलली. ' बोचलं ग खूप ' एव्हढच म्हणत होती. नीट ऐकल्यावर समजलं.काय बोचलं, कुणी बोललं का तिला, देव जाणे!
__ हो. ये. अच्छा!"

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
13 May 2022 - 22:02

शशक'२०२२ - Attention

SOS :

username : stsdVm4XBKGqZcka
password : ZGkf?7vt37cPefVK

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
13 May 2022 - 19:30

शशक'२०२२ - ...

काही दिवसांत होत्याचं नव्हतं झालं. आठवड्यापूर्वी टेरालुना कॉइनची किंमत ११६$ होती- आणि मी करोडपती होतो. आज तीच क्रीप्टोकरन्सी ट्रेड होत होती-

०.००००३८१२$ वर!

पोटात अजस्त्र गोळा, सुन्नपणा.

'गमावण्याऐवढेच घातले असते तर- स्टॉप लॉस पाळला असता तर'.... जर आणि तर.

दुपारीच ऑफिसमधून घरी आलो.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
13 May 2022 - 12:37

शशक'२०२२- सामना

विश्वचषकाचा अंतिम सामना ऐन रंगात आला होता. ह्याच्या संघाने मागील विश्वचषकात अंतिम सामन्यातच माती खाल्ली होती. समोरचा संघ पण खूपच चिवट होता, त्यांनी कधीच विषवचशक जिंकला न्हवता हा सामना त्यांच्यासाठी सुद्धा महत्वपूर्ण होता.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
13 May 2022 - 12:35

शशक'२०२२- पूर्णब्रह्म

जेवायला वाढताना तिने नेहेमीप्रमाणे फ्रिज उघडला.
सगळ्यांना ताजे अन्न वाढल्यावर सवयीप्रमाणे फ्रिझमधली कालची उरलेली खिचडी गरम करुन तिने फक्त स्वतःसाठी घेतली.
तो नेहेमीप्रमाणे तिच्यावर चिडला.
ताजे अन्न असताना मुद्दामुन शिळे अन्न संपवायची काय गरज?
त्याच्याकडे दुर्लक्ष करुन अन्न वाया गेलेले पाहवत नाही असे म्हणत तिने खिचडीचा घास तोंडात टाकला.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
13 May 2022 - 12:34

शशक'२०२२- सेन्सेशन....

या रोज रोजच्या प्रोब्लेम्सने वैताग आला आहे !
काय तेच तेच महागाई , गॅस , पेट्रोल... माझे बरे आहे , घरी विचारणारे कोणी नाही , पण लोकांचे तोंड कोण बंद करणार ? खरच लोकांना दुसरी काही कामे नाहीत काय ? विरंगूळा म्हणून आयपीएल बघावे तर तेही फ्लॉप चालले आहे.. तिकडे बोर्डर पलीकडे पाकिस्तानचे ल लागल्याने त्याही बातम्या नाहीत..

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
12 May 2022 - 17:23

शशक'२०२२ - टेलिपॅथी

“जेवायला वाढ, खूप भूक लागलीय.” तो घरात शिरत म्हणाला.

दिवाळीचा पाडवा,ती हरखली, किंचीत लाजली सुद्धा.काय हो अचानक कसे काय?आणी ते सुद्धा रात्रीच्या साडेअकरा वाजता.तो नुसताच गालात हसला.झोपलेल्या मुलांकडे प्रेमाचा एक कटाक्ष टाकला.

आई बाबा तुम्ही येणार नाही म्हणून तुमच्या बहिणीकडे गेलेत.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
12 May 2022 - 17:19

शशक'२०२२ - समाजप्रबोधनात अंधश्रद्धा

समाजप्रबोधन करणार्या साहेबांचं जोरात भाषण चालू होतं. आज साहेब धर्मावर बोलू लागले. रूढी, परंपरा, पूजा-अर्चा, देव सगळं खोटं आहे, आपण या अंधश्रद्धांमधून बाहेर पडलं पाहिजे. साहेबांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडत होता. बसलेले श्रोते आणि मंचावरचे सर्व लोक आज साहेबांच्या या नव्या अवताराकडे आश्चर्याने बघत होते. साहेब जोषात होते. तेवढ्यात एक बाई मंचापाशी येऊन उभी राहिली.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
12 May 2022 - 17:17

शशक'२०२२ - पेच

शुभमंगल वधू वर सूचक केंद्राच्या संचालिका, प्रमिला ताई यांचे फार नाव होते. वक्त्या, सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजिका अशी अनेक बिरुदं त्या मिरवीत होत्या.
ऑफिस बंद करायच्या गडबडीत त्यांनी सेक्रेटरीला हाक मारली, मुग्धा, ती मंगळी मुलामुलींची यादी, अमेरिकेतील वरवधू, अपंग वर वधू, पत्रिका पाहणारे, न पाहणारे सगळे नीट सॉर्ट करून ठेवलेस नं? नाहीतर खूप गोंधळ उडतो बघ क्लायंट्स समोर!

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
12 May 2022 - 17:16

शशक'२०२२ - हाऊ डिड यू डाय?

“आर्टीफिशिअल इंटेलिजन्सची कमाल आहे”
“पण हे सॉफ्टवेअर कसं काम करतं?”
“भूतकाळातल्या व्यक्तीचं लेखन आणि त्या व्यक्तीचा मूळ आवाज या सॉफ्टवेअर मध्ये फीड करायचा”
“ओके मग?”
“हे सॉफ्टवेअर ती सर्व माहिती प्रोसेस करतं”
“आणि त्या व्यक्तीचा मूळ आवाज शोधून काढतं?”
“फक्त शोधून काढत नाही, तर त्या व्यक्तीच्या मूळ आवाजात बोलतं सुद्धा”

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
12 May 2022 - 17:13

शशक'२०२२ - बाप

शेताततला लाखाचा माल मार्केटला पोहोचू शकला नाही, खराब झाला. गेले लाख वाया, पण बाप महत्वाचा होता. बापासाठी एवढं करायला नको?

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
12 May 2022 - 07:46

श श क २०२२ - नवा काळ..

शंकरराव एक सुखी गृहस्थ, त्यांची पन्नाशी जवळ आली होती. बायको, दोन मुली नी एक मुलगा असा सुखी संसार. दोन्ही मुलींच्या लग्नाची चिंता त्यांना सतावत होती. नवा काळ, त्यामुळे मुलींनाच विचारावं “कुणी मनात आहे का?, कुणी आवडलंय का?” असं त्यांनी ठरवलं, दोन्ही मुलींना त्यांनी बोलावलं.
मोठी मुलगी:~ “पप्पा, मी लेस्बियन आहे, मला मूलं आवडत नाहीत मूली आवडतात, मी मुलीशीच लग्न करनार”

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
11 May 2022 - 23:24

श श क २०२२ -डिलीवरी

“जेवायला वाढ, खूप भूक लागलीय.” तो घरात शिरत म्हणाला.
“अकरा साडेअकरापर्यंत कशाला डिलीवऱ्या करत हिंडायचं?”
“अगं, ड्यूटी असतीय, वाढ तू”
“आणि खाल्लं का काही वडापाव वगैरे? की संध्याकाळपासून नुसतेच हिंडताय दुसऱ्यांसाठी गल्लीबोळातून बाईकवरून?”
“तुझं झालं का? आणि सोहमचं? त्याने घरचा अभ्यास केला का नीट?”
“वाढलं त्याला. झोपला तो कधीच. उद्या विचारा त्याला अभ्यासाचं.”