शुभमंगल वधू वर सूचक केंद्राच्या संचालिका, प्रमिला ताई यांचे फार नाव होते. वक्त्या, सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजिका अशी अनेक बिरुदं त्या मिरवीत होत्या.
ऑफिस बंद करायच्या गडबडीत त्यांनी सेक्रेटरीला हाक मारली, मुग्धा, ती मंगळी मुलामुलींची यादी, अमेरिकेतील वरवधू, अपंग वर वधू, पत्रिका पाहणारे, न पाहणारे सगळे नीट सॉर्ट करून ठेवलेस नं? नाहीतर खूप गोंधळ उडतो बघ क्लायंट्स समोर!
'आत येऊ का मॅम ..? ' एक गोरटेली, नाजूक मुलगी विचारत होती.
'ये, ना. कुणाचं नाव नोंदवायचे आहे?' प्रमिला ताईंनी विचारलं.
'अं....माझंच..म्हणजे....'. ती चाचरत म्हणाली.
'पण..तुमच्याकडे LGBTQ ची स्वतंत्र यादी असेल ना..? '
प्रमिला ताई अवाक झाल्या ! त्यांच्या जवळ याचे उत्तर नव्हते.
प्रतिक्रिया
12 May 2022 - 6:01 pm | चौथा कोनाडा
+१
अशा लोकांना कोणी मिळत नसेल तर भविष्यात अश्याच सुचक मंडळाचा उपाय असेल ?
अवघड आहे अश्या लोकांचं जगणं
12 May 2022 - 6:22 pm | कॉमी
पण पुरेसा ट्विस्ट नाहीये.
12 May 2022 - 7:25 pm | सुरसंगम
आम्ही ठरलो अडाणी, आता LGBTQ म्हंजा काय रं भाऊ.
जरा इस्काटुन सांग ब्र.
13 May 2022 - 11:23 pm | सौन्दर्य
तुमचा प्रश्न खरा आहे असं समजून उत्तर देत आहे. Lesbian, gay, bisexual, transgender, अँड queer.
समाज कोठेही जाऊ दे, निसर्गाच्या विरुद्ध काहीही करणे क्षम्य नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. निसर्गाने पुरुष-स्त्री निर्माण केली त्या मागचा एक उद्देश मानव (तसे बघायला गेलो तर सर्वच जीव सृष्टी) वंश पुढे चालावा हा एक नक्कीच होता आणि आहे. ही LQBTQ मंडळी हा उद्देश कसा साध्य करणार ?
15 May 2022 - 8:03 pm | कॉमी
१. नैसर्गिक अनैसर्गिक हे द्वैत अतार्किक आहे. माणसे निसर्गाचा भाग आहेत. त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टी नैसर्गिक असतात.
बरं, तो अतार्किक निकष लावला तर कपडे घालणे, म्हाताऱ्या माणसांची काळजी घेणे, वाहने वापरणे, दिवे वापरणे ह्या आणि इतर अगणित गोष्टी अनैसर्गिक म्हणून गणल्या जातील.
२. कोणाचा उद्देश आहे हा ? आणि आज किती वेळा मुलं जन्माला घालण्यासाठी सेक्स होते ? जे सेक्स प्रोटेक्शन वापरून होते ते सुद्धा निव्वळ आनंदासाठी असते, त्याला सुद्धा तुम्ही अक्षम्य मानता काय ?
12 May 2022 - 7:59 pm | सौंदाळा
+१
13 May 2022 - 6:28 pm | डाम्बिस बोका
LGBTQ साठी वेगळी मंडल लागणार हे नक्की. बुरसरटलेल्या समाजाला कळायला थोडा वेळ लागेल. पण होईल हे नक्की
13 May 2022 - 7:18 pm | dadabhau
अश्या लोकांना नकळत्या वयात "तशी" संगत मिळाल्याने ते "तसे" होतात...मग लग्न करण्यासाठी परत अजून "तसला/ली" कशायला पाहीजे? मारत बसावं तशीच मज्जा...
26 May 2022 - 8:46 am | भागो
+१
27 May 2022 - 9:42 am | कुमार१
+१
27 May 2022 - 10:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सामाजिक प्रश्न.
-दिलीप बिरुटे
27 May 2022 - 6:34 pm | माझीही शॅम्पेन
हायला , टांगा पलटी , माझ्यासाठी हि विजेती कथा आहे
+१