“जेवायला वाढ, खूप भूक लागलीय.” तो घरात शिरत म्हणाला.
“अकरा साडेअकरापर्यंत कशाला डिलीवऱ्या करत हिंडायचं?”
“अगं, ड्यूटी असतीय, वाढ तू”
“आणि खाल्लं का काही वडापाव वगैरे? की संध्याकाळपासून नुसतेच हिंडताय दुसऱ्यांसाठी गल्लीबोळातून बाईकवरून?”
“तुझं झालं का? आणि सोहमचं? त्याने घरचा अभ्यास केला का नीट?”
“वाढलं त्याला. झोपला तो कधीच. उद्या विचारा त्याला अभ्यासाचं.”
“म्हणजे तू जेवली नाहीसच. नको थांबत जाऊ माझ्यासाठी.”
“पण तुम्ही काही खाऊन का नाही घेत संध्याकाळचं?”
“नको, आपण खाणार आपल्याच पैशानी, पण मागे त्या एका डिलीवरी बॉयचा विडियो व्हायरल झाला होता, तसं काहीतरी केलं कुणी तर केवढ्याला पडेल ते. तेव्हापासून भीतीच वाटते काही खायला हा गणवेश घातल्यावर.”
प्रतिक्रिया
11 May 2022 - 11:47 pm | कर्नलतपस्वी
आवडली
12 May 2022 - 5:43 am | कर्नलतपस्वी
+1
11 May 2022 - 11:56 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
11 May 2022 - 11:59 pm | डाम्बिस बोका
+१
12 May 2022 - 12:33 am | सुक्या
+१
12 May 2022 - 1:16 am | गामा पैलवान
+१
वैताग आहे नुसता.
-गा.पै.
12 May 2022 - 4:03 am | लोथार मथायस
+१
12 May 2022 - 6:34 am | एमी
+१
12 May 2022 - 8:44 am | विजुभाऊ
+१
12 May 2022 - 8:56 am | कॉमी
उत्तम शशक. खूप आवडली.
12 May 2022 - 9:23 am | धनावडे
+१
12 May 2022 - 9:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्या बात है. मस्त.
-दिलीप बिरुटे
12 May 2022 - 10:14 am | मोहन
+१
छान जमली आहे.
12 May 2022 - 10:21 am | कुमार१
+१
12 May 2022 - 10:29 am | सौंदाळा
+१
12 May 2022 - 1:55 pm | श्वेता२४
+१
12 May 2022 - 3:02 pm | संजय पाटिल
+१
12 May 2022 - 5:31 pm | चौथा कोनाडा
+१
किती खडतर असते काही लोकांचे जीवन !
12 May 2022 - 6:53 pm | तर्कवादी
सामान्य माणसाची व्यथा सांगणारी कथा म्हणून आवडली.
12 May 2022 - 7:16 pm | स्वधर्म
टच झाली कथा
12 May 2022 - 8:16 pm | पुंबा
+१
13 May 2022 - 12:31 am | सुखी
+१
13 May 2022 - 6:41 am | nanaba
+१
13 May 2022 - 2:17 pm | मित्रहो
आवडली
13 May 2022 - 3:12 pm | नगरी
+1
14 May 2022 - 7:52 am | तुषार काळभोर
+१ आवडली!
15 May 2022 - 7:52 am | अभिजीत अवलिया
+१
16 May 2022 - 5:28 am | प्राची अश्विनी
+1
22 May 2022 - 1:18 pm | कॉमी
मतदान.
22 May 2022 - 4:35 pm | स्मिताके
+१
भिडणारं कटु वास्तव.
22 May 2022 - 6:48 pm | यश राज
+१
24 May 2022 - 12:19 pm | प्रसाद_१९८२
+१
24 May 2022 - 2:22 pm | असा मी असामी
+१
24 May 2022 - 3:11 pm | आनंद
+१
25 May 2022 - 6:28 pm | चेतन सुभाष गुगळे
इतके प्लस वन? वास्तवापासून लेखक दूर आहे ते तर दिसतंच पण प्रतिसादक देखील.. मी माझ्या नेहमीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो तेव्हा अनेकदा तिथे गणवेशातले फूड डिलीव्हरी बॉय्ज (आणि आतातर कितीतरी गर्ल्स देखीळ) त्यांच्या डिलीव्हरी ऑर्डर्स तयार होईपर्यंत टेबलाभोवती बसून गणवेशातच अन्नाचे सेवन करीत असतात. त्यांचे व्हिडीओज् कोणी बनवत नाहीत कारण सर्वांना ठाऊक असते की हे डिलीवरी फूडचा भाग नाहीये. रस्त्यावर थांबून जेवण करायची गरज नाहीच डिलीवरी पर्सनला. तसेही एकदा रेस्टॉरंट कडून डिलीवरी फूड अॅक्सेप्ट करुन बाईक जर्नी चालू केला की मध्ये थांबायचे नसते. रिअल टाईम ट्रॅकिंग होऊन ते कस्टमरला दिसत असते. याशिवाय त्यांनी स्वतःच्या घरचा डबा आणून रेस्टॉरंटमध्ये खाल्ला तरी त्यांना "इथे बाहेरचे खाद्यपदार्ध खाण्यास मनाई आहे" असा नियम उपाहारगृहावाले लावत नाहीत. काही झाले तरी त्यांचे व्यावसायिक संबंध असतात आणि अनेकदा व्यक्तिगत संबंध देखील बनतात.
लोक संगणकासमोर बसून केवळ कल्पनाशक्ती ताणत आहेत का? प्रत्यक्ष समाजात वावरुन वस्तुस्थिती पाहिल्यावर कथा लिहिली तर अशा चूका टाळता येतील.
27 May 2022 - 7:26 pm | nutanm
+1 आवडली.