“आर्टीफिशिअल इंटेलिजन्सची कमाल आहे”
“पण हे सॉफ्टवेअर कसं काम करतं?”
“भूतकाळातल्या व्यक्तीचं लेखन आणि त्या व्यक्तीचा मूळ आवाज या सॉफ्टवेअर मध्ये फीड करायचा”
“ओके मग?”
“हे सॉफ्टवेअर ती सर्व माहिती प्रोसेस करतं”
“आणि त्या व्यक्तीचा मूळ आवाज शोधून काढतं?”
“फक्त शोधून काढत नाही, तर त्या व्यक्तीच्या मूळ आवाजात बोलतं सुद्धा”
“महाराजांशी सुद्धा बोलता येईल?”
“नाही, मूळ आवाजाचा नमुना फीड करावा लागतो”
“ओह.. आता मग कोणाशी बोलता येईल?”
त्या सायंटिस्टने कॉम्पुटरच्या स्क्रीनच्या पहिल्या नावावर क्लिक केले
“हॅलो हाय.. सर... इज धिस मिस्टर बोस?”
“येस”
“सर.. हाऊ डिड यू डाय?”
तो आवाज हलकेच हसतो आणि म्हणतो..
“इट वॉज ए वेल प्लॅन मर्डर”
प्रतिक्रिया
12 May 2022 - 6:20 pm | कॉमी
जम्या. संकल्पना आणि शेवटचा शब्दखेळ दोन्ही छान.
12 May 2022 - 6:33 pm | श्वेता व्यास
+१
12 May 2022 - 7:12 pm | चांदणे संदीप
फक्त मूळ आवाज आणि लेखन फीड केल्यावर ते मर्डर वगैरेंबद्दल कसं काय सांगू शकेल? त्यात विकीपीडियासारखं इत्थंभूत सगळंच फीड करायला लागेल.
सं - दी - प
12 May 2022 - 7:51 pm | वामन देशमुख
+१
12 May 2022 - 10:16 pm | सुखी
+१
13 May 2022 - 3:14 am | nutanm
छान धक्कादायक शेवट !!. व काहीतरी त्या महान व्यक्तिच्या मृत्युबद्दल सर्व पिढ्यात असणारी संशयास्पद मृत्युबद्दल सर्वाच्याच मनात घोळत असलेली शंका ऊघड खरणारा व सर्वाच्या मनातला असलेली गोष्ट उघडून दाखवणारा शेवट. मस्त मस्त !!
न
13 May 2022 - 10:27 am | श्वेता२४
+१
13 May 2022 - 5:24 pm | मोहन
+१
13 May 2022 - 5:51 pm | चौथा कोनाडा
+१
14 May 2022 - 7:54 am | तुषार काळभोर
+०.९
ती कृत्रिम बुद्धीमत्ता उपलब्ध माहिती प्रोसेस करून स्वतःचा निष्कर्ष पण काढते बहुतेक
22 May 2022 - 1:18 pm | कॉमी
मतदान