श श क २०२२ - नवा काळ..

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
12 May 2022 - 7:46 am

शंकरराव एक सुखी गृहस्थ, त्यांची पन्नाशी जवळ आली होती. बायको, दोन मुली नी एक मुलगा असा सुखी संसार. दोन्ही मुलींच्या लग्नाची चिंता त्यांना सतावत होती. नवा काळ, त्यामुळे मुलींनाच विचारावं “कुणी मनात आहे का?, कुणी आवडलंय का?” असं त्यांनी ठरवलं, दोन्ही मुलींना त्यांनी बोलावलं.
मोठी मुलगी:~ “पप्पा, मी लेस्बियन आहे, मला मूलं आवडत नाहीत मूली आवडतात, मी मुलीशीच लग्न करनार”
शंकररावांना धक्का बसला त्यांनी लहान मूलीकडे पाहीलं, “पप्पा, मी देखील लेस्बियन आहे, मलाही मूली आवडतात.” शंकरराव कोसळलेच.
संताप, तडफड, अनेक भावना एकाच वेळी ऊचंबळून आल्या.
“ह्या घरात मूलगा कुणालाच आवडत नाही का?” ते संतापात ओरडले.
“पप्पा, मला आवडतात”… :चिरंजीव ऊद्गारले.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

12 May 2022 - 7:58 am | प्रचेतस

अररारा =))

nutanm's picture

12 May 2022 - 8:00 am | nutanm

छान शेवट !!

विजुभाऊ's picture

12 May 2022 - 8:42 am | विजुभाऊ

तिन्ही मुलांच्या पत्रिकेत शुक्र इतका दूषीत असावा याला काय कारण असावे?

कर्नलतपस्वी's picture

12 May 2022 - 3:44 pm | कर्नलतपस्वी

आईबापाच्या पत्रिकेत शनी,राहू केतू वक्री आहेत.
आवडली.

जेम्स वांड's picture

12 May 2022 - 9:21 am | जेम्स वांड

लैच भयानक प्लॉट ट्विस्ट झाला की हो हा लॉल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2022 - 9:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे देवा. लै भारी.

-दिलीप बिरुटे

विजुभाऊ's picture

12 May 2022 - 10:11 am | विजुभाऊ

अरे देवा. लै भारी.

कॉमेंट आवडली.
ही दोन वाक्ये एक स्वतंत्र कथा म्हणूनही घेता येईल

सुरसंगम's picture

12 May 2022 - 9:54 am | सुरसंगम

ही शशक आहे कां?

स्पर्धेत ली की बाहेरची?

Bhakti's picture

12 May 2022 - 10:05 am | Bhakti

हे हे :)

तर्कवादी's picture

12 May 2022 - 12:02 pm | तर्कवादी

शीर्षकात "शशक २०२२"असे शब्द वगळले गेले आहे. तसेच कथा "स्पर्धा" विभागात प्रसिद्ध न होता "जनातलं, मनातलं" मध्ये प्रसिद्ध झालीये.

कॉमी's picture

12 May 2022 - 3:51 pm | कॉमी

असू दे शंकरराव, तसा बॅलन्स बरोबर आहे फक्त एक सून जास्त येणार
;)

कर्नलतपस्वी's picture

12 May 2022 - 4:01 pm | कर्नलतपस्वी

स्पर्धेतली अथवा बाहेरची आसो पण आवडली.
काॅमी भाई गोळाबेरीज मस्त.
कथा मस्त
प्रतीसाद चुस्त.

कर्नलतपस्वी's picture

12 May 2022 - 4:02 pm | कर्नलतपस्वी

स्पर्धेतली अथवा बाहेरची आसो पण आवडली.
काॅमी भाई गोळाबेरीज मस्त.
कथा मस्त
प्रतीसाद चुस्त.

चौथा कोनाडा's picture

12 May 2022 - 6:06 pm | चौथा कोनाडा

आरारा .... सगळीच मुलं अशी अल्पसंख्यांक ?
बाबो, कसं व्हायचं शंकररावांचं ?http://misalpav.com/sites/all/modules/bueditor/icons/x1.png

+१

तर्कवादी's picture

12 May 2022 - 6:59 pm | तर्कवादी

नवा काळ पढके दैनिक समझा क्या ? दैनिक नही बोल्ड स्टोरी हु मै :)

स्वधर्म's picture

12 May 2022 - 7:09 pm | स्वधर्म

आहे कथा!

ब़जरबट्टू's picture

12 May 2022 - 10:07 pm | ब़जरबट्टू

लोल !

डाम्बिस बोका's picture

13 May 2022 - 6:29 pm | डाम्बिस बोका

खतरनाक

तुषार काळभोर's picture

14 May 2022 - 7:55 am | तुषार काळभोर

ह्यांच्या घरी कोनत्या गिरणीतून पीठ येत असंल?

मोहन's picture

14 May 2022 - 12:15 pm | मोहन

+१

इतके फ्लेवर्स अचानक वाढलेत?

सुधीर कांदळकर's picture

14 May 2022 - 8:31 pm | सुधीर कांदळकर

+ १. आवडली. एका मित्राच्या मुलाने जातीबाहेर लग्न केले. मित्र म्हणाला मुलीशीच केले हे नशीब.

अमरेंद्र बाहुबली's picture

14 May 2022 - 11:34 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

काड्यासारू आगलावे's picture

14 May 2022 - 11:35 pm | काड्यासारू आगलावे

+१

प्राची अश्विनी's picture

15 May 2022 - 8:32 pm | प्राची अश्विनी

+1

पुष्कर's picture

17 May 2022 - 11:56 am | पुष्कर

मला वाटलं मुलगा म्हणेल - 'मी पण लेस्बियन आहे. मलाही मुलीच आवडतात.'

अनिंद्य's picture

17 May 2022 - 12:31 pm | अनिंद्य

माफ करा पण जोक म्हणून हा संवाद साधारण १० वर्षांपासून वेगवेगळ्या इंग्रजी साईट्सवर अनेकदा वाचलेला आहे. अजूनही अनेक फेबुग्रुप्सवर असेल.

कोणीही आधी वाचलेला नाही याचे आश्चर्य वाटले.

-१

पुष्कर's picture

17 May 2022 - 1:22 pm | पुष्कर

मी वर दिलेला समांतर शेवट हा पण असाच एक जोक म्हणून वाचला होता. पूर्वी ह्याबद्दलची फारशी माहिती नसताना हसू येत असे, पण आता नाही.

श्वेता२४'s picture

17 May 2022 - 12:47 pm | श्वेता२४

+१

कॉमी's picture

22 May 2022 - 1:22 pm | कॉमी

मतदान