शशक'२०२२- पूर्णब्रह्म

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
13 May 2022 - 12:35 pm

जेवायला वाढताना तिने नेहेमीप्रमाणे फ्रिज उघडला.
सगळ्यांना ताजे अन्न वाढल्यावर सवयीप्रमाणे फ्रिझमधली कालची उरलेली खिचडी गरम करुन तिने फक्त स्वतःसाठी घेतली.
तो नेहेमीप्रमाणे तिच्यावर चिडला.
ताजे अन्न असताना मुद्दामुन शिळे अन्न संपवायची काय गरज?
त्याच्याकडे दुर्लक्ष करुन अन्न वाया गेलेले पाहवत नाही असे म्हणत तिने खिचडीचा घास तोंडात टाकला.
ती मीटींग निमित्त दुपारीच परगावी गेली होती.दोन दिवसांसाठी.
रात्रीचा स्वयंपाक त्याने स्वयंपाकीण बाईकडुन बनवुन घेतला.
नेहेमीप्रमाणे त्याचा अंदाज चुकला.बटाट्याची भाजी प्रमाणापेक्षा जरा जास्तच झाली.
तिने बजावुन ठेवल्याप्रमाणे त्याने उरलेले अन्न फ्रिजमध्ये ठेवले.
दुसर्या दिवशी जेवताना वाढताना त्यानेही सवयीने फ्रिज उघडला.
रात्री फ्रिजमध्ये ठेवलेली बटाट्याची भाजी दिसली.
यांत्रिकपणे त्याने ती गरम करुन वाढली.
खरेय अन्न वाया गेलेले पाहवत नाही.
त्याला तिची फार आठवण आली.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

13 May 2022 - 1:21 pm | प्रचेतस

ही १०० शब्दांपेक्षा जास्त दिसते.

प्रचेतस's picture

13 May 2022 - 1:24 pm | प्रचेतस

बाकी ही कथा sunil kachure यांची दिसतेय :)

+१ प्रतिसादा करता फक्त ;))

चेतन सुभाष गुगळे's picture

25 May 2022 - 6:15 pm | चेतन सुभाष गुगळे

प्रत्येक वाक्यानंतर एंटर दाबला आहे म्हणून की काय?

वाह ..काय प्रेम आहे :)
+१

खरेय अन्न वाया गेलेले पाहवत नाही.
त्याला तिची फार आठवण आली.

काय प्रेम वाया चाललंय ...
असा प्रतिसाद पाहिजे ;)
वाया-ऊतू

नगरी's picture

13 May 2022 - 3:18 pm | नगरी

+1

सिरुसेरि's picture

13 May 2022 - 3:20 pm | सिरुसेरि

+१

कामवाल्या बाईंनी स्कीम केली वाटतं त्याला तिची आठवण यावी म्हणून :)

चौथा कोनाडा's picture

13 May 2022 - 5:28 pm | चौथा कोनाडा

दुसर्या दिवशी जेवताना वाढताना त्यानेही सवयीने फ्रिज उघडला.
रात्री फ्रिजमध्ये ठेवलेली बटाट्याची भाजी दिसली.
यांत्रिकपणे त्याने ती गरम करुन (तिला) वाढली.
खरेय अन्न वाया गेलेले पाहवत नाही.
त्याला तिची (आता ही कोण ती ?) फार आठवण आली.

ही वाक्ये गंडलीत का ?

अमरेंद्र बाहुबली's picture

13 May 2022 - 9:19 pm | अमरेंद्र बाहुबली

ही कथा शामळू २ आहे

ब़जरबट्टू's picture

14 May 2022 - 1:06 am | ब़जरबट्टू

छान आहे. बाकी ते शब्द ११० च्या पण पुढे गेलेत.

बाकी जेवण बघुन बायकोची आठवण यायचा धक्का आवडला :)