शशक'२०२२ - स्क्रीनटाईम

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
7 May 2022 - 12:04 pm

माझ्या वाढत्या स्क्रीनटाईमच्या व्यसनाबाबचा मानसोपचारतज्ञाने दिलेला रिपोर्ट वाचून होताच बायोटेलीपोर्टेशनतज्ञ डाॅ गफलावाला मला म्हणाले," तुला या व्यसनातून कायमचं सोडवीन मी . फक्त माझ्या एका प्रयोगात स्वेच्छेने सहभागी होतोयस असं लिहून सही कर इथे"

"काहीही करीन सर पण..." सही करताना मी म्हणालो.

"गुड. हे हेल्मेट घालून या होलोग्राम प्रतिमेत उभा रहा"

कानातला कल्लोळ दुर्लक्षून मी होलोग्राममधे उभा राहिलो.

डोळे उघडले तेव्हा समोर असलेले डाॅ गफलावाला म्हणत होते," कसं वाटतंय? आता वाढता स्क्रीन टाईम वगैरे विसरून जायचं"

"खरंच?"

" हो, काळ कायमचा गोठवलाय तुझ्यासाठी, पण.."

............
"सर ! माझे हात ? पाय? सगळंच द्विमितीत कसं?...कोण हे विकट हसतंय? ..अर्र.. मी कुठाय ? मला स्विच आॅफ केलंत सर?

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 May 2022 - 2:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान.

-दिलीप बिरुटे

भागो's picture

7 May 2022 - 2:50 pm | भागो

+१
आवडली.

विजुभाऊ's picture

7 May 2022 - 2:53 pm | विजुभाऊ

आवडलं.
सुपरमॅन च्या पहिला चित्रपटात असे एक दृष्य होते

Bhakti's picture

7 May 2022 - 8:12 pm | Bhakti

+१

विजुभाऊ's picture

7 May 2022 - 8:31 pm | विजुभाऊ

+१

एमी's picture

8 May 2022 - 5:14 am | एमी

+१

जेम्स वांड's picture

9 May 2022 - 12:04 pm | जेम्स वांड

+१

Nitin Palkar's picture

9 May 2022 - 12:58 pm | Nitin Palkar

+१

प्रचेतस's picture

10 May 2022 - 9:12 am | प्रचेतस

मोठा आशय असलेली कथा १०० शब्दात बसवताना लेखकाची दमछाक झालेली दिसतेय पण प्रयत्न चांगला.

सुक्या's picture

13 May 2022 - 5:23 am | सुक्या

+१