जळू
माणसाच्या आयुष्यात
दोन 'जळू' सापडतात
एक... मनाला चिकटलेली
हि धोकादायक
सतत डसणारी, पीडा देणारी
मानसिक स्वास्थ्य खाणारी
हिला वेळीच चटका देणे उत्तम!
दुसरे ... काही क्षूद्र जीव
जे कारण असो किंवा नसो
तुमच्यावर सतत जळतील
दुर्लक्ष करा
जळतील जळतील
संपून जातील मेणबत्तीसारखे
तुम्ही चालत राहा!
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
20 May 2020 - 5:55 pm | कौस्तुभ भोसले
लिहीलय छान
पण कविता वाटत नाही
21 May 2020 - 12:24 am | कादंबरी...
निश्चितच कविता नाही.
21 May 2020 - 7:22 am | चांदणे संदीप
+१
आतल्या आणि बाहेरच्या, दोन्ही जळूंचे उत्तम निरीक्षण.
आतल्याला आपण जाळायचा आणि बाहेरच्याला जळण्यासाठी सोडून द्यायचा.
सं - दी - प
23 May 2020 - 12:48 am | मन्या ऽ
काही समजलंच नाही.
हे जळु विचार या अर्थी लिहील असेल तर छानेय!
23 May 2020 - 11:56 am | तुषार काळभोर
कविता आवडली.
दोन्ही जळू त्रासदायकच!
23 May 2020 - 7:31 pm | कुमार१
+१
23 May 2020 - 8:04 pm | g.priya
छान विचार वाटला.
कविता अजून चांगल्या पद्धतीने मांडता आली असती
24 May 2020 - 9:10 am | पाषाणभेद
वपू आठवले.
बाकी काही गोष्टींचा वेळीच तुकडा पाडणे आवश्यक असते. विशेषत: आपल्या कडील जीवनमानात.
24 May 2020 - 8:58 pm | श्रीगणेशा
विचार छान, परंतू थोडंसं गद्यात लिहिण्यासारखं वाटलं.