भगीरथ कोसळणार्या भुयारातून बाहेर आला. समोरचे दृष्य पाहून त्याचे अवसान गळाले. पाणीच पाणी. तो दिशाहीनपणे धावू लागला. इतरांचीही तशीच धडपड चाललेली. पळतापळता तो धडकला.
“भगीरथ?” बाळकृष्ण होता.
“बाळकृष्ण, तिथे... तिथून प्रकाश येतो आहे..”
“तीचं काय ? ती बाहेर पडली ?”
अंधारात भगीरथला त्याचा चेहरा दिसत नव्हता.
“न..नाही. इतक्या खोलातून यायला काही रस्ता नाही.”
बाळकृष्णाची आकृती धडाडत भुयाराच्या तोंडात शिरताना त्याला दिसली.
भगीरथ काही वेळ थिजल्यासारखा थांबला आणि पाण्यातून धावू लागला. प्राणपणाने चढत तो प्रकाशाकडे धडपडणार्या गर्दीत मिसळला.
पण...
जेव्हा त्यातूनही फेसाळतं तपकीरी पाणी येऊ लागलं, त्याने संपणार्या प्रकाशाकडे पाहून नियंत्याला दूषण दिले.
-------------
“आई, प्राजक्ताच्या मुळावर पाणी घातलं, तर भसाभस मुंगळे आले बाहेर !”
प्रतिक्रिया
7 May 2022 - 12:07 pm | Nitin Palkar
+१
7 May 2022 - 2:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान.
-दिलीप बिरुटे
7 May 2022 - 2:55 pm | विजुभाऊ
चांगली आहे कथा
8 May 2022 - 6:50 am | एमी
+१
8 May 2022 - 4:49 pm | सुरसंगम
+१
9 May 2022 - 12:46 am | गामा पैलवान
कथा रोचक आहे. 'ती' म्हणजे राणीमुंगी असावी.
-गा.पै.
9 May 2022 - 1:54 am | सुखी
+१
9 May 2022 - 12:00 pm | जेम्स वांड
+१
9 May 2022 - 4:43 pm | Bhakti
खुपदा वाचतेय ... नाही समजली!
उत्सुकतेपोटी +१
9 May 2022 - 5:09 pm | चांदणे संदीप
+१
बऱ्याच आधी मुंगळ्याचा एक ॲनिमेशनपट पाहिलेला त्याची आठवण झाली.
सं - दी - प
9 May 2022 - 6:24 pm | कॉमी
छान.
10 May 2022 - 1:55 am | ब़जरबट्टू
आवडेश !
13 May 2022 - 10:04 am | nanaba
ही सर्वात जास्त आवडली
14 May 2022 - 7:51 am | तुषार काळभोर
+१
14 May 2022 - 10:13 am | कॉमी
चांगली कथा, आवडली.
22 May 2022 - 1:21 pm | कॉमी
मतदान