“मुळ्याची भाजी, वेळ पाहुन खावी” अशी म्हण का बरं नाहीये ? चौथी ब मधल्या त्याने तळमळत विचार केला. डोळे मिटलेले होते.
पाच मिनीटं “मौन”मध्ये काढणे अशक्यप्राय. काहीतरी करायलाच पाहीजे.
त्याने डोळे किलकीले केले, आणि टिचर मोबाईल मध्ये डोकं खुपसून आहेत पाहुन त्याला हायसे वाटले.
डेस्कवर सेलोची स्टीलची बाटली होती. ती स्टीलच्या बाकावर पाडायची आणि होणार्या आवाजासोबत आपला कार्यभाग उरकून घ्यायचा. दुसरा पर्यायच नाही,
बाटली डेस्कच्या उजव्या कोपर्यात होती. हात थेट पोहोचत नव्हता.
तो थोडासा वाकला आणि...
विस्फोट.
विस्फोट आणि हास्यकल्लोळामधल्या पाच सेकंदाच्या स्तब्धतेमध्ये त्याला “वर्गात उमगले मजला, संपले बालपण माझे...” अश्या ओळी सुचल्या. “हम्म, कवितेत छान वाटतील ना या ओळी...?”
प्रतिक्रिया
7 May 2022 - 12:19 pm | कुमार१
+१
7 May 2022 - 1:20 pm | अमरेंद्र बाहुबली
पहीलीच अर्थहीन कथा पाहून वाईट वाटले. -१
7 May 2022 - 2:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रयत्न केला म्हणून प्लस वन. प्रोत्साहनाचं धोरण.
आता एवढं तेवढं चालायचंच.
-दिलीप बिरुटे
8 May 2022 - 8:46 pm | नावातकायआहे
प्रा. डॉ. ना +१.
:-)
7 May 2022 - 2:52 pm | विजुभाऊ
यात काय आहे? विनोद की कथा तेच समजत नाही.
फारच वरवरची वाटली
7 May 2022 - 8:32 pm | विजुभाऊ
-१
10 May 2022 - 5:21 pm | चौथा कोनाडा
निरागस बालविनोद !
पण, निसर्गकॉल विस्फोट आणि बालपण संपण्याचा काय संबंध आहे हे कळले नाही, पंच जाणवला नाही.
10 May 2022 - 11:15 pm | सौन्दर्य
अजिबात आवडली नाही, नो मार्क्स