श श क २०२२

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
20 May 2020 - 12:03

[कविता' २०२०] - शून्य मी.. अनंत मी

शून्य मी.. अनंत मी

पहाटवारा गाऊन जातो,
ऊन सोनसळी जरा विसावे,
मध्यान्हीची सरता काहिली,
कातरवेळी डोळा पाणी

अवचित वाटे हीच वेदना,
हीच कल्पना, हीच कविता,
विरून जाती शब्द परंतु,
गोडगुलाबी धुक्यापरी

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
19 May 2020 - 21:06

[कविता' २०२०] - बरसती धारा

बरसती धारा

बरसती धारा सरसर झरझर
साजण भेटीला निघे साजणी भरभर

नाद हा करिती चुकार पैंजण
टिपत असेल हा नाद तो साजण
नव प्रेमाची मनी नवीच थरथर
बरसती धारा सरसर झरझर

धारांचा पडदा काही दिसेना
कुठे शोधू मी काही कळेना
काय करावे कसे मिटेल अंतर
बरसती धारा सरसर झरझर

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
19 May 2020 - 14:55

[कविता' २०२०] - भुंगा

भुंगा

शांत बसलेलो असतो तेव्हा
कोठून तरी विचारांचा भुंगा डोक्यात शिरतो
मेंदू पोखरतो
दाबून टाकलेल्या जुनाट
कुजक्या आठवणींचा
भुसा बाहेर पाडत राहतो
हुसकून लावावा म्हणता
खोलवर आत जात राहतो
मन बेचैन करतो
चित्त हरपतो
घटकाभर कसलीच मात्रा चालत नाही
हताश करून सोडतो

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
19 May 2020 - 10:27

[कविता' २०२०] - देता निरोप तुजला

देता निरोप तुजला

देता निरोप तुजला, स्मरले क्षणात काही..
सांगायचे तुला जे, विरले मनात काही..

तू घाव जे दिलेले, सारे भरून गेले.
व्रण मात्र खोल त्याचे, उरले उरात काही..

मन थांबता जरासे, सुख सापडून गेले.
जे शोधण्या उगा ते, फिरले दिशात दाही..

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
19 May 2020 - 10:25

[कविता' २०२०] - येवून जा जराशी..

येवून जा जराशी..

येवून जा जराशी, भेटीची आस आता..
संगे तुझ्याच आहे, होतात भास आता..

तव स्मृतींचा पसारा, उरकून रात्र गेली,
ताजी पहाट मजला, वाटे भकास आता..

चिमणी उडून गेली टाकून त्या पिल्लांना,
माझ्या सवेच तेही, घरटे उदास आता..

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
19 May 2020 - 10:22

[कविता' २०२०] - बिअर मात्र सुरेख होती

बिअर मात्र सुरेख होती

मूळ प्रेर्ना "पोहे मात्र सुरेख झाले" असली तरी पोहे हे चखना म्हणून खाऊ नयेत ही आग्रहाची इंन्ति.

(प्रस्तावना: दोन पेताड मित्रांच्या चोरून केलेल्या "मैफिलीतून" आपल्या सर्वांसाठी ही चिल्ड बिअर)

तळलेले शेंगदाणे विसरलास, म्हणून काय झालं
बिअर मात्र सुरेख होती

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
17 May 2020 - 11:29

[कविता' २०२०] - पोहे मात्र सुरेख झाले

पोहे मात्र सुरेख झाले

(प्रस्तावना: पती पत्नीच्या दैनंदिन "सुसंवादातून" आपल्या सर्वांसाठी हे शब्दांचे खमंग पोहे)

शेंगदाणे तळायचे विसरलीस, म्हणून काय झालं
पोहे मात्र सुरेख झाले

हळद जास्त झाली, म्हणून काय झालं
पोहे मात्र सुरेख झाले

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
16 May 2020 - 21:01

[कविता' २०२०] - शोधू जरा (गझल)

शोधू जरा (गझल)

खिन्न रात्रींचे मुके आक्रंदणे शोधू जरा
चांदण्याने भिजवलेली अंगणे शोधू जरा

खिळखिळ्या खिडक्यांतुनी का रोज ही दिसती भुते?
हरवलेले आपले बुजगावणे शोधू जरा...

वाट चुकलो की नवा पथ पावलांना गवसला
भेटलो इतके खरे, पण- कारणे शोधू जरा

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
16 May 2020 - 10:12

[कविता' २०२०] - आपलं माणूस

आपलं माणूस

प्रत्येकाला हवं असतं,
एक आपलं.. आपलं माणूस.
आर-पार ओळखणारं, समजून-उमजून घेणारं.

खरंतर आपण सांगितलेलं, त्याला काही समजत नाही.
त्यानं सागितलेलं काही, आपण कधी ऐकत नाही.
सगळ्या आपल्या वैतागाचं, ते हक्काचं कचराघर असतं.
अन् सगळं ओतून घेऊन पुन्हा, हसू घेऊन उभं असतं!

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
15 May 2020 - 21:22

[कविता' २०२०] - मुखवटे

मुखवटे

बाहेर पडलो घरातून माणसांच्या घोळक्यात
अचंबित झालो पाहून नाना रूपे.
सुख, दुःख, एकांत सगळे वेगळे प्रत्येकाचे
मुक्या ओठांनी नजर विचारे, "जायचे आहे कुठे?"

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
15 May 2020 - 21:20

[कविता' २०२०] - चौक

चौक

ही कविता उगाच नाही लिहिली
दूर अंतरावरच्या मित्राला साद आहे.
एका आर्त हाकेला 'ओ' आहे
आठवणींच्या रोपट्याला पाणी आहे.

तू ही असाच बोलशील माझ्याशी
राहिलेले आणि साठलेले दोन्हीही.
माध्यमांच्या तकलादू भिंती
समाजाने उखडून टाकल्यावर.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
15 May 2020 - 17:16

[कविता' २०२०] - ......फूल/ पिस्तूल ठेविले.

......फूल/ पिस्तूल ठेविले.

विचारला तू प्रश्न सुगंधी, उत्तरात मी फूल ठेविले
दप्तरात पुस्तके हवी, तिथे कुणी पिस्तूल ठेविले

अंतरधर्मी नाते अपुले, मान्यच नव्हते दुनियेला या
जगलो आपण कसेतरी पण नाव मुला मकबूल ठेविले

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
14 May 2020 - 18:22

[कविता' २०२०] - उचकी

उचकी

आय म्हनायची, “उचकी आली, कोन बरं आठवन काडत आसंल?”
झूट है सब, आटवनीने पोट भरत नाय,
अन आपल्याला कदीबी उचकी येत नाय.

कसल्या आटवनी अन कोनाच्या आटवनी ?
आपल्याला कुनाचिबी आटवन येत नाय,
अन आपली कोनबी आटवन काडत नाय.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
14 May 2020 - 18:18

[कविता' २०२०] - नका जाऊ बाहेर लॉकडाऊनमधी राया (लावणी)

नका जाऊ बाहेर लॉकडाऊनमधी राया (लावणी)

नका जाऊ बाहेर लॉकडाऊनमधी राया..
पुन्हा नाही मिळणार असा एकांत कधी राया..

कोरसः
उठाबशा काढतो हातापाया पडतो.. नका भाईर जावा ओ दाजी
पोलिस मारतील,क्वारंटाईन करतील घरातह्च र्‍हावा ओ दाजी.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
13 May 2020 - 15:19

[कविता' २०२०] - प्रश्न उजेडाचे -- प्रश्न अंधाराचे

प्रश्न उजेडाचे -- प्रश्न अंधाराचे

आकाशाच्या निळाईची पडे रानभूल
प्रकाशाशी जळालेले पाण्याचे अंकुर
थांबावं का थोडं इथे? दिसते का माया?
मरावं का कोणीं? तुझी क्षुधा शमवाया

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
13 May 2020 - 10:21

[कविता' २०२०] - अडगळ

अडगळ

आता खूप साचलेले
नको झाले हे सामान
जागा तेवढीच आहे
याचे राहू देत भान...

आधी आवश्यक आणि
जे जे वाटे उपयोगी
एक वस्तूही त्यांतली
नाही साठवण्याजोगी...

हौस होती, जमवल्या
काही चीजा शोभीवंत
आता फेकून देताना
किती वाटते ना खंत...

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
13 May 2020 - 10:19

[कविता' २०२०] - एकटीच राधिका...

एकटीच राधिका...

एकटीच राधिका द्वारकेस चालली
श्यामध्यास, श्यामस्वप्न, श्यामरंग ल्यायली...

चांदणे तनावरी, चांदणे मनातही
चंद्रिकाच राधिका चांदण्यात नाहली...

श्याम हीच प्रेरणा, श्याम धारणा तिची
प्रेमिकाच राधिका कल्पनेत दंगली...

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
13 May 2020 - 00:35

[कविता' २०२०] - खेळ

खेळ

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
12 May 2020 - 08:28

[कविता' २०२०] - अनर्थ

अनर्थ

"सद्या ए सद्या! काय करसी?
खोलीत सदैव का रे अससी?
सदैव चिंता चेहऱ्यावरती
झुरतोस असा कशासाठी?

भूकतहान का विसरसी?
झोपेमध्ये सदा बोलसी
दिवसाही ना डोळे मिटसी
भाळी आठ्या कशासाठी?

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
11 May 2020 - 21:21

[कविता' २०२०] - भांडण

भांडण

त्यानं तिच्या कडे पाहिलं, तिनं त्याच्याकडे पाहिलं..

पण बोलणं दोघांचं, मनातल्या मनात राहीलं..

उगाचच काढला विषय, तिचं मन तिला खात होतं..

उगाचच वाढवलं आपण, त्याचं मन त्याला समजावत होतं..

आज परत क्षुल्लक कारणांन, त्यांचं भांडण झालं होतं..

आणि भांडणाचं पर्यवसन अबोल्यात झालं होतं..